मस्कतमधली आजी….

काल काही कामानिमित्त एका शॉपिंग मॉलमधे गेलो होतो. गाडी पार्क करताना बाजुला एक नववारी साडी (इथे साडी ऐवजी पातळ म्हणणे जास्त योग्य होइल नाहे का!!!) नेसलेल्या आजीबाई आपल्या मुलाचा आणि सुनेचा (किंवा लेकीचा आणि जावयाचा) हात धरुन जाताना दिसल्या…. मस्कतमधे नउवारी साडी……आजकाल महाराष्ट्रातल्या शहरांमधे चटकन न सापडणारे हे वैभव मस्कतमधे !!!!! नवऱ्याला म्हटल्ं अरे लवकर कर गाडी कुठेतरी पार्क, मला त्या आजींना भेटायचे आहे.
गाडी पार्क करुन मॉलमधे पोहोचेपर्यंत धीर नव्हता…कुठल्या असतील त्या आजी? पुण्याच्या, मुंबईच्या, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या की माझ्या नासिकच्या??? त्या बोलतील का माझ्याशी?……नाही कारण सर्वसाधारणपणे मराठी माणुस पटकन दुसऱ्या मराठी माणसाशी बोलत नाही असा आम्हाला इथल्या दोन वर्षाच्या वास्तव्यात आलेला एक कटु अनुभव…..समोरच्या मराठी माणसाला कळले की आपणही मराठीच आहोत की एकतर तो साहेबाच्या भाषेचा आधार घेतो किंवा गप्प बसतो…….त्यातही सुरुवातीला मी थोडा लोचटपणा केला आणि एक दोन जणांशी केला बोलायचा प्रयत्न..पण जे काही अनुभव आले त्यावरुन पुन्हा काही हिंमत केली नाही….अर्थात त्यातही अपवाद आहेतच. असो!!! आत्ता हा मुद्दा नाहिये…विषयांतर होतय…
मॉलमधे पोहोचलो नवऱ्याला आणि मुलाला सांगुन ठेवलं होतं , मी काय ती खरेदी करणार आणि तुम्ही सगळीकडे लक्ष ठेवा…आजी कुठे दिसतेय का ते पहा…..सगळी खरेदी झाली, बिलिंगही झाले पण हाय राम !! आजीबाई कुठेच नाहित…. घरी निघतच होतो की जिन्याजवळच्या खुर्चीत आजी दिसल्या……धावतच गेलो म्हटलं “मराठी आहात का?” …..माझा हात पटकन हातात घेउन म्हणाल्या “ हो गं!!!” गोऱ्या पान, गोष्टीतल्या आजींसारख्या आजीला बघुन मुलं तर खुपच खुश होती. मरुन रंगाची साडी मस्त खुलुन दिसत होती त्यांना….आणि चेहेऱ्यावरचं गोडं स्मित, मनात आलं आपलं काहीही चुकलं नाही गड्या या शोधात….
आजीच्या हाताच्या त्या उबदार स्पर्शानीच ईतका आपलेपणा वाटत होता की ही आपली पहिलीच भेट आहे ही जाणिव नाहिशी झाली. आम्ही दोघी जणी भरभरुन बोलत होतो…आणि अहो आश्चर्यम आजी महाराष्ट्रातल्या नव्हत्याच..त्या होत्या बडोद्याच्या.
गप्पांमधे जाणवत होतं त्यांचही एकटेपण!!! कोणी नाही गं इथे बोलायला…परदेशात मुलांबरोबर येणाऱ्या बहुतेक सगळ्या वृद्धांची व्यथा……. म्हटलं आता असं म्हणु नका …माझ्या घरात सगळेच खुप बडबडे आहेत, आपण गप्पा मारत जाउ या आता. त्या सांगत होत्या की विकएंडला मुलगा आणि सुनेबरोबर इथे येते, थोडा वेळ बसते..निदान चार लोक दिसतात इथे. म्हणाल्या बोलत नाही गं इथे चटकन कोणी…….म्हटलं असु द्या ……आपण गप्पा मारुया. अर्ध्या तासात भरपेट बोललो एकमेकिंशी…खुप वर्षानी भेटलो होतो जश्या. एव्हाना ’अहो आजी’ ची ती ’ए आजी’ झालेली होती. म्हणाली ”आज घरातुन निघतांनाच वाटत होतं की आपल्याशी कोणितरी बोलावं!!!!”
तेव्हढ्यातच त्यांचा मुलगा आला..त्याच्याशीही बोललो…एकमेकांचा पत्ता , फोन नंबर घेतला.तिथुन निघालो ते त्यांच्याकडुन आमच्या घरी यायचा शब्द घेउनच. मॉलमधेच त्यांना वाकुन नमस्कार केला….” मुलांनो खुप मोठे व्हा!!!” आजीनी आम्हाला तोंड भरुन आशिर्वाद दिला. जाणवलं आजीच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत….काय होतय कळत नव्हतं पण मनात खुण पटली होती…..ओळख जाणवली होती आम्हाला तिच्याशी असलेली…..शेजारची अरेबिक बाई आमच्याकडे पहात होती…..तिला भाषा नव्हती कळत आमची पण भावनांना कधी भाषा असते का..तिच्या चेहेऱ्यावरचं हसु सांगत होतं तिला समजतोय हा आनंद सोहळा……
गेल्या दोन वर्षात त्या मॉलमधुन पैसे देउन आम्ही अनेक वस्तु घेतल्या..पुढेही घेत राहु….पण काल निव्वळ प्रेमाचा देवाणघेवाणीवर मिळालेला हा अमुल्य ठेवा मात्र हृदयात घर करुन गेला….
निघतांना मुलगा म्हणाला,” मम्मा !! आता इथे आलं की नेहेमी आपल्याला आजी आठवेल ना!!!!!”

