५ मार्च २००९ …… ’सहजच’ सुरू केलेलं ब्लॉगिंग !!
५ मार्च २०१२ ……. या प्रवासाला होता होता तीन वर्ष पुर्ण झाली.
ब्लॉगच्या पहिल्या वाढदिवसाला एक पोस्ट लिहीली .
दुसऱ्या वाढदिवसालाही एक पोस्ट लिहीली.
नेहेमीचाच डायलॉग आजही पुन्हा म्हणावा लागेल ….
खरं तर माझा आरंभशुर स्वभाव पहाता हा ब्लॉग गेले तीन वर्ष टिकाव धरून आहे याचेच मला कधी कधी आश्चर्य़ वाटते. पण एक खरेय की अधून मधून मला येणारे कंटाळ्याचे लहानमोठे झटके वगळता ब्लॉगाची तब्येत ठीकच किंवा उत्तमच आहे म्हणावी लागेल.
गेल्या वर्षभरात ब्लॉगर्स आणि वाचकांच्या रुपात जोडली गेलेली बरीच नवी नावं/ नाती , देउळ या पोस्टची कृषीवलच्या कलासक्त पुरवणीतली दखल ह्या काही विशेष बाबी ….
…. नवी नाती जोडली जातानी जुनी तशीच टिकून आहेत याचा आनंद खरच भरपुर आहे.
यावेळेस खूप काही बोलणार नाही ( खरं तर गेल्या ३-४ दिवसात मानेने पुकारलेल्या असहकारामूळे डॉक्टरांनी लॅपटॉपला हात लावायला देखील मनाई केलेली आहे… मगर आजका दिन खास है ना
) … छोटीशी पोस्ट आणि नोंद एक …..
मंडळी या ब्लॉगवर , इथल्या धडपडणाऱ्या कधी जमणाऱ्या अक्षरांवर प्रेम करणाऱ्या माझ्या कुटूंबियांचे, ब्लॉगर मित्र मंडळींचे, कमेंटणाऱ्या आणि न कमेंटणाऱ्या वाचक मंडळींचे सगळ्यांचे मन:पुर्वक आभार!!!!
तुम्ही सगळे नसता तर मी खरच टिकले नसते इथे …..
जय ब्लॉगिंग !!!!!!!!!!!!!

अभिनंदन!
महेंद्रजी तीन वर्ष झाली
.. माझाच विश्वास बसत नाहीये खरं तर….
या प्रवासात लिहिताना, मनातलं व्यक्त होताना तुम्ही कायम सोबत केलीत, धडपडताना नेहेमी सावरून घेतले… आधारासाठी तीन वर्षापुर्वी जितकी तुमची मदत मागत होते तितक्याच विश्वासाने आजही बघता येतेय, ही मोठी बाब आहे
अभिनंदन.. अभिनंदन… अभिनंदन…!!!
‘सहजच’ ची वाटचाल अशीच चालू राहो …खूप खूप शुभेच्छा …
जय ब्लॉगिंग !!!!!!!!!!!!!
आभार आभार आभार रे देवा
तुम्ही सगळी मुलं च गायब होऊ नका बरं… त्याशिवाय जय ब्लॉगिंग ला अर्थ नाही फारसा…
लई झ्याक चाललंय.
चाललय म्हणायचं चुकत माकत
आभार रे….
>>>तुम्ही सगळे नसता तर मी खरच टिकले नसते इथे …..
कसचं कसचं
भरभरुन अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा !!
हाहा
कसचं कसचं
आभार रे पोरा….
अभिनंदन …… वटवृक्ष होऊ देत आता याचा ….
परत तेच सांगतोय पुस्तक येऊ देत आता.
सचिन … पुस्तक
अरे आहे ते झेपत नाही कधी कधी, नवा व्याप वाढवू म्हणतोस … देखेंगे
आभार रे….
अभिनंदन…!!! ‘सहजच’ च्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!!!
मन:पुर्वक आभार सिद्धार्थ
अभिनंदन! असंच सहजच लिहित रहा ग!
नक्कीच गं गौराई
खूप खूप आभार
अभिनंदन ताई आणि ब्लॉगला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
असेच भरपूर वाढदिवस साजरे होत राहोत!
होय आणि जितके शक्य आहे तितके निश्चित टीकणार, नाहितर माझा भाउ रागावेल
अभिनंदन.
मन:पुर्वक आभार
जियो हजारों साल…साल के दिन हो पचास हजार ! अभिनंदन !
मनापासून धन्य़ु अनघा
खरं सांगू माझाच विश्वास बसत नाही बरेचदा मी अजूनही इथे येतेये आनंदाने , आणि मला खरच कंटाळा आलेला नाही
मस्त मस्त… खूप खूप अभिनंदन. लिहिते रहा
आभार रे सुहास
>>लिहिते रहा
… येस्स … लिहिते आहेच (अधून मधून का होइना
), तुम्ही सगळे आहात सोबत तोवर …
Manapaasun abhinandan. Ashich (kinva ya peksha jaast vegane) ghod-daud chalu rahu det ya mannapurvak shubheccha!
ऋता आभार गं
घोडदौड
… अगं कुटूंबाचा जराही वेळ कमी न करता , स्वत:लाही निराश न करता हा उपद्वाप सांभाळण्याचा खटाटोप करतेय खरा… बघूया जितके दिवस चालतोय आनंदाने तोवर सुरू ठेवणार निश्चित
अभिनंदन! आणि शुभेच्छा!
मन:पुर्वक आभार प्राची
Congratulations n Celebrations..!!!
आभार गं सीया…. आणि हो celebrations नक्की
मनापासून अभिनंदन तन्वी!
धन्यवाद विनायक
abhinandan aani khup khup subecha!
मन:पुर्वक आभार प्रसाद
मनापासून अभिनंदन. आणि हा प्रवास असाच यशस्वीपणे चालू राहॊ ही शुभेच्छा आणि आशिर्वाद पण.
लवकर बरी हो आणि लिहिती रहा.:-))
खूप खूप आभार अरूणाताई
मस्ती, दंगा भरपुर करतो आम्ही इथे पण तुम्ही सगळे असे मनापासून सावरून घेता , डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवता , त्याचे मोल खरच खूप आहे
लवकर बरी होण्याचा प्रयत्न करतेय , काहितरी खरच बिघडवून घेतल्याचे दिसतेय मानेने यावेळेस… जरा डॉक्टरांची देणी देउन येते
सही जवाब !!! अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!
जय ब्लॉगिंग !!!!!!!!!
जय ब्लॉगिंग !!
टिकले बघ तीन वर्ष
Congratulations Tanvi
मन:पुर्वक आभार आणि ब्लॉगवर स्वागत अक्षया
अभिनंदन गं बयो! आणि जय ब्लॉगिंग!
येस बयो, जय ब्लॉगिंग
धन्य़ू गं
तीन वर्ष झाले ही खरच गंमत वाटतेय मला.
मस्तच, ब्लॉगिंग धर्म वाढवावा ! जय ब्लॉगिंग. खूप खूप अभिनंदन
मनापासून आभार ओंकार
खरच, जय ब्लॉगिंग !!
अभिनंदन तायडे…
धन्यू आनंदा