लेकीच्या माहेरासाठी…….

नुकताच जागतिक Girl Child Day झाला……

मुळात या राजकन्या जन्माला आल्यानंतरचे सगळेच दिवस खरं तर त्यांचेच असतात……..तरिही असा एक दिवस ज्यात आपलीच नव्हे तर जगातल्या सगळ्याच मुलींचा विचार प्रत्येकाने करावा नाही का!!!! आज मात्र हे विचार मी एक आई, एका सात वर्षाच्या मुलाची आणि अडिच वर्षाच्या मुलीची या भुमिकेतून मांडतेय……..माझी मुलाची डिेलिवरी अगदी सोपी झाली…….पण माझ्या लेकीची गोष्टच निराळी!! मुलगा झाला तेव्हा म्हटलं आहा रे!! आपण केव्हढे पक्के आहोत…..अजिबात आरडाओरडा नाही केला डिलिवरीत….. माझ्या लेकीने मात्र माझी पुरती खोड जिरवली……भरपूर त्रास झाला…अगदी जीव नको नको झाला….अखेरी रात्री तीन वाजता एकदाचे कन्यारत्नाचे आगमन झाले……..तिचं ते पहिल ’ट्याँव……’ ऐकलं ….माझे श्रमलेले, शिणलेले आधीच पाझरत असलेले डोळे आणखीनच वाहू लागले……त्याक्षणी मनात आलं देवा रे माझ्या पिल्लाला पण याच दिव्यातून पार पडावं लागणार आहे रे!!!! तो क्षण, तो विचार, मनातली ती आंदोलन…..घट्ट जोडले गेले मी तिला……जाणवलं फरक आहे गड्या एका मुलाची आणि एका मुलीची आई होण्यात!!!!! ’आईपण’ सारखच असतं मुलगा असो की मुलगी190120091609…आईसाठी सगळीच लेकरं सारखी वगैरे या माझ्या समजाला धक्का बसत होता……

त्यानंतर दवाखान्यातले चार दिवस खूप बोलले तिच्याशी……’सखी’ हे तिचं आणि आम्हा दोघींच्या नात्याच ठेवलेलं पहिलं नाव……..नवऱ्याला म्हट्लं आता गरज नाही तुमची…..आम्ही दोघी भटकू आता…….गळ्यातले, कानातले, ड्रेसेस, साड्या, टिकल्या ह्या तुमच्या लेखी निरर्थक गप्पा मारत……. एक ना अनेक स्वप्नच स्वप्न…….मी आणि माझी लेक दोघी दोघी……जवळ कुशीत होते ते एक सत्य…तेही स्वप्नवत…………..

मला मुलींची भलती हौस. याउलट माझी बहिण म्हणायची ताई काय करायचीये मुलगी…..मुलगाच बरा!!! मुलींना जपत बसा उगाच!!!तरीही मला मुलगीच हवी होती…….सुंदर सुंदर फ्रॉक घालणारी…छुमछूम वाजवत घरभरं फिरणारी……बाजारातले मुलींचे ड्रेसेस पाहिले की तर ही ईच्छा आणि वाढायची. नवरा म्हणायचा आहे ना आपल्याला मुलगा त्याची बायको येइल…सुनेलाच मुलगी मान!!! आता सुनेला मुलगी मानायला माझी ना नाही पण ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे…….दुसऱ्यांदा मुलं होणार म्हटल्यावर मला सासरी सगळे म्हणाले मुलगी होत नाही आपल्याकडे….मुलांची संख्या वाढणार फक्त……..म्हटलं नाही मला मुलगीच होणार……मग मधेच एखादी अनुभवी(!!!) मैत्रीण सांगायची मुलासारखाच आहे बघ पोटाचा घेर….तुला काही मुलगी होत नाही बघ!!! मी म्हणायचे मी काय तुच बघ!!! तरिही कधीतरी वाटायचे होईल ना आपल्याला मुलगीच!!! अश्याच एका क्षणी आईकडच्या गौरीला नवसही बोलले म्हटलं मुलगी होउ दे गं बाई!!! …..मग लेकीचे नाव ठेवलेय “गौरी”……

