दुबई……..

Burj-al-arab.....मस्कतला रहायला येण्यापूर्वी जसं ओमान हा देश जगाच्या पाठीवर नक्की कुठे आहे हा प्रश्न होता तसेच त्यावेळी दुबई आणि U.A.E. याबद्दलही मनात गोंधळ होता……क्रिकेटच्या मॅचेस मधे शारजा कप असतो ते शारजा, दुबई या देशाजवळ आहे हे असलं भौगोलिक अज्ञानसुद्धा होते.

मस्कतला आल्यानंतर मात्र या शेजारी राष्ट्राची अधिक आणि योग्य माहिती मिळाली. सात एमिराट्स मिळून बनलेले U.A.E……..त्यातलेच एक दुबई. ईतर सहा एमिराट्स आहेत शारजा, रास-अल-खैमा, अजमन, अल-ऐन, फुजैरा आणि अबुधाबी. दुबई हे त्यातले सगळ्यात प्रगत असल्यामुळे ते नाव अधिक परिचयाचे. पण बाकीचे एमिराट्स हे नवखेच होते. या ईदच्या सुट्टीत आम्ही चार दिवसांची दुबई सफर केली. ही पोस्ट थोडीफार त्या देशाबद्दल आणि आलेल्या अनु्भवाबद्दल……..मस्कतहून दुबईला जाण्याचे दोन पर्याय आहेत एक म्हणजे विमानाने आणि दुसरा रोडने…..साधारण ४०० कि.मी. अंतर स्वत:च्या गाडीने पार करा नाहीतर ONTC च्या सरकारी बसेस नी जा…….आम्ही पहिल्यांदाच जात असल्याने बसनी जाण्याचा पर्याय निवडला. या प्रवासात मुलांनी त्रास न दिल्याने तो आम्ही एंजॉय करू शकलो. मात्र सरकारी बसेस सगळीकडे ढोबळमानाने सारख्याच असा अनूभव आला.

विमानप्रवासात आपण देशांच्या सीमा केव्हा ओलांडतो ते कळत नाही पण या प्रवासात मात्र आम्हाला ते अनुभवायला मिळणार होते…….’No man’s land’ मधून जायला मिळणार होते. मुळात अश्या बॉर्डर्स म्हटल्या की डोळ्यासमोर ’वाघा बॉर्डर’ चे टि.व्ही. वर पाहिलेले दृष्य येते. इथे आम्हाला स्वत:चे विसाचे कागदपत्र वगैरे स्वत:च करायचे होते……खूप उत्सुकता होती सगळ्याची. सीमेवर शस्त्रांनी सज्ज जवान असतील वगैरे मुलाच्या कल्पनांना उधाण आले होते. नवरा आमच्याआधि एकदा जाउन आलेला असल्यामुळे प्रवास सुरू झाल्यावर थोड्याच वेळात मी आणि मुलाने त्याला भंडावायला सुरुवात केली………’बॉर्डर कधी येणार’ या आमच्या प्रश्नाला तो, “सोहार गेल्यावर लगेच येइल…” हे ठरलेले उत्तर देत होता. मग थोड्यावेळाने मुलाने, “बाबा सोहार कधी येणार….” असे विचारायला सुरुवात केली. दोन अडिच तासाने एकदाचे ते सोहार आले आणि मग लगेच १५-२० मिनिटात आम्ही ओमानच्या सीमेवर पोहोचलो. प्रशस्त ऑफिसमधे आम्हा सगळ्यांची रवानगी करण्यात आली……..आमचे पासपोर्ट बसच्या कंडक्टर बाईने आधिच घेउन ठेवले होते त्यावर ’एक्झिट’ स्टॅंपिंग तिनेच करुन घेतल्यामुळे आम्हाला तिथे काहिच करायचे नव्हते…….केवळ पासपोर्ट तिच्यादुबई एकीकडे अतिप्रगत तरिही आपल्या संस्कॄतीशी जोडलेले.... ताब्यात असल्यामुळे आम्ही तिच्यावर डोळा ठेवून होतो.

येव्हढ्या गर्दीत मुलाची भुणभूण सुरुच होती, सोल्जर्स कुठे आहेत म्हणून……..मग त्याला सांगितले की ते U.A.E. बॉर्डरवर तुझी वाट पहात आहेत…………..एकदाचे ओमान मागे सुटले आणि आम्ही U.A.E. मधे प्रवेश केला. इथे सगळीकडे निवांत कारभार होता……..इथले कायदे एकूणातच भयंकर कडक असल्यामुळे फारसे गुन्हे करण्याच्या फंदात सहसा कोणी पडत नाही………बरं पुन्हा वर्षानूवर्षे खटले लांबत नाहित…….लगेच् शिक्षा होते. मागे एकदा नवऱ्याच्या मित्राने रात्री २ वाजता सिग्नल मोडला…….गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने लगेच त्याच्या गाडिचा पाठलाग केला……..त्याला थांबवून गाडी ताब्यात घेतली……बरोबर असलेल्या त्याच्या बायकोला, पोलिसांनी त्यांच्या गाडीने घरी सुरक्षित सोडले…….या गुन्ह्यासाठी असणारी ४८ तासांची जेल भोगून दोन दिवसांनी रात्री पावणे तीन वाजता त्याला सोडण्यात आले……. बर चिरीमिरी देतो म्हटल्यावर तीच शिक्षा ४८ वर्षे होण्याचीच शक्यता जास्त…….तेव्हा कायद्याच्या चौकटीतच राहिलेले बरे!!!!!

