संवाद……………….

“ पण खरचं अडलय का तुझं काही?” आहेत ना तुझ्या बऱ्याच ओळखी त्यांना तरी कुठे होतय भेटणं नेहेमी?” नवऱ्याची नेहेमीप्रमाणे चिडचिड सुरु झाली होती…….कारण तसं क्षुल्लक (माझ्या मते!!!) ……माझ्या मुलाच्या वर्गात असलेल्या एकमेव मराठी मुलाचा फोन नंबर चिरंजीवांनी दहा वेळा आठवण करून दिल्यानंतर आणला होता आणि माझा त्यांना फोन करण्याचा विचार चालला होता.

आता मला खरच कितीही ओळखी झाल्यातरी त्या पुरेश्या वाटत नाहीत……….बरं मराठीच लोक हवेत अशी काही अट नाही पण जर स्वत:हुनच पुढाकार घेउन ओळख करायची तर मातृभाषेला मान का देउ नये …… जगात खूप चांगली माणसे आहेत ज्यांच्याशी निव्वळ संवाद साधला तरी जीवन खुप सोपे आणि सुंदर होते. मग केली आपणहुन सुरुवात तर बिघडले काय या माझ्या मताचा माझ्याच नवऱ्याला बरेचदा उपद्रव वाटतो……….. बरं असेही नाही की ओळख वाढल्यानंतर हा बोलत नाही तर माझ्यापेक्षा जास्त गप्पा मारतो पण नवीन आणि त्यातही स्वत:हून करायची ओळख म्हटली की वाजलीच नकारघंटा……….

परवाचीच गोष्ट घ्या आम्ही मुंबई एअरपोर्ट चेक ईन केल्यानंतर मला एक आई आणि मुलगी दिसली, भारतात जातानाही त्या दोघी आमच्याच विमानात होत्या हे मी आणि मुलाने लगेच ओळखले……… आम्ही गेलो आणि बोललो झाली ओळख. प्रसन्न चेहेऱ्याने त्यांनीही गप्पा मारल्या………..बरं मुळात नवीन ओळख करायला मनापासून ईच्छा आणि मनमोकळे बोलण्याची तयारी याहुन जास्त भांडवल ते काय लागते!!!!!

या माझ्या असल्या सगळ्या युक्तीवादावर नवऱ्याचे मत असते की हे बघ मी काही कोणी माणुसघाणा नाही पण मला एक सांग का तुला येत का असे कोणी शोधत??? तु पण तर जिथे तिथे मराठी बाणा जागवत मराठीच बोलत फिरतेस मग तुझ्या आजूबाजूची मराठी माणसं येतात का अशी लोचटपणा करत???? ’लोचटपणा’ ही ही ही!!!!!! दात दाखवत हसले मी !!!!!! आहे मी लोचट !!!!!!!

केव्हढा मोठा शब्द तो………….साधं गणित आहे आपण बोलायला सुरुवात केली समोरचा हसून बोलला …..थोडा वेळ गप्पा मारल्या….त्यातूनही एखादा आपल्याच राशीचा निघाला तर ती ओळख बहरते !!!! आणि नसेलच एखाद्याची ईच्छा तर ते ही लगेच समजते किती सोप्पय हे सगळं त्यात काही लगेच अपमान वगैरे होत नाही. कुठलेही अवघड आणि बोजड शब्द आयुष्यही जड करतात असे माझे मतं आहे.

मुळात संवाद ही माणसाची गरज असते……… आम्ही भारतात जाण्याच्या आदल्या दिवशी आम्हाला केळकर आजींचा ( ’मस्कतमधली आजी’ ही पोस्ट मी ज्यांच्यावर टाकली आहे त्या….) फोन आला त्या म्हणाल्या , “दोन्ही मुलांना घेऊन एकटीच जातेस जपून जा हो!!!!!”…… “Happy Journey” त्या दिवसभरात खूप वेळा ऐकले होते पण आजीच्या “ जपून जा हो!!” ची सर त्याला कुठली यायला!!!! या आजीशीही तर अशीच ओळख झाली होती पण तो ठेवा मात्र आयुष्यभर पुरेल.