हळुहळू माउ मोठी होतीये…..आता तर ध्यान अडिच वर्षाचे झालेय…..आता आम्ही तिचे केस वाढवणार आहोत……मस्त पोनी बांधायचीये आम्हाला……माझ्या ड्रेसिंग टेबलवरचे सगळे सामान आता शेअरिंग मधे आहे…..मस्त नट्टापट्टा सुरू असतो मॅडमचा……मी डोळ्यात साठवत असते तिच रूप……. तिच्या बालपणात माझं बालपण जगतेय मी….. ती म्हणते मम्मा आपण दोघी फ्रेंड्स…………एकाददिवशी आजीबाईपणा करत बापाला सुनावते, “मला ना तुझा कंटाला आलाय ऑफिसमधून आल्यावल हायपाय का नाही धूत तू ?? जा आधि बातलूममधे…….” तिच्या त्या कमाल बोबड्या धमकीचा मान ठेवत तो मला म्हणतो, “खरयं बरं तुझं, ही बया पक्की तुझ्यावर गेलीये…….”

परवा रात्री माझी गौराई झोपली……तिला म्हटलं “ तू झोप मी चादल टाकते तुझ्या अंगावल…” तर मला उलटून म्हणाली, “मम्मा चादल नाही चा—द—य, बोबलं बोलू नकोस!!!!” म्हणजे ’र’ चा उच्चार ’ल’ न करता ’य’ केला की ते स्पष्ट………पण हा असला तोरा मुलींनाच शोभून दिसतो. मागच्या दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी मी घरातल्या उर्वरीत तिघांना तेल लावलं……मनात सहज विचार आला, आज आईकडे असते तर आईने मलाही तेल लावले असते…….क्षणभर तिच्या मायेच्या स्पर्शाची आठवण झाली तेव्हढ्यातच माझी लेक धावत आली म्हणाली, “ अले मम्मा तुला कोन लावनाल तेल…चल बस पाटावल….” कोण आनंद झाला होता मला…म्हटलं, ’जितं मया’ याचसाठी तर केला होता अट्टहास………..

मागे एकदा माझी एक मैत्रीण म्हणाली होती, “अरे बेटी ऐसेही नही आती किसीके भी घर……कन्यादान करने के लिये पुण्य होना चाहिये.” आपण कितीही शिकलेलो, पुढारलेलो बिढारलेलो असलो ना तरीही कोणी असं काही बोललं की मस्त वाटतं की माझ्याकडे माझी छकूली आहे……..तरिही मनात कधीकधी काहितरी बोचतं………..आता सासरी निघालेल्या मुलींना पहाताना एक वेगळीच सल उमटते….. “जा लाडके जा…” ऐकताना बाबा का रडायचे ते उमजलयं आता……..’सर्किट’ ची मुलगी पाहिली मागे…गोरी गोरी पान…निळ्या डोळ्यांची…..म्हटलं देतोस का रे सुन म्हणुन…..तर म्हणे आधिच मागण्या आहेत तिच्यासाठी…..आणि बायको आत्ताच रडते मुलगी सासरी जाणार म्हणून…….हसले मी…….पण असच होतं ते लेकीमधे आई स्वत:ला पहात असते ना!!! माहेरचा उंबरा ओलांडून सासरी जाणं…….काही गोष्टी नाही बदलत जग, काळ कितीही बदलले तरी!!!!!

अश्यावेळी मला हम आपके है कौन मधली ’समधी समधन’ म्हणणारी रिमा आठवते…..गाताना अचानक तिचं लक्ष लेकीच्या फोटोकडे जातं…..डोळे पाणावतात…..ती गाते

मेरी छाया है जो , आपके घर चली…..

 सपना बनके मेरी , पलकों मै है पली…..

राजकी बात बताए , ये पुँजी जिवन की…..

शोभा आजसे है ये आपके आँगन की॥

लेकीचं सासरी जाणं……तिचं माहेरपण आईची स्वप्न सगळी…….माझ्या लेकीला समजत नाही अजून तरी माझ्या मात्र कितीतरी अपेक्षा आहेत तिच्या शिक्षणाविषयी, व्यक्तिमत्वाविषयी…….आणि हो नवरा, सासर याविषयीसुद्धा……….. माहेरचे गाणे गायचे होते तर सासराले कश्यासाठी आली असे विचारणाऱ्याला बहिणाबाई उगाचच नाही म्हणून गेली………..

