आ बैल मुझे मार………..

/ दिवसापुर्वी माझी एक शेजारीण संध्याकाळी साधारण साताच्या सुमारास येउन बसली……गप्पा झाल्या, चहा झाला, मुले/ नवरा यांची जेवणही झाली……होता होता साडेआठ झाले पण हिची काही हलण्याची चिन्ह दिसेनात. आम्हा सगळ्यांची चूळबूळ, मुलांवर माफक चिडचिड सगळं झालं. मला स्वत:ला संध्याकाळी कोणाचे नवरे घरी आल्यावर विनाकारणच त्यांच्याकडे ठिय्या देउन बसायला आवडत नाही…..आजच्या आमच्या पाहूण्याची मात्र अशी काही अट असल्याचे दिसत नव्हते.

नवाच्या सुमारास माझे आईबाबा ऑनलाईन आले, मग सासूसासरे- जावई, नातवंड- आजी आजोबा अश्या चॅटिंगच्या जुगलबंद्या झाल्यावर मला मैदानात पाचारण करण्यात यावं असा उभयपक्षी ठराव पास झाला…….त्यानूसार बेडरूममधून मला आवतण देण्यात आले…..पण हा ही प्रयत्न फोल ठरवून माझी शेजीबाईरुपी मैत्रीण जागीच होती.नवऱ्याच्या कपाळावरचं आठ्यांच जाळ आणि ही बाई गेल्यानंतरच माझ्यावरच शाब्दिक संकट मला स्पष्ट दिसत होतं………..आज पहिल्यांदाच तो माझ्याजागी होता, नाहीतर एरवी हा त्रास त्याच्या मित्रांपायी मला होत असतो. तरिही एकिकडे असेही वाटत होते की हिचं घरात काही बिनसलं तर नाही ना!!!!!!! ईथे परदेशात उठ्सूट, ’मै मायके चली जाउँगी’ ची धमकी घालता येतं नसल्यामुळे हिचा नाईलाज तर नाही ना झाला???? शेवटी न रहावून मी तीला विचारलेच तर ती म्हणे, “अरे कुछ भी नही, मेरे घर मे मेरे हजबंड मेरे बेटे की पढाई करवा रहे है तो ये सिरियल्स मै वहाँ नही देख सकती!!!!!!!!!!!!!” म्हटलं कप्पाळ माझं…….स्वत:चाच राग येतो अश्यावेळी. आपल्या अघळपघळ चांगूलपणाचा ( सर्किटचा शब्द), भिडस्तपणाचा लोक अक्षरश: गैरफायदा घेतात, आणि आपण काहीही करत नाही.

मस्कतला आल्यावर तर मला प्रकर्षाने हा अनुभव आलाय. आपल्या चांगूलपणाला आपला वेडेपणा म्हणण्याची वेळ अनेकदा आलीये…….आता हा परवाचा ’माझ्या’ मैत्रीणीचा एखादा किस्सा सोडला तर याप्रकारे बळीचा बकरा माझा नवराच अनेकदा बनत असतो. मी इथे आले तेव्हा मुलगी साडेपाच महिन्याची आणि मुलगा पाच वर्षाचा होता माझा. आल्यानंतर महिन्याभराच्या आतच नवऱ्याच्या बॅचलर मित्रमंडळींच्या गप्पा सुरू झाल्या, “अरे भाभीजी आ गयी है तो कब बुला रहा है खाने पे???” बरं नवरोजींनी व्रत घेतल्यासारखे त्या सगळ्यांना ईमाने ईतबारे बोलवायला सुरुवात केली. सकाळी ९/१० वाजता नवऱ्याचा फोन आला की मला धडकीच भरायला लागली, कारण हा फोन यायचाच मुळी त्याच्याबरोबर जेवायला कोणकोण येतय याची यादी द्यायला……घरात लहान मुलं, जागा नवी, कामाला बाई नाही फजिती व्हायची नुसती…..

मला स्वत:ला स्वयंपाक करायला आणि वेगवेगळे पदार्थ करून खाउ घालायला आवडतं पण ही परिस्थिती वेगळी होती, मुळात यात माझा नवराच फितूर होता. माझी बायको कशी सुगरण आहे हे जणू साऱ्या जगाला पटवायला निघाल्याच्या अविर्भावात तो वावरत होता. बरं त्याला काही म्हणावं तर याचे ठरलेले उत्तर, हे बघ मी काही स्वत:हून आमंत्रण वाटत फिरत नाही, लोक स्वत:ला self invite करतात त्याला मी काय करणार. यथावकाश यापैकी अनेक उपटसूंभांच्या फ्यामिलीज आल्या आणि त्यापैकी एखादा अपवाद वगळता बाकी कोणीही आम्हाला बोलावणे तर सोडाच पण ओळख दाखवण्याचेही कष्ट घेतले नाहीत………आता ’सोनारानेच कान टोचलेले’ असले तरी नवऱ्यात १००% सुधारणा होणार नाही याची मलाही जाणिव आहे…….

