मित्र……

ऑर्कूटवरच्या फ्रेंड लिस्ट मधे नेहेमी नव्या नव्या मित्रांची भर पडत असते. काही जुन्या शाळेतले, कॉलेजमधले, ऑफिसमधले सहकारी….आणि काही सर्वता: नवखे. ज्यांना आपण कधिही पाहिलेले नसते, ओळखीचे असते ते नुसते त्यांचे प्रोफाईल……मग दोन्हीकडे असणाऱ्या सामायिक मित्र मैत्रीणींची नावं, कम्युनिटी वगैरे आपण पहातो. काही काही प्रोफाईल्स पाहून आपण दंग होतो आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. अश्याच माझ्या एका नव्या मित्राची ओळख मला करून द्यायची आहे आज…….

म्हणतात ना The world is round……आपण सगळे कुठे ना कुठे एकमेकांना पुन्हा भेटत असतो. याचा वारंवार प्रत्यय येण्याची माझी सद्ध्या ग्रहदशा सुरु असावी.  नुकताच मला एक नवा मित्र मिळालाय…..श्री.सुरेश पेठे.  माझे पेठे काका!!!!! माझी मागची पोस्ट ज्यांच्या मदतीने आणि परवानगीने होऊ शकली ते हे माझे काका…..माझा नवा मित्र!!!!!

काकांचे प्रोफाईल मागेही एक दोन वेळा पाहिले होते…. त्यांचे प्रोफाईल पाहून नेहेमीच प्रभावित होत होते म्हणून एक दिवस रिक्वेस्ट पाठवली. काकांच्या प्रोफाईलमधल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या तर पहिले म्हणजे निवृतीनंतरही नेटवरचा त्यांचा मोकळा वावर!!!! मला उगाच हे आम्हाला जमत नाही म्हणत या नवनव्या गोष्टींपासून दुर पळणाऱ्या लोकांपेक्षा या नव्या साधनांशी हातमिळवणी करणारे लोक आवडतात……ते स्वत:ही प्रसन्न उत्साही असतात आणि आपल्या सभोवतालचे वातावरणही असेच ठेवतात.

काकांच्या बाबतीतले सगळेच संदर्भ प्रेरणा देणारे आहेत……चित्रकार, कवी, लेखक अशी अनेक रुपे आहेत त्यांची. सगळ्यात विशेष म्हणजे काकांचा २००९ सालचा संकल्प. हा संकल्प होता रोज एक नवे चित्र काढून ते त्यांच्या ऑर्कूट प्रोफाईल मधे टाकण्याचा. आणि त्यानूसार गेले अकरा महिने काका अविरतपणे ही चित्रसाधना करत आहेत!!!!!! आहे की नाही कौतूकास्पद!!!! जिथे ’वेळच मिळत नाही हो आजकाल….’ हे आपले ब्रीदवाक्य झाले आहे तिथे काका माझ्यासारख्या आळश्यासाठी एक दीपस्तंभ आहेत. माणसामधे जिद्द आणि ईच्छा असेल तर अशक्य काहीच नसते हे त्यांनी मलाच नाही तर अनेकांना उदाहरणासहित शिकवले आहे. बरं ही चित्रे एकाच ठिकाणची नसून वेगवेगळ्या गावातील, ऐतिहासिक ठिकाणातील लँडस्केप्स पण अनेकसे आहेत त्यात. आहे की नाही जिद्द!!!!!! त्यांच्या ऑर्कूटच्या फोटो अल्बममधे दर महिन्याच्या ३० चित्रांचा एक याप्रमाणे गेल्या वर्षभरातील ११ अल्बम तयार आहे….डिसेंबरचा अल्बम पुर्ण झाला की एक संकल्प पुर्ण होणार.

दरवर्षीच्या पहिल्या काही दिवसात नवनवे संकल्प(यालाच रिझोल्युशन म्हणतात मराठीत) करणारे आम्ही महाभाग वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात ते विसरलेलेही असतो पण केलेला संकल्प पुर्ण करणारे काका म्हणूनच आदरास पात्र ठरतात!!!!!!