Advertisements

10 thoughts on “मस्कतमधली आजी….

 1. अगदी खरयं, पटकन बोलायला पुढे न येणे हा अनुभव देशाबाहेर सगळीकडेच येतो. छान लिहीले आहेस. खूपश्या आजीआजोबांचा हा मोठा problem आहे. चार घटका मनमोकळ्या गप्पा करायलाच कोणी नाही.

  • धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल….. का बुजतो आपण मराठी माणसं बोलायला कळत नाही….याविरुद्ध मल्लु लोकं किंवा बंगाली लोकं एकमेकांना अगदी धरुन असतात….

 2. Kharach kahi manase natyatali pan nastaat aani khup jawalachi houn jatat..
  Pan ek matr khare aahe ki, te mhanje marathi manasabaddal…mala pan muscat madhe barech anubhav aalet ki bolayala, Olakh vadhavayala marathi manus ka pudhe yet nahi?..kamit kami ekhadi Smile…

 3. Chanch lihileys
  vishay tar chan aahech pan to lihinarahi tevadhach sunder aahe , asech hyatun kalate—- agadi assal MARATHIT ‘CRYSTAL CLEAR’ mind asaleli hi LEKHIKA— hila nehami saglyanche Aashirvadach milat rahanar–
  Khup Yashasvi ho aani ho Te Donhi Little Champshi Aai Vadalnvar gelet
  Anek Anek Shubhecha—- keep writing —we love to read it—

 4. आपल्याला आजी आवडली अन तुझा स्वभाव सुद्धा…कारण मलाही अस ओळखत नसताना सुद्धा जाऊन बोलायला आवडत.,. 🙂

 5. खरं आहे. भारताबाहेरचे मराठी लोक जरा जास्तच शिष्टपणा करतात. आणि आपण पुढाकार घेतला तरी प्रतिसाद देत नाहीत.
  ‘तुम्ही मराठी का?’
  ‘हो’
  ‘मुंबईचे का तुम्ही?’
  ‘नाही’
  ‘मग काय पुण्याचे?’
  ‘नाही’

  अशा संवादांनंतर उत्साह मावळतो चौकशी करणार्‍याचा. काही सन्माननीय अपवाद सोडले तर आपण मराठी बोलून समोरच्यावर उपकारांचं ओझं टाकत आहोत असा आविर्भाव असतो एकंदरीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s