आम्हा दोघांनाही कोणाला आपल्या घरी बोलावून बाहेरचे जेवण द्यायला आवडत नाही, अगदीच नाईलाज असेल तर गोष्ट वेगळी पण केवळ कंटाळा म्हणून असले काही आम्ही करत नाही……याविषयी लोकसत्तामधे मुकूंद टाकसाळेंचा एक छान लेख आलेला आहे…… पण मग करा मेहेनत आणि बरेचदा तर भाजा लष्कराच्या भाकऱ्या. काहीही असलं तरी आता मात्र मी हे असले एकतर्फी नाते ठेवण्याबद्दल आवाज वाढवायला सुरुवात केली आहे…….यावेळेस भारतात गेल्यावर सासूबाईंशी बोलताना त्या म्हणाल्या, “अगं बाई वेळीच आवर घाल त्याला, बदलला नाही गं बाई हा अजून!!!!!!!” कधी नाही ते नवऱ्याबाबत आम्हा दोघींचे ऐतिहासिक दुर्मिळ एकमत झाले.

गेल्या वर्षी आम्ही भारतात गेलो त्याचसूट्टीत नवऱ्याच्या मित्राचे आई-वडिल येणार होते, आता ईतर बॅचलर लोकांमधे त्यांना रहायला का भाग पाडायचे, एवीतेवी आपले घर रिकामेच आहे तर राहू दे त्यांना ईथे सुखाने या विचाराने प्रवृत्त होउन आमचे घर त्यांना सुपुर्त करण्यात आले. आम्ही परत आल्यावर घरात मी आल्या आल्या गैरसोय नको म्हणून भरून ठेवलेल्या किराण्याचा खातमा झालेला, आयर्न बोर्ड जळालेला, वॉशिंग मशिनच्या ड्रायरची रिंग तुटलेली अश्या अनेक लहानसहान बाबी आढळल्या. कहर म्हणजे मस्कतसारख्या ठिकाणी जिथे प्रचंड घरभाडे आहे तिथे आपली सोय झाली याबद्दल त्या मित्राने अवाक्षरही काढले तर नाहीच उलट आलेल्या लाईटबिलाची ब्यादही आमच्या गळ्यात घालण्याचा त्याचा हेतू होता………तेव्हा मात्र मी खडसून सांगितले की हे चालणार नाही……..सरतेशेवटी एक मान्य आहेच की आपलेच नाणे खोटे…….

या सगळ्या पाहुणचाराची ही नावडती बाजू असली तरी काही अशीही नाती लाभलीत जी नुसती टिकावी नाही तर जोपासावी असे कायम वाटते. कदाचित त्याच मंडळींमूळे असावं की माणूसकीवरचा आणि नात्यांमधल्या गोडव्यावरचा विश्वास काही उडत नाही.

थोडक्यात काय माझा नवरा जोवर मोकळ्या मनाने ’आ बैल….’ म्हणतोय तोवर ’मुझे मात्र मार’ खावा लागणार आहे……कारण कितीही ठेचा खाल्ल्या तरी म्हणतात ना, ’त्याचा येळकोट राहिना…मुळ स्वभाव जाईना………’

 

Advertisements

सुरज एक चंदा एक……

सुरज एक चंदा एक……तारे अनेक…….निवांत गात गात मी पोळ्या लाटत होते. अचानक ह्या ओळी मनात का आल्या ह्याचे उत्तर नव्हते माझ्याकडे……घरापासून दुर दिवाळी साजरी करत असल्यामुळे असेल कदाचित मन वारंवार बालपणात पळत होते……तेव्हाची दिवाळी सगळ्या नातेवाईकांसोबत होती आणि आताची शेजारासोबत……..आनंद आहेच निश्चित पण मनाला आवर घालावा कोणी, बरं एका कारणाने भुतकाळात गेलेले मन तेव्हढ्याच भोज्ज्याला शिवून परत येण्याईतके शहाणे नाही, ते वेगवेगळ्या आठवणीत हजेरी लावून येते.

अश्यावेळेस मुलांना सोबत नेले नाही या सहलीला तर ते अचानक वास्तवात आणतात त्यामूळे मन मागे पळाले की मी मुलांनाही सांगते आमच्या वेळी असं होतं…तसं होतं च्या गोष्टी………तर कालच्या त्याच आठवणींच्या राज्यात माझ्या हाती लागले होते ते ह्या ओळी…

सुरज एक चंदा एक तारे भये अनेक…

एक तितली एक एक एक अनेक तितलियाँ…..

’पर दिदी ये ब्याल क्या होता है?’ ला मुलाने एंट्री केली, “मम्मा ब्याल म्हणजे काय गं?”

“ब्याल…..ब्याल होता है पंछी पकडनेवाला……………..” ….अस्मादिक.

मुलाच्या चेहेऱ्यावर स्पष्ट लिहीले होते मला काही समजत नाहीये, आणि तू हे जे काही मनापासून एंजॉय करतीये त्यात मला काही विशेष रस वाटत नाही. मागे हेच चेहेऱ्यावरचे भाव मी वाचले होते “मिले सुर मेरा तुम्हारा” गायल्यावर…….गाणं म्हणुन त्याला ते आवडलं असाव पण त्यामागचा संदेश पोहोचला नसावा…….मग मी विचार केला हे नुसते सांगून मजा येणार नाही आणि शरण गेले Youtube ला…..

पुर्वी दुरदर्शनवर येणारे एकतेचा संदेश देणारे हे व्हिडिओ आज पुन्हा नव्याने पहाताना मनात एक वेगळीच उर्मी दाटत होती……

हे  व्हिडीओ देत आहे, माझ्या मुलाला आवडले……आणि नवराही खुष झाला, आपण जुन्या पोतडीत हात घालावा आणि काहितरी खुप आवडते हाती लागावे तसे झाले होते त्याचे. काही गोष्टी समोर येत नाहीत म्हणून आठवत नाहीत पण विस्मरणात जात नाहीत हेच खरे!!!!!

