दुबई-३

Dubai MuseumHerb and Spice.....again a statueआजची पोस्ट आहे दुबई म्युजियमबद्दल……

सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या आपल्या देशाला जतन करण्यासारख्या अनेक ऐतिहासिक,कलात्मक वास्तू आणि वस्तुंचा तोटा नाही. आणि त्याविषयीची आपली आणि आपल्या राज्यकर्त्यांची अनास्था या पार्श्वभूमीवर दुबईतले हे लहानसे म्युजियम मात्र खुपच आवडले…… जुन्या किल्ल्याचे आता म्युझियम केलेले आहे….साधारण तिकिट आहे, पण ते देणाऱ्या माणसाचे मात्र कौतूक वाटले. आमच्या बरोबर दोन लहान मुले आहेत हे पहाता त्याने आधिच कसे फिरा याविषयी सुचना केली. मुलांच्या हातात ऑरेंज गोळ्या ठेवल्या आणि त्यांना गोड हसुन समजावून सांगितले की बाहेर उन्हात उगाच पळु नका…..

’दुबई म्युझियम’………बाहेरच्या भागात असलेले दोन खोल्यातले म्युझियम पाहून नवरा चिडचिड करत होता….मुले पण वैतागले. हे काय आणि किती वेळ पहायचे…..

बाहेर निघालो आणि एक रस्ता लहानश्या अंधाघरात बसलेले अरब.....हे देखील पुतळे आहेतऱ्या बोगद्याकडे जात होता…..तिथे थोडे आत गेल्यावर मी ओरडले ’युरेका’ कारण खरे म्युझियम ईथे होते…बाहेर थोडी तोंडओळख होती केवळ. आत गोल गोल उतखेळणारी मुलं...हे खरे नाहीत पुतळे आहेतरत्या रस्त्यावरून जाउ लागलो….दुबईच्या प्रगतीचे वर्णन करणारे बोर्डस जागोजागी लावलेले आहेत….गेल्या पन्नास वर्षातील प्रत्येक दशकात दुबई कशी होती याचे सविस्तर वर्णन आहे इथे……ह्या सगळ्या बोर्डसच्या मधे एका प्रोजेक्टर वर हीच माहिती चित्र स्वरूपात दाखवली जात होती, एकीकडे अरेबिक व दुसरीकडे ईंग्लिशमधे असलेली ही माहिती सगळे वेळ काढून मनापासून पहात होते. दर दहा मिनिटाने ती माहिती पुन्हा पुन्हा दाखवली जात होती.

तिथून पुढे गेल्यावर भेटले ते अरबांच्या जीवनमानाबद्द्ल सांगणारे पुतळे……..जागोजागी मांडलेले हे पुतळे अगदी खरे वाटत होते…….एका ठिकाणी खेळणारी आणि बोट बनवणारी लहान मुलं होती तर पुढे गप्पा मारत बसलेले अरब होते. लहानपणी गोष्टींच्या पुस्तकात दिसणारे किंवा पपेट शो मधून दिसणारे अरब आत्ता मुलांना दाखवतांना मजा येत होती……. एका दुकानात ’मसाले’ विकणारा अरब होता तर दुसरीकडे ’कापड दुकानदार आणि ते खरेदी करत असलेली स्त्री’……..पुर्वी इथे मोत्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असे त्या मोत्यांची पारख करणारा दुकानदार …..खजूर विकणारा, जरीकाम करणारी बाई सगळे सगळे हजर होते…… बरं हे ईतके हुबेहुब होते की त्यात असलेल्या खऱ्या सिक्यूरिटीला सुद्धा मुलाने हात लावून पाहिले…..एका खोलीत अभ्यास करणारे मुलं आणि त्यांना कुराण शिकवणारे गुरू होते…….खरे खजुराचे झाडही होते एक…….मोती वेचणारा पाणबुडा....पाण्याने ओला झालेला त्याचा ड्रेस किती हुबेहुब आहेफिशरमन आणि त्याची बायको....

या पुढचे दालन होते समूद्राशी निगडित व्यछतावरची बोट आणि त्यातून उतरणारा पाणबूडावसायांचे….यात मोती वेचणारा पाणबुडा आणि पाण्यामुळे अंगाला जागोजागी चिकटलेला ड्रेस अतिशय बारकाव्याने बनवलेला होता……..त्याला पहात असताना अचानक वर लक्ष गेले तर हा पाणबुडा ज्या होडीतून आलेला होता ती होडी आणि त्यातून पाण्यात येणारा दुसरा पाजरीचे विणकाम करणारी स्त्री.....णबुडा दिसत होता……आहाहा!!! डोळे दिपत होते सगळे पाहून…चक्क मुले आणि नवरा कंटाळत नव्हते…….बोट बनवणारा कारागिर तर असा खरा वाटत होता की आत्ता बोलेल!!!!पुढे होते कोळी कूटूंब, मासे विकणारे नवरा बायको……..

पुढे होते ती जुन्या काळची भांडी……अवजारं……काही अस्थींचे नमूने…..जुनी नाणी…..

आणि एक छोटेखानी दुकान जिथे दुबई आणि अरब संस्कृतीशी निगडीत वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या….ईथून मात्र नवरा पळ काढू पहात होता…….पण मी चतूराईने स्वत:जवळ काही करंसी ठेवलेली असल्यामुळे आणि मनापासून त्यालाही तिथल्या वस्तू आवडल्यामुळे व्हायची ती खरेदी झालीच…….

संध्याकाळ होती ती शारजा मधे रहाणाऱ्या मैत्रीणीच्या भेटीची…..दुसरा दिवस होता तो सिटी टूर आणि ’डेजर्ट सफारी’ चा…….

Advertisements

5 thoughts on “दुबई-३

 1. ए म्युजियम की म्युझिअम….या विंग्रेजीची….संग्रहालय म्हटलं तरी थोडं अंगावर येतं ना…सवय नाही आहे ना कठीण मराठीची….पण फ़ोटोंना थोडी सफ़ेदी दे ना…..

  • अग फोटोंचा काय प्रॉब्लेम आहे कळत नाही…माझ्या लॅपटॉप वर स्वच्छ दिसताहेत…तरी बघते…
   ’म्युझियम’ की ’म्युजियम’ मी पण घोळ घातलाय बघ लिहीताना….पण मला ’म्युझियम’ योग्य वाटतय!!!खरय तुझं या ईंग्रजीची ……

 2. तन्वी म्युझियम पाहताना बरेच वेळा कंटाळवाणे होते हे खरेच आहे. पण काही काही खूपच रंजक बनवलेली असतात. सेंट लुईसच्या आर्च मधले म्युझियम व स्प्रिंगफील्डचे अब्राहम लिंकन म्युझियम अशीच अतिशय रोचक बनवीली आहेत. दुबईची सफर छान रंगतेय गं.आणि मी नोटडॊउनही करतेय…का ते कळले ना?:)

  • हो हो कळले का ते!!! ये ना नक्की मस्त फिरुया आपण!!!
   मला म्युझियम्स शक्यतो कंटाळवाणे होत नाहीत, उलट आवडतात……आता तू सांगितलेले म्युझियम्स पण बघावे लागतील!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s