नावात ’क’Tय आहे????

 

“सतिश बेटा अर्चना के बारे मै तुम्हारा क्या खयाल है?”…..माँ

“अर्चना एक अच्छी लडकी है माँ…”…….बेटा

“उसके रिश्ते के बारे मै क्या खयाल है तुम्हारा…”माँ

“माँ, अर्चनासे जिसकी भी शादी होगी वो हमेशा सुखी रहेगा….”…बेटा

आता याच संवादाच्या खिचडीमधे ग्लासभर पाणी ओतून तेच ते दहा वेळा एकमेकांशी बोलायचे पण त्या हुशार माँ ने लेकाला किंचितशीही कल्पना द्यायची नाही की बाळा हे मी तुझ्याच रिश्त्याबद्दल बोलतेय…..बरं मोठ्या हुद्द्यावर वगैरे असणाऱ्या या शुंभ मुलाने देखील आपल्या ईतक्या महा चिकित्सक आईला ,”लेकिन माँ तुम किसके बारे मै बात कर रही हो?????” असे विचारायचे नाही कारण त्यांना तशी सक्त ताकिद दिली गेलेली आहे. नाहीतर ’गलतफहेमी’ ला स्कोप कसा रहाणार, मग ’रिश्तोमे दरार’ वगैरे घडवणे किती अवघड होइल नाही का????

हे सगळे मी बोलतेय ’पवित्र रिश्ता’ नावाच्या झी वरच्या नव्या मालिकेबद्दल……..सुरूवातीला मी या सिरियलची पहिले जवळपास साडे पंधरा भाग एक लॉयल प्रेक्षक होते……सविता प्रभूणे, उषा नाडकर्णी ई. मराठी मंडळी……अधून मधून पेरलेली मराठी वाक्य…….ठीक वाटले प्रकरण. तसेही मी कुठलीही सिरियल पुर्ण पहात नाही…..आठवड्यातूनच काय पण पंधरवाड्यातून एखादा भाग पाहिला तरी ’लिंक’ असते…….

मगर गडबड तो आगे थी……या घरातली ’एकता’ या ना त्या निमित्ताने आणि जराश्या ओळखीच्या कारणाने भंग होत होती. काही दिवसानंतर या सिरियलचा फ्लो वळणावळणाने एका चिरपरिचित वाटेकडे जाताना दिसले ज्याच्या शेवटाला मोठ्ठा टिळा लावलेल्या एकतामातेचे मंदिर येते!!!!!! मग हाथ कंगन को आरसी क्यूँ ???? म्हणत मी श्रेयनामावली तपासली……आणि not to my surprise तिथे या बयेचे आणि तिच्या जन्मदातीचे नाव दिसले!!!!!!!!! ये तो धोका है बॉस……..मराठीत शुद्ध फसवणूक म्हणतात ह्याला……..ही बया आता ’क’ला सोडचिठ्ठी देउन ’प’ च्या आश्रयाला गेलीये आणि ’ब’ शी देखील रिलेशन है!!!!!!

म्हणजे आम्ही चुन चून के ’के—K’ वाल्या सिरियल्स टाळायच्या…….तर या बाईने तर ’K’ लाच काटले आहे आता. मग मनात आले हा रिश्ता पवित्र बिवित्र कुछ नही है, ये एक नंबरचा ’क’च्चा रिश्ता असणार आहे…… यात गैरसमजाचे, अफवांचे, गुळगूळीत संवादाचे, अतिशय हुशार खलनायिकांचा घोळ, मिळमिळीत पुरूषांचे उदंड पीक येणार…….आणि जेव्हा यातल्या अर्चनाच्या लहान बहिणीचे तिच्या बॉसबरोबरचे प्रेमप्रकरण होणे आणि ह्या बॉसचे आधिच लग्न झालेले असणे म्हणजे पुढच्या अनेक मुर्खपणांची सुरूवात…….मुळात वेगवेगळ्या राज्यातली घरं दाखवायची आणि तेच ते गुऱ्हाळ लावायचे यातून या बाईला बहूतेक हे सिद्ध करायचे आहे की भारतभर सगळ्या राज्यात हाच गोंधळ चालतो.