दूबई-४

Atlantis Hotelचौथा दिवस…..सकाळी आमचा अर्ध्या दिवसाचा दुबई दर्शन कार्य़क्रम होता….यातले मुख्य आकर्षण होते ते ’पाम जुमैरा’ चे…. हे मानवनिर्मीत बेट एका पाम (Palm) च्या झाडाच्या आकाराचे आहे. ’नकील ग्रूप’ या कंपनीने बनवलेले हे मानवनिर्मीत आश्चर्य अवकाशातूनही दिसते. याबरोबरच ’द वर्ल्ड’ हे जगाच्या नकाश्याच्या आकाराचे बेट हेदेखील या कंपनीने बनवलेले आहे…….ईंटरनेटवर या बेटाची माहिती मिळवली होती, या बेटावरचे ’अटलांटिस हॉटेल’ पहाणे हे देखील प्रमूख आकर्षण होते…….

'Burj-al-Arab' and 'Jumairah Beach' hotel....on Jumairah Beach

याचबरोबर आम्ही जाणार होतो ते ’जुमैरा बिच’ वर….या बिचवर स्वच्छ सुंदर किनाऱ्याबरोबर दुबईतील दोन मुख्य स्थळे ’ बुर्ज-अल-अरब’ व ’जुमैरा बिच हॉटेल’ आहेत…….गौरी झोपलेली असल्यामुळे मी गाडीतच बसले तरी बाकीच्या सगळ्यांनी मात्र पाण्यात जाण्याची संधी सोडली नाही. ईथून पुढे आहे ते ’अटलांटिस हॉटेल’……पाम जुमैरा च्या अर्धवर्तूळाकार परिघावर समूद्राच्या पार्श्वभूमीवरचे हे हॉटेल खरच पहाण्यासारखे आहे……..जाताना आता आपण पामच्या बुंध्यातून जातोय वगैरे माहिती ड्रायवर देत होता……मस्त अनुभव होता तो एक……संपुर्ण जग जेव्हा मंदीच्या खाईत लोटले गेले तेव्हा या हॉटेलचे भव्य उदघाटन केले गेले…..त्यावेळी झालेल्या आतिषबाजीचा अंदाजे खर्च होता २० मिलीयन डॉलर्स……..एरवी असल्या गोष्टींना विशेष न भूलणारी मी थक्क होत होते हे सगळे ऐकून आणि याची देही बघून………….या आतिशबाजीचे साक्ष ग्रह तारेही ठरले कारण थेट अंतराळातूनही हे सगळे दिसत होते……..

तिथून मात्र आम्ही थेट हॉटेलवर आलो कारण पुढचे काम होते ’डेजर्ट सफारी’……… मला आधिपासूनच या प्रकाराची भिती वाटत होती कारण मला सरळ रस्त्यावर चालणाऱ्या गाडीतदेखील त्रास होतो आणि ईथे तर भर वाळवंटात मोठमोठ्या गाड्या उलटसुलट चालवणार…….म्हणजे माझे मळमळणे नक्की होते, पण आपल्यामूळे ईतरांचा हिरमोड नको म्हणून गप्प बसले…….तुम्ही ती महिंद्र स्कॉर्पिओ ची जाहिरात पाहिलीये का ज्यात एक ललना वाळवंटात उभी असते आणि तिकडून वाळूवरून उड्या मारत स्कॉर्पिओ येते तोच हा प्रकार…..पण प्रत्यक्षात ती जाहिरात अतिशय सौम्य वाटावी अश्या जोरजोरात दणके बसतात……..आमच्या गाडीत बसलेला कंपनीचा माणूस अर्ध्या रस्त्यात म्हणाला ’अभी ईन लोगोंको जोर का धक्का लगने वाला है!!!” झालं माझी भिती अजूनच वाढली पण काय करणार…..जवळच्या लवंगांच्या भरवश्यावर करू म्हटलं आपण वाळवंट पार, अर्थात उत्सुकता तर होतीच……..

Cars moving in Desert......The distance is around 40 K.M.The Biker in Desert

मधे एका ठिकाणी गाड्या थांबल्या…..ईथे नेहेमी ग्रूप बुकिंग होते, एकाच वेळेस अनेक गाड्या निघतात, मग एकाने एका उंच टेकडीवरून उडी मारली की दुसरा आपली गाडी त्याच्याही वरच्या टेकाडावर नेतो…….मधल्या थांब्यावर गाड्यांच्या टायरमधली हवा काढण्यात आली……जास्त दणके बसायला नको म्हणे…’नानाची टांग’ म्हटलं तुमच्या……बसायचे तेव्हढे दणके बसलेच सगळ्यांना……..

