आरसा……..

“मम्मा मी बाबाजवळ झोपणार……………….” —-कन्यारत्न

 “नाही काल ही झोपली होती आज मी झोपणार……………” —चिरंजीव

“दादू काय आहे रे बाबाजवळ……तू लहानपणी मम्माजवळच झोपायचा. मला नाही करमत तूझ्याशिवाय!!!!!!काही नको बाबा बिबा, तू ये माझ्याजवळ…………तसंही माझं शहाणं शहाणं पिल्लूच माझं आहे!!!! बरं का छकूले दादा माझा आहे……………..”—-ईति आम्ही

 “नाही दादा माझा आहे…..”—-कन्यारत्न

“माझा…”—-मी

 “झोपा रे कोणीही कुठेही…………..”—–बाबाची एंट्री.

“ए बाबा तू थांब जरा!! दादा माझा आहे………..”—-कन्यारत्न

“ए छकूले आपण भांडतोय खऱ्या, पण खरा मेंबर यईल आणि आपल्या दोघींशी वाद घालेल या मालकी हक्कावरून!!!!!!!!!!!!!!!!!!!”——मी

आता छकूली शांत…तिच्या डोक्यावरून गेलय माझं वाक्य. पण चिरंजीव आडव्याचे उभे…………..

 “म्हणजे माझी बायको ना!!!!!…”—- चिरंजीव

आता मी गार!!!!

“काहीतरीच काय रे…चला चला झोपा….”—-मी

“मम्मा मला माहितीये माझी बायको आली की तिचे आणि तुझे भांडण होणार…. “—-चिरंजीव

 “तूला कोणी सांगितलं रे….मी आणि आजी काही भांडतो का????आम्ही नाही का म्हणत की आपण सगळे एकमेकांचे आहोत…we are a family म्हणून…..”—–मी

 “नाही माझ्या क्लासमधे एक फ्रेंड आहे माझा, त्यानी सांगितलय की आपली वाईफ आली की तिचे आपल्या मम्माशी फायटींग होणार…”—- चिरंजीव

“अच्छा!!!!! अजून काय सांगतो हा तुझा फ्रेंड????…….”—–मी चांगलेच चपापले होते मी, पण पाणी किती खोल आहे अंदाज नको यायला……..मुले हे आपला आरसा असतात. घरात काय चाललय याचा मस्त आढावा घेतात आणि चारलोकात शोभा करतात. आणि याबद्दलची जागरूकता मी पाळतेच पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्या सासूबाई पाळतात. मुलं मोठी होताहेत…ते तुम्हालाच बघून शिकताहेत, एकटेच रहाता…..जपा त्यांना हे त्या दर फोनवर सांगत असतात. आम्हा दोघींमधे मतभेद असले तरी ते टोकाचे नाहीत….आणि त्यांना मुलगी नसल्यामूळे म्हणा किंवा मी त्या घरची सून होउन आज ८-९ वर्षे झाली म्हणा पण नातं गोडं झालय हे खरे!!!आणि आज हे पात्र माझीच शाळा घेत होते. म्हणजे माझ्या घरच्या पोळीभाजीला बाहेरच्या पिझ्झाचा गंध!!!! सरसावून बसले मी!!!!!!

“मी त्याला सांगितल की आई-आजी नाही पण मम्मा-बाबा नेहेमी भांडतात…..”—- चिरंजीव

“कधी भांडतो रे आम्ही????? काहीही आपलं!!! शाळेत अभ्यासाला जाता ना तूम्ही……तुमची ती बाई काय करते….पाढे पाठ करायला सांग त्या मित्राला तूझ्या!!!!!!”—-नवऱ्याची रिएंट्री

“अहो let me handle!!!!”—-मी

“हे बघ रात्रीचे दहा वाजलेत, झोपा आता!!!! सकाळी उठत नाही मग तुम्ही दोघं!!!! उद्या शाळा आहे त्याला…. लावलीये बडबड दोघांनी उगाच!!!!”—-नवरा

 “थांब रे जरा…..बोलू दे आम्हाला!!!!”—मी

“हे बघा झालं तुमचं भांडण सुरू!!!!!!!”— चिरंजीव

“ह्याला भांडण नाही discussion म्हणतात रे राजा…..आता तू आणि मी पण बोलतोय ना, तसेच मम्मा बाबा बोलताहेत……”—-मी

आता ही असली discussions जरा रेग्यूलर आहेत आमच्याकडे, पण कार्ट्याने तेच पहावे…कठीण आहे.

