दुबई-२

दुबईतला दुसरा दिवस…….सकाळी आम्ही निघालो ते ’मॉल ऑफ़ द एमिराट्स’ पहायला. मला स्वत:ला उगाचच मुलांची फरपट करत विंडो शॉपिंग वगैरे आवडत नाही…….कुठल्यातरी मॉल मधे जा आणि ज्या वस्तू आपण बापजन्मात घेणार नाही त्या कशाला पहा अशी माझी मतं मी मांडत होते……पण बरोबरच्या वाटाड्याने मला गप्प बसायला सांगितले……हा आमचा ’होस्ट आणि दोस्त’ म्हणजे सुबी नावाचा माझ्या नवऱ्याचा मित्र……आबुर्ज दुबईधि मस्कतला असलेली ही स्वारी सध्या दुबईत असते. मुलांचा लाडका सुबी मामा त्यांना वर्षभराने भेटलेला असल्यामुळे माझी बडबड त्यांच्या भरतभेटीत व्यत्यय आणत होती. मेट्रो हे मुलाचे मोठे आकर्षण…….वाळवंटातली सगळीच आश्चर्य आणि प्रगती खुल्या मनाने पहायची होती त्यामूळे आम्ही मुंबईतल्या लोकल पहाणारे लोकं, मेट्रो काही नवी नाही वगैरे कद्रूपणा कोणी करत नव्हतं!!!!! ही ट्रेन सुरू झालीये ती ०९/०९/०९ या दिवशी सकाळी ०९:०९:०९ वाजता……कुतुहल होतं हिच्याविषयी…..

दोन वेगवेगळ्या टॅक्सीमधून आम्ही सगळे बर्जूमन या जवळच्या मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. दुबईत सरळं हिंदी बोलले की काम भागते…..इथले टॅक्सी ड्रायव्हर्स भारतीय ,पाकिस्तानी वा बलुची असतात त्यामूळे अरेबिक आलेच पाहिजे असे नाही. ही सोय मस्कतला नाही….इथे जुजबी तरी अरेबिक आलेले केव्हाही सोयिस्कर ठरते. दुबईत फिरताना वारंवार जाणवत होते ते वैभव…….बराच भाग हा पुण्या मुंबईसारखा असला तरी अरबांचे वैभव आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीशी असलेली बांधिलकी जाणवत होती. दोन वेगवेगळ्या टॅक्सी असल्यामुळे स्टेशनच्या दोन टोकांना उतरणे…..ए्कमेकांचे पर्सनल नंबर नसणे……मग तू गोंधळ घातलास की मी वगैरे माझे आणि नवऱ्याIce Land in The mall of the Emiratesचे वाद….सगळे सोपस्कार पार पाडतांना लक्षात आले की आपले हुशाIce Land in Mall of the Emiratesर चिरंजीव दुसऱ्या कुटूंबाकडे आहेत ते निस्तरतील हा गोंधळ. आणि लेकाने माझ्या विश्वासाला पात्र ठरत त्यांच्याकडच्या मोबाईल वरून मला फोन लावून आम्हाला शोधून काढले. एकदाचे आम्ही ट्रेनमधे चढलो…..’बुर्ज दुबई’ ही जगातली सर्वाधिक उंच बिल्डींग दुबईतल्या कुठल्याही टोकातून दिसते…….साक्षात आकाशाला गवसणी घालणारे ते वैभव आता जवळून पहात होतो आम्ही……

२०-२५ मिनिटांच्या ट्रेन सफारी नंतर पोहोचलो ’मॉल ऑफ़ द एमिराट्स’ मधे…..सुबीचे ऐकून आपण काहीही चूक केली नाही याची प्रचिती आली. प्रचंड मोठा आणि ऐश्वर्यसंपन्न मॉल……याचे आणि एक वैशिष्ट्य असे की या ठिकाणी एक ’आईस लॅंड’ बनवलेले आहेत…..शुन्य डिग्रीपेक्षा कमी तापमान राखून तयार केलेले हे आईसलँड पहाणे ही एक पर्वणी होती, ईग्लू, पोलर बेअर, एस्किमो सगळे हजर होते तिथे. वाळवंटातल्या मॉलमधे लोक मस्तपैकी आईस स्किईंग करत होते….एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकत होते…….मनात ईच्छा आणि हातात पैसा असेल तर काय काय होउ शकते!!!!! २१ सप्टेंबर जागतिक शांती दिवस म्हणुन या मॉलमधे एक मोठी मेणबत्ती ठेवली होती ज्यावर ’शांती संदेश’ लिहायचे होते……जवळपास ३/४ तास या मॉलमधे फिरून आम्ही निघालो ते ’दुबई मॉल’ कडे……एक आश्चर्य तिथेही वाट पहात होते……..Aquarium...Dubai mall