एकदाचे आम्ही वाळवंटात अवतरलो……रेसकोर्स वरच्या घोड्यांसारख्या गाड्या लावल्या गेल्या……जोरजोरात गाणे लावले………आणि मग झाली ती धुमश्चक्री सुरू………गाडी सुरु झाल्यानंतर पहिल्या ५/१० मिनीटातच मी ओळखले आपले काही खरे नाही आज……आणि तेव्हढ्यातच लेकीने रडायला सुरूवात केली आणि जाहीर केले या माणसाला गाडी चालवता येत नाही तो वेडीवाकडी चालवतोय, मला बसायचे नाही…………तिचे रडणे मिनीटागणिक वाढतच होते….शेवटी बाकीच्या गाड्यांना बाय बाय करून आम्ही थांबलो…….ड्रायवर आपला काश्मिरी होता, त्याच्याने लेकीचे रडणे पहावेना, त्याचे मत की ती घाबरलीये पण आपण भर वाळवंटात आहोत ईथून मागे फिरणे शक्य नाही. मग काय कार्टीने या नव्या काकाला गाडी धड न चालवल्याबद्दल बदड बदड बदडले…..दोन मुलींचे वडील असलेल्या त्या सद्गृहस्थाने आनंदाने तो मार खाल्ला……कसेबसे ते ४० कि.मी. पार केले आणि एका ठिकाणी सुर्यास्त पहायला थांबलो. तोच मागच्या गाडीत कोणीतरी म्हणे ओकून गोंधळ घातला होता, कोण म्हणून पाहिले तर मस्कतहून आलेले दुसरे गुजराती कुटूंब….मग आम्ही लवंगांची वाटावाटी केली……..

Desert  Safari.....Starting PointDesert Camp

तिथून पुढे होता डेजर्ट कँम्प……….तिथे रात्रीचे जेवण आणि बरोबरच्या पुरूष मंडळाचे मुख्य आकर्षण ’बेले डान्स’ होते…….गप्पा टप्पा, अरेबिक मेंदी काढणे सुरू असतांना जेवण सुरु झाले आणि मग अवतरली ’नॅनी’ नावाची बेले डान्सर……. तिच्या थिरकणाऱ्या पावलावर ग्रूपमधल्या पन्नाशीच्या काकू नाचल्या मग सगळ्यांनाच उत्साह आला आणि माझ्या नवऱ्यासहित अनेक जण नाचण्याची संधी साधून आले.

परतीच्या वाटेवर या काश्मिरी ड्रायवरशी बऱ्याच गप्पा मारल्या…..मला काश्मिरीचा थोडाफार गंध असल्यामुळे त्यानेही खूप गप्पा मारल्या…..त्यांच्या पुढच्या वर्षीपर्यंत राजस्थान मधे जेसलमेरला अशी डेजर्ट सफारी सुरू करण्याच्या कल्पनेविषयी भरभरून बोलत होता, श्रीनगरमधले घर, बायको, मुली सगळे सांगत होता……उतरतांना म्हणाला खूप दिवसानी ईतके बोललो…..माझा नवरा म्हणे माझी बायको दगडालाही बोलायला लावेल…..हसून तो म्हणाला, “ऐसा कुछ नही औरते हर जगह ऐसीही होती है…….”…..

थोडक्यात काय भरपूर श्रम झालेले असले तरी थकवा न येता सगळे प्रसन्न झाले होते……..

(या पोस्टमधे मी ’अटलांटिस हॉटेल’ आणि ’डेजर्ट सफारी’ चे व्हिडिओ टाकले आहेत, पण पाम जुमैरा निश्चितच पहाण्यासारखे आहे, YouTube वर अनेक व्हिडिओ आहेत त्याचे…नक्की पहा.)

दुबई-३

Dubai MuseumHerb and Spice.....again a statueआजची पोस्ट आहे दुबई म्युजियमबद्दल……

सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या आपल्या देशाला जतन करण्यासारख्या अनेक ऐतिहासिक,कलात्मक वास्तू आणि वस्तुंचा तोटा नाही. आणि त्याविषयीची आपली आणि आपल्या राज्यकर्त्यांची अनास्था या पार्श्वभूमीवर दुबईतले हे लहानसे म्युजियम मात्र खुपच आवडले…… जुन्या किल्ल्याचे आता म्युझियम केलेले आहे….साधारण तिकिट आहे, पण ते देणाऱ्या माणसाचे मात्र कौतूक वाटले. आमच्या बरोबर दोन लहान मुले आहेत हे पहाता त्याने आधिच कसे फिरा याविषयी सुचना केली. मुलांच्या हातात ऑरेंज गोळ्या ठेवल्या आणि त्यांना गोड हसुन समजावून सांगितले की बाहेर उन्हात उगाच पळु नका…..

’दुबई म्युझियम’………बाहेरच्या भागात असलेले दोन खोल्यातले म्युझियम पाहून नवरा चिडचिड करत होता….मुले पण वैतागले. हे काय आणि किती वेळ पहायचे…..

बाहेर निघालो आणि एक रस्ता लहानश्या अंधाघरात बसलेले अरब.....हे देखील पुतळे आहेतऱ्या बोगद्याकडे जात होता…..तिथे थोडे आत गेल्यावर मी ओरडले ’युरेका’ कारण खरे म्युझियम ईथे होते…बाहेर थोडी तोंडओळख होती केवळ. आत गोल गोल उतखेळणारी मुलं...हे खरे नाहीत पुतळे आहेतरत्या रस्त्यावरून जाउ लागलो….दुबईच्या प्रगतीचे वर्णन करणारे बोर्डस जागोजागी लावलेले आहेत….गेल्या पन्नास वर्षातील प्रत्येक दशकात दुबई कशी होती याचे सविस्तर वर्णन आहे इथे……ह्या सगळ्या बोर्डसच्या मधे एका प्रोजेक्टर वर हीच माहिती चित्र स्वरूपात दाखवली जात होती, एकीकडे अरेबिक व दुसरीकडे ईंग्लिशमधे असलेली ही माहिती सगळे वेळ काढून मनापासून पहात होते. दर दहा मिनिटाने ती माहिती पुन्हा पुन्हा दाखवली जात होती.