 “असो, पिल्लू मजा आहे रे तुमची. आम्ही पण लहानपणी अश्याच खूप गप्पा मारायचो स्कूलमधे!!!! अजून काय म्हणाला तूझा फ्रेंड!!!!!”……मी

आता या असल्या गप्पा मारायला आम्हाला ईंजिनीयरींगचे सेकंड ईयर उजाडले होते…लटेस्ट ट्रेंड नुसार ’बावळट’ होतो आम्ही हा भाग निराळा. एव्हाना नवरा भुवया उंचावायला लागला होता….याच्या मते मी उगाचच लहानसहान बाबी सिरीयसली घेत असते………………

 “तो फ्रेंड म्हणे त्याचे पण पॅरेंट्स भांडतात!!!!”….. चिरंजीव म्हणजे हा सार्वत्रीक गुन्हा आहे तर!!!!

“पुढे……”……मी

“झोपा रे ssssssssssss………..”—-नवरा.

मी आणि पिल्लू एका चादरीत……मी विचारात, माझ्या आरश्यात हे वेगळेच प्रतिबिंब. काय करावे????? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे व्हायचेच…..एक वेळ अशी येणारच की आई वडीलांपेक्षा मित्रांचा प्रभाव जास्त असणार. ह्या पिढीत जाणिवा गेल्या पिढीच्या आधि येताहेत….सगळं मान्य….कळतय!!!!! आता हे सगळं ’वळायलाही” हवं………

 “मी त्याला सांगितलं की I love my mumma- baba, but I like my nani-babu more than anybody else!!!!!! अरे पण मम्मा तो जाम फनी आहे माहीतीये!!!!!”—-चिरंजीव

“आता हे काय मधेच!!!!…”—मी

“तुच तर विचारलं ना आम्ही काय गप्पा मारतो ते!!!!!!! Music sir म्हणाले मी चांगला म्हणतोय but I should practice more……., तू म्हणाली होतीस नवा पेन्सिल बॉक्स घ्यायचाय ना….कधी घेणार????”—–चिरंजीव

 “झोपा बच्चा उद्या शाळा आहे……”—-मी

सकाळी नवरा म्हणाला, “काय मग डिटेक्टिव्ह ! समजली का सगळी रहस्य!!!! उगाच त्याच्या लेखी महत्व नसलेल्या गोष्टींना आपणच अवास्तव खतपाणी घाला……”

मला याचं पटतय…पण मी नाही ईतकी तटस्थ राहू शकत……, “अरे अस्ं कस्ं आपण पालक आहोत ना त्याचे, समजायला नको त्याचे भावविश्व !!!!!”

 “अगं पण त्याला अशी प्रश्नावली झाडून काय साध्य होणार आहे?????”—–नवरा

“असं नाही जमत मला…..आपण मारे संस्कार म्हणायचे आणि बाहेर असा घोळ!!!! त्याचा गोंधळ नाही का होणार????”—–मी

“होईल ना!!!! होणारच….आपला नव्हता होतं????? यासाठीच तर आपण घरात पक्के रहायचे ना….त्याची मुळं पक्की असली की येउदेत ना वादळं वारे…….हबकून जाउ नकोस!!!!!”—–नवरा

“नाही हो नाही…..मला पटतं तुझं नेहेमी पण मला वाटलं काही सिरीयस की तू घे ते एकदम लाईटली!!!!!”…..मी

“मॅडम या केसमधे converse is also true!!!!!”—-नवरा

“झालास सुरू तू !!!! एक वाक्य खाली पडू देउ नकोस….”—-मी

“आपण पुन्हा भांडतोय का!!!!!”—- हसत हसत नवरा म्हणाला. आम्ही दोघेही हसायला लागलो ……

तेव्हढ्यात पिल्लू ओरडले, “मम्मा बाबा मी उठलोय….Good Morning!!!!!”

“Good Morning!!!!!” आम्ही एकदमच म्हणालो…………

सकाळच्या कोवळ्या उन्हात माझ्या आरश्यातले प्रतिबिंब स्वच्छ दिसत होते पून्हा!!!!!!!!!!!!!!!!!!!

14 thoughts on “आरसा……..

 1. MALA VATAT KI MULAANAA TYANCHYA BHAV WISHVAT RAMU DILL PAAHIJE……..KALAAYLAA LAAGLYAAVAR (MHANJE AJUN THODD JAST…..) LET THEM REALISE ALL THE TRUTH ON THEIR OWN…..YAATACH KHARI MAJA AAHE……..PAN FULLY AGRRED WITH, “आपण घरात पक्के रहायचे ना….त्याची मुळं पक्की असली की येउदेत ना वादळं वारे…….” POST AS USAL SOLID…….

 2. chan mudda mandalas ga…tujhe ase post wachale ki mala majhach tension yeta….majhi kasoti lagel tevha tokade padu asa watatay…ikade tujhya bhashet sangyacha tar माझ्या घरच्या पोळीभाजीला बाहेरच्या पिझ्झाचा गंध!!!!