अरे लागले डोहाये,सांगे शेतातली माटी

गाते माहेराचे गानं, लेक येईल रे पोटी….

 दे रे दे रे योग्य ध्यान ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते……………

तर काय मी स्वत:, माझी आई, माझी आजी आणि अश्या तमाम आयांना आणि त्यांच्या लेकींना शुभेच्छा!!!!!

Advertisements

53 thoughts on “लेकीच्या माहेरासाठी…….

 1. विचार करायला भागं पाडलसं आम्हालापण मुलगीच हवी होती, पण मुलगा झाला आणि जाणवलं माझं आणी त्याचं कित्ती मस्त जमतयं, आमचंही अस्संच शेअरींग चालु आहे, पण तुझा लेख वाचल्यावर जाणवला मुलगी असती तर बायकोनेही अधीक एन्जॉय केले असते. लेकीचे जेवढे लाड करता येतात तेवढे लेकाचे खर्रंच नाही येत करता.

  गेले कित्तेक महीने बायको ने भुणभुण लावली आहे..दुसरा चान्स्ची.. मुलगी हवी म्हणुन.. पटतयं मला.. मुलगी मला पण हवी आहे.. पणं.. दुसरं झेपायचं का?? एक आहे अवलादी कार्ट तेच झालंय थोडं 🙂

  बाकी लेख मस्त जमलाय, एकदम ‘दिल से’ वाटला.. छान 🙂

  • का रे त्या गोड बिचाऱ्या ओजसला अवलादी म्हणतोस…पोरगं बापावर गेलय का?

   बाकी आमच्याही घरात नवरा आणि मुलगा जोडी आणि मी आणि लेक……तेव्हा तु पण ऐक पल्लवीचं ……भूणभूणण्याचा तुझा गुण तिनेही घेतलाय बघ म्हणजे!!!!

   प्रतिक्रीयेसाठी आभार….

  • नाही अनिकेत.मी सांगतो तुझी बायको म्हणते ते ऐक. आज तुला वाटत एक मुल बर आहे. पण जस जसा तो मोठा होतो तेव्हा त्याचा एकटेपणा आपल्याकडून बघवला जात नाही. मला एकच मुलगी आहे. आता ती एम.एस.सी.ला आहे. मला तिचं दुख जाणवते आहे. तिचा एकटेपणा जाणवतो आहे. तिने एकदा yahoo answer वर एक प्रश्न टाकला होता.” I want to share my feelings with someone. I must have one brother.” वाचून अक्षरशः रडावस वाटलं होत मला. मी गुपचूप तो प्रश्न वाचला होता. एकट्या मुलाला आपल्या भावना व्यक्त करायला, बोलायला, भांडायला आपला एक भाऊ किंवा बहिण हवी असते. तू तीच ऐक.

   • हम्म.. विचार चालुच आहे हो.. पण १००% काही सहमती मिळत नाहीये मनाकडुन. दर वेळेला विषय निघाला की काहीतरी कारणं काढुन मी टाळतो, समोरुन पोटं पुढं आलेली आणि हाताशी एक बारकं असलेली बाई समोर आली की मी इतरत्र बघतो.

    काल अस्संच झालं..बायको म्हणते.. ते क.ख.घ आहेत ना .. त्यांनी दुसरा चान्स घेतलाय. मी म्हणलं. असु शकेल.. त्यांना पहीली मुलगी आहे. त्यांना मुलगा हवा असेल.. असतात अजुनही काही कर्मठ लोकं..

    असतील ना.. मग त्यांनी जशी मुलगी आहे म्हणुन मुलासाठी चान्स घेतला तसा आपण मुलगा आहे म्हणुन मुली साठी घेऊ की.. मी निरुत्तर..