तिथून पुढे गेल्यावर भेटले ते अरबांच्या जीवनमानाबद्द्ल सांगणारे पुतळे……..जागोजागी मांडलेले हे पुतळे अगदी खरे वाटत होते…….एका ठिकाणी खेळणारी आणि बोट बनवणारी लहान मुलं होती तर पुढे गप्पा मारत बसलेले अरब होते. लहानपणी गोष्टींच्या पुस्तकात दिसणारे किंवा पपेट शो मधून दिसणारे अरब आत्ता मुलांना दाखवतांना मजा येत होती……. एका दुकानात ’मसाले’ विकणारा अरब होता तर दुसरीकडे ’कापड दुकानदार आणि ते खरेदी करत असलेली स्त्री’……..पुर्वी इथे मोत्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असे त्या मोत्यांची पारख करणारा दुकानदार …..खजूर विकणारा, जरीकाम करणारी बाई सगळे सगळे हजर होते…… बरं हे ईतके हुबेहुब होते की त्यात असलेल्या खऱ्या सिक्यूरिटीला सुद्धा मुलाने हात लावून पाहिले…..एका खोलीत अभ्यास करणारे मुलं आणि त्यांना कुराण शिकवणारे गुरू होते…….खरे खजुराचे झाडही होते एक…….मोती वेचणारा पाणबुडा....पाण्याने ओला झालेला त्याचा ड्रेस किती हुबेहुब आहेफिशरमन आणि त्याची बायको....

या पुढचे दालन होते समूद्राशी निगडित व्यछतावरची बोट आणि त्यातून उतरणारा पाणबूडावसायांचे….यात मोती वेचणारा पाणबुडा आणि पाण्यामुळे अंगाला जागोजागी चिकटलेला ड्रेस अतिशय बारकाव्याने बनवलेला होता……..त्याला पहात असताना अचानक वर लक्ष गेले तर हा पाणबुडा ज्या होडीतून आलेला होता ती होडी आणि त्यातून पाण्यात येणारा दुसरा पाजरीचे विणकाम करणारी स्त्री.....णबुडा दिसत होता……आहाहा!!! डोळे दिपत होते सगळे पाहून…चक्क मुले आणि नवरा कंटाळत नव्हते…….बोट बनवणारा कारागिर तर असा खरा वाटत होता की आत्ता बोलेल!!!!पुढे होते कोळी कूटूंब, मासे विकणारे नवरा बायको……..

पुढे होते ती जुन्या काळची भांडी……अवजारं……काही अस्थींचे नमूने…..जुनी नाणी…..

आणि एक छोटेखानी दुकान जिथे दुबई आणि अरब संस्कृतीशी निगडीत वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या….ईथून मात्र नवरा पळ काढू पहात होता…….पण मी चतूराईने स्वत:जवळ काही करंसी ठेवलेली असल्यामुळे आणि मनापासून त्यालाही तिथल्या वस्तू आवडल्यामुळे व्हायची ती खरेदी झालीच…….

संध्याकाळ होती ती शारजा मधे रहाणाऱ्या मैत्रीणीच्या भेटीची…..दुसरा दिवस होता तो सिटी टूर आणि ’डेजर्ट सफारी’ चा…….

दुबई-२

दुबईतला दुसरा दिवस…….सकाळी आम्ही निघालो ते ’मॉल ऑफ़ द एमिराट्स’ पहायला. मला स्वत:ला उगाचच मुलांची फरपट करत विंडो शॉपिंग वगैरे आवडत नाही…….कुठल्यातरी मॉल मधे जा आणि ज्या वस्तू आपण बापजन्मात घेणार नाही त्या कशाला पहा अशी माझी मतं मी मांडत होते……पण बरोबरच्या वाटाड्याने मला गप्प बसायला सांगितले……हा आमचा ’होस्ट आणि दोस्त’ म्हणजे सुबी नावाचा माझ्या नवऱ्याचा मित्र……आबुर्ज दुबईधि मस्कतला असलेली ही स्वारी सध्या दुबईत असते. मुलांचा लाडका सुबी मामा त्यांना वर्षभराने भेटलेला असल्यामुळे माझी बडबड त्यांच्या भरतभेटीत व्यत्यय आणत होती. मेट्रो हे मुलाचे मोठे आकर्षण…….वाळवंटातली सगळीच आश्चर्य आणि प्रगती खुल्या मनाने पहायची होती त्यामूळे आम्ही मुंबईतल्या लोकल पहाणारे लोकं, मेट्रो काही नवी नाही वगैरे कद्रूपणा कोणी करत नव्हतं!!!!! ही ट्रेन सुरू झालीये ती ०९/०९/०९ या दिवशी सकाळी ०९:०९:०९ वाजता……कुतुहल होतं हिच्याविषयी…..

