ये है फिल्मी चक्कर………….

काल एका मित्राशी वाद घालत होते…..त्या पठ्ठ्याने मला त्याची बाजू पटवणाऱ्या माहितीच्या अनेक लिंक्स पाठवल्या ज्या पाहून माझी खात्री पटली की हे महाराज खरं बोलताहेत आणि आपली बाजू चुकीची आहे. मग काय त्यांचे आभार मानणे क्रमप्राप्त होते…..

मी : ठीक आहे जनाब… ईन सब सबूतोंको देखते हुए हम मानते है की ये फोटो एक गफला है और आप सही हो!!!

तो: तमाम गवाहों और सबूतोंको मद्दे नजर रखते हुए ये अदालत ये फैसला करती है के यह फोटो एक hoax है । उस ई-मेल करनेवाले को ये अदालत कैदे-ए-बामुशक्कत की सजा सुनाती है और मोहोतरमा तन्वी देवडे को बाईज्जत बरी करती है!!!!! Dhannnnnnnnnnnnnnn…..(हथौडा!!!!!!!)

मी : Thank You मिलॉर्ड……कोर्टाबाहेर नवरा उभा डोळ्यात पाणी वगैरे……….सच्चाई की हमेशा जीत होती है……. (तुझ्या हातोड्याच्या आवाजासारखाच बॅकग्राउंड म्युज्यिक वगैरे………….)

तो: कोर्टाबाहेर नवरा उभा डोळ्यात पाणी वगैरे….कडेवर ईशान आणि गौरी……. तू पट्ट्यापट्ट्याच्या साडीत……..बाहेर पळत येउन त्यांच्या गळयात पडणार………मग तुमचा वकील पण चष्मा काढून डोळे पुसत पुसत येणार…….तुमच्या पाठीवर थोपटून नजेरेनेच काहिबाही बोलून निघून जाणार……………(वकिलाच्या भुमिकेत विक्रम गोखले कसा वाटेल…….)

मी : मग मी सच्चाईवर भाषण देउ का???????? की ’चलो घर तुम्हारा ईंतजार कर रहा है॥॥॥’ या नवऱ्याच्या वाक्याबरोबर आम्ही सगळे हातात हात घालून पाठमोरे चालायला लागलेले……मग पाठीमागे ’THE END’ किंवा ’THIS IS THE BEGINNING” ची पाटी……………. (वकील म्हणून विक्रम गोखलेच हवा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!)

तो: भाषण नको……लोक आधिच वेडे झालेत सिनेमा ईथवर पाहून……’THIS IS THE BEGINNING’ पण नको….लोक घाबरायचे सिनेमा पुन्हा सुरू होतो की काय????? ’समाप्त’ च बरंय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आहे की नाही फिल्मी………….. आम्हा दोघांची मेलामेली संपली पण चेहेऱ्यावर किती तर वेळ हसू होते…….एक सामायिक धागा आहे सगळ्यांचा…हिंदी चित्रपट आणि त्यातली गाणी आणि संवाद. बरेचसे भावनांचे व्यक्तीकरण जसे गाण्यांतून होते तसेच ते या चित्रपटांच्या संवादातूनही होत असते. आमचे घर तर बरेचसे ’ओम शांती ओम’ टाईप फिल्मी आहे…….. याचा प्रत्यय मुलांच्या वागण्यातूनही दिसतो…… मागे एकदा मुलाची शाळेची बस यायला उशीर झाला, एकदाची ती बस आली…….चिरंजीव आले मी नकळत बोलले, “बेटा मी घाबरले होते रे!!!! किती उशीर झाला!!!!!!!!!!” कार्टं जवळ आलं आणि म्हणालं, “मेरी फिल्मी माँ!!!!!!!!!!!!” तेव्हा विचार आला अरेच्चा, चिरंजीवांनी हेही गूण घेतलेत तर आईबापाचे!!!! माझी लेकही अधुनमधून हम भी कुछ कम नही हे दाखवून देते….. डायलॉग्स जरा नव्या सिनेमातले असतात पण त्यांचा वापर मात्र चपखल असतो!!!!!!!!!!!!!!