    माझ्या नाही म्हणण्यामागे अजुनही एक कारण आहे आणि ते म्हणजे पहिल्या बाळंतपणात बायकोला झालेला त्रास आणि आमच्या माता-पित्यांकडुन मिळालेले ‘को-ओपरेशन'(?) त्यामुळे नकोच वाटते परत.. आणि दुसऱ्यांदा मुलगीच होईल कश्यावरुन. म्हणुन मग मी एक मुलगी दत्तक घेण्याचा विचार व्यक्त केला होता. पण तो काही उचलुन धरला गेला नाही. असो..

    कालाय तस्मै नमः

   • अनिकेत समजतीये तुझी घालमेल……
    आणि पहिल्या वेळेस आई वडिलांच्या कोऑपरेशन चा जो मुद्दा मांडलास ना त्याबाबत तर घरोघरी मातीच्या चुली आहेत……लव्ह मॅरेजेस मधे तर हे प्रकर्षाने जाणवते…..दुसऱ्या मुलाच्या वेळेस नवऱ्याने मला स्पष्ट कल्पना दिली होती की तुला माहित आहे मदत होणार नाही…झेपणार असेल तरच पुढे जा….आणि ईतर कोणी सोबत नाही यापेक्षा तुझे आईवडिल आणि मी आहे याचा आनंद बाळग….

   • आमच्याकडे ते सुध्दा नाही ना, सौ च्या आईवडीलांना जाऊन जमाना झाला, आणि भाऊ आहे तो काही कामाचा नाही, असण्यापेक्षा नसण्यातच जमा

 2. hmm!!! khup chhan lihilas…
  तरीही मला मुलगीच हवी होती…….सुंदर सुंदर फ्रॉक घालणारी…छुमछूम वाजवत घरभरं फिरणारी……बाजारातले मुलींचे ड्रेसेस पाहिले की तर ही ईच्छा आणि वाढायची >> agadi agadi..
  masta lihilas…

  • अश्विनी, मुग्धा…..आभार….

   @ आई….
   तुझे मत ऐकले की खूप छान वाटते….दिवस खरच खुप भराभर पुढे जातात…..तरिही तुझ्या आणि बाबांच्या मायेच्या उबेबाबत कायम म्हणावेसे वाटते..शुक्र है कुछ चीजे कभी नही बदलती……मुलीची आई होताना तुलाच तर आदर्श मानले आहे…..खात्री आहे मला मी पण तुझ्याचसारखी आवडी आई होणार…..

 3. तन्वी,
  चांगला मुलगा होणं शंभर टक्के आपल्या हातात नसते पण चांगला जावई पहाणं नक्कीच असतं.. असं म्हणतात.. 🙂
  शेअरिंग मधे?? आमच्या इथे सगळ्यांचं वेगवेगळं आणलं जातं विकत, आणि मग घरी आल्यावर एकत्र होतं काही दिवसांनी.. माझा खर्च वाढतो ना पण त्यामुळे …. 🙂

  • चांगला जावई पहाणं आपल्या हातात असतं……..खरय….
   माझ्या बाबांची तुमच्यासारखीच परिस्थिती होती ते नेहेमी म्हणायचे….तीन बायका गंमत ऐका…

   • मी नेहेमी म्हणतो आमचं घर नाही हारम ( की हारेम?) आहे.. 🙂
    आपल्या अपरोक्ष त्या मुलाला किंवा मुलिला स्वतःचं सख्खं हवंच असं मला वाटता. या जगात रक्ताच्या नात्याचं कोणितरी असावं.. म्हणुन आम्ही सेकंड चान्स घेतला. आणि दोन मुलिंमधे अगदी पुर्ण समाधानी आहोत. मुलगा किंवा मुलगी हार्डली मॅटर्स, अर्थात मुलिंचं आईसोबत जास्त मेतकुट जमतं हे पण अगदी खरं.. त्या क्लिप्स, लोकल मधे विकत घेतलेले कानातले.. सगळ्यांसाठी मुलिच हव्या. 🙂 मुली झाल्या घरातलं बायकोचं वर्चस्व वाढतं… 🙂

 4. खरच, मुलगी असणे हि भाग्याची गोष्ट आहे. सर्वे भाग्यवान नसतात. घाबरू नकोस मला हि मुलगीच आहे एक. मुलगी आवडते पण तिच्या भविष्याची चिंता सतावते. मुलगा कसा मिळेल? अशी चिंता असते नेहमी. “अभी तो दिल्ली दूर है” नाही का? माऊ अजून बरीच लहान आहे. माझी कन्या २० ची झाली आहे. आता तिच्या लग्नाचा विचार करावा लागणार आहे. पण एकच कन्या तिचं लग्न झाल्यावर आमच काय? हा प्रश्न भला मोठा “आ” करून पुढे उभा आहेच. त्याची जासी मर्जी.