दोन वेगवेगळ्या टॅक्सीमधून आम्ही सगळे बर्जूमन या जवळच्या मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. दुबईत सरळं हिंदी बोलले की काम भागते…..इथले टॅक्सी ड्रायव्हर्स भारतीय ,पाकिस्तानी वा बलुची असतात त्यामूळे अरेबिक आलेच पाहिजे असे नाही. ही सोय मस्कतला नाही….इथे जुजबी तरी अरेबिक आलेले केव्हाही सोयिस्कर ठरते. दुबईत फिरताना वारंवार जाणवत होते ते वैभव…….बराच भाग हा पुण्या मुंबईसारखा असला तरी अरबांचे वैभव आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीशी असलेली बांधिलकी जाणवत होती. दोन वेगवेगळ्या टॅक्सी असल्यामुळे स्टेशनच्या दोन टोकांना उतरणे…..ए्कमेकांचे पर्सनल नंबर नसणे……मग तू गोंधळ घातलास की मी वगैरे माझे आणि नवऱ्याIce Land in The mall of the Emiratesचे वाद….सगळे सोपस्कार पार पाडतांना लक्षात आले की आपले हुशाIce Land in Mall of the Emiratesर चिरंजीव दुसऱ्या कुटूंबाकडे आहेत ते निस्तरतील हा गोंधळ. आणि लेकाने माझ्या विश्वासाला पात्र ठरत त्यांच्याकडच्या मोबाईल वरून मला फोन लावून आम्हाला शोधून काढले. एकदाचे आम्ही ट्रेनमधे चढलो…..’बुर्ज दुबई’ ही जगातली सर्वाधिक उंच बिल्डींग दुबईतल्या कुठल्याही टोकातून दिसते…….साक्षात आकाशाला गवसणी घालणारे ते वैभव आता जवळून पहात होतो आम्ही……

२०-२५ मिनिटांच्या ट्रेन सफारी नंतर पोहोचलो ’मॉल ऑफ़ द एमिराट्स’ मधे…..सुबीचे ऐकून आपण काहीही चूक केली नाही याची प्रचिती आली. प्रचंड मोठा आणि ऐश्वर्यसंपन्न मॉल……याचे आणि एक वैशिष्ट्य असे की या ठिकाणी एक ’आईस लॅंड’ बनवलेले आहेत…..शुन्य डिग्रीपेक्षा कमी तापमान राखून तयार केलेले हे आईसलँड पहाणे ही एक पर्वणी होती, ईग्लू, पोलर बेअर, एस्किमो सगळे हजर होते तिथे. वाळवंटातल्या मॉलमधे लोक मस्तपैकी आईस स्किईंग करत होते….एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकत होते…….मनात ईच्छा आणि हातात पैसा असेल तर काय काय होउ शकते!!!!! २१ सप्टेंबर जागतिक शांती दिवस म्हणुन या मॉलमधे एक मोठी मेणबत्ती ठेवली होती ज्यावर ’शांती संदेश’ लिहायचे होते……जवळपास ३/४ तास या मॉलमधे फिरून आम्ही निघालो ते ’दुबई मॉल’ कडे……एक आश्चर्य तिथेही वाट पहात होते……..Aquarium...Dubai mall

’दुबई मॉल’ यात काय आश्चर्य असेल ते असो माझ्यासाठी हेच महत्वाचे होते की हा ’बुर्ज दुबई’ च्या जवळ होता…….हा मॉलमधे एक प्रचंड मोठे अक्वेरियम बनवलेले आहे……लहानमोठे विविध आकाराचे रंगाचे मासे पहाणे सगळ्यात जास्त एंजॉय केले माझ्या लेकीने……मनसोक्त बागडत होती ती. आणि तीच का आम्हाला ही मजा येतच होती……रोजच्या त्याच त्याच रूटिनमधून मिळालेला बदल सुखावत होता……… अक्वेरियम मधल्या बोगद्यातून मासे अजून जवळून बघितले……मस्कतहून आमच्याबरोबर आCandle for peaceलेले नवरा बायको हे नविनच लग्न असल्यामुळे मासे, बोगदे तत्सम गोष्टींपेक्षा एकमेकांचे फोटो काढण्यात रमलेले होते……

