आज मै खुश हूँ………..

’आज मै खुश हूँ………..’ कारणही तसचं आहे उद्या माझं पिल्लू सात वर्षांच पुर्ण होतय………..१८ ऑगस्टची रात्र ही अशीच येते नेहेमी…..

आज रात्री गप्पा मारतांना अचानक नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं…….म्हणाला, “ गुंड्या किती मोठा झालाय ना आपला!!!!” खरं तर माझ्याही मनात हीच आवर्तन येताहेत……

पहिलं मुल……सगळं सगळं बदलून टाकणारं……नवरा बायकोचे आई-बाबा करणारं………पहिलं मुल सगळ्यांनाच किती प्रिय असते ना!!! रात्री नेहेमीप्रमाणे पिल्लू माझ्या कुशीत येउन शिरलं….बडबड करत गाढ झोपूनही गेलं…….माझे डोळे मात्र मिटत नव्हते………….मन मागे भुतकाळात केव्हाच पसार झाले होते……हे सात वर्षे मी पुन्हा पहात होते…अनुभवत होते……

१९ ऑगस्ट २००२, सकाळी दवाखान्यात नेल्यावर माझ्या शेजारी बसलेल्या एका पोटाचा माझ्यापेक्षा मोठा घेर असलेल्या प्रेग्नंट बाईने मला विचारले, “कितवा महिना?”…त्याही परिस्थितीत हसले मी…………म्हटलं अहो डिलिवरीसाठी आलेय मी !!!! आई, आजी, बाबा सगळेच दडपणात मी निवांत……..शेवटी आजी ओरडली की खरच हिला काही त्रास होतोय का नाहीतर चला घरी!!!!!! पण दुपारी लेबर रुममधे नेल्यावर अर्ध्या तासात माझी ’सुटका’ झाली……खर तर ती ’सुटका’ नसतेच ते असतं आयुष्यभराचे ’गुंतणं’………नाळ नसते जोडलेली आता पण मन मात्र त्या पिल्लूतच अडकलेले सतत…..

आम्हा नवरा बायकोचे विश्व अंतर्बाह्य बदललेलं…….पहिलाच नातू, पणतू, भाचा, पुतण्या सगळी बिरुद भुषवणारा माझा मुलगा……त्याचे पहिले बोल, रांगण सगळ आठवतय आत्ता. नाव काय ठेवायचे हा एक मोठा प्रश्न…..शेवटी ’ईशान’ हे शंकराचे नाव सगळ्यांना आवडले.

कितीतरी प्रसंग एकामागोमाग एक मनात येताहेत…..पिल्लू असेल तेव्हा ३ वर्षाचे, १५ ऑगस्टला टि. व्ही. वर जन-गण-मन ऐकले, म्हणालं मम्मा कोणतं गाणं हे?….. त्यानंतर दोन-तीन दिवस रोज मला ते म्हणायला सांगितले…..त्यावेळच्या गणपतीच्या सांस्कॄतिक कार्यक्रमांमधे खेळता खेळता मधेच जाउन त्याने आयोजकांना सांगितले की मला जन-गण-मन येत आणि स्टेजवर म्हणायचे आहे…….अचानक स्टेजवर माईक घेउन समोर आलं माझ पिल्लू…….अनपेक्षित आनंद होता तो….. न चुकता त्याने राष्ट्रगीत म्हटले, उपस्थित सगळे जण उभे राहिले…माझे डोळे नकळत वहायला लागले होते……आजही आठवताहेत मला त्या टाळ्या. गेल्यावर्षीच्या तुझ्या एस्किमोतल्या रुपाचा विडिओही किती वेळा पहातो मी आणि बाबा…..

दुसरं मुल होउ देण्याचा निर्णय घेतला आम्ही……..विश्वासात घेऊन आधि तुला सगळी कल्पना दिली. त्यानंतर काही दिवसात आपण गाडीवर येत असतांना अचानक तू म्हणाला , “बाबा नेक्स्ट ईयर गाडीवर आपण चौघे असणार तु, मम्मा, बाळ आणि मी….” पिल्लू तेव्हाही खुप भावलं होत रे तुझ ते स्वत:चे नाव शेवटी घेणं……ही लहानशी गोष्ट करण्यासाठी लागणारा मोठेपणा आहे तुझ्यात हे तेव्हा जाणवलं………….

