झोप …

झोप …मोठा सेंसिटिव विषय आहे आमच्या घरात….. म्हणजे मला आणि मुलाला अतिशय कमी झोपायला आवडते (ज्याला आम्ही quality झोप म्हणतो) आणि नवर्‍याला आणि मुलीला प्रचंड झोप येते. आमच्या सरळ सरळ दोन विरोधी पार्ट्या होतात… मग बाकी कितीही एकमत असले तरी झोपेचा विषय निघाला की वाद सुरु होतात. म्हणजे रात्रीचे नऊ वाजले की नवरा घड्याळ बघायला लागतो…. आणि सकाळी मुलाला शाळा आहे रे !!! झोपा आता….. वगैरे त्याचे पेटेंटेड वाक्य यायला लागली की आली याला झोप हे आम्ही ओळखतो.

त्यातही मग मुलाला झोपवायला म्हणुन हे महाराज त्याला बेडरुममधे नेतात  आणि पाचच मिनिटात “मम्मा …बाबा झोपला गं!!!” असे चिरंजिव सांगतात. मला स्वत:ला निद्रादेवी न वाटता निद्राराक्षस वाटतो. म्हणजे बघा ना…उद्या पेपर आहे, बराच अभ्यास बाकी आहे आणि आपले डोळे प्रचंड जड झाले आहेत. आपण मोठ्या मुश्किलिने काहीतरी एकाग्रचित्तने वाचायचा प्रयत्न करतोय आणि आपल्या डोक्यात काहीही प्रकाश पडत नाहीये….हा किती common सिन आहे.  कट टु.…… परिक्षा संपलेली आहे…… सुट्टीचा पहिला दिवस….. उद्या मी खुप वेळ झोपणार आहे हे आपण आधिच डिक्लेअर केलेलं आहे…… आणि पहाटे पहाटे आपल्याला जाग येते, बरं नुसतेच डोळे उघडत नाहीत तर टक्क जाग येते. नंतर काय either अंथरुणात लोळत पडा नाहीतर चरफडत उठा. हीच बाब नौकरीबाबतही, weekly off  ला नेमकी सकाळीच जाग येते. ही तर मोठ्यांची गत… पण कार्टेही सुट्टीच्या दिवशी न उठवता उठतात आणि आपल्यालाही उठवतात.

आमच्या घरात माझ्या नवर्‍याची ८-१० तास झोपुनही झोप पुर्ण होत नाही त्यामुळे त्याला नाइलाजाने उरलेल्या झोपेचा कोटा कंपनीच्या बसमधे पुर्ण करावा लागतो. अनेकवेळा डोक्याला टेंगुळ येउनही हा पठ्ठ्या काही ऐकत नाही. एकदा एक नविन रुजु झालेली मुलगी बसमधे होती. जागा नसल्यामुळे हे महाराज तिच्याशेजारी बसले आणि बस सुरु झाल्या झाल्या ह्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली. त्यातही रस्त्यावरच्या सगळ्या खड्ड्यांमधुन आपली बस गेलीच पाहीजे हा ड्रायवरचा अट्टहास ….. ती बिचारी मुलगी सरकत सरकत आता खिडकीतून खाली पडेल की काय असे वाटत होते….हा झोपलेला नागोबा बसच्या हेलकाव्यांबरोबर मस्त डोलत होता. हा तिच्या अंगावर पडेल की नाही यावर म्हणे त्यादिवशी बसमधे बेटिंग झाले. अशिच माझी एक झोपाळू मैत्रिण…परिक्षेच्या दिवसात हिला रात्री जागून अभ्यास करण्याची हुक्की यायची. मग हिला जागं ठेवण्याची जबाबदारी आम्ही वाटून घ्यायचो. मांडीवर पुस्तक ठेऊन डुलक्या घेणार्‍या डोक्याला हाताचा आधार देऊन ही बसली की हमखास झोपलेली असायची….मग धक्का द्यावा लागायचा…..जरा जागी झाली की आरडाओरडा सुरु ’ ते कपड्यांना लावायचे चिमटे लावा रे माझ्या पापण्यांना…..’

असाच एक किस्सा माझ्या बाबांचा….आमचे एक परिचित एकदा त्यांचा कुत्रा घेऊन आले होते( लोकं कुत्रा का पाळतात???) ….हे गृहस्थ तर त्यांच्या घरी परत गेले पण कुत्रा मागे राहिला. रात्री केव्हातरी आईला आवाजाने जाग आली म्हणून शोधले तर तोपर्यंत घरात या कुत्र्याने मोठा गोंधळ घालून ठेवला होता. मग आरडाओरडा…आवाज करत मी आणि आईने त्याला घराबाहेर काढले. सगळ घर आवरले. हे होत असतांना बाबांच्या ज्या पलंगाखाली लपुन कुत्रा घरात राहिला होता त्यावर ते निवांत झोपलेले होते.

