बीजं….

 

मनात काहितरी विचार आले आणि अलगद ते कागदावर उतरले…. मी जे लिहीले होते ते वाचून आश्चर्य वाटण्याची माझ्यावरच वेळ आली होती ….

तेव्हा वाटलं :

लेखणीने सात्त्विकतेचा
बुरखा उतरवून ठेवला
अन
पडद्यामागच्या शब्दांनी
कागदावर प्रकट डाव मांडला !!

आधि परके वाटलेले माझेच शब्द पुन्हा वाचले आणि आपलेसे वाटू लागले ते मग….

वेदनेनं वांझोटं असू नये
आणि वैफल्यानेही षंढ नसावं,
एकत्र येऊदे दोघांनाही
त्यातूनच आशेचं  ’बीज ’ रूजावं !!

आपण म्हणतो नं , When the going gets tough the tough gets going :)

(पुन्हा एकवार तेच म्हणेन की असलं काही मनात उमटणं किंवा मनात येतं ते शब्दापर्यंत पोहोचणं यात मला अमृता प्रीतम सापडते !!)

फारश्या सोवळ्या नसलेल्या शब्दांचं इतकं प्रकटं माझ्या मनात येणं हे मलाच नवीन असल्याने अर्थातच अगदी भीत भीत पोस्टतेय हे!! :)

About these ads

18 thoughts on “बीजं….

  1. तन्वे, जे मनात येतं ते कागदावर उतरवलं तर ते मनाला अधिक भिडतं हे तर खरंच.
    उगाच सोवळ्या शब्दांचं आवरण घेतल्यावर त्यातून थेट भिडणारं फार कमी येतं….हा माझा अनुभव.

    मला हे खूप आवडलं….माझं वाटलं.

    (आयुष्याने फार दाखवल्याने हे असं बंधन, मला स्वत:ला फार फार घालून घ्यावं लागतं.)

  2. अमृता प्रीतमच वाचलं मी,
    पुरता अनुभव नाही येत अगदी; जोवर रखरखीत विस्तव अंगचटी येत नाही. पण जसं वाचत जातो, तसं निराश न होता त्याने वेगळंच बळ अंगी चढतं. आसरा लाभतो, आपल्या अनवट भावनांना तिच्या शब्दांत नकळतच. (जड निरर्थक शब्दांना दुर्लक्षून दे.. आणि :-))

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s