मग एक दिवस या मालिकेच्या ’क’च्या नावांची कल्पना केली ती नावे होती….’क्यूँ’की हर रिश्ता कभी पवित्र था!!!!, कसौटी पवित्रता की!!!! , ’कहानी’ पवित्र रिश्ते की आणि मग अनेक वर्षानंतर आपल्या म्हातारपणी केव्हातरी कोर्टाच्या ऑर्डर्स येणार की बंद करा हा प्रकार…..मराठी कुटूंब आपला पहिला वीक पॉईंट…..उषा नाडकर्णी खलनायिका म्हणजे झणझणीत मिसळ…..बाकिची मंडळी म्हणजे कांदा शेव ई.ई. आणि शेजारी ’तरी’ ऐवजी एकतारूपी आळूचं फदफदं……अहाहा क्या बोगस कॉंबिनेशन…… हा बेत मला पटत नाही….. तेव्हा कॅन्सल……..

खरं तर या बयेलाही मागे टाकणाऱ्या ’अवघाची संसार’ सारख्या सिरियल्स आपल्या मराठी चॅनेल्स वरही आहेत की…….मागे ती एक ’अधूरी कहाणी’ अशीच होती. सद्ध्या मी झी मराठी पहाण्याच्या फंदात पडत नाहीये….भयंकर कंटाळा आलाय तेच ते पहाण्याचा. ’अनुबंध’ चा विषय वेगळा वाटूनही मी त्याच्या फंदात पडले नाहीये…… मला कल्पना आहे मी म्हणजे कोणी महान नाहीये आणि मला एकूणातच ईडीयट बॉक्सविषयी आपुलकी आहे पण तरिही मी माझ्या आयूष्याचा रोजचा अर्धा तास काही आता या लोकांना देणार नाहीये……’राजा शिवछत्रपती’ पाहिले आणि ईतर सावळ्या गोंधळाकडे पहाण्याची ईच्छाच नाहीये…….

’अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ सारख्या अभिनयसमृद्ध मालिका आठवड्यातूण एकदोन वेळा, थोडा वेळ म्हणजे मोजून दहा मिनिटं बातम्या त्यात दिवसभराचा सार कळतो……सब टि.व्ही. वरचे लापतागंज सारखे कार्यक्रम, आणि टाळताच येत नाही म्हणून मुलांबरोबर कार्टून नेटवर्क आणि पोगो असा मी माझा डाएट प्लॅन आखला आणि माझ्या हातात वेळच वेळ आहे आता…..आणि शांत डोके…….

तेव्हा सद्ध्या मी जरा डाएट करायचा प्लॅन केलाय…….माझे हे डायटींग आहे टि.व्ही. पहाण्याचे !!!!! कधीतरी असे अचानक वाटायला लागते की आपण आपल्या आयूष्याचा फार वेळ असा टि.व्ही. पहाण्यात वाया घालवतोय…..हे सिरियल्स वाले आपल्याला फसवतात, आपल्या आयुष्यातल्या मौलिक वेळेचा नासाडा करतात वगैरे वगैरे…..मग मला जनरल विरक्ती येते एक ८-१५ दिवस…..आणि मग ’नेमेची ’ येणारा कामाचा कंटाळा एखाद दिवस पुन्हा येतो आणि मी फतकल मारून बराच वेळ बधिर कानांनी आणि शुन्य नजरेने पुनश्च टि.व्ही. समोर ठाण मांडून बसते…………….

यावेळेस काय माहित नाही मगर फिलहाल ये अपना प्लॅन है ये पक्का!!! जय एकता माता…….

35 thoughts on “नावात ’क’Tय आहे????

 1. बापरे! मी तर सुरुवातीपासूनच ह्या सिरियल्स पहात नाही. कोणे एके काळी कहानी घर घर की नावाची सिरियल पहात होते. काही भागांनंतर तिलाही तोचतोचपणाची घरघर लागली. तेव्हापासून सिरियल्स बंदच केल्या. अगं ती एकता क ह्या अक्षरामागे लागल्यापासून माझा जीव किती धडधडायचा! नावात क आणि आडनावात सुद्धा क!

  • कांचन 😀 अगं मला सुद्धा हा लेख लिहिताना नक्की किती वेळा ’क’ आला हे मोजायचा मोह झाला होता बघ….तु मात्र एकताची लाडकी …..नावात दोन वेळा क……
   सगळं ’क’ठीण आहे म्हणायचं!!!!

