दिव्यत्वाची जेथे प्रचिती…..

म्हणतात ना ’दिव्यत्वाची जेथे प्रचिती……’ …माझे ऑर्कूटवरचे वयाची ६५ वर्षे ओलांडलेले मित्र श्री.सुरेश पेठे यांच्या प्रोफाईलमधे मला सापडलेला हा खजिना. मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा नतमस्तक झाले…खरच हे असे काही पाहिले की ’कर माझे जुळती!!!!!’ काकांना विचारले की ही माहिती मी माझ्या ब्लॉगवर टाकू का……..तेव्हा त्यांनी मोकळ्या मनाने परवानगी दिली. खर तर माझ्या या ’मित्राबद्दल’ एक स्वतंत्र पोस्ट होउ शकते, मी ती लिहीणार आहे पण आज मात्र हे ’सुक्ष्म रामायण’…….

ईंग्लिशमधे एक वाक्य वाचले होते मागे…

Beautiful young people are creation of God…

But beautiful old people create themselves….

आपणही गातोच की ’पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ हो असावाच तो असा सकारात्मक हिरवा…नाही का?

किती खरयं ना…आयुष्यातला एखादा छंद, ध्यास या लोकांना केवळ सुंदरच बनवत नाही तर त्यांच्या चिरतारुण्याला बघून शरिराने तरूण असलेल्यांना प्रेरणा मिळते!!!!!!

माझा या सगळ्यांना मनापासून सलाम!!!!!

 काकांनी केलेले हे डॉक्य़ुमेंट……

सूक्ष्म रामायण

  आपण आज पावेतो अनेकदा गदिमांचे गीतरामायण अनेकांच्या तोंडून ऐकले असेल व आपण नक्कीच तृप्त ही झाला असाल. आज मी आपणाला गीतरामायण दाखवणार आहे ! आपण ऐकले असेल पुर्वी ढाक्क्याच्या मलमलीची साडी कोयीत मावत असे !
  हे आहे सूक्ष्म गीरामायण केव्हढे ? काडेपेटीत मावेल इतकेच ! खाली त्याच्या काही पृष्ठांची छायाचित्रे  मुद्दाम मोठी करून दिली आहेत.
  ह्यात एकूण ११२ पाने आहेत. लेखनाला पन्नास दिवस लागलेत. सांगली येथे १४ जानेवारी १९६६ रोजी लिहून पूर्ण झाले अशी नोंद आहे. हे लिहून काढले आहे  श्रीयुत रामचंद्र गणेश आपटे ह्यांनी. आता ते 
पुण्यात आपला सेवानिवॄत्तीचा काळ आनंदात घालवीत आहेत.
खालील छायाचित्र श्रीयुत आपटे ह्यांचे आहे. 
 
  
  
  
  
  
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
हे दुसरे छायाचित्र आहे लेखकाच्या निवेदना चे
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आता हे तिसरे छायाचित्र  पहा :- आकार लक्षात येतोय ना ? दोन बोटात पकडलेले आहे.
१४ जानेवारी १९६६ ल सांगली येथे लिहून पूर्ण केले तो दिवस मकर संक्रांतीचा होता !
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
हे पुढील छायाचित्रे आहेत प्रस्तावना ” पारायणापूर्वी ” प्रसिध्द कवी बा. भ. बोरकर ह्यांची
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
श्रीराम जयराम जयजयराम !
 
हे छायाचित्र पहिल्या पृष्ठाचे आहे. कीती सुबक बनवले आहे पहा ! पुस्तकाचे रेशमी बांधणी
काम ही अफलातून आहे ! मी तर बराच वेळ ते कौतुकाने पहात राहिलो !
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
हे छायाचित्र पहिला गाण्याचे .. ” स्वये श्रीराम प्रभू ऐकती  कुश लव रामायण गाती “..
इथून पुढे प्रत्येक पानावर एकेक गाणे अगदि एक टाकी आहे ! जेव्हा मुद्रण कला अस्तित्वात
नव्हती तेव्हा आपले अनेक गंथ हस्तलिखित स्वरूपात असत पण त्यानंतर ही श्रीयुत आपटे 
ह्यानी परिश्रम पूर्वक केलेला त्रेचाळीस वर्षा पूर्वीचा हा विक्रमच मानला जायला हवा.
त्यांच्या चित्रकलेच्या ओढी मुळे आज माझी व त्यांची विठठलवाडी येथे गांठ पडली.
हाही एक दुर्मीळ सर्वॊत्तम योगच आहे ! 
खरं तर ते स्वत:च रामचंद्र आहेत ! प्रभु रामचंद्रानी त्यांना उत्तम आरोग्य द्यावे व
चित्रकलेची त्यांची उर्मी फलद्रुप होवो हीच ईच्छा ! 
सुरेश पेठे
१६ ऑगष्ट २००९
(या मूळ पानावर जाता यावे म्हणू्न सूक्ष्म रामायण या नावाला लिंक दिलेली आहे.)

