सहजच….

Ishaan लेकाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याच्यासाठी केलेले कार्ड…..

आज सहज मनात आले की ब्लॉगवर हे कार्ड टाकावे म्हणून पोस्टचे नावही ’सहजच’ दिले.

मला लहानपणापासून कार्ड्स घरी करायला आवडतात, ते किती जमतात हा माझा प्रश्न नव्हे. ते मी ज्याला देते त्याने तो विचार करावा असा स्वाभिमान बहुधा लहानपणापासून असावा त्यामूळे मी अगदी ६/७ वर्षाची असल्यापासून हा उद्योग करायचे. त्यातही तेव्हा मिळणाऱ्या पोस्ट कार्डवर एका बाजूला चित्र आणि उरलेल्या लहानश्या बाजूला मजकुर असायचा. पत्र लिहायला मला तेव्हाही आवडायचं आजही आवडतं!!!! पोस्टमनची वाट पहाणं त्याने पत्र आणून देण्ं , कधितरी आपल्या दारासमोर थबकणं आणि पुढे निघून जाणं …..किती मजा आहे ही सगळी.

मी पाठवलेले कार्ड्स आणि माझी त्यावेळेसची महान (?) चित्रकला हे बाड घेउन माझे आजोबा मी चौथीत असताना J.J. मधे गेले होते…..मला आजही गंमत वाटते ते आठवले की. पण माझ्या पत्राला जेव्हा दोन्ही आजोबांची उत्तरे यायची ते ही आंतर देशीय पत्राने तेव्हा ते उघडून वाचणे हा एक आनंदाचा ठेवा असायचा. असेच एक पत्र यायचे आमच्या मावशीचे अत: पासून ईतिपर्यंत काळजी आणि सुचनांनी भरलेले असायचे ते!!! तिच्या हळव्या स्वभावाला साजेसे!!!

माझी आजी, आई, मोठी मामी, मामा हे लोक पत्र लिहीताना काही कधी दिसले नाही. जो कोण लिहीत असेल त्याच्या हाताला हात लावून ही लोकं ममं म्हणत असावे. बाबांना मात्र पत्र लिहायला आवडतही आणि जमतही!!! बाबांनी लिहीलेली पत्र मी याआधि ब्लॉगवर टाकलेली आहेत…….

आता तर काय आपण सगळे 24X7 नेटवर असतो तरिही मनात कुठेतरी पत्राला, पोस्टमनला स्थान आहेच की!!!!

स्वत: कार्ड करता करता मी हळुहळू कार्ड विकत आणायला सुरूवात केली. यातही पुन्हा दोन प्रकार असतात….काही जण कार्ड पाहून ते घेतात तर काही मजकूर पाहून. पुन्हा मजकुरातही मराठी विरुद्ध ईंग्लिश हा लढा आहेच….आता तर अनेक साईट्स वरून परस्पर ही कार्ड्स पाठवतो आपण!!!

कॉलेजमधे असताना मात्र आर्चिज किंवा हॉलमार्कच्या गॅलरीज मधे जाउन ग्रिटींग कार्ड्स विकत घेणे हा मोठ्ठा नाद होता. किंमत बिंमत कोण बघतोय….नाहीये कोणाचाही वाढदिवस, कुठला सण, कुठला डे…who cares!!!! कार्ड आवडलं घ्या…….. विनाकारण चालणारा उद्योग!!! तिथले ते अनेक रंग त्यावेळेसच्या मनोवृतीला मोह घालायचे हेच खरे!!! लग्न झाल्यावर निवडक कार्डस दोऱ्याने शिवून त्याचे वॉलपिस बनवणे वगैरे प्रकारही आवडीने केले होते……..

स्वत: कमवायला लागल्यावर मात्र वर्षभरातच हा खर्च वाटायला लागला आणि मी पुन्हा वळले माझ्या कलर बॉक्स कडे!!!!! त्यातून केलेले सगळे कार्ड आज माझ्याकडे नाहीत पण आजच्या ह्या कार्डचा फोटो यावेळेस लेक येताना घेउन आला…….

लेकासाठी  जे जे केले होते ते आता लेकीसाठी करायचे आहे…..तेव्हा आता पोस्ट आवरती घेते आणि कामाला लागते!!!!!

20 thoughts on “सहजच….

 1. अग्ग खरच गं..कित्ती छान लिहीले आहेस..फ़ारच मस्त…खुप आवडले..कार्ड्स बनवायचा नाद मला ही होता आणि अजुन ही आहे..हे मात्र खरे मी पण कोलेज मधे असताना नविन नविन कार्ड्स मैत्रिणीच्या करीता घ्यायची..पण मग जसे स्वत: बनवण्याचा आनंद मिळायला लागला तेव्हापासुन स्वत:ची क्रिएशन सुरु झाली..

  पण आज हा हलका फ़ुलका लेख वाचुन आंनद झाला.

