नव्या वर्षाची सुरूवात, आई-बाबा इथे अबूधाबीत आलेले ….. मग ठरवलं काहितरी वेगळं करायचं . बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यावरून दुबई शहराचं दर्शन करावं असं ठरवलं पण तोच विचार माझ्याआधि अनेकांनी केलेला असावा बहूधा
. मला काही ते बुकिंग मिळालं नाही. मग राहिलं ते अगदी जवळच्या अल -ऐन (Al Ain) या एमिरातीतलं Zoo . मुळात वाळवंटात असे अनेक प्राणी कसे ठेवतात याचे कुतूहल होतेच. मग सर्वानूमते , म्हणजे घरात खरच लहान असलेले बालक आणि माझ्यासारखे वय वाढूनही स्वत:तलं लहान मुल जिवंत ठेवलेल्या मोठ्यांच्या मते प्राणीसंग्रहालय फायनल झाले!!!
जबेल हाफीत (Jabel Hafeet ) पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले ९८८ एकर जमिनीतले हे प्राणीसंग्रहालय पहायला जाताना मला मुलांइतकाच उत्साह वाटत असताना एक जाणवलं की बाल्य आपल्याला सोडून कुठेही जात नाही, लहानपणी राणीच्या बागेत जाताना असेच काही भाव मनात ठेवून मी गेले असावे!!
नेहेमीप्रमाणे गाडीत आधि ’Petrol Full ’ केले गेले, म्हणजे रस्ता चुकला तरी घाबरायला होत नाही मला, आणि नवऱ्याला रस्ते चुकवायची आयती संधी मिळते
प्रवासाच्या पहिल्या पंधरा – वीस मिनिटात Camel Race Track असा बोर्ड दिसला आणि त्या पाठोपाठ शर्यतीसाठी तयारी करत असलेले उंट आणि अरब!!


गाडीचा हॉर्न वाजला की पळण्याचा वेग वाढवणारे उंट पहाणे हा सर्वस्वी नवा अनूभव होता.
तिथून जरा पुढे गेल्यावर आणि एक आश्चर्य आमची वाट पहात होते. आपल्याकडे शेळ्या- मेंढ्या जसे कुंपणात दिसतात तसे जागोजागी उंट दिसत होते. त्यात जवळपास काळा रंग असलेला एक उंट मात्र पहिल्यांदा पहायला मिळाला.
रस्ता एकीकडे वेगवेगळ्या थरात वाळू असलेला वाळवंटाचा आणि एकीकडे प्रचंड हिरवीगार वनराई राखून ’वाळवंट ’ या शब्दाला छेद देणारा….
अल- ऐन शहर कायम आठवेल ते तिथल्या हिरवळीने नटलेल्या सौंदर्यासाठी. मला माझे नासिक क्षणभर आठवून गेले
रस्त्यात आलेला एक राऊंड अबाऊट पाहून zoo आता जवळपास आहे याची खात्री पटली आणि नवऱ्याने चक्क रस्ता चुकवला नाही हे जाणवले
आणि मग समोर आले ते प्राणीसंग्रहालय
…. आता मात्र माझं लिखाणाची फारशी गरज भासणार नाही, कारण फोटोच पुरेसे बोलके आहेत, अर्थात अधून मधून बोलल्याशिवाय मला चैन पडायचे नाहीच हा भाग निराळा …..
Zoo Entrance
Chilean Flamingo
आता मात्र तो प्राणी दिसणार होता ज्याला पहाण्याची मला मोठी उत्सूकता होती!!

ह्या पठ्ठ्याने मात्र कोणाचीही दखल न घेता मस्त ताणून दिली होती….
प्राणीसंग्रहालयात पिंजऱ्यात बंद प्राण्यांना भेटायला ’मोकाट’ सुटलेला मनूष्य ’प्राणी’ येऊन गेल्याचा पुरावा झाडावर सापडला
बिबळ्या महाराजांना काही फोटो काढू द्यायची इच्छा नसावी, ते तरातरा फिरत होते
Jaguar !! आणि हो याला नसेल फोटो काढून घ्यायचा , मी हार मानतेय होय, सापडला किनई कॅमेऱ्यात
पुढे होते Bengal Tiger !!! यांनी काही कोणाला शेवटपर्यंत दर्शन दिले नाही.
कबूतरांचे घरटे बांधणे सुरू…..आम्हालापण Zoo मधे रहायचं पण आमचं आमचं घर बांधून
प्राणीसंग्रहालयात वेळोवेळी होणारा थंडगार पाण्याचा आल्हाददायक वर्षाव
Hedgehogs या निशाचर प्राण्याला मराठीत काय म्हणतात हे कोडं मी सोडवत असताना ’साळिंद्र’ हे उत्तर तात्काळ देऊन ’इथे टाळी घेतली ती नवऱ्याने’ असं म्हणण्यास मला भाग पाडलं
कोण म्हणतं वाळवंट रखरखीत असतं???
Mongoose
मला विलक्षण आवडलेला फोटो, अर्थात हा अजून स्पष्ट यायला हवा होता!!!
या zoo मधे प्राण्यांची घेतली जाणारी काळजी, प्राणीसंग्रहालयातलं प्रसन्न वातावरण निश्चित आवडणारं. एक संपुर्ण दिवस इथे सहज घालवला जाऊ शकतो…. बाजूलाच मुलांना खेळायला असलेली विस्तृत हिरवळ, आणि खेळण्यांची उपलब्धता पहाता वारंवार इथे यावेसे वाटले तर चूक नाही !!!!
Bird Show मधे falcon या UAE च्या राष्ट्रीय पक्ष्याबद्दल अधिक माहिती मिळते. हा शो पहाता आला नाही याची खंत अल ऐन सोडताना आम्हाला वाटत होती!!!
जवळपास पाच तासांची अथक भटकंती आणि अनेक वर्षानी पाहिलेले प्राणीसंग्रहालय….. घरून करून नेलेले पोळी भाजीचे साधेच जेवण पण सगळं कुटूंब एकत्र…. खूप खूप धमाल!!! एकूणात एक अविस्मरणीय सुरूवात एका ’नव्या वर्षाची’
मातीतून सोने उभे करणारे अरब, आणि सोन्याची माती करणारे आपण भारतीय ही अटळ तूलना नेहेमीप्रमाणे मनात येते तशी ती इथेही आलीच!!!
तर मंडळी….. आमची तर नव्या वर्षाची सुरूवात मस्त झालीये, तुम्हा सगळ्यांची झाली असेल अशी आशा आहे.
येणारे हे नवे वर्ष ब्लॉगच्या सगळ्या वाचकांसाठी आणि त्यांच्या कुटूंबियांसठी सुख , समृद्धी आणि समाधान घेऊन येवो अश्या मनापासून सदिच्छा !!!




























