5+6=12

काल माझी आणि मुलाची वादावादी झाली……खर तर या वाक्यामागे ’पुन्हा एकदा’ हे विशेषण लावणे योग्य ठरेल कारण आम्ही दोघं उठता बसता वाद घालत असतो……बरं “तुझं माझं जमेना…..” चा प्रॉब्लेमही आहेच.

काल त्याला काही गणितं म्हणजे सम्स (त्याच्या भाषेत) दिले होते करायला…..जे सोडवून त्याने थोड्या वेळाने मला चेक करायला दिलेले होते………जवळपास सगळे बरोबर होतं….व्हेरी गुड असा शेरा देणार तेव्हढ्यात नेहेमीचा गोंधळ दिसला……………..पोराने 5+6 चे उत्तर 12 असे लिहुन ठेवले होते.

जोरात ओरडले मी “ अरे भानात राहुन अभ्यास करत जा ना जरा…..लक्ष कुठे आहे तुझे? आणि काय रे 5+6 चे उत्तर 12 लिहायचे युनिवर्सल पेटंट घेतले आहेस का तु? किती वेळा तीच चुक करतोस तु?”

एव्हाना ती वही माझ्या हातात कोंबुन चिरंजीव Mr. Bean पाहण्यात गुंग झालेले होते…….या कार्यक्रमाचा मला भयंकर राग येतो……एकतर मला तो Bean नावाचा प्राणी अजिबात आवडत नाही आणि मुलाचे ते दैवत…मोठ्या मुश्किलीने भांडणाचा मुद्दा बदलु न देता मी त्याला परत हाक मारली…………

–“तुला हाक मारतेय मी!!!!”

–“मम्मा, पेटंट म्हणजे काय ग!!”

–“शुंभा ते सोड आधि मला 5+6 किती ते नीट सांग……………..”

गेले 6 डोक्यात आणि 5 बोटे वर… मोजणे सुरु……. ही त्यांची पद्धत आहे, बेरिज करतांना एक आकडा इन माईंड आणि दुसऱ्या आकड्यायेव्हढे फिंगर्स आउट…मग मोजामोजी सुरु…………………..

–“ईलेवन मम्मा…”

–“अरे मग एकावर एक असे लिहित नाहीये का पेन्सिल तुझी……………..”

–“ही ही ही !!!”

–“ कार्ट्या तुला जर 10 टाईम्स हेच सम दिले तरी तु पुन्हा एकदा तरी तीच चुक करशील…………….”

–“ छकुली आता बघ हं एकदम फनी सिन आहे……………ए सरक ना छकुली तिकडे नाहीतर दुसरीकडे जाउन    बस…………….”

(हा मुलगा निवांतपणे बहिणीशी बोलतोय……………माझ्याकडे सरळ दुर्लक्ष करुन……………)

–“ईकडे बघ नाहीतर T.V. बंद करेन हं मी आता………….”

–“मम्मा काय ग रोज तेच ते सम्स देते…… तु पण आणि ती टिचर पण एकदम सेम आहात……… simple addition, addition with carry, simple subtraction, subtraction with borrowing………..word problems………..मम्मा मला जाम बोअर झालय गं………………..”

(लेकरु पोटतिडकीने बोलत होतं…….)

–“ झालं रे बाळा आता ही एक्झाम झाली ना की मग सुट्टी सुरु………, बर उद्या काय आहे आता?”

–“ मला नाही माहित तुच टाईमटेबल बघ…”

मी उठुन दाराला चिकटवलेल्या कागदापुढे उभे राहुन उद्याच्या परिक्षेच्या विषयाचा शोध घेउ लागले………………. १६ मे ला सुरु झालेली ही परिक्षा संपत होती १ जुनला………खरच किती दिवस चालणार हा प्रकार म्हणून मुलाचे वैतागणे साहजिकच होते…………अभ्यासात मोजुन चार विषय ईंग्लिश, गणित, हिंदी आणि E.V.S. आणि परिक्षा १५ दिवस………..

एरवी ’मॉनिटर क्लास 2 A’ अशी ओळख मोठ्या तोऱ्यात मिरवणार माझं पिल्लु अनाठायी चिडचिड नव्हत करत तर…………….बरं शाळेची वेळ सकाळी ८ ते दुपारी १.१५ पर्यंत..घरुन सकाळी ७ वाजता गेलेला हा मुलगा दुपारी २ च्या सुमारास घरी येतो, मग त्याला कंटाळा आला तर त्याचे खरच काही चुकतेय का?