मला वाटतं माझं हे खुळ बळावलं आम्ही कॉलेजमधे असताना…..माझ्या दोन्ही मैत्रीणीही माझ्या सारख्याच होत्या…..लेक्चर्स संपले की दुपारी प्रॅक्टिकल्स असायचे मधल्या वेळात होस्टेलला न जाता आम्ही वर्गातच बसायचो….मग माझी काश्मिरी मैत्रीण ओढणीचा पट्टा करून तो हातात घ्यायची आणि मग हा वर्गातल्या शोलेतला गब्बर जे काही आम्हाला हसवायचा की वेळ सहज जायचा!!!!!!!!!!!!!!! तसाही डायलॉगबाजी मधे शोलेचा नंबर वर येतो…………..’कितने आदमी थे!!!!!!!’, ’अरे ओ सांबा…’ ,’अब…गोली खाss!!!!!’ वगैरे गब्बरचे डायलॉग्स असो की बसंतीचे ते पाठ नाहीत अशी व्यक्ती विरळा!!!!!! आम्ही तिघी मैत्रीणी तर बरेचदा असे सुरूवातीपासून शेवटपर्यंत सगळे काही म्हणत असू…..समोर स्टेजवर आमचा गब्बर वेगवेगळ्या रुपात आपली कला सादर करत असायचा!!! कधी ती ’भाग धन्नो…बसंती की ईज्जत बिज्जत असायचं….तर कधी यूँ की, ज्यादा बकबक करनेकी आदत तो मुझे है नही असायचं!!!!!!!!!!!!!!!

नंतर भर वर्गात कुठलेतरी सर काहितरी भयाण अभ्यास घेत असायचे आणि ईकडे आमच्या गब्बरला ’जाने भी दो यारों’ चे डॊहाळे लागायचे……………. मग कधी बोलत बोलत तर अर्धेमुर्धे डायलॉग्स लिहीत आम्ही त्यातली पात्र जगायचो……….त्यातला ’डिमेलो’ रुपी सतिश शहा म्हणजे तर हद्द आहे!!!!! नासिरूद्दीन शहा, ओम पुरी निव्वळ अप्रतीम…….संपुर्ण सिनेमाच आमचा फेव्हरेट होता पण शेवटचा महाभारताचा सीन म्हणजे कहर!!!!!!!!!!!!!!!! २/३ वेळा आम्हाला शिक्षा झालेली आहे त्या सीनपायी!!!!!!!!!!!!!!!!!!!! पण कुठलासा मास्तर स्टेजवर फळ्यासमोर आला आणि या बयेने ’अरे डिमेलो स्टेजपे…’ ची ललकारी दिली की समजायचो आम्ही आता आपली सुटका नाही……बरं तिला चूप म्हणता म्हणता आम्ही नकळत तिला सामिल व्हायचो….हळूहळू पुढच्या मागच्या बेंचांवरची प्रजा यायची आणि खसखस पिकायची………………..

किती आले किती गेले तरिही ’शांत गदाधारी भीम….’ ,’ओये धृतराष्ट्र के पुत्तर…….’ मधून मधून ओरडणारा धृतराष्ट्र , “कोई मुझे बताएगा ये सब क्या हो रहा है????????????????” आणि त्यावेळी वर्गात काहिही समजत नसणारे आम्ही यांच्या अवस्थेत भयंकर साम्य होते!!!!!!!!!!!!!!!! त्या महाभारतात मधेच सुरू झालेले मुगल-ए-आझम……तोड नाही त्या विनोदाला!!!!!!!!!!!!!!!!! त्यातले डायलॉग तेव्हाच नाही तर त्यानंतरही किती वेळा स्वत:ही वापरले आणि ईतरांनाही वापरताना ऐकले!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

असाच आणखी एक अत्याचार होता ’अंदाज अपना अपना’……………..यातही आमिर, परेश रावल या वल्लींनी जो काही धुमाकुळ घातला होता, ते पुन्हा होणे नाही!!!!!!!!!!!! यातली डायलॉगबाजी माझ्या महान मैत्रीणीने पहिल्या बाकड्यावर बसून केली होती……. तास होता मुलगीर नावाच्या मास्तरचा, या सरांना शिकवता कणभर यायचे नाही पण डोळे गोलगोल फिरवण्याची सवय होती……………….त्यांच्या नाकाखाली बसलेल्या या बयेनी जेव्हा ’मेरा नाम है गोगो…आँखे निकालके गोटियाँ खेलता हूँ…………….” चा  नारा केला होता तेव्हा न हसता चेहरा स्थिर ठेवण्यासाठी आम्हाला प्रचंड कष्ट झाले होते!!!!!!!!!!!!!!!!!!!! सलमान आमिरचा, “दो दोस्त एक प्याले में चाय पियेंगे” असो की बसमधल्या सीनमधला “ये टोपी आपने कहाँसे खरीदी?” असो….. की बापुडवाण्या वडिलांनी आमिरला म्हटलेला, “बेटा तू जब जब खुश हुआ है……तब तब मै रोया हू!!!” या डायलॉग्सनी जी काही साथ दिलीये , क्या कहेना!!!!!!!!!!!!!!!!!!!! परेश रावलचे ’गेम कर दुँगा…’…….विजु खोटेचा ’गलती से मिश्टेक हो गया………….’….तर शक्ती कपुरचा ’आया हूँ कुछ कुछ ना कुछ लेकेही जाऊंगा………….’ असो आठवले तरी आजही आवडतात……………………यातलीही शेवटची मारामारी असलीच तुफान!!!!!!!!!!!!!!!

