छोटा दोस्त-२ (छोटा जादूगार)

3, 8, 7, A, Q, 6, 4, 2, J, K,10, 9, 5

तरंग ब्लॉगवर परवा हा क्रम पाहिला पत्त्यांच्या जादूचा….यात कुठलेही एका प्रकारच्या १३ पानांना या क्रमाने लावायचे. आणि मग वन ते किंग अश्या स्पेलिंगनूसार ते ते पान काढून दाखवायचे. आपण प्रत्येकाने लहानपणी अश्या कितीतरी गमती केलेल्या असतात. आपल्याला समजलेली जादू कितीतरी वेळा करून दाखवायची आणि समोरच्याने कितीही वेळा विचारले की सांग ना कसे करायचे तरी सांगायचे नाही!!!!मग एखाद दिवशी हळूच मी तुला सांगते पण तू कोणाला सांगू नकोस, नाहीतर मजा नाही येणार करत एखाद्याला सांगायची.

या बाबतील आम्ही जाम लकी होतो कारण आमचे बाबा आम्हाला हे सगळे शिकवायचे त्यामूळे मैत्रीणींमधे आमचे नाक वर !!!!! तरंग ब्लॉगवरच्या पोस्टमूळे लहानपण आठवले आणि मग आला समोर माझा छोटा दोस्त….तर आज त्याला शिकवलेल्या काही जादू.

तूम्ही नाही शिकवल्या अजून मुलांना…मग शिकवा आणि मी ज्या विसरले त्या मला कळवा.

१.  3, 8, 7, A, Q, 6, 4, 2, J, K,10, 9, 5 या क्रमाला आम्ही एक गोष्ट सांगायचो.  ती अशी की ३८७ वर्षापूर्वी एक(A) राणी(Q) होती ती ६४ वर्षाची होती, तिला २ मुले होती. एकाचे नाव जॅक (J) आणिगोष्टीनूसार लावलेली पाने दुसऱ्याचे नाव किंग (K) होते. जॅकचे वय होते १९ आणि किंगचे ५. आता  गंमत पहा………….असे म्हणत ती पाने क्रमाने लावायची आणि मग तो गठठा उलटा धरून त्या त्या स्पेलिंगनूसार ते ते पान काढून दाखवायचे.

२.ही जादू अतिशय सोपी आहे…आणि नवशिक्या लहान मुलांसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी.  यात आपल्याकडच्या पत्त्यांमधील एक पान समोरच्याला बाहेर काढून लक्षात ठेवायला सांगायचे. मग ते पान आपल्या हातातल्या पत्त्यांत सगळ्यात वर ठेवायला सांगायचे.         मग आपले हात मागे घेऊन एका हाताने काळजीपुर्वक ते पहिले पान उलटे ठेवायचे. म्हणजे समोरच्याने उलट ठेवलेले ते पान आता सुलट झालेले असेल…..काळजीपुर्वक हातातले पत्ते समोर असे धरायचे की ते सुलट झालेले पान आपल्या डोळ्यासमोर यईल आणि त्याचवेळेस कॅटचे शेवटचे पान समोरच्याला दाखवून विचारायचे की हे तूझे पान आहे का????? तो मजेत ’नाही’ म्हणत असताना आपण मात्र त्याचे  पान पाहिलेले असते. हात पुन्हा मागच्या बाजूला घेउन ते पान पुन्हा पुर्वव्रत उलट ठेवून पत्ते हवे तेव्हढे पिसावे आणि मग जादूने ते पान शोधून दाखवावे.

३. ही देखील आणखी एक सोपी जादू…..९ पानांची. यात हे ९ पाने ३X३ अशी मांडावी. समोरच्याला एक पान मनात धरायला सांगावे…मग आधि उभ्या आणि नंतर आडव्या कोणत्या रेषेत ते आहे विचारून ओळखावे.3X3 लावलेली ९ पाने

 

४. २१ पानांची जादू…ही शिकवायला आमचा दोस्त अजून लहान आहे……पण इथे लिहून ठेवले म्हणजे हा मागे भूणभूण लावून आज नाही तर उद्या शिकणार हे नक्की.

 

पत्त्यांचे घर....

 

 

 

 

 

५. पत्त्यांचे घर…..पेशन्सची कमाल मागणारा खेळ.

आमचे बाबा सुट्टीत आम्हाला दरवर्षी पत्त्यांचा एक नवा खेळ शिकवायचे. बदाम सात, रमी, चॅलेंज, नॉट ऍट होम,झब्बू,गुलाम चोर, मेंढीकोट……कितीतरी. याहीवेळेस ते मस्कतला माझ्या घरी आले तेव्हा आम्ही आवर्जून पत्ते आणले होते. बदाम सात सारखाच खेळ पण काय मजा यायची…कहर म्हणजे जजमेंट खेळण्याची…..माझी आई हातात पत्ते आले की पटकन किती हात होणार ते सांगायची मग अर्ध्या खेळात विचारायची अरे पण अमित हुकूम काय आहे रे??? हसून हसून दमायचो आम्ही….नवरा रोज सांगायचा काकू हात सांगण्याआधि थांबत जा ना जरा……

