गोष्ट लहान असते……

“काल आसिफला सेकंड हाफ मधे यायला उशिर झाला….” नवरा सांगत होता. आसिफ त्याचा मित्र…तो म्हणे बँकेच्या कामानिमित्त ऑफिसमधुन निघाला आणि ते उरकुन लंच करुनच परत जाणार होता. पण झाले असे की तो बँकेतलं काम आटोपुन येत होता, आपल्याच घाईत गाडी चालवत असताना त्याला रस्त्याच्या विरुद्ध बाजुला एक कुटुंब भर उन्हात लहान मुल कडेवर घेउन टॅक्सीची वाट पहाताना दिसलं…….दुपारची ती वेळ नमाजची असल्यामुळे टॅक्सी मिळणं तेव्हा अवघडच होतं……ह्याची गाडी तिथुन पुढे गेली पण मनातुन त्या कुटुंबाचे विचार जाईनात……….एकिकडे लंच टाईम संपत होता……………तरिही मनाशी विचार पक्का करुन जवळपास २-३ कि.मी. पुढच्या round about वरुन हा वळुन त्यांच्याकडे गेला….. त्यांना मदतीचा हात देउ केला…..ते लोकं त्या मुलाला घेउन दवाखान्यात निघाले होते….त्यांना व्यवस्थित पोहोचवुन परत ऑफिसमधे येइपर्यंत ह्याला उशिर झाला होता.

मनात सहज विचार आला…हा तर रस्त्याच्या विरुद्ध बाजुस होता….त्या कुटुंबाच्याच बाजुने अश्या कितीतरी गाड्या गेल्या असतीलच की !!!! दखल मात्र घेतली ती याने…………

मला ’तमन्ना’ या सिनेमाचे गाणे आठवले..’ घर से मस्जिद है बहुत दुर चलो युँ कर ले….किसी रोते हुए बच्चे को हसाया जाये’ हे गाणं जेव्हा पहिल्यांदा ऐकल तेव्हाच आवडलं होतं पण काल ते नव्याने उमजलं.

असच मागे एकदा माझ्या मुलाची शाळेतुन परत येतांना बस चुकली…..त्याची घरी येण्याची वेळ जसजशी टळत होती माझी काळजी वाढत होती…तेव्हढ्यात एक फोन आला..पुर्णपणे अनोळखी नंबर…..फोनवरचा माणुस सांगत होता…” Your son was standing in front of the school….he gave me this number…..could you please arrange some transportation for him or else I would drop him..” परका देश…..पहिलीतला मुलगा….आधिच घाबरलेले मी..तसाच नवऱ्याला फोन लावला, त्याला त्या अनोळखी माणसाचा नंबर दिला. नवऱ्याला पोहोचत करत २०-२५ मिनिटे लागली तोपर्यंत त्या भल्या माणसाने मुलाला एकटे सोडले नव्हते.

आपण आपल्या मिळालेल्या यशाची मोजमापं करतो आणि आपल्या नातेवाईकांना, गुरुंना, ओळखीच्यांना त्याचे श्रेय देतो……………..पण असे किती अनोळखी हात नकळत मदत करतात… बरेचदा तर न मागता!!!! आज आठवायला बसले तर कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर येताहेत……….साधच बघा ना आपण ट्रेननी ,बसनी प्रवास करत असतो अचानक कोणीतरी उठुन एखाद्या लहान मुलाला, महिलेला, वृद्धाला बसायला जागा देतं…. आपण रिजर्वेशनसाठी उभे आहोत…खुप वेळानंतर नंबर येतो आणि लक्षात येतं की १५-२० रुपये कमी आहेत….ते मिळतात ते एखाद्या अपरिचिताकडुन….कितीतरी घटना असतात दवाखान्यातल्याही….या सगळ्या गोष्टींच महत्व यामुळे की यात परतफेडीची भावना नसते. मुंबईतल्या दंगलींचा, पुराचा अनुभव घेतलेल्या लोकांना आलेल्या अश्या अनुभवांचे सार हे एक पुर्ण पुस्तक होउ शकते.

मी जेव्हा पहिल्यांदा मस्कतला आले तेव्हा दोन लहान मुलं आणि तिघांच्या तिकिटावर जेव्हढे किलो सामान आणता येइल ते सगळं बरोबर घेतलेलं……….एका गुजराती व्यक्तीने मुंबईला माझ्या बाबांना सांगितले की तुम्ही नका काळजी करु, मी करेन मदत…आणि त्या वाक्याला अक्षरश: जागला तो माणुस……….तोच नव्हे तर विमानातल्या ईतरही लोकांनी खुप मदत केली…त्यामुळेच तो प्रवास सुखकर वाटला, नाहितर कल्पनाही करवत नाही. 