  Aparna

  • अपर्णा, चिनू, गौरी आभार….
   अपर्णा अगं जमतं आपल्याला सगळं…एकदा आरुष मोठा तर होउ दे!!!!
   गौरी झालीये ग सुरुवात…..अक्कल पाजळत असतात सगळे मित्र मिळून….

 3. geloy geloy hyatunch aamhi jatoy fakta vay ata 13 varsh aahe. arsa lahanpani hota aata bhing lavun prtibimb shodhtoy. lage raho gharchya vidyapethat. addolence stage paungadavastha nav pan vaya sarkhe. me tyat aahe lihin ekda. dhamal parantu niruttar karnare my lekaranche sawal jawab.

 4. सहजंच.. पण छान झालंय पोस्ट. मुलांचं भाव विश्व आपणंच जपलं पाहिजे.. त्यांच्या दृष्टीने हे लहान सहान प्रॉब्लेम्स म्हणजे मोठे इशुज असतात.. अगदी फ्रेश झालंय पोस्ट..

 5. पूर्वी घरात आजी-आजोबा, काका-काकू…सारखा नातेवाईकांचा राबता, घरचेच असल्यासारखा शेजार असे अनेक जणांचे आदर्श म्हणा-त्यांचे वागणे सतत पाहायला मिळत असे. त्यामुळे चौफेर शिकवणी मिळत होती. शिवाय यात वयानुरूप अनुभवांची विविधता असल्याने चांगले पाठ मिळत. आजकाल न्युक्लिअर फॆमिली. मुले सारखी आई-बाबांकडे डोळे लावून आणि आई-बाबा मुलांकडे. अनेकदा यामुळे एकतर नात्याची सहजता हरवते किंवा फार टोकाचे धडे दिले जातात, अपेक्षाही फार होतात. आणि याउलट आई-बाबाचे वागणे पाहावयास मिळते. मग मुले गोंधळून जातात गं. असो.
  पोस्ट छान झालीये, खूप महत्वाचा विषय आहे हा. मुलांचे भावविश्व आई-बाबाभोवतीच फिरत असते. म्हणूनच फार संवेदनशील व आश्वासक राहायला हवंय आपण.

  • अनूजाताई, महेंद्रजी आभार….प्रत्येक वेळी पिढी बदलतेय, त्यात इथे तर यांच्या शाळेत बारा राज्याची मुलं प्रत्येकाच्या कल्पना वगवेगळ्या……काही विचारायलाच नकोय!!!!
   भाग्यश्रीताई बरोबर आहे तुझं म्हणणं…..आमच्याही कडे एकत्र कुटूंब नव्हते पण निदान सुट्टीत तरी महिना महिना सगळे एकत्र असायचो. या मुलांना तर आपल्याला आते, मामे, मावस भावंड नक्की किती हे ही माहित नसते!!!
   कसे समजवायचे सगळे….

   • पोस्ट as usual spontaneous आणि छान.

    bhaanasa, एकदम बरोबर आहे तुझ म्हणन. मनापासून पटल.

    आता कुठे माझी पिल्लू बोलायला लागलीये तरी फार careful राहाव लागत. जे बोलू ते बोलते पठ्ठी! खरच आरसा असतात ही मूलं. आणि माझी भाचवंड, पुतणे जरा वयाने मोठे आहेत. ते हे बाहेरचे सगळे प्रभाव घेउन येतात आणि एकेक भन्नाट प्रश्न विचारतात. आपल्या पेक्षा दसपट वेगाने पुढे चालली आहेत ही मूलं.

  • आधि श्रीया ईशानसारखी वागते का ते बघ!!!! ती जर गौरी सारखी ढाणक निघाली तर झालेच तुझे समजवण्याचे मनसुभे पुर्ण!!!! सरळ सांगते ही बया….थोडे शांत बसा म्हणून!!!!

 6. @ सोनल आभार….अग आत्ताच बोलायला लागलीये ना मुलगी मग धोका कमीये…टि.व्ही. बघू देउ नकोस ग!!!!फार आहारी जातात आणि आपल्याला अक्कल शिकवतात….बाहेरच्या जगापासून तरी कसे आणि किती वाचवणार गं!!!!

 7. ईशानसोबतची तुझी हेरगिरी वाचतांना कॉमेडी वाटली खरी, पण संसारिक आयुष्यात खरंच असे प्रसंग हाताळणे म्हणजे अतिकठीण काम असेल… तुमच्यासारख्यांच्याच अनुभवांवरून काहीतरी शिकायला मिळतंय का ते शोधण्याचा माझा प्रयत्न राहील!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s