दात………..

’पडला का रे??’…….’कितने दिन हिलने वाला है? बच्चे को दर्द हो रहा है क्या?’…….’मम्मा!! हाऊ मेनी डेज विल ईट टेक?’ वगैरे अनेक प्रश्नांचे काल उत्तर मिळाले. हो ! आमच्या चिरंजिवांचा दुधाच्या दातांपैकी पहिला दात पडला. आता यात काय नविन, सगळ्यांचेच दात पडतात आणि नविन येतात असे तुम्हाला वाटण्याची दाट (चुकुन आधि दात असेच type केले होते….) शक्यता आहे….. पण एक आई म्हणुन या घटनेचे महत्व समजायला आईच व्हावे लागते( ऊसके लिये माँ का दिल होना चाहिये ….). मुलाला पालथे पडता येणे, तो रांगणे, दात येणे, चालता बोलता येणे या टप्प्यांप्रमाणेच दात पडणे सुद्धा ’Something must be celebrated..’ याची जाणिव झाली.

तर झाले असे की माझा मुलगा आता साडे सहा वर्षाचा झालाय…. त्याच्या एका मित्राच्या (त्यांच्या भाषेत friend च्या) आईने एक दिवस मला विचारले “ईसके दात गिरने लगे क्या?” आणि आमच्या डोक्यात प्रकाश पडला अरे हो ! आता दात पडतील नाही का याचे. मग किती मोठा झाला रे शोनुल्या वगैरे म्हणत त्याचे दात जरा तपासले…काही नाही सगळे आपापल्या जागी ठाम ऊभे होते. त्यानंतर २/३ महिने गेले तरी काही चिन्ह नाही, तो विषयही डोक्यातुन गेला.. आणि एक दिवस अचानक राजे समोर उभे म्हणे “ मम्मा हा जो फ़्रंट चा दात आहे ना तो मूव होतोय बघ!!” हलला रे हलला !! मग आजी आजोबा , मावशी सगळ्यांना फोनवर बातमी देण्यात आली. काय पण सल्ले दिले त्याच्या मित्रांनी….. एक म्हणे पेन्सिल शार्प करुन ती त्या हलणार्‍या दाताच्या मागुन टाक आणि त्याला पुश कर… दातावर रुमाल टाक आणि हळुच दात ओढ…ई.ई. मग आमचे सल्ले ’बाळा यातलं काहीही करु नको”.. करत करत ४/५ दिवस गेले पण हलत हलत त्या दाताने किल्ला लढवला, जाम पडला नाही तो.

’मम्मा ब्रश जपुन करुन दे’, ’मला पोळी नाही खाता येणार..इडली दे’, या प्रकारात मोडणारे यतेच्छ लाड करुन घेतले कार्ट्याने.

रोज सगळ्यांचा तोच प्रश्न ’पडला का रे?’. त्या निमित्ताने आमचीही एकदा बालपणाची उजळणी. हो! मी आणि नवर्‍यानी या विषयावर काही कधी चर्चा केलेली नव्हती….तुझे दात पडायला कधी सुरुवात झाली, तुला काही त्रास झाला होता का? या यादीत चिरंजिवांच्या प्रश्नांची भरं… तुमचे पण दात असेच हलायचे का? मग आता माझा दात परत कधी येइल? आता next कोणता दात् पडणार? वरचा की खालचा? तुझे दात कोणत्या सिक्वेंस नी पडले होते?( काय सांगणार कपाळ!! कोणाला आठवतो हा सिक्वेंस!!) तुझा आणि बाबाच्या दात पडण्याचा सिक्वेंस सेम होता का?( सरळ हो म्हणुन उ्त्तर दिलं.) बाप रे!! किती ते संशोधन…..