  • पटतय तुमचं…..ह्या चिंता सगळ्याच आई वडिलांना वाटतात….कसा मिळेल मुलगा…कशी असतील सगळी माणसं….आपल्या पिल्लाला जपतील ना!!! शेवटी तुम्ही म्हणालात तसचं…..त्याची जैसी मर्जी!!!
   आवर्जून आणि मनापासून दिलेल्या प्रतिक्रीयेसाठी आभार……..

 5. तन्वी, माझी आणि आईची अगदी मला कळायला लागले तेव्हापासून गट्टी जमली व उत्तरोत्तर अजूनच वाढते आहे. मला मात्र एकटा शोमूच. दुस~याचा विचार करणे शक्य होते पण आधीच लेकाला पाळणाघराट ठेवून जात होतेच त्यात त्याच्यापेक्षा लहान बाळालाही ठेवायचे हे मला बिलकूल शक्य नव्हते. शेवटी एकच पुरे असे ठरवले. शोमू अनेकदा विचारत असे पण तसा तो समंजस असल्याने फारसा त्रास त्याला झाला नाही. शिवाय तो अगदी बापासारखा जगन्मित्र आहे त्यामुळे अजूनतरी ओके आहे. पण मला मात्र सारखे वाटते एक तरी मुलगी हवी होती. पुन्हा एकदा मी तिच्या थ्रू सगळे पुन्हा अनुभवले असते.
  आता तू पुन्हा एकदा ती दुखती रग छेडलीस. मुलगी सासरी गेली ना तरिही आई-बाबांशी तिची नाळ कधीच तुटत नाही. फोनवर आई जेव्हा म्हणते, ” मने, कधी येशील ग आता? लवकर ये ग. आम्ही दोघे तुझीच वाट पाहत आहोत. ” कंठ इतका दाटून येतो की शब्दच फुटत नाही. काळीज फाटते माझे.

  • खरय ताई तुझं मुलगी सासरी गेली तरी तिची नाळ तुटत नाही…..आजही मी आणि आई नेटवर चॅट करायला बसलो की बाबा उशी घेउन झोपून घेतात म्हणतात आता साऱ्या विश्वाच्या गप्पा मारायच्या असतील तुम्हाला……नासिकला गेले की आई झोप ग दमतेस खुप म्हणत रोज रात्री १ ते १.३० पर्यंत गप्पा मारत असते….तिला ईतके काही सांगायचे असते की बास….आमची आजीही आमच्या घरी आली की ती आणि आई रात्री हळूहळू कितीतरी वेळ बोलत बसायच्या.मुलगी हवी गं ताई….निदान आईचे ऐकायला तरी…

 6. काय यार….असं लिहुन आम्हा फ़क्त मुलगेवाल्यांना अजुन जाणवतं की आम्हाला स्वतःला मुलगी नाही ते….मी माझ्या भाचीलाच आपली मुलगी ती झाल्यापासुन मानलंय आणि त्यावेळी मी कॉलेजला होते तरी माझ्या मित्रमैत्रीणी काय मग काय म्हणते तुझी मुलगी असं विचारत…आता दुधाची तहान ताकावरच भागवावी लागणार वाटतं…..
  बाकी पोस्ट लय भारी….आणि फ़ोटु-बिटु काय???

  • तुम्ही काय लिहीणार त्ये माहित व्हतं बघा…..अगदी त्या फर्निचरच्या रंगापत्तूर……तुमास्नी येक सांगत्ये…ग्लोबल आब्जर्वेसन हाये माझं…समद्या ताया सारख्याच अन समद्या लहान बहिनी बी तस्याच….भाच्यांमदे जीव गुतवणाऱ्या…यावरच लिहा की येकादी पोस्त….
   लय मज्जा येती बगा तुमाला चिडवायला…..पन आमचा आरुष पन लई गोड हाये…..

