दूबई-४

Atlantis Hotelचौथा दिवस…..सकाळी आमचा अर्ध्या दिवसाचा दुबई दर्शन कार्य़क्रम होता….यातले मुख्य आकर्षण होते ते ’पाम जुमैरा’ चे…. हे मानवनिर्मीत बेट एका पाम (Palm) च्या झाडाच्या आकाराचे आहे. ’नकील ग्रूप’ या कंपनीने बनवलेले हे मानवनिर्मीत आश्चर्य अवकाशातूनही दिसते. याबरोबरच ’द वर्ल्ड’ हे जगाच्या नकाश्याच्या आकाराचे बेट हेदेखील या कंपनीने बनवलेले आहे…….ईंटरनेटवर या बेटाची माहिती मिळवली होती, या बेटावरचे ’अटलांटिस हॉटेल’ पहाणे हे देखील प्रमूख आकर्षण होते…….

'Burj-al-Arab' and 'Jumairah Beach' hotel....on Jumairah Beach

याचबरोबर आम्ही जाणार होतो ते ’जुमैरा बिच’ वर….या बिचवर स्वच्छ सुंदर किनाऱ्याबरोबर दुबईतील दोन मुख्य स्थळे ’ बुर्ज-अल-अरब’ व ’जुमैरा बिच हॉटेल’ आहेत…….गौरी झोपलेली असल्यामुळे मी गाडीतच बसले तरी बाकीच्या सगळ्यांनी मात्र पाण्यात जाण्याची संधी सोडली नाही. ईथून पुढे आहे ते ’अटलांटिस हॉटेल’……पाम जुमैरा च्या अर्धवर्तूळाकार परिघावर समूद्राच्या पार्श्वभूमीवरचे हे हॉटेल खरच पहाण्यासारखे आहे……..जाताना आता आपण पामच्या बुंध्यातून जातोय वगैरे माहिती ड्रायवर देत होता……मस्त अनुभव होता तो एक……संपुर्ण जग जेव्हा मंदीच्या खाईत लोटले गेले तेव्हा या हॉटेलचे भव्य उदघाटन केले गेले…..त्यावेळी झालेल्या आतिषबाजीचा अंदाजे खर्च होता २० मिलीयन डॉलर्स……..एरवी असल्या गोष्टींना विशेष न भूलणारी मी थक्क होत होते हे सगळे ऐकून आणि याची देही बघून………….या आतिशबाजीचे साक्ष ग्रह तारेही ठरले कारण थेट अंतराळातूनही हे सगळे दिसत होते……..

तिथून मात्र आम्ही थेट हॉटेलवर आलो कारण पुढचे काम होते ’डेजर्ट सफारी’……… मला आधिपासूनच या प्रकाराची भिती वाटत होती कारण मला सरळ रस्त्यावर चालणाऱ्या गाडीतदेखील त्रास होतो आणि ईथे तर भर वाळवंटात मोठमोठ्या गाड्या उलटसुलट चालवणार…….म्हणजे माझे मळमळणे नक्की होते, पण आपल्यामूळे ईतरांचा हिरमोड नको म्हणून गप्प बसले…….तुम्ही ती महिंद्र स्कॉर्पिओ ची जाहिरात पाहिलीये का ज्यात एक ललना वाळवंटात उभी असते आणि तिकडून वाळूवरून उड्या मारत स्कॉर्पिओ येते तोच हा प्रकार…..पण प्रत्यक्षात ती जाहिरात अतिशय सौम्य वाटावी अश्या जोरजोरात दणके बसतात……..आमच्या गाडीत बसलेला कंपनीचा माणूस अर्ध्या रस्त्यात म्हणाला ’अभी ईन लोगोंको जोर का धक्का लगने वाला है!!!” झालं माझी भिती अजूनच वाढली पण काय करणार…..जवळच्या लवंगांच्या भरवश्यावर करू म्हटलं आपण वाळवंट पार, अर्थात उत्सुकता तर होतीच……..