आता संध्याकाळचे सात वाजत आले होते…फिरून फिरून पाय दुखत होते. साडे आठ वाजता निघायचे होते क्रुजसाठी…..आम्ही परतलो हॉटेलवर. चहा पिउन फ्रेश झालो……मी आणि सुबी रमलो होतो शिळोप्याच्या गप्पात…या दोन दिवसात आम्हाला वर्षभराच्या गप्पा मारायच्या होत्या……आठ वाजता गाडी आली आणि आम्ही निघालो क्रूजसाठी…..भारतात क्रुज काही नवे नाही, गोव्याला केरळमधे क्रुज असतेच. आमचा हा अनुभव तितकासा सुखद होणार नाही याची जबाबदारी क्रुजवर असणाऱ्या गुज्जू ग्रुपने घेतली. बोट दुबई क्रीकमधे फिरायला लागल्यानंतर सुरु झालेली गाणी बंद करून या गुज्जू गँगचा म्होरक्या त्यांना गुजरातीमधे अनेक सुचना करत होता, त्यांच्या ट्रीपचे संपुर्ण प्लॅनिंग त्याने समजावले……आमच्या बरोबर असलेले ’गोरे’ आणि मल्लू मात्र वैतागले…..कसेबसे त्याची बडबड थांबली आणि डिनर लावण्यात आले……त्याबरोबरच ही सगळी फौज त्यावर तुटून पडली……बोट बॅलन्स होत नाहीये हे अनेक वेळा सांगुनही ते ऐकेनात. शेवटी गेलेल्या आम्हाला त्या डिनर मधे नक्की किती पदार्थ आहेत हे समजणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली होती. आम्ही मात्र सभोवतालचे दुबई पहाण्यात रमलो होतो, शेजारी असलेल्या गोऱ्यांची एव्हाना ईशानशी मैत्री झालेली होती….. ह्याने फोटो काढतो म्हटल्यावर त्या पन्नाशीच्या गृहस्थाने समोरच्या टेबलवरची फूले देऊन त्याच्या सौ.ना देण्याची पोज देउन त्याच्या तरूण मनाचे दर्शन घडवले……सौ. नेही ती फुलं लाजून स्विकारली. तेव्हढ्यातच आगमन झाले ’जादुगाराचे’, हा मल्लू जादुगार त्याच्या भयाकारी ईंग्लिशमधून त्याच्या ट्रिक्स समजावत होता……त्या गोऱ्यांनाच काय आम्हालाही समजेना, मग त्याला सल्ला दिला तुला हिंदी येत असेल तर त्यातूनच बोल!!!!! पण चाचपडतच त्याने केलेल्या जादू मात्र सगळ्यांना आवडल्या…… अंगठी गायब करणे आणि क्रूजच्या दुसऱ्या टोकाहून ती सापडणे….या जादुसाठी मी अंगठी दिली आणि तेव्हढ्यातच थोडं लाईमलाईट मधे येण्याची संधी साधली……

दमून थकून परतत आम्हाला अकरा वाजले होते…….पुढचा दिवस होता ’दुबई म्युझियम’ चा…….

दुबई……..

Burj-al-arab.....मस्कतला रहायला येण्यापूर्वी जसं ओमान हा देश जगाच्या पाठीवर नक्की कुठे आहे हा प्रश्न होता तसेच त्यावेळी दुबई आणि U.A.E. याबद्दलही मनात गोंधळ होता……क्रिकेटच्या मॅचेस मधे शारजा कप असतो ते शारजा, दुबई या देशाजवळ आहे हे असलं भौगोलिक अज्ञानसुद्धा होते.

मस्कतला आल्यानंतर मात्र या शेजारी राष्ट्राची अधिक आणि योग्य माहिती मिळाली. सात एमिराट्स मिळून बनलेले U.A.E……..त्यातलेच एक दुबई. ईतर सहा एमिराट्स आहेत शारजा, रास-अल-खैमा, अजमन, अल-ऐन, फुजैरा आणि अबुधाबी. दुबई हे त्यातले सगळ्यात प्रगत असल्यामुळे ते नाव अधिक परिचयाचे. पण बाकीचे एमिराट्स हे नवखेच होते. या ईदच्या सुट्टीत आम्ही चार दिवसांची दुबई सफर केली. ही पोस्ट थोडीफार त्या देशाबद्दल आणि आलेल्या अनु्भवाबद्दल……..मस्कतहून दुबईला जाण्याचे दोन पर्याय आहेत एक म्हणजे विमानाने आणि दुसरा रोडने…..साधारण ४०० कि.मी. अंतर स्वत:च्या गाडीने पार करा नाहीतर ONTC च्या सरकारी बसेस नी जा…….आम्ही पहिल्यांदाच जात असल्याने बसनी जाण्याचा पर्याय निवडला. या प्रवासात मुलांनी त्रास न दिल्याने तो आम्ही एंजॉय करू शकलो. मात्र सरकारी बसेस सगळीकडे ढोबळमानाने सारख्याच असा अनूभव आला.

विमानप्रवासात आपण देशांच्या सीमा केव्हा ओलांडतो ते कळत नाही पण या प्रवासात मात्र आम्हाला ते अनुभवायला मिळणार होते…….’No man’s land’ मधून जायला मिळणार होते. मुळात अश्या बॉर्डर्स म्हटल्या की डोळ्यासमोर ’वाघा बॉर्डर’ चे टि.व्ही. वर पाहिलेले दृष्य येते. इथे आम्हाला स्वत:चे विसाचे कागदपत्र वगैरे स्वत:च करायचे होते……खूप उत्सुकता होती सगळ्याची. सीमेवर शस्त्रांनी सज्ज जवान असतील वगैरे मुलाच्या कल्पनांना उधाण आले होते. नवरा आमच्याआधि एकदा जाउन आलेला असल्यामुळे प्रवास सुरू झाल्यावर थोड्याच वेळात मी आणि मुलाने त्याला भंडावायला सुरुवात केली………’बॉर्डर कधी येणार’ या आमच्या प्रश्नाला तो, “सोहार गेल्यावर लगेच येइल…” हे ठरलेले उत्तर देत होता. मग थोड्यावेळाने मुलाने, “बाबा सोहार कधी येणार….” असे विचारायला सुरुवात केली. दोन अडिच तासाने एकदाचे ते सोहार आले आणि मग लगेच १५-२० मिनिटात आम्ही ओमानच्या सीमेवर पोहोचलो. प्रशस्त ऑफिसमधे आम्हा सगळ्यांची रवानगी करण्यात आली……..आमचे पासपोर्ट बसच्या कंडक्टर बाईने आधिच घेउन ठेवले होते त्यावर ’एक्झिट’ स्टॅंपिंग तिनेच करुन घेतल्यामुळे आम्हाला तिथे काहिच करायचे नव्हते…….केवळ पासपोर्ट तिच्यादुबई एकीकडे अतिप्रगत तरिही आपल्या संस्कॄतीशी जोडलेले.... ताब्यात असल्यामुळे आम्ही तिच्यावर डोळा ठेवून होतो.