 2. Bahuda Sagalynache asech mat asel! Mi tar suruwatila agadi bhaktibhawane ya serials baghayache. Kusum baghatana mi tar swatala kusumach samajayala lagale hote. Abhalmaya serial athawate ka…….? ti pan ashich bharpoor phirun nanatar sampali. Ata matra serial purn band! Tula pan ek suggestion ahe jar tv baghawsa watala tar zee studio warche cineme bagh. Kadhi kadhi changale astat. Serials phar bore kartat. Baki lekh nehemi pramane pharach chhan lihila aahes.

  • माधूरी :)……ह्या पोस्टवरच्या प्रत्येक रिप्लायमधे मला हसावे लागणार आहे कारण त्या बाईची ’कि’मयाच तशी आहे…..बाकी कुसूम, प्रेरणा यांच्या जागेवर स्वत:ला कल्पून माझी आणखी एक मैत्रीणही रडायची……आणि आम्ही ती आली की ’लिकाSSSSSSSS’ असे कोमलिकाच्या एंट्रीसारखे ओरडायचो…..
   आभार गं!!!!!

 3. अपने प्लॅन पे डटे रहो… मी आहे सोबतिला टीव्ही न पहाणारा…. 🙂 कधीच नादी लागत नाही त्या टिव्हीच्या. त्या पेक्षा काहीतरी वाचणं प्रिफर करतो नेटवर.. बाकी लेख मस्त … ते एक मुर्ख सिरियल होतं जय श्री राम वालं, त्यामधे तो म्हातारा डुलणाऱ्या मानेने सारखा जय श्री राम म्हणत रहायचा, आणि परकाया प्रवेश वगैरे होतं त्यात.. ते आमच्या सौ च्य आवडिचं सिरियल . त्यात ती मारक्या म्हशीसारखी डॊळे दाखवणारी एक होती ती पण तिला खुप आवडायची.. मी आवडिने पाहिलेलं सिरियल म्हणजे शिनचॅन.. हे हे हे….

  • येस्स…महेंद्रजी तुमचा पाठिंबा आहे ना…मग आता प्लॅनको सक्सेसफ़ुल होनाच होगा!!!!!
   अमितला म्हटले या एकता नावाच्या घोडनवरीला जितेंद्रबाबा उजवत का नाहीये रे????? तर तो मला म्हणाला तिच्या किराणाचे बिल तू भरतीये का :)??? तू इथे खडे फोडत बैस आणि ती तिथे चेक फाडत बसलीये!!!
   (थोडक्यात तुझ्या बापाचे खाते का हा प्रश्न जरा सौम्य शब्दात :D…….)
   म्हणजे पहा ही बया फूट पाडण्यात किती पटाईत आहे….तिचे नुसते नाव निघाले की मतभेद सुरू!!!!!
   बाकि शिनचॅन ईशानचे फेव्हरेट…..

  • Are I am all with you. Mi Pan TV baghat nahi. Fakt Marathi Saregama baghte. majha nawra Big Boss chya naadi laaglela asto halli. Raju sriwastav chya 5 minitanchya comedy sathi to wattel to nonsense baghato 1 tas.
   aata NDTV imagine warachi ‘Raj Picchle janam ka’ ha reality(?) show baghaycha wichar aahe. raajkanyene baghu dila shantpane tar baghen.

   • सोनल हे बरे नव्हे बघ!!! हे म्हणजे डाएटींग करणाऱ्या माणसासमोर आपण काहितरी मस्त पदार्थांची नावं घ्यायची…..’राज पिछले जन्म का….’ सोचना पडेगा…..एक दोन भाग देखू क्या????? हा बघ असाच माझ्या डाएटचा बोऱ्य़ा वाजतो……:D

 4. ह्या सीरिअलचा मी एखाद दुसरा भाग सहज ५ एक मिनिटे बघितला होता पण बोर वाटली. ती.व्ही वरील काही निवडक सिरिअल्स बघाव्याश्या वाटतात. त्या म्हणजे. सब वरील फक्त तारक मेहता……., स्टार प्लस वरील ये रिश्ता क्या ………., आणि सोनीवरील सी.आय.डी. अधून मधून बिग बॉस बस या व्यतिरिक्त कोणतीच सीरिअल बघण्यासारखी वाटत नाही.

