सिरियल्स….भाग २

चला एकदाची देवयानी विक्रमादित्यला ’हो’ म्हणाली..मुळात या सिरियलचे नाव कुलवधु..त्यात most eligible bachelor म्हणुन पहिल्या एक दोन भागातच समोर आला विक्रमादित्य आणि नायिका देवयानी त्यामुळे पहिल्या १००-१५० भागात हे दोघे कसेही एकमेकांच्या प्रेमात वगैरे पडणार हे भाकित आम्ही केले होते…….

आता विक्रमादित्य बदलला बिदलला असला तरी हे त्याचे नाटक असुन, लग्न झाल्यावर तो देवयानीला जाम छळणार आहे आणि श्रावणी बहुतेक रणवीरराजेंशी लग्न करुन त्याच घरात जाणार असेही भाकित वर्तवण्याचा कालचा आमचा प्रयत्न आमच्याच घरात दुर्लक्षला गेला..(घर की मुर्गी……एकतामातेकडे जावे का आता आम्ही???) “ज्योती” नावाच्या सिरियलच्या प्रोमोजवरुन आम्ही केलेली भाकितं तंतोतंत खरी ठरलेली असुनही ही उपेक्षा आमच्या वाट्याला यावी…..जाउ द्या…..धावत जाउन बेडरुममधल्या बेडवर पडुन रडावे का आता आम्ही??? की एका बॅगमधे उगाचच २-४ कपडे कोंबावे!!!!!!(नाहीत आमच्या साड्या येव्हढ्या व्यवस्थित हँगरला लटकवलेल्या..)

तिथे “श्री” मधलं भुत हे कंगना आहे आणि ती ईस घरकी बहुच होती हे बडी बा नी सांगुन सुद्धा पुढे काय होइल याचा अंदाज बांधता येत नाहीये. आमच्या ईतक्या वर्षाचा ’K’ सिरियल्सचा अभ्यास, चार दिवस सासुचे, या गोजिरवाण्या (इथे आम्ही लाजिरवाण्या, कंटाळवाण्या, रटाळवाण्या सारखी नावे fit करुन पाहिली आणि ती चपखल बसत होती हा आमचा अनुभव..)  घरात या मालिकांचे काही भाग पहाण्याचा केलेला पराक्रम ही शिदोरीसुद्धा यावेळेस उपयोगी ठरत नाहीये….

छोटी बहु या अत्यंत छोट्या वेगाने चालणाऱ्या मालिकेची आम्हास लिंक आहे..तशी आम्हास ईतर अनेक मालिकांची लिंक आहे कारण आम्ही एका ब्रेक मधे ईतर सगळे चॅनल्स फिरतो…आजकाल सगळीकडे एकदमच ब्रेक असतात हा चिंतेचा विषय आहे. अगले जनम मोहे बिटिया ही किजो…हे टायटल…ऐश—अभिषेक अभिनित(?) उमराव जान या चित्रपटातल्या गाण्यावर बेतलेलं आहे हा नवा शोध आम्हाला नुकताच लागला आहे.

सोनी, स्टार प्लस, कलर्स ह्याची आपणास विशेष मा्हिती नसल्याचा आम्हास खेद आहे…अर्थात बालिका वधु या मालिकेबद्दल विपुल लिखाण झालेले असल्याची exclusive माहिती आम्ही आमच्या ब्लॉगच्या वाचकांना देउ ईच्छितो..(आता हा ब्लॉग खरच कोणी वाचतं का, हा ही विषय संशोधनास घेण्याचा आमचा विचार आहे.) उतरण (नावं नक्की स्मरतं नाही) मालिकेचा अर्धा भाग आम्ही पाहिला होता कारण त्यातल्या लहान मुलीच्या (नावं नक्की स्मरतं नाही) दातांशी आमच्या दाताच्या structure चे असलेले साम्य…

आम्हास एक गहन प्रश्न पडलेला आहे आणि तो असा की या यच्चयावत मालिकांमधे कुटुंबातली एक व्यक्ती wheel chair वर बसवण्यामागे काय बरे हेतु असावा? ती wheel chair कॉमन आहे का ह्या संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आम्ही आहोत… लांबलचक कानातले घालुन ह्या बायकांचे कान दुखत नाहीत का..हा ही एक उपप्रश्न पडण्याचे कारण म्हणजे आमच्या तश्या प्रयत्नानंतर आम्हास उठलेली कानदुखी…

वहिनीसाहेब, मायका असल्या मालिकांविषयी बोलण्यापेक्षा आम्ही शेफ निलेश लिमये आणि राणी गुणाजी यांच्या निवेदनाविषयी बोलु..कारण ३० मिनिटांपैकी साडॆ अठ्ठावीस मिनिटे हे दोघे न थकता बोलत असतात.

