अंक, बाराखडी, गणित, भाषा, इतिहास, भुगोल, विज्ञान, मग जीव नी भौतिक त्यात रसायनाचा घोळ….. बीजगणित, भूमिती, ट्रिगनॉमेट्री नं बिट्री…. साईन न कोसाईन, टॅन न बिन …… ईंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हज…. डबल नं ट्रिपल…. काळ काम न वेगही त्यात….आपली भाषा, साहेबाची भाषा… हिंदी बिंदी मधेमधे….व्याकरणं बिकरणं, नुसतंच प्रकरण….. प्रोजेक्टाईल नी सरळ , रिलेटिव्ह बिलेटिव्ह मोशन की बिशन ….. हालचाल नुसत्याच नावाची नी खरं तर सगळं थबकवणारी …… व्हेक्टर्स बिक्टर्स , डोक्यावरचे बाण….. वर्तूळ नि चौकोन….. इकडे रेषा, तिकडे किरण….. वाकड्यात शिरले की डिगीटल नं ऍनालॉग….. डेटा न फेटा…. बायनरी बियनरी ….. मेकॅनिक्स नं ग्राफिक्स …. कंडक्टर नं नॉनकंडक्टर भलती धुडं … मधे सेमी वाल्यांच रिजर्वेशन चं लफडं ….. मिली सेंटी डेसी मिटर … डेका हेक्टो किलो मिटर… नसती पाठांतर… त्यात मैलाची गणितं …. आर्टस न कॉमर्स…..आम्ही सुखी न तुम्ही दु:खी….. उभ्या दोन रेषा समोरासमोर की कपॅसिटर …आडवं पाडा त्यांना वेड्या वाकड्य़ा ओढा झाली की रेजिस्टर…. डायोड न ट्रायोड, इन्व्हर्टर नं बिन्व्हर्टर ….
आमचं सायन्स तुमचं सायन्स….. तुम्ही डॉक्टर, तुम्ही वकील .. तुमची जात वेगळी आणि आमची वेगळी !!! तुमचे विषय सोप्पे आणि आमची मेली ब्रॅंचच अवघड…… तुम्ही करा मज्जा नं आम्हाला सजा….
एकाचे एक विषय नं एकाचे एक…. तुमचा अभ्यास आमचा अभ्यास… तुमची डिग्री नं आमची डिग्री…… तुमची वर्ष गेली नं आमचीही गेली……
आम्हाला नोकरी मिळते तुम्हाला नोकरी मिळते….. कधी कधी आमचं नं तुमचं ऑफिसही एकच ….. तुमच्या डिपार्ट्मेंटला काम कमी नं आमच्यावर जबाबदारी भारी…… तुमचं लग्न होतं नं आमचं ही लग्न होतं…. तुम्हाला पोरं होतात नं आम्हालाही पोरं होतात… आयुष्याच्या वेव्हज एकाच दिशेला वहातात…. ए सी असो नं डि सी असो… त्यांचा रस्ता ठरलेला …..
नाती नं गोती जपा फार….. लोकांच्या वागण्याचा भलता भार….. एक न धड चिंध्याच फार …. आमचं माहेर तुमचं सासर ….. आमची घरं तुमची घरं…. आमचा किराणा, तुमचा किराणा ….. आमच्या मुलांचे रिजल्ट नं तुमचे ते निकाल…..आम्ही घरं घेतो तुम्हीही घेता घरं …. आमचं महाबळेश्वर नं तुमचं माथेरान… लंडन बिंडनला तिकीटं फार…..
दमछाक करताना तुम्हीही दमता… दमछाक करताना आम्हालाही थकवा….. आयुष्याचा अर्थ शोधतो आम्ही…. अर्थात आयूष्याला शोधताना रमताय तुम्ही….
आयुष्याची गणितं म्हणे तुम्ही सोडवता… आयूष्याची गणितं मग आम्हिही सोडवतोच….
गणितात असतं काय काय…. अधिक नं उणे….भागाकार नं गुणाकार…. बालपणीच्या वर्गात शिकवतात बाई…. त्यांच्यावर विश्वासायची आपल्याला घाई….
प्रत्येक जण एक अंक असतो खरा…. पूर्णांक असो किंवा अपूर्णांकच बरा…. काही गोष्टी जोडतो काही वजा करतो….. घातांक बितांक शोधायचेच नसतात… पुस्तकाच्या बाहेर सांगा ते तसेही कुठे दिसतात??? वर्गमूळ नं घनमूळ की नुसतं खूळ …..
प्रश्न पडतात आम्हाला बरं , वाटतं तुमचंही असचं असतं हेच एक खरं…..
आयुष्यात गणिताला एकच फुटते वाट…. भागाकाराच्या रस्त्याचा भलताच थाट …..
