सत्संग(???)

मध्यंतरी एका परिचित महिलेच्या घरी जाण्याचा योग आला….पाहिले तर त्यांच्या घराच्या हॉलमधील सगळी arrangement बदललेली होती, जमिनीवर चटया टाकलेल्या, सोफा, टि.व्हि. सगळ सरकवलेलं….तेव्हढ्यात लक्षात आलं एरवी एका कोपऱ्यात असलेली त्यांच्या भगवानाची तसबीर जागा बदलुन त्या हॉलच्या मध्यावर स्थानापन्न झालेली आहे… …….या महिला आणि त्यांचा एक मोठा ग्रुप एका कुठल्यातरी भगवानाची पुजा करतात… आणि नव्या नव्या लोकांना त्यांच्या चमत्काराच्या कथा सांगुन आपल्या ग्रुप मधे सामिल करुन घेण्याचा प्रयत्न फावल्या वेळात करत असतात…….

त्यादिवशीच त्यांचं घर पाहुन मला पडलेलं प्रश्नचिन्ह त्यांना समजलं असाव त्यामुळे त्या म्हणाल्या “ आज घरमे सत्संग था ईसिलिये ये सब .” थोडावेळ गप्पा झाल्यावर म्हणाल्या “ आज afternoon सोने के लिये बहुत लेट हो गया था, वो _ _ _ आंटी है ना वो २.०० बजे तक बैठे थे…..उनकी बहु के बारे मे बता रहे थे…अरे वो बहु का नाम तो है सुमती मगर वो actual मे एकदम कुमती है, क्या बताउ आपको?” मग तिने मला त्या सुनेचा किस्सा बयाजवार सांगितला… आंटीनी सुनेला कश्या शिव्या घातल्या वगैरेही आलेच त्यात.

त्यानंतर म्हणे “ वो उपरवाली है ना उसका हजबंड every six months India क्यों जाता है पता है क्या आपको?” आता म्हट्लं, असेल त्याची ऐपत म्हणुन जात असेल..कारण आम्ही वर्षातुन एकदा सहकुटुंब जातो त्याचा खर्च कंपनी देते…….पण बाईनी वेगळीच माहिती दिली “ उसकी है कोई उधरभी !!!” च्यामारी हे ज्ञान मला नव्हते…..या धक्क्यातुन मी सावरत नाही तोच पुढचा मुद्दा आला….. “वो सिंधु है ना उसका हजबंड उसको पिटता है…तो ये उपरवाली ने उसे बोला तुम डिवोर्स ले लो…अब इससे अपना घर नहि संभलता और ये दुसरोंको सलाह देती है। आप ही बताओ ऐसा कोइ करता है क्या?” आम्ही आपली नकारार्थी मान हलवली……….

जवळजवळ पुढचा एक तास ’आपकी बिल्डिंग मे वो अमकीढमकी है ना वो अपने डॉक्टर हजबंड पे शक करती है की उसका किसी नर्स के साथ कुछ चल रहा है……. वो दुसरी है ना उसे एक कान से सुनाई नही देता है…….वो तिसरी है ना उसको देखा क्या आपने कैसे transparent ड्रेसेस पहेनती है और उपरसे दुपट्टा भी नही लेती……………..’ ई. ई……………….. अतिशय मौल्यवान माहिती मला मिळाली.

सरतेशेवटी मी हिंमत करुन विचारले की आपको कैसे पता है ये सब…….मिळालेलं उत्तर असे की ये लोग सत्संग आते है ना तो बातोंमे बात निकल जाती है!!!!!!!! पुढे मला म्हणे आप भी आया किजिये …ये भगवान सबको एकदम अच्छे से देखते है!!!! मै आपको और बच्चोंको दिक्षा देती ँहु ॥ मनात म्हटलं नको रे बाबा …….तिला सांगितल की हम ना डायरेक्टली गणपती भगवानकीच पुजा करते है…त्यामुळे हमे अपनी बात उनतक पहुचवनेके लिये किसी मिडियेटर की गरज नही पडती है……

हुश्श !!!! म्हणत घरी आले…साडेसहा वाजुन गेले तरी नवऱ्याचा पत्ता नाही… आधी चहा केला …डोकं भणभणायला लागलं होत, ह्याला का म्हणायचे सत्संग असा विचार येत होता……..चहाचा कप हातात घेतला…ए.सी. लावला…पहिला घोट घेतला आणि मनात विचार आला.. “आज का बरं उशीर झाला असेल ह्याला…. फोन पण नाही केला…… कही मेरेपण हजबंड का बाहर कुछ…………………………….”

“नही ssssssssssssssssssssssssssssssss!!!!!!”

Advertisements

13 thoughts on “सत्संग(???)

    • प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे…पण अहो फक्त बायकाच नाही तर पुरुषही जॅम गॉसिपिंग करतात बरं………

  1. Vijay & Ckt Thanks for the comments…..असाच आणि एक ग्रुप आहे ..त्यांच्या एका अनुयायाच्या घरी जाण्याचा योग आला होता…म्हणे U must sing the Bhajan loudly so that God should listen….ही माहिती मला नविन होती…म्हटलं आपला गणपतीच बरा…मनातही हाक मारली तरी धावतो मदतीला….त्यांच्या गॉड्नी आधिच सांगितलय की..In kaliyugaa people will start eating out…अशी भिती वाटली सांगु म्हटलं ह्यांना कुठून कळले की आम्ही दर वीकएंड्ला बाहेर जातो जेवायला……….घाबरुन त्या गॉड्चे नाव नाही घेतले….

    • धन्यवाद आशिष….असल्या प्रतिक्रिया नवनविन लिहायला प्रेरणा देतात…जबाबदारी वाढल्यासारखी वाटते…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s