 7. अप्रतिम,

  अगदी खरंय. मुलिची आई असणं म्हणजे काय असतं हे तो अनुभव प्रत्यक्षात घेतल्याशिवाय नाही समजणार. मला पहिली मुलगी असताना दुसर्या वेळेसही मला “मुलगीच” हवी होती. सगळे म्हणायचे तुला मुलगाच होणार. त्यावेळेसची मनातली पाकपुक तुझी आणि माझी सारखीच वाटते. आम्ही तर “मार्विका” हे नावही फ़िक्स केलं होतं. पण खरोखरच मुलगा झाल्यावर सुचेना की याचं नाव काय ठेवायचं. डोक्यात मुलगी होणार हे पक्कं असल्यानं मुलांची नावच काढली नव्हती. पण मुलाची आई असणं आणि मुलिची असणं यातला फ़रक मलाही पहिल्याच दिवसापासून समजला. 🙂

  • ’मार्विका’ छान आहे नाव…पण त्याचा अर्थ काय आहे?
   आम्ही सुद्धा फक्त मुलींचीच नाव आठवलेली होती …मुलगा असता तर असेच गोंधळलो असतो….

 8. खुपच छान लेख आहे.मला मुलगी नाही.दोनही मुलगेच.दोन्हीवेळेस वाटत होते की मुलगी व्हावी पण….खैर देवाच्या मनात नसेल असे म्हणुन मी जे आहे ते मान्य केले.पण कधी एकटी असली की खुप जाणवते.मुलगे सतत घराबाहेर,खेळ्ण्याच्या निम्मीत्ताने किंवा कसल्या कामाच्या निम्मीत्ताने.मुलगी कशी आईच्या जवळ जवळ रहाते.हे मला खुप हवे होते.कारण मी सुध्दा आइच्या पाठी पाठी असायची.ते मला अनुभवायला मिळणार नाही ह्याच दु:ख मला नेहमी मनात रहाते.पण आज माझ्याच मनातले इथे वाचायला मिळाले.खुपच सुंदर लिहीले आहेस.

 9. नमस्कार
  तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या,आपण मुलगा/ मुलगी ह्या पैकी कोण अधिक जवळचे असते? ह्या पेक्षा आपण पाल्याच्या किती जवळ आहोत,मुलांनी आपलायला मित्र म्हणून नाते कसे दृढ केले आहे ह्याचा अंतर्मुख होऊन विचार करणे जास्त महत्वाचे आहे.खूप मोठा विषय आहे,प्रत्येकाचे मत स्वातंत्र्य आहेच.मुलगा/मुलगी दोघेही दूर जाणारच.
  मनाने पाल्य नेहमीच आई वडिलांचा विचार करीत असते.पाल्य आणि पालक ह्याचे नाते मोठे झ्याल्यावर बदलते त्याचे परिणाम म्हातारपणी दिसतात असे होऊ नये म्हणून नुसते पालक न बनता मैत्री चे नाते,विश्वासाचे,संवेदन सक्षम नाते,
  बनविणे आपल्याच हातात असते.विषयाचा आवाका खूप मोठा आहे
  मुल एकटे नाही,हा विश्वास निर्माण करा,तुम्ही घेतलेला निर्णय योग्य वयात समजून सांगा,स्वतः बाबत पूर्ण विश्वास ठेवा.दोन जण असली तरी.
  anuja

  • अनुजाताई वेगळा विचार मांडलास ……मनापासून पटते तुझे बोलणे म्हणून तर लहानसहान निर्णय घेण्याआधिही नेहेमी तुझा सल्ला घेते…….

 10. I really feel so lucky….to have both a son & a daughter…………above all to have a wife like you……………..I cannot thank you all…………..but still THANKS A LOT………for being with me & for being mine………….