खरं तर माझा हा अत्यंत आवडता विषय आहे…पोस्ट काही लवकर संपेलसे दिसत नाही पण तरीही आवरते आता…………………

तरिही आनंद मधले ’बाबू मोशाय’ वगैरे राहीलेतच, किंवा करन अर्जून नावाच्या टुकार सिनेमातला जड जिभेने राखीने केलेला ’मेरे करन अर्जून आएंगे…’चा आक्रोश…………..मैने प्यार किया तला ’दोस्ती मे नो सॉरी नो थँक्य़ु……………”….नव्यांपैकी ’जब वी मेट’ मधले करिनाचे डायलॉग्स……किती किती राहिलय…असो…..सुज्ञास अधिक सांगणे न लगे…….

ता.क. माझ्या पहिल्या जॉबमधे बॉसने ओरडले म्हणून मी उदास बसले असताना माझा एक मित्र येउन म्हणाला…’बडे बडे कंपनियों मै ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है!!!!!!!!!!!!!!!!!”………तोच मित्र आता माझा नवरा आहे…….कारण तो भेटल्यावर आणि त्याची फिल्लमबाजी पाहिल्यावर मी त्याला विचारले होते…’YOU TOO!!!!!!!!!!!!!!!!!!’ ओळखा बरं आता हा डायलॉग कश्यातला…थोडक्यात कोण कोणास म्हणाले!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Advertisements

28 thoughts on “ये है फिल्मी चक्कर………….

  • प्रसाद आभार…;)
   पहिल्याच बॉलवर माझी मात्र विकेट गेलीये…प्रहारमधल्या व्हिडिओसाठी पुन:श्च आभार….

 1. असेच मस्त डायलो्ग्स “गुंडा”आणि “लोहा” धे पण आहेत.

  चित्रपट अतशय टूकार असून डायलोग्स मस्त आहेत.

  अनिकेत वैद्य

 2. ‘khandan ki izzat’,
  ‘tumhare bachche ki maa’,
  ‘maa, main BA me first class first aya hoon’,
  ‘kash, aaj agar tumhari maa/bapu zindaa hote,’
  ‘kamine, chhod de muze,’

  vagaire 60s ani 70s che nahi lihiles?

  baki tuza mitr hi tuzya sarakhach R-TekaDa disatoye. :-p

 3. junya ‘chupke chupke’ che hi masta hote :
  “aake aake khaDa huwa hoon”

  junya golmal che tar tufan :
  “beta agar khana nehin khaoge to pulis ki maar kaise sahoge beta?”
  ‘pitaji hamesha kaha karte the ki,’

  navya golmal-return che pan maarayala chhan vatatat :
  tussar kapoor sarakha ati-bobaDa bolaycha,
  “aaiyyaa, aaamuAaAa??”
  “A..A..yOy” (sorry for this abusive slang word) :p

  • सर्किट तुम हमारे बारे में कुछ कहो ये हम सह लेंगे पर हमारे दोस्त को रिकामटेकडा केहकर उसकी बेइज्जती करने का तुम्हे कोई हक नही!!!!!!!!!!

   आणि राजे या विषयातले तुम्ही मास्टर्स तेव्हा तुमच्या कमेंटमधे अनेक डायलॉग्स येणार याची अंधुकशी कल्पना होती आम्हास!!!!!!!!!!!!!
   पण जुन्या गोलमालची सर नाही रे नव्याला…..त्यात उत्पल दत्तने मजा आणली होती. चुपके चुपके पण सही!!!!!
   आपका कमेंट देखके मोगॅंबो खुश हुआ!!!!!!!

 4. तन्वी अग या अंदाज अपना अपनाची पारायणे झालीत तरीही शोमू अजूनही तो लावला की खुदखुदून हसत गडाबडा लोळत असतो. ऒल टाईम फेवरेट आहे गं बाई हा सिनेमा. हो गं तो राखीचा आवाज कानात बसून नुसता छळत असतो….मेरे करण अर्जुन आयेंगे.. तसे ते शाहरूख चे जिथेतिथे कककक….. करणे. बहुदा एकता कपूरला त्याचीच पक्की लागण झाली असावी. माझा आवडता डायलॊग परिचय मधला, ” करनी हैं…..” तो सीनच धमाल आहे अगदी.तसेच ते ’ हेराफेरी ” चे भन्नाट डायलॊग. परेश रावल, अक्षय आणि सुनील शेट्टीने दिलेला एक जबरी सिनेमा. शोलेतले विरू आणि बसंती व जय आणि बसंतीचेही मस्तच. ही यादी न संपणारी आहे. मस्त गं तन्वी. मजा आली पोस्ट वाचून. 😀

  • शोमुला म्हणावं आपण परत एकदा बघू या तो सिनेमा…..:)…ईशानला पण आवडतो….
   हेराफेरी मधली शेवटची मारामारी मस्त आहे………….परेश रावलचं मराठी माणसा जागा हो!!!!!!! सही….

