तारें जमीं पर……

ईशानची MS-Paint मधली कलाकारी…..

परवा मी त्याला रागावले की लॅपटॉप हातात मिळाला की गाणे ऐकणे हे एकमेव काम करत जाउ नकोस, त्याऐवजी काहितरी बनवत जा त्यावर…..थोड्या वेळाने जाउन पाहिले तर त्याने पेंट मधे बरेचसे चित्र काढलेले होते. मग दिवसभर तेच चित्र पुन्हा चित्रकलेच्या वहीत काढले आणि रंगवले. आज त्याने सेव्ह केलेले पेंट मधले चित्र टाकतेय…..

 हे पहिलेच चित्र…..याचे नाव आहे ’24 hours service’ ……मला आवडले. चंद्र काही जमला नाहीये पण कल्पना आवडली सुर्य आणि चंद्राची…..त्याने सांगितले मागे आपण मॅकडोनाल्डच्या इथे थांबलो होतो ना तिथे होते हे चित्र……..

 

 

हे आहे सफरचंदाचे झाड, शेजारी झोपडी आणि त्याचा लाडका सुर्य…..

 

 

 

 

याचे नाव आहे( सगळी नावं त्याने दिलेली आहेत) mountains with face……

सगळ्या डोंगरांना डोळे, नाक आणि तोंड लावलेय…..वर पुन्हा लाडका सुर्य आहेच. कुठल्याही चित्राची सुरूवात त्या गोलानेच करायची असा त्याचा अलिखीत नियम आहे.

 

ही आहे Galaxy……हा कधी पहातोय हे सगळं असा प्रश्न मला पडत होता. ही पिढी नक्कीच खूप हुशार आहे आणि यांच्या प्रगतीचा वेग पहाता ७ वर्षाच्या मुलाला अशी सगळी माहिती असणे यात काही नवे नाही……फिर भी जब अपना बच्चा कुछ करता है तो अच्छा तो लगता ही है!!!!

 

 

 

हा आणखी एक प्रचंड मोठा नाद….गाड्या. याच्या डोक्यात सतत चाकं फिरत असतात असे मी चिडून म्हणते कायम…पण कुठल्याही गाडीचा कोणताही कोपरा बघून जेव्हा तो त्याचे मॉडेल, कपॅसिटी, फिचर्स असल्या मुद्द्यांवर बाबाशी गहन चर्चा करतो तेव्हा मला तो खुप आवडतो……

ह्याचे नाव आहे sun limousine and a house. वोल्स वॅगनची नवी जाहिरात येते हल्ली ज्यात एक लहान मुलगा आपल्या भविष्यातल्या गाड्या बुक करत असतो तसाच आमचा लेक त्याच्या गाड्या रंगवत असतो. पण ही चित्रातली गाडी माझ्यासाठी आहे…..प्रसिद्ध उद्योगपती श्री. धनंजय दातारांनी त्यांच्या पत्नीला ही गाडी दिली हे मी नवऱ्याला सांगत असताना लेकाने मला ’प्रॉमिस’ केलेय की तो मला ही गाडी देणार.

ह्या चित्राला तो बाइक म्हणतो म्हणून मी पण म्हणतेय…..याचे नाव आहे bick sun and the number ………………………………………………2468 2468 8642 6842 4262

आता हा भला मोठ्ठा नंबर का आहे या गाडीचा राम जाणॆ!!!!!!पण ईशानच्या डोक्यातले ’धुम’चे खूळ बघता तो बाईक न काढता तरच नवल होते…..

मला तारें जमीं पर मधले आमिरचे वाक्य राहून राहून आठवत होते काल,

’ये तेज दिमाग हजारों खयाल बुन रहे है रंगो में!!!!!’

मुलं आणि त्यांच विश्व……..नेहेमी हाच विषय येतो माझ्या पोस्टस मधे, कल्पना आहे मला. पण जेव्हा माझा मुलगा आणि त्याचे मित्र गप्पा मारतात तेव्हा तिथे घुटमळणे काही सोडत नाही मी!!!! ते ही अजून लहान आहेत त्यांना माझी अडचण वाटत नाहीये सद्ध्यातरी!!!!!!

म्हणूनच लहानश्या मिश्या असणारे कार्टून हिटलरसारखे आहे असे माझ्या लेकाला सांगणारा माझ्या मुलाचा मित्र ,”Aunty do u know , who was Hitler?”  असे सहज विचारतो. या प्रश्नाला मी नकारार्थी मान हलवते…….मग तो सरसावून मला सांगतो, “Even I don’t know….but he was somebody related to Germany!!!!!”  …….पण या मठ्ठ बाईच्या डोक्यात कसा प्रकाश पाडावा या विचारात गुंतलेलं ते ध्यान थोड्या वेळाने माझ्या समोर पुन्हा उभं रहातं आणि मला सांगतं, “Ok…u must be knowing Charlie Chaplin at least…….” यावेळेस मी ’हो’ म्हणते!!!! तो सुटकेचा श्वास टाकत असतो की आतातरी मला आठवेल त्या मिश्या कोणासारख्या आहेत……आणि मी त्याच्या डोक्यावर टपली मारत त्याच्या अस्ताव्यस्त शर्टची ईन नीट करून देत असते!!!!!!!