 11. लेख खुप छान झालाय हे वेगळ सांगायला नकोच.
  माला सुद्धा एक मुलगी आहे. आणि ती एक दिवस दूर जाणार हां विचार आताच सहन होत नाही.
  कधी कधी मनात विचार येतो की आपण हे सगळ वेगळ्या दृष्टिकोनातून नाही का बघू शकत? कमी त्रास होइल अशा? असो.
  पण हे सगळ लिहिताना तुमच्या मुलांवर तुम्ही अन्याय नाही न करताहात? मुलगा व्ह्यायाच की मुलगी हे कोणाच्याच हातात नसत. त्या चिमुकल्यांचा काय दोष? तेहि लाडकेच आणि त्यांच्यावारही तितकाच प्रेम असल जरी तरी ‘पण मला मुलगी हवी होती…’ हे म्हणुन असमाधान व्यक्त करण योग्य आहे का? भविष्यात कधी त्यानी हे विचार वाचले किंवा एइकले तर त्याचा त्यांच्या मानत खोल कुठेतरी काय परिणाम होइल? विशेषतः जर अर्धवट वयात वाचले तर?
  एकाला एक असाव हे मनापासून पटत. मुलीच आणि आईच नाट हे वेगळ असत हेही पटत. पण मुलाच आणि मुलीच दोघांचाही एक स्वतंत्र स्थान आहे. त्यांची शक्ति स्थल आणि weaknesses सुद्धा unique आहेत. भावनेच्या आहारी जावून हा बैलेंस हरवून बसलो तर त्याचा आपल्या मुलांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येइल का?
  तेव्हा मुलीचा घोषा लावणार्या तमाम आयानो..आधी तुमच्या तय चिमुकल्या बच्च्याचे आभार माना. त्याने तुम्हाला आई केलय. तोही तितक्याच निर्व्याज पाने तुम्हाला बिलागातो, गर्दित हात सुटला तर तुम्हाला आसुस्स्लेल्ल्या डोळ्यानी शोधतो. ‘आई, आई’ करत भंडावून सोडतो. त्याची तुलना करू नका. gender equality च हाही एक angle आहेच न?

  • सोनल…..मी स्वत: हा लेख लिहीताना त्यादिवशी मनात आलेले विचार मांडलेले आहेत, माझ्या मुलाचे किंवा अपत्याचे( irrespective तो मुलगा आहे की मुलगी) आयूष्यातले स्थान यावर मी आधिच एक पोस्ट टाकली आहे….तुझे म्हणणे पटतेय. पण हे विचार एका हलक्याफूलक्या पातळीवर चाललेले आहेत, आपल्यापैकी कोणीही भूणहत्या वगैरे करणारे नाहीत किंवा मुलगी झाली तर मुलाच्या हव्यासापायी तिला टाकणारेही नाहीत…..ही सगळी सुशिक्षीत मंडळी केवळ एक विचार मांडत आहेत…..एक सहज सोप्प तुलनात्मक मत आहे प्रत्येकाचं….इथे ’gender equality’ चा angle नाहीचे मनात….
   मला वाटतं घरात जर सोप्प सहज सुंदर वातावरण असेल तर आपली आई ’तरी पण मला मुलगीच हवी होती’ असे का म्हणतेय हे समजण्याची कुवत ’त्याच’ आईच्या मुलामधे नक्की येइल आणि मुलीकडून असणाऱ्या आपल्या पालकांच्या अपेक्षा तो मुलगा पुर्ण करेल….थोडा स्वप्नाळू आहे विचार…पण positive स्वप्न बघावित नाही का!!!!

   • हे विचार एका हलक्याफूलक्या पातळीवर चाललेले आहेत, आपल्यापैकी कोणीही भूणहत्या वगैरे करणारे नाहीत किंवा मुलगी झाली तर मुलाच्या हव्यासापायी तिला टाकणारेही नाहीत…..itpat malahi kalatay.
    Pan eka ensitive wayat ardhawat satyane mul bhitharun jawoo shakat. Tyanche psychodynamics wegale astaat. majhe wichar kewal majhyapurate amryadit aahet. aani te fakt ya lekhala navhe tar tyawar aalelya pratikriyanna uddeshun suddha aahet.
    ‘gender equality’ mhanshil, tar mi fakt ek angle maandlaay. tula as mhanaychay asahi majaha mulch dawa nahi.

