सिरियल्स……..

“मम्मा त्या ’श्री’ मधल्या बाईचा फेस दाखवणार आहेत….” मुलाने ओरडुन सांगितले…………. “अरे तुला किती वेळा सांगायचे आहे आता की नको पाहुस असले सिरियल्स..” हॉलमधे जाउन त्याला विचारले “बाळा अरे त्यात ते भुत आहे त्याची भिती नाही वाटत का?”

“भुत !! ह्यँ !! कॉमेडी आहे ते सिरियल… आणि घाबरायचे काय त्यात? तुझे पण केस मोकळे असे टाकले तोंडावर तर तु पण अशीच दिसशील…” …..मी–भुत…. अवाक झाले मी. टी.व्ही. बंद केला आणि त्याला अभ्यास दिला… रोजच्यापेक्षा जास्त.. मला भुत म्हणतो काय !!!!!

वैताग आहे या सिरियल्स म्हणजे…मागे नवऱ्याचा असंभव या मालिकेचा एक एपिसोड पहायचा राहिला…आता त्या भागात काय झाले ते त्याला सांगण्याची जबाबदारी माझी… केली सुरुवात……

–हे बघ सुलेखानी तनिष्काच्या कामवाल्या बाईच्या मनाचा ताबा घेतला आणि ती तनिष्काचा घरी गेली.

–कोण? कुठे घेतला ताबा? सुलेखाला कसे कळले तनिष्काची  बाई कुठे रहाते?

–अरे रस्त्यात भेटते ती तिला, मग एका आडोश्याच्या झाडाखाली ते ताबाबिबा घेतात…. आणि सुलेखा त्या बाईच शरीर घेउन जाते…

–कोणी बघत नाही?

–छे रे!! असं बघत का कधी कोणी? हं मग ती तनिष्काच्या घरी जाते आणि तिथे त्यांचे वाद होतात..त्यात सुलेखा जिंकते कारण तनिष्काला पिहु जी की मागच्या जन्मीची छबु आहे ती डिस्टर्ब करते आणि त्यामुळे सुलेखा तनिष्काच्या मनाचा ताबा मिळवते….आता ती तनिष्का असते.

–च्यायला गुरुची विद्या गुरुलाच…मान गये सुलेखा!!! पण काय म्हणालिस तु? सुलेखा तर बाई आहे ना?

–अरे मग ती बाईच तर हे करते!!!

–पण त्या बाईला कुठे येते ही विद्या?

(एव्हाना नवरा confuse व्हायला सुरुवात झालेली आहे…)

–मठ्ठ आहेस का रे तु!!! बाई सुलेखा आहे ना…..

–मग सुलेखा कुठे आहे? म्हणजे तिचे शरीर कुठेय?ती बाई जी तिच्या शरीरात आहे तिचं काय?

–अरे ती काही expert आहे का या प्रकारात? ती पडलीये बेशुद्ध, तिला परमेश्वरच्या माणसाने सुलेखा समजुन हॉस्पिटलमधे नेलय.

–?????( याच्या डोक्यावरुन जातय आता….मला याच्या मनाचा ताबा घेता आला असता तर किती बरं झालं असतं असाही एक विचार मनात येउन गेला..म्हणजे हा सव्यापसव्य तरी वाचेल)

–कळतय का?

–पुढचं सांग…

–मग ती तनिष्कारुपी सुलेखा मम्मांच्या घरी जाउन त्यांचा खुन करते..

–अगं माते पण मम्मांचा खुन तर सुलेखानी केलाय ना एकदा…आता पुन्हा ती हे का करतेय?

–अरे ती आता तनिष्काच्या शरीरात आहे ना..मग ती आता त्याचे शुटिंग करुन ठेवणार आहे….तिला तनिष्काचा सुड उगवायचा आहे ना!!!

(वातावरण तापायला लागलय आता))

–continue करं…

–ते शुट करुन झालं की ती सुलेखाला म्हणजे तिच्या शरीराला शोधत हॉस्पिटलमधे जाते….

(दयनीय दिसतोय हा आता… किती ताण पडतोय याच्यावर…)

–माझी आई ..अगं पण ती बाई कुठेय? (ओरडला जोरदार)

–त्या बाईचा मेंदु हॉस्पिटलमधे, शरीर ज्यात आता तनिष्काचा मेंदु आहे ते तनिष्काच्या घरी….तनिष्काच्या शरीरात सुलेखाचा मेंदु…..सुलेखाच शरीर ज्यात बाईचा मेंदु आहे ते हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध….. मग ती सुलेखा(तनिष्का) नर्सला हिप्नॉटाईज करते …… मग………

–एक काम कर…आता ब्रेक घे एखादा मी चहा करुन आणतो तो घे..आणि विसरुन जा की मी तुला काही विचारलय…..पोरखेळ कुठला….

चहा घेता घेता तो म्हणाला “मला वाटतय सतीश राजवाडे नी संगीत कुलकर्णीच्या मनाचा ताबा घेउन आता ही सिरियल डायरेक्ट करावी…नाहीतर कोणीतरी पल्लवी जोशीच्या मनाचा ताबा घेउन ती बंद तरी पाडावी……

दुसऱ्या दिवशी नवऱ्यानी सांगितल की रात्री झोपेत काय आवाज येतोय म्हणुन पाहिल तर तु बडबडत होतीस …बाई…सुलेखा…तनिष्का………………………..मेंदु…. ताबा… गतजन्म……

क्रमश:

Advertisements

13 thoughts on “सिरियल्स……..

  1. मस्तच जमलय….किती दिवसांनी असंभवची विनोदी अपडेट मिळाली. मागे मुंबैत गेले होते तेव्हा पाहिली होती तेव्हा follow करत होते.

  2. ताई,
    हे प्रचंड भारी आहे… मी असंभव बघायचो नाही!… खूप मिस केलं आहे मी! 😛
    बाकी..एकदम जुनी पोस्ट असल्यानं.. मी प्रतिक्रिया प्रचंड एन्जॉय केल्या.. 😀
    मुक्तपीठ!!!

  3. हाहाहा… मस्त एकदम. हा उपाय चांगला आहे. कोणी तुम्हाला एखादी मालिका बघायला सांगितली तर त्याला प्रचंड कन्फ्यूज करा. नंतर परत तुम्हाला ती मालिका बघायला सांगितली जाणार नाही…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s