पत्ते खेळणे……तसे वाईट मानणारी अनेक जण भेटली. माझ्या एका मैत्रीणीच्या आजीला आमचा फार राग यायचा, तिचे मत घरात पत्ते ठेवू नये……पण मला मात्र मनापासून आवडणारा खेळ. बावन्न पान आणि कितीतरी खेळांचे प्रकार. मला सगळ्यात आवडायचे ’नॉट ऍट होम’ कारण त्यात बरेचदा मी जिंकायचे……माझे बाबा मला बोटाने नंबर दाखवून ते कोणाकडे आहे ते खुणेने सांगायचे, ही झाली लबाडी पण ती न करताही मला जमायचे ते. चॅलेंज खेळताना माझ्या बहिणीच्या आधि बसणारा नेहेमी जिंकायचा कारण ही सतत चॅलेंज करायची….मग काय खरे पत्ते लावा आणि सुटा. मामाला पत्त्यांना मस्त कैची मारता यायची…..ती आम्ही प्रयत्नपुर्वक शिकलो होतो. आजीकडे पत्ते खेळताना मामा नेहेमी लबाडी करायचा आणि ती नेमकी मामी पकडायची…..मग त्यांचे भांडण ठरलेले. आम्ही आपले दोन्ही एंजॉय करायचो, पत्ते आणि भांडणही 🙂

मला माझच आश्चर्य वाटत होतं आज…..मुलगा टि.व्ही. त रमतो याचा बागूलबूवा करत बसण्यापेक्षा आपण ह्या साध्या गोष्टी त्याला  शिकवल्या तर तो त्या आनंदाने शिकेल. पण आमची गाडी धक्का स्टार्ट….तरंग ब्लॉगने मला धक्का दिला आणि मी मुलाला हे सगळे शिकवले………त्या पठ्ठ्यानेही एकदाच शिकवल्यावर बिनचूक करून माझा हुरूप वाढवला आहे.

आता हळूहळू ईतरही लहानसहान खेळ त्याला शिकवायचे आहेत. राजा भिकारी सारखा वेळ खाउ खेळ असो की बिस्किटसारखा स्मरणशक्तीची परिक्षा घेणारा खेळ असो…..मि. बीन नावाच्या त्या कार्टून सदृश प्राण्यापेक्षा नक्कीच जास्त रंजक आहे.

Advertisements

9 thoughts on “छोटा दोस्त-२ (छोटा जादूगार)

 1. छान आहे गं कल्पना मुलांना रमवायची..आणि एकदम बालपणी घेऊन गेलीस..हा लेख मला अजुन काही वर्षांनी नक्की उपयोगी पडेल…

 2. पत्त्यांच्या जादू मस्तच.
  अगं किती दिवसात मस्त सगळे जमून पत्त्यांचा आणि गप्पांचा कार्यक्रम झाला नाहीये … तुझ्या पोस्टने आठवन करून दिली.

 3. अगं आपण मुलांना सांगतो ना की आमच्या लहानपणी असे होते, तसे होते त्यांना काही मजा येत नाही तशी…पण हे असे सांगितले की त्यांनाही खूप मजा येते. ईशान तर आता सारखा पत्ते घेउन बाबाला त्याच त्या जादू करून दाखवतोय. आणि सही रे !!! काय जादू आहे मला पण सांग ना असे म्हणताना बाबा पण खुश आहे!!!
  अजून एका खेळाचा उल्लेख राहिला मी बारावीची परिक्षा दिल्यावर आजीने मला’पेशन्स’ शिकवला होता….
  मजा होती ती, तासनतास रमायचो नाही का आपण!!!

 4. पत्ते खेळणे त्यात लबाडी करणे व नंतर जोरदार भांडणे करणे हा आमचा नित्याचा खेळ होता. आमची आजी शेवटी वैतागून पत्ते फेकून द्यायची. आम्ही सगळी भावंडे अक्षरश: घर डोक्यावर घ्यायचो. आत्ताही भावाची छोटी आत्या चल ना गं उनो खेळूया असे मागे लागली की हिरीरीने मी, शोमू व मोठी भाची खेळायला बसतो आणि मस्त भांडतोही. पत्यांचा बंगला करणे हा ही माझा अतिशय आवडता उद्योग होता. तन्वी मस्त वाटले गं. रम्य ते बालपण. म्हणा पत्ते कुठल्याही वयात तितकेच आनंद देतात.

 5. आम्ही ही लहानपणी जेव्हा सुट्टीत एकत्रा यायचो तेव्हा पत्त्यात चांगलेच रमायचो.उन्हात भटकाण्यापेक्षा एका जागी बसून खेळतात म्हणून मोठे लोकांचे विचारही पत्त्यांसाठी अनुकूल असत.बादाम सत्ती ,किलबिल ,मेंढी कोट (कामावर जाताना-येताना अजुनही खेळतो),गुलाम चोर, गाढव पिशी,मुमारी ,सात-आठ ,पाच-तीन-दोन असे कितीतरी खेळ खेळायचो.मग मध्येच कधी हे जादूचे प्रयोग व्हायचे.तुम्ही लिहल आहे त्याप्रमाणेच आमच्या इथेही हया जादुच्या सीक्रेट
  सहजासहजी कोणी शेअर करायच नाही .मला आत निताश्या ट आठवत नाहीत त्या जादू पण आठवल्या की लिहिन त्याबद्दल..बाकी पत्त्यांचे बंगले आम्हाही खुप बंधायाचो लहानपणी …

  • भाग्यश्रीताई, देवेंद्र आभार…..खरय पत्ते आणि तसे कुठलेही साधे साधे (बिनखर्चिक खेळ…आजकाल हे फार महत्वाचे झालेय)किती आनंद देतात.
   देवेंद्र नक्की लिही तूला येणाऱ्या जादूंबद्दल..म्हणजे मला त्या ईशानला शिकवता येतील.तेव्हढीच कार्ट्याची मित्रांमधे कॉलर वर!!!!!

 6. sahi aapan khup ch patte khelay cho Igatpuri la 🙂 tyat ratri pan barach vel jayacha Mama jam labadi karay cha biscuit/challange and judgement he mostly khelaycho aapan hahhaa ho suppu kayam cha challange daychi hahahaha 🙂 mast zalay lekh mala ajun hi awadel patte khelay la pan sagale ekdam pakke hawet 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s