आयुष्य स्वत:च होतो मग भाज्य एक… भाजक म्हणजे आपणच अंक नेक….. अंक जितका मोठा भागाकार तितका सोपा… खूप पायऱ्या उतरायच्या नाहीत, उधाऱ्या उसनवाऱ्या करायच्या नाहीत……
अंक असू देत कुठलाही म्हणा….. नियम हाच गणिताचा कणा… पायऱ्यांना इथे मार्क असतात….. चुकारपणाच्या वाटा नसतात ….
काहीतरी भाग मग आम्ही देतो….. वजाबाक्या बिक्या करत असतो…. एक दरी पार की पुढची खाई ओढायची…. सारं बळ्ं एकवटत पुन्हा उडी मारायची…. आमचं ते असं नं तुमचंही असंच….. भागाकारात गुणाकार.. … गुणाकाराचा एक साक्षात्कार…. आम्ही नं तुम्ही रस्ते तेव्हढे वेगळे, आकडेच काय ते नवे …… तुमचं तेच नं आमचंही तेच की …..
गुणाकाराची वजाबाकी …. हे बाकि नं ते ही बाकि…..
आयुष्याचं संचित वर हळूहळू साठत जातं …..स्वत:लाच स्वत:ने भागायचं वळणं येतं….. हा भाग असतो एक भोग बरं का ….. त्याला चुकवणं आपल्याच्याने खरय का????
अंकातून अंक वजा मग होतो…. संचिताला एक अंक जोडला जातो….. ह्याचं संचित , त्याचं संचित…. आमचं वेगळं … तुमचं पुन्हा वेगळं….
तळाशी उरतं त्याला मग ’बाकी’ म्हणतात…… भेदाभेदाची गणितं इथे येऊन विरतात…..
गोल गोल आकडे फेर धरतात…. शुन्यातून विश्व उगाच का म्हणतात !!!!!
पुन्हा एकदा चौकार..एकदम झकास !!
थॅंक्य़ु माउ
तन्वीताई, तुला साष्टांग नमस्कार.
अतिशय सुंदर लिहिलेस. आणि खरे पण. आपल्याच मनात कुठेतरि खोल रुतून बसलेले विचार समोर दिस्तहेत असे वाटते.
अरूणाताई अहो ’तन्वीताई’ म्हणताय
नको ’तन्वीच’ म्हणा …
मनापासून आभार प्रतिक्रीयेसाठी ….
aaishappath…. kay he… mastach jamlay “ganit” aayushyach… tasa maza nawadatach vishay hota …..mala aayushyache ganitahi asech vatate… dukhavanrya goshtina nehmi vaja”baki”ta theva… ni sukhachya kshnanchi matra berijch kara…..
पुजा धन्य़ु गं…..
कसलासा इझम नाही का गं?
इझम नं बिझम … लिंका फार
apratim taidya…………apratim…..
मला हा ब्लॉग खूप आवडला..
ब्लॉग वरील माहिती उत्कृष्ट रित्या मांडली आहे.
माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या ब्लॉग ला विझिट द्यायला विसरू नकोस..
http://themarathi-blog.blogspot.in/
तन्मय आभार आणि ब्लॉगवर स्वागत
… तुझा ब्लॉग बघतेय …. फेसबूकच्या स्टेट्स ला बोल्ड अक्षरात करायला शिकलेय नुकतेच तिथून
सरशी तो फारशी… !!
एकदम मस्त!
एक दरी पार …. की लगेच पुढची ओढायची घाई फार… आपण काही थांबतच नाही…
बाकी आयुष्याच्या संचिताची भर अव्याहत सुरूच !
हो ना बयो…. आपण जाम थांबत नाही, दमून जाऊ हवे तर मगर रुकनेकाच नय
आभार गं ….
अप्रतिम!!!!
खूप दिवसापासून तुमचा ब्लॉग वाचतेय… पण अजून कधी प्रतिक्रिया दिली नव्हती… अतिशय सुंदर लिहिता तुम्ही…
नीला आभार आणि ब्लॉगवर स्वागत
इतका वेळ का लावला प्रतिक्रिया द्यायला माहित्ये? कारण ग्रेटेस्ट पोस्ट आहे ही. वा छान मस्त वाली टिपिकल प्रतिक्रिया नाही देऊ शकत. किंबहुना काय प्रतिक्रिया देऊ तेच कळत नाही.. !!!
अप्रतिम !! निःशब्द !!
ग्रेटेस्ट पोस्ट … हाहा …
इतका वेळ का लावला प्रतिक्रीया द्यायला तू हा प्रश्न मलाही पडलाच
मला वाटलं मी नेहेमीप्रमाणे अगम्य बडबड केली की काय
अरे एका शेजारणीशी (कॉमर्स वालीये ती ) बोलत होते…. तेच ते विषय बोलत होतो आम्ही… मग वाटलं आयला शिकताना वगैरे कसले भेदाभेद करतो आपण…. आयुष्य एकाच वाटेने नेणार असते आपल्याला…. भेद संपणारच असतात….
fantastic….amazing….too good.
आभार गं ….