आज मारे काकांवर लिहायला सुरूवात केलीये पण त्या बहूआयामी व्यक्तिमत्वाला मी न्याय देउ शकेन की नाही अशी शंका सतत मनात येतेय!!!! काकांचा जन्म २२जुलै १९४२ चा…..बालपण नाशिकचे . शिक्षण ११ वी SSC नाशिकच्या पेठे विद्यालयातून. पुढे डिप्लोमा इन सिव्हील इंजीनीयरींग पॉलीटेक्निक पुणे येथून .बावीस वर्षे सरकारी नोकरी तर काही वर्षे व्यवसाय केला आणि २००३ पासून त्यांनी दोन्ही तून निवृत्ती घेतली आहे.आता त्यांनी आवडीचा विषय चित्रकले्ला ‘लक्ष’ केले आहे. खरे तर चित्रकलेची आवड त्यांना अगदी बालपणा पासून. पण त्याचे शास्त्रशुध्द शिक्षण घेणे त्याकाळात शक्य झाले नाही. मात्र सेवानिवृत्ती नंतर संस्कारभारती ह्या संस्थेशी संबंध आला आणि त्यांचे आयुष्यच आमूलाग्र बदलून गेले. गेली सहा वर्षे सतत , अखंडित चित्रकलेची साधना चालू आहे. त्यांची सगळी माहिती त्यांच्या ऑर्कूट प्रोफाईलमधून इथे टाकत आहे.

 • काकांनी काढलेली काही  चित्रे इथे पहा.
 • चित्रकलेचा रेखाटनांचा काकांचा ब्लॉग इथे पहा.
 • काकांच्या कवितांचा ब्लॉग इथे पहा.
 • खरं तर ही माहिती भरपूर आहे म्हणून ती काकांनी एका ठिकाणी संग्रहित केलेली आहे. ऑर्कूट्वरील ’आम्ही कोण म्हणून काय पुसता?’ या त्या माहितीरुपी कम्यूनिटीची  लिंक इथे पहा. या कम्युनिटी मधे काकांच्या विडंबन कविता, त्यांनी ईतर कवितांना दिलेले अभिप्राय सगळे आहे. यातच त्यांनी निवांत अंध मुक्त विकासालयाला दिलेल्या भेटीची समग्र माहिती आहे. एकूणातच त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन होते.

आणखी एक गंमत आहे आता. काकांशी बोलताना त्यांनी मला नासिकच्या एका बुक स्टॉलचे नाव सांगितले आणि म्हणाले की ते माझा पुतण्या चालवतो. अब ये तो हमारेको मालुम है, क्युँकी ते दुकान ज्यांचे आहे ती पेठे मंडळी आणि माझी आजी लहानपणी जुन्या नाशकात एकाच वाड्यात रहात असत. काकांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ते माझ्या आजीलाच नव्हे तर पणजीलाही ओळखतात. माझ्या आईला ती ३ वर्षाची असताना (जे आता माझ्या लेकीचे वय आहे) त्यांनी खेळवलेले आहे……आहे की नाही गंमत!!!! मला खुप आनंद झालाय कारण त्यांनी आईला, आजीला लहानपणापासून पाहिलेय. आणि काकांना आनंद झालाय की अनपेक्षितपणे  मी भेटल्याने त्यांना ६० वर्षापुर्वीच्या ते आणि आजी लहान असतानाच्या सगळ्या आठवणी आल्या. परवा आजीला कळवले माझ्या, म्हटलं क्या आजीबाई तुमनेच हमारे दोस्त लोग देखे है क्या!!!! मी पण ओळखते तुझ्या सवंगड्यांना आणि अभी तो वो अपनेभी दोस्त है!!!!!!!!! हसत होती आजी म्हणे ’अग सुरेश लहान आहे माझ्यापेक्षा तुला कुठे भेटला तो?’ ……..एक वर्तूळ पुर्ण होताना मी साक्षीदार आहे….हम खुश है!!!!!

खरी गंमत तर अजुन पुढे आहे, आता मी भारतात गेल्यावर काका मला त्यांच्या लहानपणीच्या, माझ्या पणजीच्या, त्यांच्या वाड्याच्या आठवणींचे चित्र काढून दाखवणार आहेत. मला तर खजिना गवसल्याचा आत्ताच आनंद होतोय.