असाच एक लहानसा प्रसंग, आम्ही मॉलमधे जातो तेव्हा माझी मुलगी हट्टीपणा करत बास्केट ट्रॉली ओढत असते……अंगापेक्षा बोंगा खुप जड झालेला असतो…मग उगाचच तिच्या ट्रॉलीमधे थोडसं सामान टाकावं लागतं. लोकांची गैरसोय नको म्हणुन आम्ही शक्यतो गर्दीची वेळ टाळतो…परवा या बाईसाहेबांची स्वारी रस्ता अडवुन निवांत चालली होती……मी ओरडत होते….मागे एक सहा फुटाचा माणुस आपल्या मुळे खोळंबला आहे याची तमा न बाळगता मॅडम चालत होत्या…शेवटी मी न रहावुन तिला उचलायला लागले तर तो माणुस पटकन म्हणाला..” No!! I can wait!!!” त्याच्या चेहेऱ्यावरच्या निखळ हवभावांवरुन वातावरणातला ताण हलका झाला………….

खरच गोष्ट किती लहान असते पण ती सहजपणे करणारी माणसं मात्र खुप महान वाटतात मला. या सगळ्या नायक नायिकांचा उल्लेख होत नाही कारण त्यांची नावं तरी कुठे माहित असतात !! एक मात्र नक्की  काढता येतो की जगात चांगलीच माणसे जास्त आहेत……..माणुसकीचा स्वच्छ सुंदर झरा अखंड वहातोय………….   

मला पुर्ण कल्पना आहे याची की मी आलेल्या अनुभवांपैकी सगळ्यांचे उल्लेख केलेले नाहीत..आज झरकन जे नजरेसमोर आले त्यांचा उल्लेख करत आहे. ईतरही अनेक घटना आहेत ज्या काळाबरोबर धुसर होत गेल्या आहेत.

निरपेक्षपणे मदतीचा हात देउ करणाऱ्या त्या सगळ्या माणसांना मनापासुन सलाम!!!

म्हणतात ना…

’देणाऱ्याने देत जावे……’ मला आज ते देणाऱ्याचे लाखमोलाचे हात खरच घ्यावेसे वाटताहेत……………

Advertisements

15 thoughts on “गोष्ट लहान असते……

 1. asa tar javal javal pratyekachya babtit ghadat….
  khar tar hi ek sakhali aahe..
  kuni aaplyasathi karat….
  garaj nahi tyacha hisheb mandayachi…
  ulat asach nakalat aapan dusaryasathi karun mokal vhav..
  garaj asate fakt doosaryachya jagi swathla thevanyachi…
  sundar hotat shan aani vishvashi vadhato hya jagavarahca

 2. अगदी मनातलं लिहिलंस…मजा म्हणजे सर्वांनाच असे अनुभव येतात..मग कधीतरी आपणही कुणाचा अनुभव होऊया. देणा-याचे हात घेऊया.

 3. छान आहे पोस्ट. आत्मविश्वास, विश्वास, उमेद ह्यावरच जीवनाचे अनुभव येत राहतात.सकरात्मत्क दृष्टिकोण आयष्याकरीता सुखाच्या पोस्ट निर्माण करतो .अस्सेच सुखद अनुभव वाचावयास मिळोत.

 4. There are some unkonwn people…because of their small helps life becomes happier…….we should respect those moments and those people…….

  I do agree with you….we should say thanks to all those people who knowingly or un-knowingly keep helping others…….

 5. मत आहे पोस्ट, वाचून वाटल …
  देणर्‍याचा हात बर्‍याचदा आपल्या मदतीला पुढे होतो, पण आपला हात आहे का असाच कोणासाठी तरी पटकन मदतीला पुढे होणारा. आहे की नाही सांगता येणार नाही पण, तुमचा लेख वाचून नक्की होईल. “मनाची नाही पण हातची तरी”….. हा हा हा…

 6. तुझा लेख वाचून मला पण एक प्रसंग आठवला ग तायडे! प्रतिसादासाठी थोडा मोठा होईल कदाचित… 🙂