मोठे जेव्हा वयाने मोठे असूनही वृतीने लहान वाटतात….तेव्हा ही बच्चे कंपनी मात्र नेहेमी निखळ आनंद स्वत:ही उपभोगत असतात आणि तो मुक्त हस्ताने चौफेर उधळतही असतात……आपणही असेच होतो नाही का लहानपणी!!!!!!

Advertisements

39 thoughts on “तारें जमीं पर……

 1. भारी आहेत सगळी चित्रे… ईशान
  लहानपणी गणित, भुमीतीच्या जाचाला कंटाळुन त्यांचा आभ्यास बाजुला ठेवुन चार्ली, सावरकर, डाकु रामसिंग ;), ची चित्रे काढली होती. ते दिवस आठवले.. 🙂

 2. ह्या ब्लॉगने तू मला एकदम माझ्या बालपणात ढकललेस !किती रम्य, आणि अजब असते हे विश्व !

  मी जेमतेम दिड- दोन वर्षाचा असेन, आमच्या नाशिकच्या पेठे वाड्याचे मधले घर !असेल ४०’x१२’, नुकतेच
  शेणाने सारवायला झालेले …मी घर भर खडूने गोळे मोठे मोठे लहान लहान होत गेलेले काढले होते …कुणी तरी विचारले काय आहे ? माझे उत्तर, ” हम्मा आली होती तिचे पो आहेत !”

  आमच्या वाड्यात सौंदाणकर नावाचे बिऱ्हाड आहे. ती ही इंदू माझी तेव्हाची बाल- मैत्रिण .. माझं दुसरं घर !( आत्ता वय वर्षे नव्वदीच्या वर !)मध्यंतरी नाशिकला गेलो होतॊ, तिला आवर्जून भेटलो. हातात हात घेऊन किती तरी वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तेव्हा तिने हा कीस्सा सांगीतला होता, अन ईशान च्या ह्या ब्लॉग मुळे प्रकर्षाने आठवला !

  हा विचार तेव्हा माझ्या डोक्यात का – व – कसा आला असेल? त्याची इंदूला जाणवलेली घटना- माहीती तिने दिली.

  घर सारवायला झाले आहे असे आमचे दादा ( माझे वडील) अर्ज्युन्याला (आमचा कोकणी घर गडी ) सांगत होते, व तो सध्या शेण मिळत नाहीय्ये हे तो दादांना सांगत होता ! मी ते बहुदा ऐकलेले असेल…. तेव्हा घ्या हे हवे तितके शेण…

  बालमन मोठ्यां सारखेच …!

  • म्हणजे तुम्ही तेव्हापासूनच कलाकार होतात तर!!!
   काका, मी त्याला सहसा या गोष्टींसाठी रागावत नाही कारण तो सहज म्हणून जे काही करत असतो त्यातली त्याची समज पहायला मला आवडतं!!! आता तुम्ही भेटले की मात्र मी खुप गप्पा मारणार आहे…

 3. jasa tumhi mhanaalaat…….mull aaju baajulaa je pahtaat kiva je tyaanaa aavdat….tyaache vichaar te maandat astaat kuthlyaa naa kuthlyaa prakaare…..chitr he ek maadhyam……aataa mala vaata ki space tyaane “KOI LIL GAYA…” paahun kaadhla asel aani vaalvantaa til dongar “Tumchyaa Dubai Trip” laa anusarun……… Pan kharay……mull he satat aanand det astaat…………..

  good one……keep it up…….

 4. तन्वी ईशानची चित्रे एकदम मस्त आलीत. पोरांचे डोके भन्नाट चालत असते. सूर्य आणि घर या दोन गोष्टींची नितांत गरज त्याला पक्की समजलीये पाहा.:)सफरचंदाचे झाड आवडले आणि बाईक उडते हे बाकी बरोबर…गाडी चालते पण बाईक मात्र…… मस्तच.

 5. मस्त चित्र काढली आहेत इशानाने …
  बाइकच चित्र सर्वात जास्त आवडल मला.
  तुम्हीही छान रमला आहात इशानच्या भावविश्वात …
  मलाही कधी कधी लहान मुलांसमोर असच अज्ञानी बनायला आवडते …

  • भाग्यश्रीताई, देवेंद्र आभार…..ताई अग सफरचंदाच्या झाडासाठी मला विचारले त्याने…मी पोळ्या करताना जे समजावले त्यानूसार काढले गं!!!
   देवेंद्र तू अजून गध्धे पंचविशीतच आहेस ना मग तुझे आणी इशानचे पटणारच!!! आमच्या घरात सतत धूम सुरु असते बाबा!! त्याच्या गाड्यांच्या कायम रेस करत असतो. त्याने त्याची आवडती ’बर्निंग ट्रेन’ कशी नाही काढली अजून आश्चर्य आहे!!!!