मला आठवतयं आमच्या लहानपणी दात पडल्यावर तो आम्ही वर उंच फेकत असु,त्यामुळे म्हणे नवीन दात लवकर येतो….नवीन येणार्‍या दाताला जिभ लावायची नाही,तसे केले तर तो वाकडा येतो हा सल्ला न जुमानल्यामुळे मी सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लाजवेल अ्श्या वेडया वाकडया शिखरांची माळ तोंडात बाळगुन आहे. आणि हे असे दात लकी माणसांचे असतात हे आधिच नवर्‍याला सांगुन ठेवले आहे.

पण मुलगा महा वात्रट त्याने आधिच जाहीर केलेय की मम्मा मला तुझ्या सारखे दात यायला नको ..बाबाचे दात मस्त आहेत ,मला तसेच हवेत. तथास्तु म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता.

तर !! काल बाळराजे शाळेतुन घरी आले तेच विजयी मुद्रा घेऊन… त्या हलणार्‍या दाताने काल अखेर हार मानली आणि तो शरण आला. आता हे झाले शाळेत त्यामुळे मला त्या घटनेची साक्षीदार नाही होता आले.पण त्या दाताचे कलेवर एका टिश्यु पेपरमधे भरुन नर्स नी दिले आहे…..आता तो आम्ही उंच फेकणार आहोत. पुढचा दात लवकर आला पाहिजे ना!! सद्ध्या आम्ही त्याला “ए दातपडक्या!!”, “दातपडी माऊ” आणि “तुझा दात उंदराने नेला” वगैरे चिडवतोय.

काय खुश आहे पिल्लु माझं !! अनेक फोटो काढुन झालेत..आणि सगळ्यात चीssssssssज करुन हसणे सुरु आहे. हो आता चेहर्‍यातला गोडवा थोडा कमी झालाय हे माझे मत. ’पण आता मी मोठा झालोय मम्मा” हे जेव्हा तो सांगतो ना तेव्हा खर सांगु त्या पडलेल्या दातासहित खुप गोड दिसतो. आणि एक आई म्हणुन नाही म्हटल तरी डोळे भरुन येतात “खरच पिल्लं कधी मोठी होतात कळतच नाही!!” एक दिवस असाच हा मुलगा शिक्षणासाठी, नौकरीसाठी कुठे दुरही जाईल तेव्हा माझ्याकडे असतील त्याच्या गोड आठवणी आणि हे असे अनेक फोटो अल्बम. त्याला खिडकीत उभे करुन त्याचे हसणारे फोटो राहिलेत की काढायचे आणि हो दोन्ही मुलांचा दात दाखवणारा फोटोही काढते आता…….हवाय मला माझ्याकडे 🙂

Advertisements

15 thoughts on “दात………..

   • हा सँटाक्लॉजसारखाच एक प्रकार आहे. मुलं आपले पडलेले दात जपून ठेवतात. सहसा हे दात झोपण्याआधी उशीखाली ठेवले जातात. मग रात्री ही Tooth Fairy येते आणि हे दात घेऊन जाते. आणि या दातांच्या बदल्यात मुलांना पैसे किंवा भेटवस्तू देते.

 1. Zakas zalay lekh— dibrya tuzya mammachya padanllya dataanchi mi sakshidar aahe bare ka? hi tuzi mamma kiti mulanmadhe guntaliy pratek lekhatun kalat—- tu asach khup khup motha ho tuzya padalelya datasakat harek goshtich celebration hou de — yashaswi ho—- tula motha hotana pahatana tuzya Piyuchyahi dolyat pani yet— 4–5 minutancha asalela tu tuzya aaichya kushit janyachyahi aadhi tuzya Piyu javal hotas—-mothya mothya dolyani sagalikade baghat— he navin jag kiti dolyat samavun gheu ase zalela—–khup motha ho beta—–
  Aani mazi “DATPADI MAU ———- KHAU —-“” LAVKAR i Indiat ye— tuzi sagale jan vat pahata aahet.
  Chan zalay lekh—-