  मी त्यावेळी दुसरीत होतो बघ, बाबांची बदली खेड्यात झाली होती, मला १८ कि.मी. वर असलेल्या अकोला शहरात शिकायला टाकलं होतं. त्या गावातून त्यावेळी एक टेम्पो जायचा माझ्या शाळेत लहान मुलांना घेऊन, पण सगळी मुले माझ्या पेक्षा लहानच होती. परीक्षेचे दिवस होते, माझे काही पेपर बाकी होते, बाकी लहान्यांचे संपले होते…माझ्या सोबत अजून एक मुलगा होता, दोन मुलांना न्यायला परवडत नाही म्हणून टेम्पो बंद झाला होता…मी आणि माझा मित्र आम्ही दोघं तेव्हा बसने जायचो अकोल्याला, बस स्टॅन्ड वरून मग एक रिक्षेवाले काका आम्हाला शाळेत पोहचवायचे आणि परत बस मध्ये बसवून द्यायचे …येणं जाणं करून आम्ही बस पकडणे शिकलो होतो तोवर…मग बरेचदा बस मिळायला उशीर झाला तर ते रिक्षेवाले काका चालला जायचे आणि आम्ही दोघं बस पकडून यायचो घरी बरोबर… बसमधले लोक कौतुक करायचे, मज्जा यायची आम्हाला 🙂 …त्या दिवशी पण असंच झालं… रिक्षेवाले काका चालले गेले होते आणि आम्ही शहराचा नकाशा बघत होतो…मी तिथे असलेल्या लोखंडी बार वर उभा होतो, तेव्हढ्यात बस आली, माझ्या मित्राने मला हाक मारली, आणि मी वळतच उडी मारली, ती थेट मागे असलेल्या पिल्लर वर गेली… माझ्या दुर्दैवाने जिथे माझं डोकं आपटलं तिथलं सिमेंट निघून आतली लोखंडी सळा बाहेर आलेली, ती बरोबर माझ्या भूवयात घुसली आणि रक्ताची धार सुरु झाली…मला मात्र एव्हडच समजलं होतो कि मागे वळलो आणि तसाच उलट्या दिशेने फेकल्या जाऊन पडलो होतो…मला काही दुखणं जाणवत नव्हतं, जखम मोठी असली कि लगेच दुखत नाही हे मी तेव्हा शिकलो …मी हसत उठलो आणि मित्राला म्हटलं कि “गिर गया यार…”…पण त्याचा चेहरा काहीतरी वेगळीच कहाणी सांगत होता, मी परत विचारलं “क्या हुआ? खून आ रहा क्या?”…त्याने होकारार्थी मान डोलावली तेव्हा मी डोक्याला हाथ लावला आणि माझा हातच लाल झाला…मग मात्र मी चांगलाच ओरडायला लागलो बघ तिथेच 😉 …ते बघून एक बाई धावत आली तिने माझा रुमाल घेतला आणि डोक्यावर घट्ट दाबून ठेवला आणि लोकांना ‘कुणीतरी ह्याला डॉक्टर कडे न्या हो’ म्हणून विनवायला लागली…आता पर्यंत तिथे गर्दी जमली होती पण कुणी पुढे येत नव्हतं, ती बाई ओरडतच होती …मग एक मुलगा पुढे आला… म्हणाला “मी नेतो दवाखान्यात ह्याला, मी ओळखतो ह्या दोघांना…”, तो मला पहिले बाथरूम मध्ये घेऊन गेला, माझा शर्ट तर रक्ताने भरलाच होता, पण चेहरा हाथ आणि अर्धी बाजूवर पण रक्त लागलेलं होतं…त्यांना ते धुवून काढलं, जखम दाबून धरल्यामुळे रक्त थांबलं होतं…त्याने मला माझ्याजवळ किती पैसे आहेत विचारलं आणि मला शेजारच्या दवाखान्यात घेऊन गेला, तेव्हा त्याच्याकडचे आणि माझ्या जवळ असलेले पैसे मिळून टाके आणि धनुर्वाताचं इंजेक्शन साठी कमी पडत होते बघ ताई…डॉक्टर ने इंजेक्शन देऊन फक्त पट्टी लावतो म्हणून म्हटलं आणि ‘टाके नंतर लावून घ्या’ म्हणून सांगितलं…तायडे तेव्हा ह्या मुलाने डॉक्टर ला त्याची पुस्तके ठेवून घ्यायला सांगितली गं…पैसे उद्या आणून देतो म्हणून म्हणायला लागला…मला आजही आठवतो तो विनंती करतांना…चेहरा पूर्ण धूसर झाला आहे…पण तो क्षण नाही विसरलो कधीच…बऱ्याच विनवण्या करूनही डॉक्टर नाही ऐकला…मग हा तसाच आम्हाला घेऊन आमच्या गावावर आला, बस साठी पैसे काढून ठेवले होते त्याने…घरी पोचतं केला मला…बाबा आणि त्याच्या सोबतचे कर्मचारी सगळेच घरी आले मग धावत…मला दवाखान्यात नेऊन टाके लावलेत…बाबा त्या पोराचा हाथ आयुष्याचं उपकार केल्यासाठी धरून होते…त्यांना काही सुचत नव्हतं कि ह्या उपकाराची परत फेड कशी करायची म्हणून…पैसे घ्यायला तो तयार नव्हता… त्याने घेतले हि नाही… थोड्या वेळाने तो निघून गेला…

  त्याने आम्हाला प्रवास करतांना बरेचदा बघितलं होतं…तेव्हढीच त्याची ओळख आमच्यासोबत…तीही फक्त त्याच्याचकडून…पुढच्यावेळी मी त्याला बरंच शोधायचा प्रयत्न केला…पण मग परत कधी तो दिसला नाही…कदाचित त्याची माझ्या जीवनात तेव्हढीच भूमिका होती…मला एक महत्वाचा पाठ शिकवून जायची…तो पाठ जरी विसरलो चुकून कधी तरी ऋण म्हणून मी दुसर्यांची मदत करत राहिलंच शेवटच्या श्वास पर्यंत…

  • छान अनूभव सांगितलास रे… येव्ह्ढ्या लहानश्या ओळखीवरही मदत करणारे लोक पाहिले की माणूसकीवरचा विश्वास वाढतो!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s