Cars moving in Desert......The distance is around 40 K.M.The Biker in Desert

मधे एका ठिकाणी गाड्या थांबल्या…..ईथे नेहेमी ग्रूप बुकिंग होते, एकाच वेळेस अनेक गाड्या निघतात, मग एकाने एका उंच टेकडीवरून उडी मारली की दुसरा आपली गाडी त्याच्याही वरच्या टेकाडावर नेतो…….मधल्या थांब्यावर गाड्यांच्या टायरमधली हवा काढण्यात आली……जास्त दणके बसायला नको म्हणे…’नानाची टांग’ म्हटलं तुमच्या……बसायचे तेव्हढे दणके बसलेच सगळ्यांना……..

एकदाचे आम्ही वाळवंटात अवतरलो……रेसकोर्स वरच्या घोड्यांसारख्या गाड्या लावल्या गेल्या……जोरजोरात गाणे लावले………आणि मग झाली ती धुमश्चक्री सुरू………गाडी सुरु झाल्यानंतर पहिल्या ५/१० मिनीटातच मी ओळखले आपले काही खरे नाही आज……आणि तेव्हढ्यातच लेकीने रडायला सुरूवात केली आणि जाहीर केले या माणसाला गाडी चालवता येत नाही तो वेडीवाकडी चालवतोय, मला बसायचे नाही…………तिचे रडणे मिनीटागणिक वाढतच होते….शेवटी बाकीच्या गाड्यांना बाय बाय करून आम्ही थांबलो…….ड्रायवर आपला काश्मिरी होता, त्याच्याने लेकीचे रडणे पहावेना, त्याचे मत की ती घाबरलीये पण आपण भर वाळवंटात आहोत ईथून मागे फिरणे शक्य नाही. मग काय कार्टीने या नव्या काकाला गाडी धड न चालवल्याबद्दल बदड बदड बदडले…..दोन मुलींचे वडील असलेल्या त्या सद्गृहस्थाने आनंदाने तो मार खाल्ला……कसेबसे ते ४० कि.मी. पार केले आणि एका ठिकाणी सुर्यास्त पहायला थांबलो. तोच मागच्या गाडीत कोणीतरी म्हणे ओकून गोंधळ घातला होता, कोण म्हणून पाहिले तर मस्कतहून आलेले दुसरे गुजराती कुटूंब….मग आम्ही लवंगांची वाटावाटी केली……..

Desert  Safari.....Starting PointDesert Camp

तिथून पुढे होता डेजर्ट कँम्प……….तिथे रात्रीचे जेवण आणि बरोबरच्या पुरूष मंडळाचे मुख्य आकर्षण ’बेले डान्स’ होते…….गप्पा टप्पा, अरेबिक मेंदी काढणे सुरू असतांना जेवण सुरु झाले आणि मग अवतरली ’नॅनी’ नावाची बेले डान्सर……. तिच्या थिरकणाऱ्या पावलावर ग्रूपमधल्या पन्नाशीच्या काकू नाचल्या मग सगळ्यांनाच उत्साह आला आणि माझ्या नवऱ्यासहित अनेक जण नाचण्याची संधी साधून आले.

परतीच्या वाटेवर या काश्मिरी ड्रायवरशी बऱ्याच गप्पा मारल्या…..मला काश्मिरीचा थोडाफार गंध असल्यामुळे त्यानेही खूप गप्पा मारल्या…..त्यांच्या पुढच्या वर्षीपर्यंत राजस्थान मधे जेसलमेरला अशी डेजर्ट सफारी सुरू करण्याच्या कल्पनेविषयी भरभरून बोलत होता, श्रीनगरमधले घर, बायको, मुली सगळे सांगत होता……उतरतांना म्हणाला खूप दिवसानी ईतके बोललो…..माझा नवरा म्हणे माझी बायको दगडालाही बोलायला लावेल…..हसून तो म्हणाला, “ऐसा कुछ नही औरते हर जगह ऐसीही होती है…….”…..

थोडक्यात काय भरपूर श्रम झालेले असले तरी थकवा न येता सगळे प्रसन्न झाले होते……..