 2. @ अपर्णा Tooth Fairy म्हणजे एक परी असते, तेथिल लोकांच्या मते लहान मुलांचा दात पडला की तो झोपतान उशीखाली ठेवायचा. एकदा आपण झोपी गेलो की ही परी येते आणी आपला दात घेउन जाते, आणी त्याच्या बदलात खाउ आणी भेटवस्तु वगेरे देते.. ! पण मला आणखी हे कळल नाही ही Tooth Fairy या लहान मुलांच्या पडलेल्या दातांच काय करते…. 😀

  • अजय धन्यवाद माहिती आणि प्रतिक्रीया दोहोंबद्दल…..जुन्या पोस्टला आलेल्या प्रतिक्रीया नेहेमी जास्त आनंद देतात…

 3. मस्त जमला आहे लेख. मी लहान असताना पडलेले दात तुळशीत टाकणे किंवा कौलांवर उडविणे असे उद्योग होते 🙂

 4. अगं हो की आपलं अगदी सेम आहे की…..!आणि आताच मला असाही सा़आत्कार झालाय हाच नाही इतरही अनेक असे विषय असे आहेत जे मला सुचले पण लिहायला वेळ नाही मिळाला. आपण बाई आणि आई म्हणूनही सेम आहोत अशी माझी तरी खात्री पटलिय. 🙂 बाय दी वे आमचा सोमवारी शाळेत दात पडलाच अखेर. आई शप्पथ! आणि चक्क आम्हिही त्याचं फ़ोटोसेशन केलंय. झालंय काय सध्या दुसर्या बाळाचे दात येण्याची आणि पहिल्या बाळाची दात पडण्याची प्रक्रिया एकदमच सुरू आहे. 🙂 घरात त्यामुळे दातांच्या किस्स्यांचं पिक मुबलक आहे. मला तर पडक्या दातांच्या सानुचा फ़ोटोही टाकायचा मोह होत होता.

  ता.क.- पडक्या दाताचा “बेळगाव प्रश्न” झालाय. काहीजण म्हणताय की जमिनीत पुरून टाक तर काहीजण सांगतायत की उंच उडव. पिल्लू माझं कन्फ़्युज झालंय. बरं चुकिचं काही करावं तर नंतर येणारा दात म्हणे मॊन्स्टरसारखा येतो. असो, लेकिनं यावर भलताच तोडगा काढलाय. आता ख्रिसमस येतोय नां जवळ तर म्हणे आपण तो दात मोज्यात घालून ठेवू म्हणजे सांता तो घेऊन जाईल आणि त्याचं काय करायचं ते बघेल. 🙂 कल्पना लई भारी आहे पण महिनाभर पडलेला दात सांभाळायचा म्हणजे……..ही पोरं पण नां, काय सुपिक डोकी असतात यांची.

  • अभिषेक आभार…आम्हीहि लहानपणी दात कौलांवर उडवायचो…
   @शिनु….मुलीचे ऐक…सांभाळ तो दात. अग आमच्याकडे आता नवा प्रश्न आहे…पहिला दात पडण्याआधि नवा येतोय मग लेकाची चिडचिड आहेत ते घासायचा कंटाळा त्यात नवी भर….बरं दादाचे दात हलतात तर माझे का नाही म्हणून लेकही रोज सांगते मम्मा माझा हा दात हलतो, तो दात हलतो….उगाच तिचीही समजुत काढावी लागतीये गं!!!! सानूला सांग मॉन्स्टरसारख्या दाताला आपण नाही भ्यायचं काही लोकांना घाबरवायचं….मी बघ नवऱ्याला आधिच सांगितल होत माझे दात नशिबवान माणसाचे दात आहेत….तसाही मला मौशमी चॅटर्जीसारखा दोन दातांच्या भगदाडातला माझा तिसरा दात आवडतो….
   शिनूला सांग मावशीने आणि तिच्या लेकाने शुभेच्छा सांगितल्या आहेत…..

 5. मस्त झालंय दंत पुराण..हेरंब चा एक(ची)दंत पण छान आहे..दोन पोस्ट दात येण्यची व एक पडण्याची..वाचणाऱ्यांची मज्जा आहे…मी दात पुरला होता माझा..अन ते जीभ फिरवायला मला फार आवडायचं….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s