तर ओमान सोडल्यावर १० ते १५ मिनिटात आम्ही ’हत्ता बॉर्डर’ ओलांडुन U.A.E. चौकीवर पोहोचलो……..रांगेत उभे राहून विसा फी भरून एकदाचे आम्ही या देशात ’एंट्री’ मिळवली. सगळे सोपस्कार पार पाडून बाहेर पडलो आणि पाहिले की आमची बस ’गायब’ आहे. सगळे सामान बसमधे……बरोबर लहान मुलं, आणि आम्ही ८/१० माणसं रात्रीच्या ८ वाजता तिथे उभे होतो…….गोंधळलेलो……तिथल्या पोलिसाला विचारले तर त्याने वर आकाशाकडे बोट दाखवले आणि तो निघुन गेला. आता मात्र खरी पंचाईत होती……अश्या वेळी दुसऱ्या पोलिसाला विचार वगैरे सल्ले नवरा अजिबात ऐकत नाही…….आहेत ना अजुन लोकं बरोबर ते बघतील काय ते किंवा जे त्यांचे होइल तेच आपले………असली भूमिका घेऊन बाप लेक तिथे पकडापकडी खेळतं होते……..मला मात्र असा वैताग आवडत नाही. मी दुसऱ्या पोलिसाकडे गेले आणि शक्य तेव्हढे त्याला समजावले की बाबा रे माझ्याकडे दोन लहान मुलं आहेत, मला बसचा पत्ता दे. तेव्हा कुठे त्याला समजले की आम्हाला खरच माहित नाहीये बस कुठे गेलीये ते!!!! मग त्याने सांगितले की बसमधल्या काही जणांचा पासपोर्टवर ’एक्झिट’ स्टॅंपिंग’ झालेले नव्हते…..तसेच या बॉर्डरवर काही जणांना विसा नाकारण्यात आलेला होता त्या सगळ्यांसाठी बस पुन्हा ओमान बॉर्डरला गेलेली आहे आणि ती अर्ध्या तासात येइल……….तेव्हा कुठे जीवात जीव आला, बरोबरच्या एका वयस्क कुटुंबालादेखील हा निरोप दिला……….पाउण तासात बस आली आम्ही सगळे बसलो………….आता मुलाचे प्रश्न सुरु झाले, “बाबा दुबई कधी येणार?????” मुलीचे वेगळेच नाटक सुरु होते……. “आहा !!!! मस्त आहे मुंबई, मला तर खूप आवडलं………” असे ’दुबई’ चे ’मुंबई’ असे नामकरण करून ती मोकळी झाली होती. आणि नुकत्याच दिसू लागलेल्या वाळवंटाचे कौतूक करून तिने या सहलीत ती खूश असल्याची ग्वाही दिली होती.

दुबईला पोहोचलो साधारण अकरा साडेअकराच्या सुमारास आणि मुलीचे म्हणणे खरे असल्याचे पटले…….खुप साम्य आहे ’दुबई’ व ’मुंबई’ या दोन्ही शहरात……..पहिल्या दिवशी हॉटेलवर पोहोचल्यावर चहा पिउन गप्पा मारत बसलो……..दुसऱ्या दिवशी ’मॉल ऑफ द एमिराट्स’ , नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रोची सवारी, ’ दुबई मॉल’, आणि दुबई क्रीकमधे क्रूझ सफारी असा भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे आणि सगळे बऱ्यापैकी दमल्यामुळे पटापट झोपले…………………

क्रमश:

Advertisements

14 thoughts on “दुबई……..

  1. .इथले कायदे एकूणातच भयंकर कडक असल्यामुळे फारसे गुन्हे करण्याच्या फंदात सहसा कोणी पडत नाही. . . .असेच कायदे भारतात पण हवे. . . दुबई सारख्या वाळवंटात जे नंदनवन फुलवल आहे ते निव्वळ अविश्वसनीय आहे. . . पुढील पोस्टची वाट बघतोय!!!

  2. क्रांती, शिल्पा, योगेश आभार….

    योगेश यथा राजा तथा प्रजा याचा अनुभव या आखाती देशात येतो……इथल्या राज्यकर्त्यांना देशाचे आणि प्रजेचे हित महत्वाचे वाटते…..त्यामूळे हुकुमशाही असूनही इथे सुरक्षित वाटते जे की आपल्या लोकशाहीतही वाटत नाही……

  3. बरेच मित्र-मैत्रिणी व नातेवाईक तिथे असल्याने खूप ऐकून आहोत. मला सगळ्यात जास्त आवडते ते म्हणजे तिथल कडक कायदे. हुकुमशाही असो की लोकशाही जनतेला सुरक्षित वाटणे अतिशय महत्वाचे आहे. नेमके हेच आपल्याकडे कधीही होऊ शकेल असे वाटत नाही. 😦
    लेख नेहमीप्रमाणे छान.

  4. जरा अजुन फोटोवगैरे पोस्ट करा ना. आमच्या कंपनितला एक इंजिनिअर तिथे जॉइन झालाय रिग वर. दिड महिना भारतात, आणि नंतर दोन महिने रिग वर असा फ्रिक आउट जॉब प्रोफाइल आहे.
    तो वाळवंटातल्या अरबाचा फोटो खुप मस्त आलाय.

    • अजून फोटो टाकणार आहे , पुढच्या पोस्टमधे टाकते….ज्या ज्या जागेची पोस्ट तिचे फोटो असा मानस आहे……

  5. khupach chhan.nanhache drawing pan khup awadle.nanha tuzya blogchi vat baghat aahe. lavakarch pahayala milel. aaipeksha mulaga savai honar.tai tuza lekh nehami pramane chanach ahe. amitche protsahan tumhala prerna det asate. +chakuli kay mhanate? diwalichya shubhechya happy diwali.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s