’दुबई मॉल’ यात काय आश्चर्य असेल ते असो माझ्यासाठी हेच महत्वाचे होते की हा ’बुर्ज दुबई’ च्या जवळ होता…….हा मॉलमधे एक प्रचंड मोठे अक्वेरियम बनवलेले आहे……लहानमोठे विविध आकाराचे रंगाचे मासे पहाणे सगळ्यात जास्त एंजॉय केले माझ्या लेकीने……मनसोक्त बागडत होती ती. आणि तीच का आम्हाला ही मजा येतच होती……रोजच्या त्याच त्याच रूटिनमधून मिळालेला बदल सुखावत होता……… अक्वेरियम मधल्या बोगद्यातून मासे अजून जवळून बघितले……मस्कतहून आमच्याबरोबर आCandle for peaceलेले नवरा बायको हे नविनच लग्न असल्यामुळे मासे, बोगदे तत्सम गोष्टींपेक्षा एकमेकांचे फोटो काढण्यात रमलेले होते……

आता संध्याकाळचे सात वाजत आले होते…फिरून फिरून पाय दुखत होते. साडे आठ वाजता निघायचे होते क्रुजसाठी…..आम्ही परतलो हॉटेलवर. चहा पिउन फ्रेश झालो……मी आणि सुबी रमलो होतो शिळोप्याच्या गप्पात…या दोन दिवसात आम्हाला वर्षभराच्या गप्पा मारायच्या होत्या……आठ वाजता गाडी आली आणि आम्ही निघालो क्रूजसाठी…..भारतात क्रुज काही नवे नाही, गोव्याला केरळमधे क्रुज असतेच. आमचा हा अनुभव तितकासा सुखद होणार नाही याची जबाबदारी क्रुजवर असणाऱ्या गुज्जू ग्रुपने घेतली. बोट दुबई क्रीकमधे फिरायला लागल्यानंतर सुरु झालेली गाणी बंद करून या गुज्जू गँगचा म्होरक्या त्यांना गुजरातीमधे अनेक सुचना करत होता, त्यांच्या ट्रीपचे संपुर्ण प्लॅनिंग त्याने समजावले……आमच्या बरोबर असलेले ’गोरे’ आणि मल्लू मात्र वैतागले…..कसेबसे त्याची बडबड थांबली आणि डिनर लावण्यात आले……त्याबरोबरच ही सगळी फौज त्यावर तुटून पडली……बोट बॅलन्स होत नाहीये हे अनेक वेळा सांगुनही ते ऐकेनात. शेवटी गेलेल्या आम्हाला त्या डिनर मधे नक्की किती पदार्थ आहेत हे समजणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली होती. आम्ही मात्र सभोवतालचे दुबई पहाण्यात रमलो होतो, शेजारी असलेल्या गोऱ्यांची एव्हाना ईशानशी मैत्री झालेली होती….. ह्याने फोटो काढतो म्हटल्यावर त्या पन्नाशीच्या गृहस्थाने समोरच्या टेबलवरची फूले देऊन त्याच्या सौ.ना देण्याची पोज देउन त्याच्या तरूण मनाचे दर्शन घडवले……सौ. नेही ती फुलं लाजून स्विकारली. तेव्हढ्यातच आगमन झाले ’जादुगाराचे’, हा मल्लू जादुगार त्याच्या भयाकारी ईंग्लिशमधून त्याच्या ट्रिक्स समजावत होता……त्या गोऱ्यांनाच काय आम्हालाही समजेना, मग त्याला सल्ला दिला तुला हिंदी येत असेल तर त्यातूनच बोल!!!!! पण चाचपडतच त्याने केलेल्या जादू मात्र सगळ्यांना आवडल्या…… अंगठी गायब करणे आणि क्रूजच्या दुसऱ्या टोकाहून ती सापडणे….या जादुसाठी मी अंगठी दिली आणि तेव्हढ्यातच थोडं लाईमलाईट मधे येण्याची संधी साधली……

दमून थकून परतत आम्हाला अकरा वाजले होते…….पुढचा दिवस होता ’दुबई म्युझियम’ चा…….

Advertisements

8 thoughts on “दुबई-२

  1. दुबईचे वर्णन फारच छान केले आहे. एक सांगावेसे वाटते कि फोटो जास्त डार्क आहेत. दिसून येत नाही. ती अडोब फोटोशोप वरून auto fix केल्यास स्वच्छ दिसतात. आपल्या पोस्ट वरील फोटो मी सवे करून फ़िक्ष केली आहेत. एकदम साफ दिसत आहेत पण पाठवू कसे? आपला इ-मेल दिल्यास पाठविता येतील. माझा इ-मेल koshtirn@gmail.com आहे. असो मात्र वर्णन खूपच छान झाल आहे

    • अग आज तब्येतीने दगा दिलाय….मनापासून सगळं नाही लिहीलं गेलय….या एकेका मॉलवर एक लेख होउ शकतो…

  2. तन्वी, चला आता तुझ्याकडे आल्यावर हे सगळे धावत्या समालोचनासकट दाखवायची जबाबदारी आली तुझ्यावर. हा..हा..हा. मस्तच लिहीले आहेस. वाचतेय..वाचतेय.:)
    का गं, काय झालं तब्येतीला?:(

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s