 12. छान लेख आहे…. पण एक सांगु का…?
  मुलांचा कुणी विचारच केला नाही, एकदा बहिण सासरी गेली की. भावाला पुरता विसरुन जाते. प्रत्येक बहीणी बद्दल नाही म्हणत मी, पण असतात काही अपवाद. सर्वांना सासरी जाणार्या मुलिचा रडणारा बाप दिसतो, पण रात्रं-दिवस जागुन पाव्हण्यांची सरबराइ करणार भाउ दिसत नाही, कारण मुळात तो तिथे नसतोच, बहीणीला आपल्या घरुन जातान बघुच शकत नाही. तो कुठेतरी, कोपर्यात जाउन तोंड दाबुन रडत असतो…..
  माफ करा जर काही जास्त बोललो असेल तर…

 13. Sahaj, Chhan lihiles….mala farase lihita nahi yet, pan ek juni kavita aathavali –

  माझया छकुिलचे डोळे, दधुया कवडीचे डाव
  बाई! कमळ कमळ, गोड िचडीचं ग नांव!
  जरी बोलते ही मैना, माझी अजनू बोबडे
  मला लागती ते बाई, खडीसाखरेचे खडे!
  सवर जगाचं कौतुक, िहचया झांकलया मुठीत
  कु ठे ठेवू ही साळुनकी, माझया डोळयाचया िपजरयात
  कसे हासं ले ग खुदकुन, माझया बाईचे हेओठ
  नजर होईल कोणाची, लावु दा ग गालबोट!

 14. aaj pahilyanda tumacha blog pahila. aani latest taklelya lekha pasun hya paryant saglae vachun kadhalet, eka baithakit…
  pan hya lekhani tar mala radkundila aanlay. 2 mahinyani maza lagna aahe. aai-baba ase achanak itake lad ka karrtaet he kalat hota pan achanak kahitari vegalach janvla.. jari me kahi divas aai pasun hakechya antravar rahanar asle tari aaj sarkhe divas parat milnar nahit.. tumachya mulanbaddal vachun khup hasu aala mala, agadi “devachi bhuta” aahet.. ekikade mala vait vattay ki me aai pasun dur janar, pan tumachya mulanbaddal vachlyavar asahi vattay ki malahi jeva ashich mula hotil teva mazya aai-baba na kiti aanand hoil..
  tumhi ghara baddal lihita, aani mala vatat hech chan aahe.. vyapak etc lihun kai milanre? ulat he ase tumachya mulanche kisse aamhala sanga. tuamchya aai-babnbaddal sanga.. shevati khara aanand tar mansatch aahe.
  chotya chotya hya tumhi lihilelya goshtich manala saglyat jast javlchya vattat…

  • स्वप्ना तुझ्या प्रतिक्रियेला सविस्तर उत्तर देईनच .. आत्ता भारतात आहे आणि जरा घाईतही, आईकडे आलेय माहेरी 🙂
   आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार आणि स्वागत!!!

 15. बरं झालं बझ टाकलास ते. नाहीतर इतका चांगला लेख वाचायचा राहून गेला असता माझा. अप्रतिम लिहिलंयस.. नेहमीप्रमाणेच.. प्रश्नच नाही..

  >> आता सुनेला मुलगी मानायला माझी ना नाही पण ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे

  ईशानूला वाचायला देऊ नकोस हां हे. तो बिचारा भावी बायकोच्या होणाऱ्या सासुरवासाने आत्ताच काळजीत पडायचा.. (हघे हेसांनल)

  • 🙂

   हेरंबा जुने लेख वाच आधि ब्लॉगवरचे नाहितर आता रोज बझ टाकून भंडावेन बरं 🙂

   >>>ईशानूला वाचायला देऊ नकोस हां हे. तो बिचारा भावी बायकोच्या होणाऱ्या सासुरवासाने आत्ताच काळजीत पडायचा.. (हघे हेसांनल)

   अरे कार्टं सुनवास करणार आहे बघ माझा!!! 😉

   आभार रे!!!

 16. काही हे निव्वळ योगायोग असतात… जस की हा लेख वाचतांना मागे ‘कन्या सासूरासी जाये’ चालू असण! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s