मी प्रेग्नंट होते, नवरा कामानिमित्त पुण्याला गेलेला आणि दुपारी माझ्या पोटात खुप दुखायला लागलं……अगदी उठवेना…… पिल्लु भांबावलं, पण म्हणे, “मम्मा गोळी घे…मला सांग मी आणतो…” तेव्हा तो Jr. KG मधे होता , त्याला त्या गोळीच्या नावाचे स्पेलिंग सांगितले……त्याने गोळी आणि पाणी दिले…..ते घेतल्यावर मला झोप लागली…. अडिच तीन तासाने जाग आली…….पाहिलं तर बाळ उशाशी बसलेलं……..अपराधीपणाने मन भरलं माझं…. “सॉरी!!!” म्हटलं त्याला…..जवळ घेतल…….पिल्लू म्हणालं, “तुला बर वाटतय का आता?” बाळा कसं विसरु रे हे सगळं…………………

आजही तु तसाच आहेस!!!!! बहिणीला सांगणारा, “छकूली मम्मा दमते ना दिवसभर, त्रास देउ नकोस तिला…..”….तुझी आई कौतूकाने पहाते रे राजा तुला तेव्हा !!!!! पिल्लू आज सात वर्षाचे होतय म्हणजे मुंजीचे वय झालेय की आता…..

आज मनाला मुक्त सोडलय बेटा तुझ्या बालपणात……आनंदाचा अविरत ठेवा सापडतोय मला……मी तुला काय दिलं आणि तु मला काय हा हिशोब नाही मांडत पण तरिही ’आई’ केलयेस तु मला……  

शाळेतून आल्यावर तु हात पाय धुण्याचे नाटक करतोस……….बघू हाताला साबणाचा वास येतोय का असे विचारल्यावर हसतोस आणि म्हणतोस, “तुझे सब है पता मेरी माँ !!!!!”…………….बच्चू तु थोडा मोठा झालास ना की तुला सांगणार आहे असा निरुपद्रवी लबाडपणा मी देखिल करायचे लहानपणी…………..तुझ्याचसारखी तर होते मी तेव्हा…..वास्तवाकडे स्वप्नाळू डोळ्यांनी पहाणारी…….आपल्याच तंद्रीत असणारी……..आई रागावली तरी हसणारी……….वस्तूंशीही गप्पा मारणारी……….. मी तुझ्यासारखी की तु माझ्यासारखा!!!!! दुसरा ऑप्शन जास्त आवडलाय मला……. तु माझ्यासारखा. माझाच तर अंश आहेस तु…….तुझ माझं हे अस एकमेकांच्या अस्तित्वात असणं आवडत मला…….

तुझ्या दोन्ही आज्या सांगतात अशी वेड्यासारखी मुलांमधे गुंतू नकोस………मी पण ठरवणार आहे हेच !!!! पण खर सांगू का पिल्लू त्यांना तरी कुठे जमलय ते अजुन जे मला जमणार आहे!!!!! तरीही मी कमी करणार आहे बरं का…….आत्ता नाही येउ दे की ती दुसरी तुझी काळजी घेणारी!!!!!

हे जे काही लिहितीये ते ब्लॉगवर नव्हते टाकणार…… पण टाकतेय…..तु आणि मी मिळून वाचू ते नंतर….वाचतांना चूका करायच्या नाहीत पण ईनू…..नाहीतर मी रागावेन!!!!

“मम्मा मी तुला जिंकवणार आहे कायम!!!” तु म्हणतोस नेहेमी……………बाबा म्हणतो तोंड बघा माँ बेट्याच…… खरं वेगळंच असतं बरं….ह्या मम्मा असतात ना त्या बोलतात घडाघडा मनातलं सगळ……पण बाबा लोक जास्त हळवे असतात……तुझे ईंजेक्शन घ्यायला जायचो ना आपण तेव्हा बाबा कायम बाहेर उभा रहायचा, म्हणायचा मला नाही सहन होत तुच जा………तुझे बाबू पण तसेच. त्यांचे तर श्वासच तुझ नाव घेत येतात…… यावेळेस नासिकला रागावले मी त्यांना, म्हटल काय हे किती लाड कराल त्याचे….ऐकणार नाहीत ते माझं !!!!!!

तुझी स्पर्धा स्वत:शीच आहे बेटा……. वास्तवाचे भान येइलही तुला नंतर, नव्हे हे जग ती जाण करून देतेच आपल्याला……पण स्वत्व विसरु नकोस……स्वत:ला आणि जगाला तुझ्या नजरेतूनच बघ !!!!! त्यासाठी समर्थ हो!!!! तुझे आई- बाबा कायम आहेत तुझ्या सोबत………

हे खर तर पत्र नाहीये तुला हे असेच माझे विचार……तोडके मोडके…..तुला समजेल तरिही, हो ना!!!!!!

Advertisements

31 thoughts on “आज मै खुश हूँ………..