(या पोस्टमधे मी ’अटलांटिस हॉटेल’ आणि ’डेजर्ट सफारी’ चे व्हिडिओ टाकले आहेत, पण पाम जुमैरा निश्चितच पहाण्यासारखे आहे, YouTube वर अनेक व्हिडिओ आहेत त्याचे…नक्की पहा.)

Advertisements

12 thoughts on “दूबई-४

  1. तन्वी,
    दुबई ला ह्याही सुट्टीत गेलो नाही म्हणून खंत वाटत नाही,पुन्हा डेझर्ट सफारी डोळ्यासमोर आली,मला मुंबई त गेल्यासारखे वाटते म्हणून दुबई आवडते.सगळे भाग कसे गजबजलेले वाटतात,डेझर्ट सफारी त आमचे हे,व चिरंजीव धमाल करतात,मी मात्र नंतर येणारी घेरी आठून गप्प बसते कारण सफारी शिवाय दुबई नाही, हा लेकाचा करारनामा, तुझ्या लिखाणा मुळे अटींशिवाय पूर्ण झाला.बघ फिरलीस न पुन्हा दुबईत, म्हणून नवरा शांतपणे ऑफिस ला गेला.

    • अग मला आणि गौरीला काही जमलं नाही ते सफारी प्रकरण….पण अमितने आणि ईशानने मजा केली.
      दादांना म्हणावं अशी व्हर्चूअल टूर नको पुन्हा फिरून येउ या, आता पुढच्या ईदमधे टर्टल बिच ला जाउ या आपण….अजिंक्य ची अट मावशी कशी मानणार नाही!!!

  2. पाम जुमैराचा विडियो पाहिला.काय सुंदर जागा आहे.खुप मज्जा आली असेल ना…
    बाकी लेख छानच…या पोस्ट मधील फोटोही क्लिअर आहेत.
    आम्हाला इथे बसल्या बसल्या दुबई फिरवत आहात तुम्ही.

    • मनात आणले तर काय होउ शकते ते पाम जुमैरामधे समजते…..समूद्रामधे भर घालून कृत्रीम बेट ते ही पाम खजूराच्या झाडासारखे!!! अनूभव खूप मस्त होता……या पोस्टमधले फोटो धूतलेत पुन्हा, मागचे भलतेच काळे आहेत, ते ही बदलते लवकरच!!!

  3. तन्वी अग त्या डेजर्ट सफारी च्या धमाल टुरबद्दल फार ऐकलयं गं.:) पाम जुमैरा व अटलांटीस हॊटेल सही ग. आम्ही बहामाज ला हॊटेल अटलांटीस मध्ये गेलो होतो. जबरीच आहे ते पण. सही गं. मस्त फिरतेय तुझ्याबरोबर.

    • अगं संपलं आता माझं पुराण,दुसऱ्या दिवशी परत आलो मस्कतला….
      डेजर्ट सफारी धमाल असते खरच पण माझ्यासारख्या रड्यांसाठी नाही….नंतर मी गाडीत फ्रंट सीटवर बसले होते तेव्हा नाही झाला त्रास कारण पुढे काय वाढून ठेवलय त्याची कल्पना येत होती….
      आणि अटलांटिस खरच जबरी आहे गं!!!!

  4. डेझर्ट सफारी मस्तंच दिसते आहे. काही दिवसांपुर्वी एक लेख वाचला होता सॅंड स्केटबोर्डिंग वर. ते पहायला/ करायला मिळालं कां??व्हिडीओ पहायचे आहेत. घरचं ब्रॉड बॅंड बंद असल्यामुळे, आणि ऑफिस मधे यु ट्य़ुब चालत नसल्याने बघता आले नाहित. लवकरच बघिन.

  5. तुम्हाला, तुमच्या कुटूंबियांना, मित्रांना, आप्तेष्टांना व नातेवाईकांना, सर्वांनाच ही दिपावली आनंदाची जावो; येणारे वर्ष समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!

    पुन्हा एकदा दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s