यावेळेस नासिकला मी आणि नवरा दवाखान्यात गेलो होतो ….बाहेर आल्यावर एका रिक्षावाला भेटला आणि म्हणाला, “ अरे ताई ईकडे कुठे सगळे ठीक आहेत ना?” मग घरापर्यंत त्यानी भरपूर गप्पा मारल्या……….. रिक्षातून उतरल्यावर नवरा म्हणे ओळखीचा होता का ग? म्हटलं नाही रे परवा मैत्रीणीकडे याच्याच रिक्षातून गेले होते…………. अच्छा त्याचाही दादा, मामा किंवा भाऊ करून बौद्धिक घेतलत का आपण!!! नवरा हसत हसत म्हणाला…..आणि त्याने हाताबाहेर गेलेली केस, ही सुधारणार नाही अश्या अर्थाचा चेहेरा केला………

आम्ही कुठेही गेलो मॉल, हॉटेल, स्टेशन तरी नवरा एका बाजूला उभा रहातो आणि निघण्यापुर्वी विचारतो की झालं सगळ्यांना हाय बाय करून, घरचे सगळे कसे आहेत, हवा पाणी राजकारण सगळ्या विषयांवर सखोल चर्चा करून झालेली असेल तर निघायचे का आपण? बरं मी एक कमी होते बिचाऱ्याचा आयुष्यात तर माझी दोन्ही मुलं याबाबतीत थेट माझ्यावर गेलेली आहेत त्यामुळे बरेचदा बाबा थांब आम्ही बोलतोय ना असा आदेश आल्यावर त्याचा नाईलाज होतो……..आणि मग आमच्या बाहेरच्या ’संवादा’ वरून घरात ’वाद’ होतात……

थोडक्यात काय तर मला माझ्यासारखेच अनेक वेडे आणि जरा गोजिऱ्या शब्दात सांगायचे तर संवादासाठी कायम भुकेले माणसं सतत भेटतात. आमची आजी नेहेमी सांगते जसा चष्मा लावाल तसे जग दिसते……..त्यामुळे आपण बोलल्यावर समोरच्याने दुर्लक्ष केले तर, आपण फसवले जाउ वगैरे मुर्ख शंका मनात न येता जगात खूप चांगली लोकं आहेत आणि त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून आपलेही जीवन समृद्ध होईल याविषयी माझ्या मनात किंतू नाही!!!!!!!!!!!!!!!!!!!

Advertisements

15 thoughts on “संवाद……………….

 1. आज एकदम हलकं-फुलकं वाचायला मिळालं. छान वाटलं, मलाही प्रचंड गप्पा मारायला आवडतात आणि जर समोरचा माणुस मराठी असेन तर त्या जास्तच बहरतात.

  असंच लिहीत जा !

 2. वाह. मस्त पोस्ट. मला पण बोलायला आवडतं. इंडिअन स्टोअर्स/ मंदिरात कोणीही मराठी बोलताना दिसलं की मी आपण्हून ओळख करुन घेतो. आहे काय आणि नाही काय त्यात.

 3. 🙂
  chhan lihilayes.
  maza swabhav pan tuzya navarya sarakhach ahe. pan tuza vagana jast yogy ahe he paTataye.. still, I cud never become this much talkative. amhi apale sadankada koshaat miTun gheNare.

 4. हाय,

  आज पहील्यांदाच तुझ्या ब्लॉगवर आले.
  तुझा ‘संवाद’ खुप आवडला…
  मी तुझ्यासारख्याच विचारांची आहे,मलाही नवनविन मित्रमैत्रिणी करायला खुप आवडतं..
  यापुढे नक्किच नेहेमी तुझ्या या वेब व्ररच्या घरी भेट देत जाईन.
  मी स्वतः ब्लॉगर नाहीय पण मला काही मोजकेच ब्लॉग्ज आवडतात….त्यांत हा तुझा अगदी ‘सहजच’ पटकन आवडून गेला.

 5. महेंद्रजी, सर्किट, भाग्यश्री,गायत्री,अंजु प्रतिक्रीयेबद्दल आभार…….अंजू माझ्या या घरात तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे….

 6. आमच्या कडॆ नेमके उलटॆ आहे. ” कामापुरते बोलायला येतात फक्त ” नाहीतर ” सगळॆ एकजात लुच्चे…. तुम्हाला फसवायला येतात. ” ही आहेत आमच्या सौ.ची मते… मला तर अघळ पघळ गप्पा मारायला आवडतात.’अश्शी नातीत’ जुळलेला नाते-संबध असाच तर होता. फार कशाला तन्वी, आपण तरी एकत्र आलो ते सुध्दा ऑर्कुट वरील गप्पांमुळेच ना ? …

  हल्ली निरनिराळ्या फायनान्स कंपनीच्या स्किमचे आठ्वड्यातून एकदा तरी नाजूक आवाजातले फोन येत असतात…मी तिच्याशी ( बहुदा त्याच असतात ) भरपूर गप्पा मारणे सोडत नाही ! शेवटी सांगतो, ” मॅडम पण त्या स्कीमची एन्ट्रीची एज लिमिट सत्तर तरी असेल ना ? ” ..व मग ती खजील होत फोन ठेवून देते !!!

  • काका मला संवाद आवडतोच…..नाहीतर घुसमटल्यासारखे होते……
   बडबडे लोक मनाने निर्मळ असतात..:) असे आजी म्हणते आणि मग आम्ही खुप बडबड करतो!!!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s