ईंग्लिश या एकाच विषयाच्या दोन धडे या महान सिलॅबसवर बेतलेले हे पेपर पहा…………

Dictation, Grammar, Comprehension, Literature, Listening Skills, Picture Composition, Reading and Recitation…………. अबब यादी लिहिताना सुद्धा दमायला होतय……बर हे सगळे पेपर्स वेगवेगळ्या दिवशी. हिंदी मधे एक दिवस ’आ ’ की मात्रा आणि ’छोटी इ’ की मात्रा आणि मग दुसऱ्या दिवशी ’बडी ई’ आणी ’उ’ की मात्रा………….गणिताचे तसेच…………माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे राहिले माझ्या ईतिहास विषयाचे असे वर्गीकरण झालेले….एक दिवस गाळलेल्या जागा, मग जोड्या लावा, मग घटना आणि सनावळ्या, एका ओळीत उत्तरे, २/३ ओळीत, मग ८-१० आणि शेवटच्या दिवशी १६ ओळीतली उत्तरे……..देवा मी दहावीपर्यंत तरी शिकले असते का अश्याने !!!!!!!!!!!!!!!

तडक गेले आणि मुलांशेजारी बसले…..मुलगा म्हणे कसलाय ग उद्या पेपर???.

म्हटलं कसला नाही, काय करतोय तुझा Mr.Bean, पोरगं खुश…………….मनमोकळेपणे बोलायला लागलं…….भरपुर गप्पा मारल्या….. “मम्मा, girls are not clever…boys are clever” म्हणुन मला चिडवुनही झाले……..दिवस कसा मस्त गेला……………….

दुसऱ्या दिवशी तो शाळेत जायला निघाला…..अचानक काहीतरी आठवुन थांबला……….मला जवळ घेउन म्हणाला, “तु नको काळजी करुस मी 5+6 = 11 लिहीन exam मधे………………मम्मा आय लव यु………..मी काल त्रास दिला ना तुला…..सॉरी… प्रॉमिस मी छान करेन…मला तुला जिंकवायचं आहे………………”

डोळ्यातले पाणी लपवुन त्याला बसमधे बसवून आले……….अभ्यासाला सुट्टी दिली तरी मुलाचे शिक्षण सुरुच होते तर………………..

Value Education किंवा  value असलेले education यालाच म्हणतात नाही का!!!!!!!!!!!!!!!

Advertisements

20 thoughts on “5+6=12

 1. नक्की पॉलिटिक्स मधे नेता होणार चिरंजीव.. त्याला बरोब्बर कळतं की ’कुठे’ -’केंव्हा’- ’कसं’- ’आणि काय’ बोलायचं ते..
  सुंदर जमलाय लेख. आमची धाकटी पण अशिच होती.. :)आई शिकवते आहे आणि ही बाल्कनीतलं कबुतर पहात बसली आहे.. हे नेहेमिचंच होतं..!

  • हे गुण आई बाबांपैकीच कोणाचे तरी असतात….कारण मी लहानपणी अशीच वांड होते….कधीच लक्ष टिकायचे नाही एका ठिकाणी…मग आई ओरडायची..
   तुमच्याकडे धाकटीमधे हे गुण कोणाचे आलेले असावेत बरं????

 2. मस्त. मला आत्ताच टेंशन आले हे सगळे विषय वाचुन. खरंच मला एवढे विषय असते तर काय केले असते मी?? या पोरांचे कौतुक वाटते आणि किव पण येते बिच्चारे. पोराला सुट्टी असलीकी मलाच जास्ती आनंद होतो 🙂

 3. इशानला सांग तो असं काय काय बोलतो म्हणून मावशीला फ़ार आवडतो. बाकी लेख तर काय उत्तमच…अजून येऊ देत…:)

 4. छोटे छोटे प्रसंग … आठवणी मोठ्या मोठ्या … मी सुद्धा असाच होतो बरं का … 😉

  • बाबा, आई पुन्हा रागावेल हं …म्हणेल मुलीना नाही करु दिला अभ्यास नातवाला तरी करु द्या…..आणि ईशानला तर आनंदच होईल …highest authority कडून सुट्टीत अशी अभ्यास न करण्याची परवानगी मिळाल्यावर…..

  • आभार….येव्हढ्या जुन्या पोस्टही वाचल्या जाताहेत याचा आनंद झाला……आणि तुमच्या धाकट्याला शुभेच्छा……

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s