  • रविंद्रजी आभार…..मला देखील कधितरी विरंगूळा म्हणून टि.व्ही.बघायचा तर सब टि.व्ही.पाहिन…..

 5. मला तर आधीपासुनच टीवी बघायला आवडत नाही.रविन्द्रजीनी सांगीतलेला ’तारक मेहता..’,पोगो वरील टकेशीस कास्टल,जस्ट फ़ोर लाफ़ असे काही मोजकेच कार्यक्रम पाहिले तर पाहतो.तशी मला काही कार्यक्रमाची टाइटल सोंग्स आवड्तात.यावर एक पोस्ट(http://davbindu.wordpress.com/2009/09/27) टाकली होती मागे मी.तुम्ही वर उल्लैख केलेली ’पवित्र रिश्ता’ आमच्या घरातही पाहिली जाते.असो बाकी ती एकता बाइ अगद विक्षीप्त आहे.संस्कॄतीची अगदी विल्हेवाट लावत असते हि हिच्या मालिकांमध्ये हिच त्याच्याबरोबर लफ़ड त्याच वेगळ्याच कोणाबरोबर लफ़ड सगळच विचित्र …..क हा शब्दच आवडेनासा झाला या बयेमुळे…असो तुमच टि.व्ही डायटींग यशस्वी होवो…

  • देवेंद्र….तारक मेहता माझ्या मुलीचे लाडके आहे….मी अगदी रेग्युलर पहात नाही रे काहिच….घरात दोन लहान मुलं आहेत…..पण तरिही ईतर काही पहाण्यापेक्षा ’सब’ बरे…कारण पहा, relax व्हा आणि विसरून जा…:)

 6. हाहा…. क च्या कथांनी कमालीचे कावलेले अन सतावले गेलेले सगळे आपल्यासारखे प्रेक्षक…:( सुदैवाने गेली काही वर्षे मी तिच्या तडाख्यातून सुटले आहे. अग मराठीत तरी काय चालले आहे….. इतकी दु:खे लागोपाठ एकाच घरात कशी येतात….तीही आयुष्यभर. कारस्थानी, जहांबाज बाया इतकी उघड कारस्थाने करतात अन ती फक्त घरातल्यानांच दिसत नाहीत…जाऊ दे…कोळसा कितीही उगाळला तरी काही बदल होणार नाही. अडोस पडोस सारख्या सुंदर हलक्या फुलक्या तरीही काळजाला भिडणा~या मालिका म्हणजे स्वप्नच होती.
  तुझ्या संकल्पाला अनेक शुभेच्छा:D…बाकी आजकाल ब~याच गोष्टींचे डाएटींग मनावर घेतलेले दिसतेय…..:P

  • बरोबर बोललीस बघ…कोळसा कितीही उगाळला तरी काळा……
   आणि आभार गं!!!!!!!!!!!! तूला माझे दुसरे डाएटींग माझ्या फोटॊंमधे दिसले ना!!!! 😀

 7. खुप वर्षे झाली टी.व्ही. बघणे सोडून … घरात संध्याकाळी (कधीतरी जेंव्हा मी असतो तेंव्हा) टी.व्ही.चा त्रास व्हायला लागला की आपला कम्पूटर आहेच की… 😉 ब्लॉग वाचणे किंवा लिहिणे उत्तम.

  (तुमचे जास्त लिखाण अजून वाचलेले नाही तेंव्हा उगाच ‘नेहमी सारखे झकास लिखाण’, ‘मस्त लेख’ वगैरे… असे शब्द डकवत नाही.) बाकी भाषेची सरमीसळ आणि ‘एक नंबरचा ’क’च्चा रिश्ता’ आवडले… मस्त.

  … बाकी ह्या ‘क’ वरुन एक भन्नाट लेख माझ्या ऑरकुट प्रोफाइलला आहे. जमले तर बघा. (मला तुम्ही भानस ताईंच्या लिस्टमध्ये शोधू शकता..)