 1. वाचता वाचता डोळ्यात पाणी आलं ….खरच ना मुला किती पटपट मोठी होतात….माझं पिल्लु पण पाहता पाहता ३ वर्शाचा झाला….क

 2. तुम्हा सगळ्यांचे प्रतिक्रियेबद्दल आभार…..आपण सगळी नात्यांना प्राधान्य देणारी माणसं….त्यातही आई-बाबा आणि मुलांचे नातेसंबंध आणि त्यातले कंगोरे सर्वत्र सारखेच….
  माझ्या पिल्लूला आज खूप शुभेच्छा मिळाल्यात….आभारी आहे….
  असाच लोभ असू देत….

 3. अगं पाहिलीच नाही ही पोस्ट, सॊरी. इशानला वाढदिवसाच्या शुभेच्छा व अनेक आशिर्वाद.(Belated)खुपच हळवी झालीस ना? ह्म्म्म, व्हायचेच असे वारंवार. लेक २१वर्षांचा झाला गं नुकताच पण अगदी जन्मापासूनचे सोनेरी क्षण….कंठ दाटून आला बघ,तेव्हा थांबते.सुंदर मांडलेस.आवडले.

 4. अप्रतिम… बाकी शब्दच नाही. वाचता वाचता शेवटी अक्षरेच दिसेनाशी झाली. मग कळलं की डोळेच पाण्याने भरले मग दिसेल कसं… खुपच छान…

 5. काय गं ही पोस्ट दिसली का नाही आधी?? पण इशानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा (उशीराने) तू मला सात वर्ष पुढे नेलंस.

 6. Nandu aani tyache aai baba, comment sathi khup ushir zalay, pan kay lihu kalatach navahate, aani ajunahi kalat nahi aahe.
  Ishaanu bala khup khup aashirvad , raja khup motha ho, mala tuzya mamma sarakhe chan lihita yet nahi pan beta believe me ‘ 19th ko mein bhi bahot khush thi’
  maza team member itaka motha zala kadhi kalalech nahi, kay lihu nandu? yevadhech sangen

  “CHANDA HAI TU MERA SURAJ HAI TU , ESS TUTE DIL KA SAHARA HAI TU”

  Nandu beta it is only and only because of you i am here , during a very critical span of my life nothing fascinated me expect your words ‘AE PIYU”, which gave me the strenth in every way, pillu phar lihita yet nahi aahe re, tuzi mamma radavate bagh, pan khup khup motha ho, tuzi piyu kayam kayam kayam tuzyasathi aahe————-
  Sukhi raha beta.

 7. कुठेतरी स्वतः ईनूच्या जागी होते ह्यात.. अन अचानक असे वाटले की माझी आई जर असे काही लिहायला लागली तर नेमके काय लिहील आपल्याबद्दल?? कदाचित हे असेच काहीसं.. फक्त आमच्यातलं….

  • मेधा अग सगळ्या आया हे असच काहिसं लिहिणारं!!! मी मागेच म्हटले होते जे आपल्याला खूप पर्सनल वाटते तेच खरं तर सगळीकडे सारखे असते….आणि ह्या हळव्या नात्यांचे पैलु तर जगभर समान…
   @हंसराज, मेधा आवर्जून प्रतिक्रीया दिल्याबद्दल आभार…..

  • श्रीरंग तुमचा ब्लॉग पाहिला, सुंदर आहे…..
   जुन्या मागे पडलेल्या पोस्टवर आलेल्या कमेंट्स जास्त सुखावह वाटतात कारण कोणितरी मुद्दाम वेळ काढून वाचतय आपले विचार ही जाणिव होते…..आभार

 8. हो. आज जरा थोडा वेळ मिळाला म्हणून ही तुझी मगची पोस्ट उघडून वाचित गेलॊ अन तेच सारे प्रसंग माझ्याही मनासमोर उभे राहीले व बाळ ईशान व तुमच्यामधे मी ही विरघळत गेलॊ…कधी अश्रू घरंगळत खाली टपकला कळलेच नाही.

  तन्वी, एखादा प्रसंग वर्णन करीत समोर उभा करण्याची प्रचंड ताकद तुझ्यात आहे ! मानलं तुला !!

 9. काका काय लिहू…..ईशानला भेटायला आणणार आहे तुमच्याकडे…..माझ्यासारखंच वेडू आहे पिल्लू माझं!!!!

 10. खुप मस्त लिहिली आहेस ही पोस्ट..हळुवार..मुले कधी मोठी होतात कळतच नाही…तुझ्या ह्या लेखामुळॅ नकळत पुन्हा भुतकाळात नेवुन सोडलेस..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s