पत्ता……

नुकतच आम्हाला Max New York कडून एका पॉलीसीच्या प्रिमीयम साठी पत्र आलय. माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधल्या टेबलवर ते ठेवलेलं होतं म्हणजे निश्चितच ते पोस्टाने आलेलं आहे. पाहून आश्चर्य वाटलं कारण या संदर्भातला आमचा सगळा पत्रव्यवहार हा नासिकच्या पत्त्यावर होतो. या पत्राचे म्हणणे होते की आमच्या नासिकच्या पत्त्यावरून ते परत पाठवण्यात आलेले आहे म्हणून ते आम्हाला मस्कतला पाठवले आहे. आता ईथपर्यंत सगळे ठीक होते पण त्या पत्रावर जो पत्ता टाकलेला होता तो वाचून मात्र मोठी करमणूक झाली……..

त्या पत्त्यावर माझ्या नवऱ्याचे नाव आणि आडनाव एकत्र करून टाकलेलं होतं……………त्यामुळे साहजिकच आडनावाचे आद्याक्षर हे capital न असता ते small झालेले होतं. तसही त्याच आडनाव हे काही special noun नाही या माझ्या मताला Max New York मधल्या लोकांनी जोरदार पाठिंबा दिला होता . सर्वसाधारणपणे स्त्रीयांना फक्त त्यांच्या माहेरचे आडनाव special वाटतं आणि सासरचे सगळ्ंच common वाटतं याला मी का बरे अपवाद असावे !!!!! असो त्यानंतरचा पत्ता असा……

Gul Farenga post,

Box No. ——-,

Postal Code—–,

Muscat, Oman 422007

Maharashtra.

Muscat ही Oman या देशाची राजधानी असून हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रातच आहे हा शोध बाकी नवा आहे. बरं त्यातही पुन्हा त्या पत्त्यावर माझ्या नवऱ्याच्या नावाचा दिव्य पद्धतीने केलेला उल्लेख सोडला तर त्याच्या कंपनीचे नाव, त्याचे डिपार्टमेंट, एम्प्लॉयी कोड नंबर यापैकी कसलाही पुसटसाही उल्लेख नाही. त्यातही हे ’Gul Farenga Post’ म्हणजे काय ते कळेना. त्यातही जरा लावा डोके आणि सोडवा कोडे वगैरे केले तर त्याच्या कंपनीचे नाव तयार होउ शकते पण मग त्या संधीचा असा विग्रह करून घालण्यामागचं व्याकरणीय कारण मला उमजलं नाही. या नावावरुन मला ते नवी दिल्लीतलं किंवा मुंबईतलं कुलाबा भागातल्या एरियाचे नाव वाटले. हेच कमी की काय पण देशाला 422007 हा नासिकच्या कुठल्या तरी भागाचा पिन कोड लावण्याचा अविष्कार देखील साधलेला आहे. या असल्या भयावह पत्त्यावरून पत्र पोहोचवण्यात भारतातले पोस्ट ऑफिस सक्षम आहे यावर माझा पुर्ण विश्वास आहे पण मस्कतमधल्या पोस्ट खात्याने देखिल हम भी कुछ कम नही हे आता सिद्ध केलेले आहे……..

महाराष्ट्र असा स्पष्ट उल्लेख असलेलं पत्र एअरमेलनी येतं ही गंमत आहे. आणि केवळ नावावरून ते माझ्या नवऱ्याला मिळतं यावरून, “बघीतलसं मी किती फेमस आहे ते!!!” हे वाक्य मला दिवसभर ऐकावे लागले.

ओमान हा देश आणि त्याची मस्कत ही राजधानी आहे हे बरेच जणांना माहित नसते हा अनुभव आम्हाला नवा नाही. आम्ही जेव्हा जेव्हा आमचे मुक्कामस्थळ सांगतो तेव्हा हे आवर्जून नमूद करतो की मस्कत ही सल्तनत ऑफ ओमान या देशाची राजधानी आहे आणि ही जागा मुंबईपासून अवघ्या २५००कि.मी. वर आहे.

मागे एकाने आम्हाला प्रश्न विचारला होता की, ’काय रे हे तुमचे मस्कत रोह्याच्या जवळ आहे का?’ काय उत्तर देणार कपाळ !!!! ते पहाता पोस्ट खात्याचे मात्र कौतूक करावे लागेल.

आणि जाता जाता Max New York च्या पत्ते टाईप करणाऱ्या त्या महान संशोधकाला सलाम !!!!! कारण तो या गोंधळावर थांबला नाही तर त्याने आमच्या नासिकच्या पत्त्याचेही व्यवस्थित पोस्ट मार्टेम केलेले आहे…… मधूमालती हे स्पेलिंग  MadhuMalit आणि म्हसोबा मंदिर चे स्पेलिंग Bhmasoba Mand करायला तो विसरलेला नाही…..तेव्हा त्याला त्रिवार सलाम!!!!

Advertisements

11 thoughts on “पत्ता……

 1. Hats off to them 🙂 I had couriered one letter to my Mumbai address from USA and Fedex guys couldnt locate my address in bombay, My brother had to go and collect it from their office. If they cant locate an address in Mumbai, you can imagine how good they are 🙂

 2. खरं तर मी त्या लेटरचा फोटो टाकणार होते पण चूकुन Post Box No. आणि postal code तेव्हढा बरोबर आहे म्हणून नाही टाकला….हे मात्र सिद्ध झाले की हे लोक कुरियर वाल्यांपेक्षा ग्रेट म्हणावे लागतील मग….

 3. आपलं पण पोस्ट खातं असंच ग्रेट आहे बरं का …

  मला जर्मनीहून काही पत्रं येतात. मी सगळीकडे पूर्ण पत्ता दिला आहे, पण त्या ऑफिसने माझ्या पत्त्याचं ’जर्मनीकरण’ करून त्यातून सोसायटीचं नाव, उपनगराचं नाव असा ’अनावश्यक’ मजकूर गाळून टाकला आहे. जर्मनीमधल्या ऑफिसला अजूनही पत्त दुरुस्त करता येत नाहीये, आणि आपलं पोस्ट खातं कित्येक महिने मला एवढ्या पत्त्यावर पत्र देत आहे:

 4. MAST……..PU LA NCHYA POSHT KHAATYAACHI AATHVAN AALI….SAHI…KADHI KADHI MALA VAATAT KI PSOT KAAHTE E-MAIL PEKHSAAHI JAAST RELIABLE AAHE…. E-MAILS SUDHHA BOUNCE BACK HOTAAT CH NA…..PARANTU AAPLYAA POSTAAT KADHI DUSRYAANAA TRAAS HOIL ASE VIRUS/BUG YET NAAHIT…..KIVA KUNI PUBLISH HI KARU SHAKAT NAAHI…..KHARACH POST HA SAGLYAAT SURKSHIT UPAAY AAHE MSG. PAATHVANYAACHAA………..ISN’T IT?

 5. हाहाहा… हसून हसून पुरेवाट झाली. मस्त.

  >> मस्कत रोह्याच्या जवळ आहे का?
  हो, म्हणून सांगायचं ना. सांगायचं, ‘अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तिथून निघालेला माणूस चार तासांत रोह्याला पोचतो!’

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s