  .
  माउ

 2. same pinch 🙂

  aamachya kade patr lihinyaache kaam aai che. baba `ममं’ mhananaare. pudhachya pidhimadhye patra lekhan aai kadoon maajhyaakade aale, aani ममं mhanane dogha bhaavaankade 😀

  cards banavaayachi – visheshatah diwali chya velela – haa ek mottha prakalp asaayacha shalet / college la asatana.

  ani college la asatala aavadali mhanoon vikat ghetali, pudhe prasang aala tar konala dili naahi tar swatah javalach thevali ashi kaahi greetings ajoon aahet majhaakade 🙂

 3. आपल्या हाताने कार्ड्स बनवायला मजा येते ना.. कार्ड चा फोटो आणि कार्ड पण मस्त आहे. कॉलेजमधे गेल्यावर मी पण बरेचदा विनाकारण ग्रिटींग कार्ड्स घेऊन ठेवायचे. आर्चिज, हॉलमार्क, पेपर रोज … छान छान कार्ड्स असायचे. मजा यायची. लेकीला वाढदिवसाच्या ऍडव्हांस्ड शुभेच्छा :). छान हलकाफुलका झाला आहे लेख :).

 4. मस्त…….अगदी कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली…………..मला तर आठवतय की आमच्या कॉलेजमध्ये CARD KING, ROSE QUEEN सारख्या स्पर्धा सुद्धा व्हायच्या मध्ये……आणि मग आमच्या मित्र किंवा मैत्रिनिला जिंकवण्यासाठी आम्हीच भरपूर सारे कार्ड विकत घेऊन त्यांच्या नावाने टाकायचो……धम्माल वाटायची तेव्हा त्या सगळ्या प्रकारात………..पण खराय स्वत: बनवलेल्या कार्डची मजा काही अओरच…………बाकी कार्ड आणि पोस्ट दोन्ही एकदम झकास………

 5. स्वत: कार्ड बनवण्याची आवड मलाही होती-आहे. मुखपृष्ठावर सुंदर गुलाबाचे चित्र किंवा देखावे किंवा नुसतेच काही सुचक….तर कधी वेलदोडे, काड्या,सुकलेली पाने,मणी, वर्ख काय काय चिकटवत…पण आतले शब्द माझ्यासाठी नेहमीच फार महत्वाचे….:) किती छान वाटायचे बनवताना व देताना. बाकी हाती लिहीलेली पत्रे हा एक अमूल्य ठेवा आहे. अगदी लहानपणापासूनच हा नाद लागलेला त्यामुळे इतरांनाही मी नादी लावत असे….:D मग काय अगदी आजोबांपासून ते मित्र-मैत्रिणींपर्यंत सगळेच लिहीत. तन्वी छानच लिहीलेस गं. गौरीचा वाढदिवसाचा काय खासा बेत आहे?

 6. खरंच केलंय कां?? मला नाही विश्वास बसत.. >….. 🙂
  छान जमलंय कार्ड.मला काही या मधे फारशी गती नाही, आणि कार्ड विकत आणायला त्या साठी पैसे खर्च करणं पण आवडंत नाही.. 🙂 कंपनीची कार्ड्स मिळतात दिवाळी अन न्यु इअरला, तीच पाठवतो मोठ्या मुश्किलीने.. 🙂

 7. छान काढलं आहे कार्ड. अशी लहानपणाची एखादी आवड मोठेपणी जोपासन जमत नाही. पण केल तर फार आनंद मिळतो. मला सुद्धा लहानपणा पासून अशी आवड होती चित्रकला, मूर्तीकला, कविता, गोष्ठी अभ्यास शिवाय अश्या बर्याच गोष्ठी जोपासल्या होत्या. पण एकदाचे कामाला लागलो आणि संसारात रमलो कि ते कमी होऊन जाते. आता ब्लोग निमित्त मी पुनः सुरु केले आहे.

  • महेंद्रजी आभार…तुम्ही दुसरं कमेंट नसतं टाकलत तरी मला भापो होत्या!!!! खूप आवड होती ही आणि आहे पण काही करणं होत नाही आता हेच खरे!!!! क्रोशाचे विणकाम, शिवण तेही उद्योग आवडतात. अमित तर म्हणतो ईजिनीयरींग ची एक सीट कशाला अडवलीस तू, होमसायन्सला जायचं होतं!!!!!
   रविंद्रजी…खरय लहानपणीचे हे आनंद देणारे छंद मागे पडतात….

 8. Mala yaatil kuthlihi kala avgat naahi……….pan tarihi maajhaa saglyaat aavdtaa chhand mhanje baaykola patra lihine………lagnaalaa 8 varsha jhaali tarihi ajun hi aamhi gharaatlyaa gharaat ek mekaanaa 4-4 paani patra lihito…………kharach patra lihinyaachi majaach kaahi vegli aahe…………ti e-mail kiva ready made messages paathvun miluch shakat naahi………….

 9. मस्त जमलय कार्ड…! मला कॉलेज पसुन फोटो काढायचा छंद होता, तो तसा आताही आहे.. त्या फोटोंची हार्ड कॉपी काढुन त्याचे कार्ड म्हणुन मि उपयोग करयचो….!

 10. छान आहे कार्ड मी माझी नोंदणी आधीच केलीय माहित आहे नं???? खरंच तू एक सीट फ़ुकट घालवलीस..अमितला सांग की मी पुर्ण सहमत आहे….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s