  • अजय आभार…..सगळ्यांच्या प्रतिक्रियांना जितका तो सुखावतो तितकीच मी देखील आनंदीत होते!!!!
   आणि ती लिमो मला देणार आहे माझा श्रावणबाळ!!!!

 6. चला शेवटी आपले ईशान महाराज अवतरले “सहजच” वर. खूप खूप आनंद झाला . खूपच सुंदर चित्र काढली आहेत ती ही पेंट वर. मला ईशानच्या पेज वर प्रतिक्रिया दिल्या होत्या. आज रिझल्ट मिळाला. ईशान निश्चित आपल्या आई साठी तशी लिमोझिन घेणार.

 7. ईशान, तुला मराठी येते का रे? नसेल येत तर आई कडून नक्की शिकून घे ! खरं तर आपले विचार आपण मातृभाषेत च अधिक छान मांडू शकतो. मी तुला म्हणून काही लिहीन ते मराठीतच लिहीन, तुझे तू वाचून उत्तर ही मला मराठीत देण्याचा प्रयत्न कर. घरी आई तुझ्याशी मराठीतून बोलते का? तर असेल तर मग तू लवकर शिकशील. मग ?

  सुरेश आज्जोबा !

  • काका त्याला शाळेत हिंदी असल्यामुळे मराठी पण वाचता येतं आणि मुळातच आवड आहे त्याला वाचायची त्यामूळे जमतय ….घरात मात्र आम्ही मराठीच बोलतो आवर्जून….
   सांगते त्याला उत्तरे द्यायला….तो खरं तर लूडबुडत असतो पण मीच जरा रागावत असते त्याला 🙂

 8. सुंदर आहेत चित्रं.. आम्ही तर पुस्तकातल्या ( इतिहासाच्या ) चित्रांना कुंकू लावणं, दाढी मिशा रंगवणं हे खेळ करायचो. चित्रकले मधे मी अगदी औरंगजेब.. मस्त आहे चित्र. चित्र म्हणण्यापेक्षा त्या मागची कल्पना शक्ती वाखाणण्यासारखी आहे. रसिका पण अभ्यासाचा खुप कंटाळा करायची लहान असताना, पण चित्रकला म्हंट्लं की खुश असायची. हळु हळू चित्र काढता काढता, अभ्यासातपण कॉन्संट्रेशन वाढलं, आणि मग चांगले मार्क्स मिळाला लागले.

  चित्रकला ही अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी खुप उपयोगी ठरते. करु द्या जे काही करित असेल ते.. अगदी तासन तास जरी बसला तरी बसु द्या चित्रं काढित.. पुढे बायोलॉजी मधे हा छंद उपयोगीपडतो.

  • महेंद्रजी झालं त्याला तुमचा, भाग्यश्रीताईचा पाठिंबा मिळालाय मग काय हवे आणखी!!! पण जमतयं हे मात्र खरं…..उगाच काहितरी कार्टून पहाण्यापेक्षा इथे निदान तो स्वत:ला व्यक्त करतोय आणि खरच मी दंग झाले होते त्याची कल्पनाशक्ती पहाता…..अगदी स्पष्ट बोलायचे त्याच्याबाबत तर बुड टेकवतोय एका जागी हे ही खुप आहे….

 9. एक्जॅक्टली.. आणि याच गोष्टीचा फायदा खुप होतो पुढे. एकाजागी बसुन रहायची सवय लागते हेच महत्वाचे.. मुलांना नेमकं हेच जमत नाही. सारख अर्ध्या तासाने उठुन काही तरी दुसरं करावसं वाट्तं… ह्या सवईचा फायदा मी स्वतः अनुभवला आहे. अगदी अभ्यासात इंटरेस्ट नसणारी आत पहिल्या पाचात असते…

  • अजय आभार,,
   अरे हे काय सुचवतो आहेस त्याला…त्याने पहिलेच चित्र बाबाचे काढले होते ते मेल करते तुला….:)
   ते पाहून मी ताकीद दिलीये माझं काढायचं नाही!!!

   • तन्वी, तसं नाही, अजयजी बोलतात त्यात एक तथ्य जरूर आहे. इथे वास्तवता चित्रात अपेक्षीत नाही तर तो जे काही काढील ते त्याच्या मनातील आई बाबांचे स्थान-स्वरूप असेल व तुलाही त्याच्या मनात डोकवण्या साठी तो झरोका असेल !!

 10. मला वाटलच होतं , कारण माझा ही भाचा नेहमी माझ्या मागे लागतो की मामा तुझं चित्र काढायचं आहे. एके दिवशी मी त्याला ती संधी दिली आणि त्याने माझं चक्क हसण्यासारखं चित्र काढल. चित्रात त्याने माझ नाक मोठं काढल आणि डोळे बारीक. त्यानंतर मी कित्येक दिवस स्वताला आरशात पाहताना नाक आणि डोळे पहायचो 🙂 त्यामुळेच म्हटल जरा ही कलाकारी आई-बाबांवर आजमावुदेत इशानला. 🙂

  -अजय

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s