  • रोहन आभार……अरे तुला शोधणे ईतके अवघड नाही…तुझ्या ऑर्कूटवरच्या ’कं’ताक्षरी ला मी आधिच वाचले आहे….मस्त आहे…मी तर तुला विचारणार होते त्यातला काही भाग इथे टाकून …’मोजा बरे किती ’क’ आहेत..’ असे काही उद्योग करावे का???????? 🙂 🙂

   • हा काय. टाका की मग पोष्ट.. बरे तुम्हास्नी ऑरकुट वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची होती. पण इमेल नाय न माहीत.. 😦 बघा की काय करता येइल का ते … 🙂

 8. अगं सिरियली मी सिरियसली कधीच पाहात नाही. त्यात इथे लांब देशात आल्यावर शक्यच नव्हते. पण हाय!! या इंटरनेट/डिश टि.व्हीच्या यु्गमहिम्याने (हिंदी)झी दिसायला लागले म्हणून एकदा घेतले आणि सारेगम सोडून काहीच पाहणे नाही म्हणून बंद केले आणि एका कार्यक्रमासाठी द्यावे लागणारे पैसे पण जरा जास्तच वाटले.
  मग आता पुन्हा नेटवर मराठी झी घेता येते ते फ़क्त आई-बाबा इ. कुणी आलं तर घेतो. आणि मग त्या मालिका वीट आणतात अक्षरश: मी सध्या जबरदस्ती झी मराठीच्या मालिका ऐकते…कारण या घरात आधीच्या घरासारखी आईला लावुन स्वतः दुसरीकडे जायची सोय नाहीये….मजा म्हणजे तुझा तो अवघाची संसार मागे आई आरूषच्या वेळी आली होती तेव्हा ऐकला होता आणि आता जवळजवळ दीड वर्षांनी परत ऐकतेय तरी त्यांची तीच तीच रडकथा…लोकं कसं काय पाहातात काय माहित….आता मी आईलाच सांगितलं की निदान ही तरी मालिका पाहू नकोस…त्यात काय चाललंय कशाशी काही संबंध नाही…या विषयावर लिहावसं फ़ार वाटत होतं पण तुझं ते स्किलसेट आहे ना ते माझ्याकडे नाही…तू या पोस्टला पुरेपुर न्याव दिलास बाय…..:) keep it up…and stay on your diet plan….I strongly support it…Good luck..

  • आता तुमच्या कडून कौतूक ऐकल की अक्षी गार वाटतय बघा!!!! 🙂 आणि तुमच्या शुभेच्छांच्या जोरावर डाएट तर यशस्वी करेन मी पन मग तुमास्नी हिथे काय बी वाचाया लागलं तेव्हडं बगा…येकच धोका होनार……काय म्हंता तरिबी करू की ऱ्हाउ द्येउ?????:D

 9. आता ’कं’ची बाधा व्हायची राहीलीय ! पण मला आश्चर्य वाटते ते हे की इतके रटाळ कार्य(?)क्रम इतके मन लाऊन कसे काय तुम्ही पहायचात ? पण हे जाहिरात दारांना पक्के ठाऊक आहे की ह्यांचे डाएट किती तास…दिवस…आठवडे ..(पुढे नाही वाढवत !) कारण ह्या सिरीअल्स त्यांच्या सोयीसाठी केलेल्या आहेत ! कारण तुम्ही कितीही कथानकावर वगैरे चर्चा केलीत तरी जाहिरातदार +चॅनलवाले ह्यांच्या मर्जी पुढे कोणाचे काय चालणार ?

  आता डाएट मुळे वेळ भरपूर असेल तर चल नवीन पोस्ट पाठवली आहे ती पहायला

 10. खरच धन्यवाद त्या कोर्टाचे जे या सिरीयल्स आता बंद करा असा निर्णय देते………खर तर वर्ष वर्ष चघळुण झाल्यावर सुद्धा हे लोक एक्सटेन्षन मागतात हीच यांची कमाल आहे……… खरच हिंमतीचे आणि पॅशियन्स चे कौतुक केले पाहिजे निर्माअतयांच्या आणि प्रेक्षकांच्या दोघांच्याही……….आणि मराठी लोकांवरची ही सिरीयल खरच एकदा ‘राज’ साहेबांना दाखवली पाहिजे म्हणजे मराठी माणसातील ‘एकता’ या बाईला कळेल नाही का?

  बाकी लेख नेहमी प्रमाणे सही…..