येव्हढ्या गर्दीत मुलाची भुणभूण सुरुच होती, सोल्जर्स कुठे आहेत म्हणून……..मग त्याला सांगितले की ते U.A.E. बॉर्डरवर तुझी वाट पहात आहेत…………..एकदाचे ओमान मागे सुटले आणि आम्ही U.A.E. मधे प्रवेश केला. इथे सगळीकडे निवांत कारभार होता……..इथले कायदे एकूणातच भयंकर कडक असल्यामुळे फारसे गुन्हे करण्याच्या फंदात सहसा कोणी पडत नाही………बरं पुन्हा वर्षानूवर्षे खटले लांबत नाहित…….लगेच् शिक्षा होते. मागे एकदा नवऱ्याच्या मित्राने रात्री २ वाजता सिग्नल मोडला…….गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने लगेच त्याच्या गाडिचा पाठलाग केला……..त्याला थांबवून गाडी ताब्यात घेतली……बरोबर असलेल्या त्याच्या बायकोला, पोलिसांनी त्यांच्या गाडीने घरी सुरक्षित सोडले…….या गुन्ह्यासाठी असणारी ४८ तासांची जेल भोगून दोन दिवसांनी रात्री पावणे तीन वाजता त्याला सोडण्यात आले……. बर चिरीमिरी देतो म्हटल्यावर तीच शिक्षा ४८ वर्षे होण्याचीच शक्यता जास्त…….तेव्हा कायद्याच्या चौकटीतच राहिलेले बरे!!!!!

तर ओमान सोडल्यावर १० ते १५ मिनिटात आम्ही ’हत्ता बॉर्डर’ ओलांडुन U.A.E. चौकीवर पोहोचलो……..रांगेत उभे राहून विसा फी भरून एकदाचे आम्ही या देशात ’एंट्री’ मिळवली. सगळे सोपस्कार पार पाडून बाहेर पडलो आणि पाहिले की आमची बस ’गायब’ आहे. सगळे सामान बसमधे……बरोबर लहान मुलं, आणि आम्ही ८/१० माणसं रात्रीच्या ८ वाजता तिथे उभे होतो…….गोंधळलेलो……तिथल्या पोलिसाला विचारले तर त्याने वर आकाशाकडे बोट दाखवले आणि तो निघुन गेला. आता मात्र खरी पंचाईत होती……अश्या वेळी दुसऱ्या पोलिसाला विचार वगैरे सल्ले नवरा अजिबात ऐकत नाही…….आहेत ना अजुन लोकं बरोबर ते बघतील काय ते किंवा जे त्यांचे होइल तेच आपले………असली भूमिका घेऊन बाप लेक तिथे पकडापकडी खेळतं होते……..मला मात्र असा वैताग आवडत नाही. मी दुसऱ्या पोलिसाकडे गेले आणि शक्य तेव्हढे त्याला समजावले की बाबा रे माझ्याकडे दोन लहान मुलं आहेत, मला बसचा पत्ता दे. तेव्हा कुठे त्याला समजले की आम्हाला खरच माहित नाहीये बस कुठे गेलीये ते!!!! मग त्याने सांगितले की बसमधल्या काही जणांचा पासपोर्टवर ’एक्झिट’ स्टॅंपिंग’ झालेले नव्हते…..तसेच या बॉर्डरवर काही जणांना विसा नाकारण्यात आलेला होता त्या सगळ्यांसाठी बस पुन्हा ओमान बॉर्डरला गेलेली आहे आणि ती अर्ध्या तासात येइल……….तेव्हा कुठे जीवात जीव आला, बरोबरच्या एका वयस्क कुटुंबालादेखील हा निरोप दिला……….पाउण तासात बस आली आम्ही सगळे बसलो………….आता मुलाचे प्रश्न सुरु झाले, “बाबा दुबई कधी येणार?????” मुलीचे वेगळेच नाटक सुरु होते……. “आहा !!!! मस्त आहे मुंबई, मला तर खूप आवडलं………” असे ’दुबई’ चे ’मुंबई’ असे नामकरण करून ती मोकळी झाली होती. आणि नुकत्याच दिसू लागलेल्या वाळवंटाचे कौतूक करून तिने या सहलीत ती खूश असल्याची ग्वाही दिली होती.

दुबईला पोहोचलो साधारण अकरा साडेअकराच्या सुमारास आणि मुलीचे म्हणणे खरे असल्याचे पटले…….खुप साम्य आहे ’दुबई’ व ’मुंबई’ या दोन्ही शहरात……..पहिल्या दिवशी हॉटेलवर पोहोचल्यावर चहा पिउन गप्पा मारत बसलो……..दुसऱ्या दिवशी ’मॉल ऑफ द एमिराट्स’ , नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रोची सवारी, ’ दुबई मॉल’, आणि दुबई क्रीकमधे क्रूझ सफारी असा भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे आणि सगळे बऱ्यापैकी दमल्यामुळे पटापट झोपले…………………

क्रमश: