सुरज एक चंदा एक……

सुरज एक चंदा एक……तारे अनेक…….निवांत गात गात मी पोळ्या लाटत होते. अचानक ह्या ओळी मनात का आल्या ह्याचे उत्तर नव्हते माझ्याकडे……घरापासून दुर दिवाळी साजरी करत असल्यामुळे असेल कदाचित मन वारंवार बालपणात पळत होते……तेव्हाची दिवाळी सगळ्या नातेवाईकांसोबत होती आणि आताची शेजारासोबत……..आनंद आहेच निश्चित पण मनाला आवर घालावा कोणी, बरं एका कारणाने भुतकाळात गेलेले मन तेव्हढ्याच भोज्ज्याला शिवून परत येण्याईतके शहाणे नाही, ते वेगवेगळ्या आठवणीत हजेरी लावून येते.

अश्यावेळेस मुलांना सोबत नेले नाही या सहलीला तर ते अचानक वास्तवात आणतात त्यामूळे मन मागे पळाले की मी मुलांनाही सांगते आमच्या वेळी असं होतं…तसं होतं च्या गोष्टी………तर कालच्या त्याच आठवणींच्या राज्यात माझ्या हाती लागले होते ते ह्या ओळी…

सुरज एक चंदा एक तारे भये अनेक…

एक तितली एक एक एक अनेक तितलियाँ…..

’पर दिदी ये ब्याल क्या होता है?’ ला मुलाने एंट्री केली, “मम्मा ब्याल म्हणजे काय गं?”

“ब्याल…..ब्याल होता है पंछी पकडनेवाला……………..” ….अस्मादिक.

मुलाच्या चेहेऱ्यावर स्पष्ट लिहीले होते मला काही समजत नाहीये, आणि तू हे जे काही मनापासून एंजॉय करतीये त्यात मला काही विशेष रस वाटत नाही. मागे हेच चेहेऱ्यावरचे भाव मी वाचले होते “मिले सुर मेरा तुम्हारा” गायल्यावर…….गाणं म्हणुन त्याला ते आवडलं असाव पण त्यामागचा संदेश पोहोचला नसावा…….मग मी विचार केला हे नुसते सांगून मजा येणार नाही आणि शरण गेले Youtube ला…..

पुर्वी दुरदर्शनवर येणारे एकतेचा संदेश देणारे हे व्हिडिओ आज पुन्हा नव्याने पहाताना मनात एक वेगळीच उर्मी दाटत होती……

हे  व्हिडीओ देत आहे, माझ्या मुलाला आवडले……आणि नवराही खुष झाला, आपण जुन्या पोतडीत हात घालावा आणि काहितरी खुप आवडते हाती लागावे तसे झाले होते त्याचे. काही गोष्टी समोर येत नाहीत म्हणून आठवत नाहीत पण विस्मरणात जात नाहीत हेच खरे!!!!!

Advertisements

12 thoughts on “सुरज एक चंदा एक……

    • हो त्यातली एक होती ती ’पढना लिखना सिखो ओ मेहेनत करने वालों……’ सगळ्या आठवतात अजूनही….

  1. अग तन्वी मिले सुर हे गाणे मी इतक्या वेळा ऐकत असते की…… देवेंद्र नी वर दिलेली जाहिरातही तशाच काही निवडक कोरलेल्या आठवणीतली गं.

    • भाग्यश्रीताई अग ईशानला दाखवायला म्हणून शोधले हे व्हिडिओ आणि स्वत:च रमले कितीतरी वेळ त्यात….

      @सई, अश्विनी आभार….

  2. फार पूर्वी, म्हणजे आपण लहान होतो तेव्हा, ’एकता का वृक्ष’ नावाची एक छोटी फिल्म लागायची. ती आता कुठेच उपलब्ध नाहीये. त्यात अंड्याच्या आकाराची माणसं शेवटी नाच करायची ते अजूनही आठवतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s