 11. good.
  mi join hotey tuzya diet plan madhe 🙂

  agadi aajacha bhag (mi fresh episod pahat nahi) pahilyawar niranay ghetala hota. tuzi post wachu pakka kela.

  by the way, yat Ajay Wadhawkar nawacha guni kalawantsuddha aahe. tyala ya murkha ekta kkkkkkpoooor na waya ghalawalay.

  • शिल्पा आभार गं!!! हो गं मी अजय वढावकरचे नाव विसरले होते…..अगं परवा नवऱ्याला म्हटले एकता म्हणजे कोणी ना कोणी जेलमधे जायलाच हवे….काल तो सांगत होते गेले म्हणे कोणीतरी जेलमधे….:)माझा डाएट ना त्यामूळे मी नाही पाहिले 😀

 12. majhi aai ani vahini yana hindi nahi pan marathilya vahinesaheb ani tatsam serials ne jhapatelle ahe, tyachya ya serials cha amhala tras hoto karan tyach veles bakichya channels var kahi bhagnyasarkhe programs astat. pan mala ajun ek na ulgadelel koda ahe ki ya serials madhye asa kai asta ki samsta stri varga agdi gum lavlysarkha chiktun basto. bar bhagnybaddal kai harkat nahi ho, pan aapaly maitrinina sudha he vicharat astat ki aata kai hoin kiva kal philas na kai jhala vagaire ….hasu yet pan thik aheeeeee…

  marathi lihu na shaklybaddal shamsva…tevdha vel navata.

  Lekh nehmipramane shevatapryant vachayala lavnara hota.

  -Ajay

  • अजय आभार…..अरे काही नसतं खरं तर या सिरियल्स मधे….आपण उगाच त्यातले पात्र आपल्या आयूष्यात आणून त्रास करून घेत असतो!!!!!

 13. नक्की टी.व्ही. वर पाहायचे काय हाच प्रश्न पडतो.
  हिंदी काय नि मराठी काय सगळ्या daily soap serials एकचं. या मराठी चानेल वाल्यानापण त्या एकताचे डोहाळे लागले आहेत.
  स्पोर्ट्स चानेल वर आत्ता match असली तर ठीक, नाहीतर कुटली तर जुनी पुराणी match चालू असते.
  न्यूज चानेल वाल्यांच तर विचारू नका, ते तर entertainment category मध्ये मोडतात आजकाल.
  moviews चानेल वर तेच तेच रटाळ सिनेमे repeat होत असतात.
  Cartoons पण बोर होतात आजकाल.
  ‘Ideot Box’ या शब्दाचा अर्थ आज-काळ समजायला लागलाय.

  to99.wordpress.com

 14. आत्ता कॉमेंट करणं थोडं जास्तच उशिरा होईल..पण असो..सिरियल्स सारखीच एव्हरग्रीन नोंद आहे….
  मी १६-२३ ह्या वयोगटात असेपर्यंत सिरियल्स ह्या प्रकाराला हेट करायचो…
  पण मग इथे देशापासून दूर आलो..आणि घरी झी आणि झी सिनेमा हे दोनच प्रकार…आणि मातृभूमीशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर प्रचंड प्रेम…मग जे असेल ते बघायचं ठरवलं…आणि बऱ्याच सिरियल्स चा नियमित दर्शक झालो…पण मजा म्हणजे मुंबईत सुट्टीला गेलो कि पाहावत नाहीत सिरियल्स…कदाचित इतर अनेक पर्याय असल्याने…
  पण काहीही असलं तरी ह्या सिरियल्सची मला आदरयुक्त भीती वाटते..(आदर त्यांच्या जबरदस्त स्टेमिनाचा आणि स्वतःच्या विचित्र कल्पनांवर असलेल्या दुर्दम्य विश्वासाचा)!
  कॉमेंट थोडी लाम्बलीय..पण विषयही तसाच आहे ना…;-)

  • >>>> पण काहीही असलं तरी ह्या सिरियल्सची मला आदरयुक्त भीती वाटते..(आदर त्यांच्या जबरदस्त स्टेमिनाचा आणि स्वतःच्या विचित्र कल्पनांवर असलेल्या दुर्दम्य विश्वासाचा)!

   अगदी रे…… अक्षरश: कठीण कल्पनाशक्ती आणि त्याचा भयावह विस्तार करू शकतात हे लोक!!

   प्रतिक्रीयेसाठी आभार रे!!! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s