wow!!!! zoo tar uttam aahech pan Tanvi tumachya likhanane ajun maja aali .
Navin varshachya anek anek shubhechha, lihit raha…..
as usual all the readers like me are desperately waiting for your new posts….
पियू तूलाही नव्या वर्षाच्या अनेक शुभेच्छा!!!
बघायला पाहिजे प्राणी संग्रहालय, अजूनही तीच गम्मत देत का? बाकी देशी प्राणी संग्रहालयात वरच्या सारख सोन पहायला मिळेल हि अपेक्षा खोटी ठरण्याचीच अपेक्षा करू शकेन.
आम्हा लोकांची मानसिकता अशी (म्हणजे सोन्याची माती करणे) का डेवल्हप झाली याची कारण शोधावी लागतील, लवकर…. फारच गरज आहे बेसिक सुधारणा करण्याची
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
अभिषेक अरे येते लहानपणासारखी मजा अजूनही प्राणीसंग्रहालयात…. म्हणजे मला तरी येते!!! अश्यावेळी प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक आवासात न ठेवता असे कोंडणे कितपत योग्य वगैरे विचार मी दुर ठेवते!!!
नव्या वर्षाच्या तूलाही अनेक शुभेच्छा!!!
मस्त आलेत फोटो. तो हरणांचा तुला विलक्षण आवडलेला फोटो मलाही विलक्षण आवडला
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आवडले नं फोटो… खरच धमाल आली अरे….. नव्या वर्षाची मस्त मस्त सुरूवात एकदम !!!
येत्या नव्या वर्षात आपण सगळे भारतात भेटूया आता एकदा
तूला, अनूला,आदिला आणि काका- काकूंना नव्या वर्षाच्या अनेक शुभेच्छा!!
WIsh you and your family a very happy, healthy and prosperous new year! Hope this will be the best so far.
Photos chhan ale ahet.
Last month madhe amhi katraj snake park la gelo hoto ani 5.10 la tithe pochalo tar kalale ki 5 la ticket counter band hote.
ata parat kadhi muhurt lagtoy kay mahit.
ऋता आभार गं!! आणि तुम्हा सगळ्यांनाही नव्या वर्षाच्या अनेक शुभेच्छा!!
जाउन ये पुन्हा कात्रजला आणि मग फोटो पाठव मला
तन्वी, तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुला नवीन वर्ष आनंदाचे, उत्साहाचे, ईशान आणि गौरीच्या भरपूर गमतीजमतीचे आणि अर्थातच जोरदार blogging चे जाउदे
हरीण आणि जिराफाचे फोटो खूप मस्त
धन्यू अपर्णा
तुम्हालाही नवीन वर्षाच्या मनापासून अनेक अनेक शुभेच्छा!
फोटू मस्त …. नवीन वर्षाची सुरुवात तर मस्त भटकंतीने केलीये ….
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा …..
सचिन अरे आई-बाबा आले आहेत सध्या इथे नं मग काय भटकंती जिंदाबाद
तूलादेखील नवीन वर्षाच्या मनापासून अनेक अनेक शुभेच्छा!
Last week i have visited the Zoo of Mysore, which was earlier visited by me with your mom in my childhood, but now there is no any fun in it and no animals, it is very shameful for the Indians, So watching the Zoo in desert is an beautiful experience.I like to read your blogs & keep it-up. Mama.
मामाजी तुमची कमेंट आणि प्रियेशाच्या आयडीने
… मज्जा एकदम माझ्यासाठी !!!
मला याचीच गंमत वाटतेय की प्रियेशा कसा मोठा झालाय आपला!!
मामा अरे खरच जाम मस्त आहे zoo !! बाकि वर्णन आई-बाबा करतीलच
फोटो जबरा आलेत एकदम… मी उगाच आपला माझा भाईबंद कुठे दिसतो का पाहत होतो!
तुझी बहिण होती की तिथे… तिनेच काढलेत सगळे फोटॊ
हाहाहा