25 thoughts on “दिव्यत्वाची जेथे प्रचिती…..

 1. मस्त पोस्ट दिलीस. माहिती नसतात आपल्याला किती छान गोष्टी. वर्तमान पत्रात बातमी येते. काल्लोघाने विसरून ही जातो. खरच छंद असला
  तर एकटेपण जाणवत नाही. त्यांना माझाही नमस्कार सांग.

  • अगं मी जेव्हा पाहिले तेव्हा थक्क झाले होते मी….सुरेश काका पण असेच ग्रेट आहेत…त्यांच्यावर पण एक पोस्ट टाकायची आहे मला….

 2. स्वतःला गुंतवुन ठेवायला कांहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करुन वेळ घालवता येतो, नाहितर रिकामपण खायला उठतं . खुप सुंदर आहे ही कल्पना.. स्वतःला गुंतवुन ठेवण्याची. मला तर स्वतःला पत्रकारिते मधे काम करायला आवडेल.. साठी नंतर… 🙂

  • महेंद्रजी मस्त विचार आहे…त्यायोगे आम्हालाही खरे खुरे भाष्य करणारा आणि सडेतोड मुद्दे मांडणारा पत्रकार मिळेल…
   पण खरय हे स्वत:ला गुंतवून ठेवणे गरजेचे आहे, खरंतर आयुष्यभर पण विशेषत: आयूष्याच्या उत्तरार्धात तर असेच हवे!!!!

 3. तन्वी,
  तू तर कमालच केलीस. प्रस्तुत डॉक्युमेंट मी गुगल मधे केले होते पण ब्लॉग मधे ते टाकून तू मजा आणवलीस. ए मला हे सर्व तू शिकवायचे आहेस बरं का?
  नाशिकच्या मुरलीधराचे निरनिराळ्या वाहनांवरील फोटॊ माझ्या अल्बम मधे आहेत. त्यावर काही करावेस असे वाटते.
  खूप्च छान !

  • काका मनापासून थॅंक्यू!!!! आता मला आधि तुमच्यावर एक पोस्ट टाकायची आहे…..
   हे सगळे खुप सोप्पे आहे….नक्की सांगेन मी तुम्हाला!!!!! असेच ब्लॉगवर येत जा!!! आज माझा ब्लॉग तुमच्यामुळे आणि आपटे काकांमूळे मस्त सजलाय!!!!!

  • माउ, अजय, भाग्यश्रीताई आभार…..अजय अरे आपटेकाकांना खरच मानलं पाहिजे रे!!! आजकाल जिथे ४ ओळी लिहायची मारामार तिथे त्यांनी येव्हढे लिखाण तेही ईतके सुंदर केलेले आहे….

 4. तन्वी च्या ब्लॉगला मिळालेल्या प्रतिक्रिया वाचून मला भलताच आनंद झाला ! चला कामाला लागुया पुढील शोध कार्याला !

 5. वा किती मेहनत करावी लागली असणार लिहिण्यामध्ये. .कलेला वाव असण्यापेक्षा मनाला आनंद मिळतो.व इतरांनी कौतुक केले तर उत्साह वाढतो.श्रीयुत आपटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन

 6. अगदी सुरेख,कोम्पेक्ट असून सुद्धा सुटसुटीत आहे …
  आपटे काकांची मेहनत स्पष्ट दिसते आहे यात ..त्यांना माझा सलाम ..
  तन्वीताई,हे निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद .

 7. आपटेकाकांना सांग की खूप छान आहे. अगं कलाकार रक्तातच असतो असं काहीसं बाबा म्हणतात..पण त्यांची मेहनतही आहे..
  आणि तुझंही कौतुक….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s