आज ही पोस्ट लिहीलीये खरी…..तरिही पुन्हा पुन्हा वाटतय काहितरी रहातय लिहायचं. असचं काहिसं माझं माझ्या बाबांच्या लेखात झालं होतं. काही वेळा एक संपुर्ण व्यक्ती एका पानावरच्या लेखात पुर्णपणे व्यक्त नाही करता येत….अपुरे पडतात ते माझेच शब्द!!!!!!!! विचारांच्या मागे त्याच वेगाने धावताना…..ते टाईप करताना बरेचसे राहून जाते………

या पोस्टला शेवट असूच शकत नाही, कारण काका तर आजही त्यांचे लॅंडस्केपचे सामान घेउन एका नव्या ठिकाणी गेलेत…..नव्या उत्साहात, नव्या जोमात…..नव्या कलाविष्कारासाठी. आज रविवार, जेव्हा त्यांच्यापेक्षा वयाने लहान आम्ही लोक लोळत पडलोय……हा योगी मात्र उत्साहात आणि अचलपणे कार्यमग्न आहे !!!!!!!

20 thoughts on “मित्र……

 1. ही आणि या आधीची या दोनिहि पोस्ट खरच अतिशय प्रेरणा दाई आहेत……..खरच आपटे काका आणि पेठे काका या दोघांचा ही उत्साह आणि जिद्द दोनिहि वाखाणण्याजोगे आहे……..खरच आपल्यासारखे तरुण लोकही एवढी चिकाटी दाखवत नाही….आणि कुठलाही संकल्प दोन आठवड्याच्या आत विसरून जातात…..नव्याचे नौ दिवस म्हटल्या प्रमाणे……. hats off to these people…………बाकी खरच कधी कधी इंटरनेट भुले बिसरो को मिला देता है आणि मग आपल्याला प्रत्यय येतो की दुनिया गोल है……..

 2. बाई ss गं ! अगं ह्याला काय ब्लॉग म्हणायचं, अगदि खरं सांगू मला एकदम गहिवरून आलं व डोळ्यातले पाणी काही केल्या हटेना ! संपूर्ण चित्रच रेखाटून टाकलंस अगदि भरपूर व्हायब्रंट रंगाचे पॅलेट घेऊन ! तू म्हणत्येस तेच खर असेल कदाचित कारण अजून माझीच मला पुरती ओळख पटलेली नाही !! पण बाईच्या जातीला संवय असते … शितांवरून भात पकवूनच टाकलास काय गं…!

  तुझे लिखाणातील सामर्थ्य नि:संशय वाखाणण्या जोगेच आहे

  • काका काय लिहू……मुळात मला जे जितके शिकायला मिळाले तुमच्याकडून ते ईतरांना सांगण्याचा लहानसा प्रयत्न आहे हा माझा. आणि काका म्हणतेय तुम्हाला, तुमचा अधिकार आहे आम्हा सगळ्यांवर!!!
   तुमच्यातली प्रसन्नता आम्हाला बळं देतेय, जगण्याची नवी दिशा मिळतेय!!!!

 3. तन्वी अगं काय सारखं न्याय देऊ शकते की नाही लावलंयस….कधी कोर्टात काम करायचं ठरवलं होतंस का?? तसं असेल तर सोड ते आणि असे सुंदर सुंदर ब्लॉगच लिही बाई….:)
  खरंच खूप व्यवस्थित मांडलंस गं…आणि नेमका पेठेकाकांशी तुझ्या आजीचा संबंध म्हणजे तर दुधात साखर…ही व्यक्ती माझ्यासारख्यांना खूप प्रेरणादायी आहे..ऑर्कुट ज्याने निर्माण केलं त्याचा उद्देश माहित नाही पण तू मात्र त्याचा खूप चांगला वापर करु शकतेस हेही यातुन दिसतं आणि तसंही आपली ओळखही तिथलीच ना?? त्यामुळे त्या सुरुवातीच्या दिवसांची आठवणही आली…:)

 4. तुझे हे काका आमचे पण झाले. नमस्कार सांग त्यांना. अशीच कलेची ओळख देत रहा कारण हिऱ्या करता कोंदण
  पण तितकेच महत्वाचे…….

 5. अगं तुझ्या काकांची इथे ओळख करून दिलीस म्हणून ही चित्रं बघायला मिळाली … काय सुंदर आहेत सगळीच! त्यात तुझ्या आजीची ओळख निघाली म्हणजे दुधात साखर.

  कुठली ओळख कुठे भेटेल सांगता येत नाही – दुनिया गोल आहे हे खरं.

  • अपर्णा खरयं गं तू माझी ऑर्कूटवरचीच मैत्रीण पण मैत्रीला बंधन नसते कुठले हे सिद्ध होतेय ना!!! येव्हढ्या दुर आहोत पण बरेचदा न बोलताही समजतोय एकमेकांना…अजून काय हवे!!!!