मराठी बातम्यांचा खास ओघ असणाऱ्या एका वाहिनीवर सेलिब्रिटीना बोलावुन आपणच बोलायचे..अगदी नाहिच बोलु द्यायचे त्यांना हा कठोर नियम असावा असेही आम्हास भासते…ह्याचा कॉस्चुम डिजायनरही नवखा असावा… किंवा कोणाला कोणते कपडे अजिबात शोभत नाहीत याचे तो प्रयोग करत असावा…हे आमचे मतं…

गुन्हा या सदरात आपले नाव यावे म्हणुन आम्ही परवा नवऱ्याच्या खुंटीला लटकलेल्या पँटमधुन त्याचे वॉलेट काढले..पण त्याने रहा सावध चा नारा लक्षात ठेवल्यामुळे तो सावज होउ शकला नाही… निव्वळ काही चिल्लर त्यात असल्यामुळे आम्ही ते जागच्या जागी ठेउन दिले… नाहीतर आमच्याविषयी सांगितले गेले असते…”गेले चार पाच दिवस तिचे लक्ष नवऱ्याच्या वॉलेटकडे होते..आणी एका बेसावध क्षणी तिने आपला डाव साधला….”

तसेही News Channel नावाच्या फंदात आम्ही सहसा पडत नाही…चार आने की मुर्गी आणि बारह आने का मसाला हे आमच्या तत्वात बसत नाही…

बरेच लिहिले आणि बरेच लिहिले जाउ शकते याची आम्हास पुर्ण कल्पना आहे पण परंतु वाचणारे वाचतात आणि ऐकणारे ऐकतात म्हणुन चऱ्हाट लावणेही आम्हास रुचत नाही…तेव्हा आता आवरते घ्यावे असा विचार येतोय…

(खरं असेही आहे की आमच्या स्वयंपाकघरात आम्हास स्वयं जाउनच पोळ्या करायच्या आहेत…तेव्हा आत्ता निरोप घेणे भाग आहे….)

Advertisements

5 thoughts on “सिरियल्स….भाग २

  1. वा…….. सुंदर……….अतिशय सुंदर………….प्रामुख्याने “गुन्हा” बद्दल लिहिलेले जामच आवडले……..
    हा गुन्हा जवळपास प्रत्येक घरात घडत असेल……… मस्त…………..

  2. मला पडलेला मोठ्ठा प्रश्न .. ह्या सिरियल मधल्या बायका नेहेमीच कशा अगदी लग्नाला निघाल्यासारख्या तयार होऊन बसलेल्या असतात? अगदी घरात पण स्टिलेटोज ( माझं ज्ञान आहे बरंका या बाबतित, कशाला स्टिलेटॊ आणि कशाला हाय हिल्स म्हणायचं कळतं मला) घालुन वावरतात. झोपेतुन उठल्यावर पण यांच लिप्स्टीक मॊडलेलं कां नसतं? घरामधे सगळ्या बायका दागिने घालुन का बसतात? इतके शिकले सवरलेले ( मोठ्ठं खानदान वाले) पण एकमेकांच्या थोबाडित येता जाता कां मारतात?

    लेख मस्त जमलाय. ही सिरिज कंटीन्यु करा.. भरपुर स्कोप आहे लिहायला..

  3. >>अगले जनम मोहे बिटिया ही किजो…हे टायटल…ऐश—अभिषेक अभिनित(?) उमराव जान या चित्रपटातल्या गाण्यावर बेतलेलं आहे हा नवा शोध आम्हाला नुकताच लागला आहे.
    हा शोध मला आत्ता तुझ्यामुळे लागला! 😀

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s