झोपणार्‍यांमधेही अनेक प्रकार आहेत….सतत वळवळ करणारे आणि घोरणारे हे त्यातले त्रासदायक टाईप. बरं हे घोरणारे लोक सकाळी उठल्यावर आपण झोपेत घोरतो हे अमान्य का करतात हे एक न उलगडलेले कोडे आहे. त्यातही ट्रेनमधे, बसमधे, विशेषत: कोणाच्या घरी गेल्यावर झोपु शकणार्‍या लोकांचा मला हेवा वाटतो. या लोकांची झोप आवाज, डास असल्या यत्किष्चित घटकांमुळे मोडत नाही. हुकुमी झोप हा असाच एक प्रकार…. हे लोक त्यांना केव्हाही झोप म्हटले की मिनिटभरात गाढ झोपेत असतात. ट्रेनमधे झोपेच्या नादात आपले स्टेशन सोडुन पुढे जाण्याच्या कथाही घडतात अश्याच. दुपारची झोप हा ही एक प्रकार….. माझं डोकं दुपारी झोपले तर जडं होतं आणि नवर्‍याचं नाही झोपला तरं. आहे की नाही भांडणाचा मुद्दा.

हे इंग्लिश्मधे टाईप करुन मराठी लिहिणे किती जिकिरिचे काम आहे नाही!!!! आई गं!!! जाम झोप आलीये……Good Night.  

Advertisements

13 thoughts on “झोप …

 1. घोरणारे लोकं कधिच मान्य करित नाहित.. हे अगदी खरं.. मी पण कधिच मान्य करित नाही. एकदा माझ्या सौ. ने टेप करुन ठेवलं होतं घ्रोरणं.. आणि मला दुसऱ्या दिवशी ऐकवलं.. अर्थात मी सपशेल नाकरलं की तो माझा आवाज आहे म्हणुन.. आता व्हिडिओ रेकॉर्डींग करुन ठेवणार आहेत म्हणे.. मी तर कॅमेराच लपवुन ठेवलाय सध्या.. 🙂

  छानच जमलाय लेख..

 2. Sahee. Mast aahe post. te pariksheche prakaran agdi khare aahe han. pepar chya kalat barobar zop yete, aani jevha aapan chhan paiki zopayache ase tharavato n tevha zopach yet naahi.
  Dahavichya parikshela mi fan a.c. sagale band karoon thevayaci ka tar zop yayala nako mhanoon aani pariksha sampalyavar evdhe prayatn karoonahi zop naahi yayachi.
  BTW ekdam chhan aahe post.

  • आशिष….हे कलेक्शन नाही… sorry संग्रह….हे सगळे माझे स्वत:चे अनुभव मी शब्दांकित केलेले आहेत…म्हणुतच पहिल्या पानावर COPYRITE चा tag टाकु शकले…

 3. हे अगदी खरे हं.माझे पण दुपारी झोपले की डोके चढते आणि नवरोजींचे न झोपले तर..आणि घोरणे म्हणजे केवळ वादाच विषय..घोरुन झाल्यावर पठ्ठ्या तरी म्हणतो की माझी झोपच नाही झाली..म्हणजे हा रात्रभर जागाच होता का हे मला नेहमी पडणार कोडच आहे.[शेजारी घोरत कोण होतं???]

  अजुन एक सांगावेसे वाटते की माझे चुलत सास~या बददल सगळे सांगतात की ते कधी ही केंव्हाही झोपायचे.अगदी देवघरात पुजा करता करता पण …मस्त छानशी झोप काढायचे..कमाल आहे ना…बाकी लेख हलका फ़ुलका…मस्त…फ़्रेश…

  • कविता आभार…..सध्या तरी ब्लॉगिंग जरा कमी केलेले आहे..पण काही विषय छळायला लागला की मात्र तो इथे व्यक्त होइलच आपोआप…:)

 4. झोप, आळस, कंटाळा कित्ती मस्त विषय आहेत ना लिहायला. ह्या झोपेपायी एक सो एक भारी किस्से होतात. तो बसवाला किस्सा भारी आहे.. हेहे… मला सुद्धा आता अश्या विषयांवर लिहायला हवे. बघुया कोणी वाचते का ते.

 5. @रोहन अरे लिही की मग फक्त खादाडीच्या पोस्ट टाकतोस नंतर येणारी झोप यावर हि होऊ दे…
  @तन्वी ताई या झोपेचे अन माझ काय वाकड आहे देव जाने…नाही म्हणजे झोप येते पण अवेळी अन तीही खूप..माझी पहिलीच पोस्ट आहे यावर..वेळ मिळाला तर वाच…

 6. मलाही फारसं झोपायला आवडत नाही. पण तरीही निद्रादेवी माझ्यावर जरा जास्तच प्रसन्न आहे. मला कधीही, कुठेही आणि केव्हाही झोप येते. बस स्टॉपवर तिकडच्या दांड्याला टेकून उभा असतानाही मला एकदा झोप लागली होती!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s