   अनूजाताई आभार…..

   गौरी अगं काहीचं चित्र आहेत त्या लिंकवर…..सगळे नाहीयेत पण मला काकांची ओळख करून देण्याची घाई होती त्यामूळे होते त्या माहितीसहित पोस्ट टाकून मोकळी झाले बघ.आभार….

 6. काही माणसे वयातीत असतात हेच खरं. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे गं काकांचे. त्यांना नमस्कार सांग.चित्रे छान आहेत. त्यातून काका नाशिकचे…पेठे हायस्कूलचे….म्हणजे आमच्या अगदी जवळचे.:) आईला सांगायला हवे.

 7. तन्वी तुझ्या ह्या जागेचा मी थोडा माझ्या साठी उपयोग केला तर चालेल ना ?… हो….समजून चालतोय !!

  तन्वी च्या सर्व मित्र – मैत्रिणींनो , आपणास माझे आग्रहाचे आमंत्रण… या या सर्वांनी ऑर्कुट वरील माझ्या प्रोफाईल ला भेट द्या… माझेही मित्र ( friend request ) बना. मला तुम्ही सर्व हवे आहात… आतूरतेने वाट पहात आहे !

  • काका हा हक्क आहे तुमचा…..
   तुमची ओळख तुमच्या ऑर्कूट प्रोफाईल मधून आणि जास्त होउ शकते कारण तिथे तुमच्या चित्रांचे सगळे अल्बम तसेच ईतरही चित्ररुपी माहिती आहे!!!!

 8. asha navin navin wallinchi olakh karun dilyabaddal aabhaar. aayushya kuthunahi suru karata yet yacha prachiti denari hi manas aahet. prerna kahi fakt thoramothyanchya charitratunach milate as nahi. aaplya ajubajulach ashi kititari manas aahet ki tyana baghun ‘jivan sunder aahe’ yacha punha punha anubhav yet raahto. kharach khup chaan.

  • पियू, अश्विनी आभार..
   सोनल पुन्हा एकदा आपले विचार जुळले बघ…प्रेरणा काही थोरामोठ्यांकडूनच मिळते असे नाही….
   हे जीवन खरच खुप सुंदर आहे गं!!! डॊळे आणि मनाचे कवाड उघडे ठेवून बघायला हवेय फक्त…..तुझ्यासारख्या मैत्रीणी जेव्हा पाठीवर थाप देतात तेव्हा आणखी मजा येते!!!

   • पेठे काकां बद्दल काय बोलू कळतच नाही…. पेठे काकांची आणि माझी ओळख तशी नविनच. मी कुठे छत्तीसगढ़ला आणि काका कुठे पुण्यात…… बोलतात ना नशिबात असेल तर माणस कुठूनही कशीही भेटतात… अगदी वर ब्लॉगवर लिहिल्या प्रमाणे……… काकां सारख व्यक्तिमत्व लाभायला नशीबच लागत……..

    तुमच्या पुढील कार्याला माझ्या संपूर्ण कुटूबातर्फे माझ्या हार्दिक सुभेछा…..तुम्हाला स्वस्थ, सुंदर आणि निरोगी आयुष्य लाभों हीच इश्वर चरनी प्राथना………….

    या ब्लॉग वर पेठे काकां विषयी खुप छान लिहिल आहे…. शब्दच नाहित…
    तुमच्या मैत्रीला माझा आदराचा सलाम…….

 9. पेठे काकां बद्दल काय बोलू कळतच नाही…. पेठे काकांची आणि माझी ओळख तशी नविनच. मी कुठे छत्तीसगढ़ला आणि काका कुठे पुण्यात…. बोलतात ना नशिबात असेल तर माणस कुठूनही कशीही भेटतात… अगदी वर ब्लॉगवर लिहिल्या प्रमाणे……. काकां सारख व्यक्तिमत्व लाभायला नशीबच लागत……

  तुमच्या पुढील कार्याला माझ्या संपूर्ण कुटूबातर्फे माझ्या हार्दिक सुभेछा…..तुम्हाला स्वस्थ, सुंदर आणि निरोगी आयुष्य लाभों हीच इश्वर चरनी प्राथना………

  या ब्लॉग वर पेठे काकां विषयी खुप छान लिहिल आहे…. शब्दच नाहित…
  तुमच्या मैत्रीला माझा आदराचा सलाम…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s