साधू संत येती घरा……

कुठल्यातरी डिजिटल टि.व्ही. च्या कोणा एका स्पर्धेच्या विजेत्यांकडे रेहेमान, करिना कपूर ई. मंडळी जाताहेत म्हणे… परवा सहज लक्ष गेले तर त्यादिवशी करिना कपूर कोणाच्यातरी घरी जाणार होती….. करिनाला या अनुभवाविषयी काय वाटते, तिच्या त्या घरातल्या लोकांकडुन काय अपेक्षा आहेत, तिला काय खायला आवडते छाप मुलाखत एकिकडे दाखवत होते…आणि त्याचवेळी याच मुद्द्यांबाबत त्या घरातल्या लोकांचे मतं ..असे ते प्रसारण सुरु होते….

करिना बद्द्ल मी तशी neutral आहे म्हणजे ती आवडत्या किंवा नावडत्या नट्यांच्या यादीत नाही…..रेफ्युजी, ऐतराज , जब वी मेट सारख्या सिनेमांमधे ती आवडलीही होती… मला आवडतो तो तिच्या चेहेऱ्यावरचा टवटवीतपणा…………. अगदीच गेला बाजार ’क्योंकी’ नावाच्या सिनेमामधलं तिचं साडीतलं रुपही आवडलं होतं.

तर यावेळेस ती ज्यांच्या घरी येणार होती ते कुटुंब मराठी आहे हे समजल्यावर तो कार्यक्रम पुढे पहायला सुरुवात केली. त्यांनी केक, सॅलड वगैरे तयार ठेवले होते……सगळेजण उत्सुक असल्याचे सांगत होते. इथपर्यंत ठीक होतं सगळं……. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना हा लेखप्रपंच नक्की कीं कारणमं आहे ते!!! नमनाला घडाभर ओतत होते मी………..बाकी काही नाही….

या सगळ्या गुडी..गुडी अतिउत्साही वातावरणात एक काकु हिंदी ईंग्लिशमधे भरभरुन बोलत होत्या …आणि अचानक त्या म्हणाल्या…….” In Marathi we say.. साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा…..  so today Kareena is coming, it’s like diwali for us.”

आता ये बात हमको खरच कुछ हजम नही हुइ!!! नाही म्हणजे करिनाला साधु किंवा संत यातले काय म्हणु शकतो आपण हा भुंगा डोकं पोखरतोय (आहे मला ते!!!) …….. मला आपले उगाचच भगव्या वस्त्रातले करीनाचे रुप आले डोळ्यासमोर..कारण सध्या ती ज्या वस्त्रात(?) वावरते त्यामध्ये तिला साधु म्हणुन कल्पना नाही करवणार!!! गळ्यात रुद्राक्षाची माळ… ही घ्यायला तिला बाजारात जायची गरज नाही ती तीच्या शम्मी आजोबांकडून घेउ शकते……..

फिल्मस्टार्स किंवा क्रिकेटर्स याबद्दल माझे मत थोडे रुक्षच आहे …यातले जास्त प्रमाणातले लोकं हे साधू नसुन संधीसाधू असतात हे आपले माझे प्रामाणिक मत……..त्यामुळेच की काय पण मला तो कार्यक्रम ऐकल्यावर कळेना काय करावे????

याच विचारात पडले असतांना अचानक काहीतरी ऐकु येतय ….. अरे ही गाणी कुठे लागलीयेत…..कोणतं बरं सुरु आहे……….आलं आलं ऐकु आलं…’सत्यम शिवम सुंदरम…’ का येतीये माझ्या डोळ्यासमोर ती झीनत अमान !!!!! संपल एकदाचं…  हुश्श…….. पुन्हा दुसरं सुरु होतय….आता हे आणखी कोणतय बरं……………’ राम तेरी गंगा मैली…’…आता पुढे बॉबी चे गाणे सुरु होणार बहुतेक…………. याच संत घराण्याच्या भजनांची कॅसेट लावलीये बहुतक कोणितरी………

या पोस्टला लांबवुन मला त्यांचा शाप नको रे बाबा!!!! थांबते मी आता…….संतांच्या घराण्याची बदललेली व्याख्या तर पचु दे आधि……………….

Advertisements

9 thoughts on “साधू संत येती घरा……

 1. करिना साधू, मग शाहिद कपुर संत का..हे मात्र ’ अती ’ झालं. मला पण तिचा जुन्या ३ पैशांच्या आकाराचा चेहेरा बिलकुल आवडत नाही.

 2. करीना नाही मला आवडत, पण तिचा Attitude पणा मला जाम आवडतो.

  बाकी हे जाहीरात वाले कधी ‘अब्दुल कलाम’, ‘विजय भटकर’ सारख्या लोकांना का नाही घरी आणत, कुठला प्रोडक्ट असा असेल तर मी जरुर त्यात भाग घेईन 🙂

 3. masta lihilay…

  mi to program nahi pahila… pan hi post vachun vichar karat hoto… ki tya lokanni tichya sathi khas size zero khadya thevayala pahije hota. ukadalele flower, gajar, patta kobi… ani mhanayala hava hota ki ghe bai tuzhy size zero la amachi badha nako … 🙂

 4. Mast zalay lekh
  MArathi manasana Tyanchya Martubhashtil Mhani,shikavane garajeche aahe…. Kareenala Sadhu ase bolanari hi MATA aapalya Mualana KAy BARE MARATHICHA MAHATI sangu shakel?
  MARATHI LOKANCHE MARATHIBADDALCHI HI ASALI AAPULKAI PAHUN KAHRACH VAIT VATATE…. HYA AAPALYA MAHARASHTRALA khrach punha ekada Tilak Agarkar Savarkarnchi garaj aahe ase rahun rahun vatate….MHANE AMRUTA TE HI JINKI PAIJA ashi aamchya Marathi hya Dev vanchi tichya Lekarankadun Hi Upeksha!
  Aso , lekh mast jamalay

 5. ए मी खरंच वाचली नव्हती ही पोस्ट पण मागच्या मेमध्ये म्हणजे मी आरुषच्या पहिल्या वाढदिवसात B Z असणार so lets blame it on….:)
  पण तुझं एकदम पटतंय आणि कोण गं ती in marathi we say…. एकदा भेटू दे मग कोपर्‍यातच घेऊया….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s