 5. तुमच्या दोघांची माझ्या नवर्याबरोबर खूब जमेल ….मी तशी फ़िल्मी दुनियेतील अडानी. पण जे काय थोड फार पाहिलेत किंवा इथे आल्यावर पाहावे लागलेत त्यातलेच बरेचसे तू पोस्टलेत म्हणून वाचायला मजा आली..तू ‘क’ वाल्या मलिका न पाहाता चांगले चित्रपट पाहून त्यावरही छान लिहिशील..

   • काय केला म्हणजे काय…अग सुरुवातीला कोलेज इतकी लांब होती की वेळ मिळत नसे…नंतर जंगल भटकायला जास्त आवडायला लागल मग review वाचून जे काही पाहिले टे पण नाही पाहिले तरी चालत मग नंतर नवर्याला कंपनी म्हणून तसे मागचे पण काही पाहिले…

   • तुझं जंगलातलं भटकणं बाकी सहीये पण….त्याच्यावरच्या पोस्ट पण मस्त!!!!

  • आपण संदेश मधे ब्लॅकने तिकीट घेउन कुठला तरी सिनेमा स्टॉलमधे पाहिला होता गं!!! मन्या म्हणाला होता मी बहिणींची रक्षा करतो बिरतो…..फालतू सिनेमा होता बघ सलमान श्रीदेवीचा……
   मन्याचं दहावीनंतरचं सगळे फ्लॉप सिनीमे पाहून पुण्य़ गोळा करणं पण सही!!!!!!!
   आपण मनमाडलाही जायचो बघ जयश्रीमधे …जो लागला असेल तो सिनेमा पहायला बाबा न्यायचे आपल्याला….किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या घराच्या गच्चीवर बालूमामा टि.व्ही.न्यायचा बघ मग आपण सगळे लोळत सिनीमे पहायचो….तेव्हा टि.व्ही. बंद कोण करायचं विचारलं पाहिजे एकदा!!!!!!!!!!ईगतपुरीला पण राजेशमामाच्या दुकानात जायचो बघ आपण व्हिसीडी आणायला….पण बाई तुम्ही खुप यायच्याच नाही आमच्यात आपलं काकूप्रेम उफाळून यायचं सुट्टीत……………

 6. hahahha ……. pan picture bharpur baghitale aahe aapan nasik la ekda black ne ticket ghevun Barast baghit la hota te pan faltu theater madhe aani andharat khruchi sapdat nahi mhanun supu barach vel maza mandit basali hoti hahhaha ……… nantar mag saglyat jast pictures me Hyderabad la baghit le pictures babtit Hyd Malegoan sarakhech famous aahe 🙂 me aani mazi ek maitrin A-Z cinme baghay cho agdi flop pan hehehe

 7. कॉलेजचे दिवस आठवले. . .लेक्चर ऐवजी कॅन्टीन ला बसून आमच पण हेच चालायच. . .सनी देओल चा तो डायलॉग तारीख पे तारीख. . .आम्ही मारला होता सबमिशन घेतल नाही म्हणून अन् नेमक त्याच सरांनी ऐकल मग व्हायच तेच झाल. . बदला 🙂 . . . .तो पण फिल्मी स्टाइल मध्येच. . असो पोस्ट एकदम मस्त झाली आहे!!!

 8. पोस्ट एकदम भारी…तुझी फ़िल्लमबाजी बघुन आमचे पण कोलेज चे दिवस आठवले.रोक्सी,रीगल आणि इतर अनेक थिएटर्स पार जाउनजाउन चिरडवुन टाकलीत.खुप धमाल्ल्ल…त्यात ब्लक ची टिकीटे काढुन पिक्चर्स बघण्यात काही तरी निराळाच आनंद..नाही का??आम्ही जितेंद्रचा “नालायक”बघायला गेलेलो..बाहेर येउन त्यालाच भन्नाट शिव्यांची लाखोली वाहिली होती.
  आज ही शोले.चुपके चुपके,अंगुर सारखे चित्रपट मस्त वाटतात..बाकी तुमची आमची जोडी जमलीच समजायचे..”U TOO ” !!!!!!!!!!!!mau

  • माउ तुझ्याबरोबर जोडी जमणे म्हणजे हम भी थोडे कुछ है बाई…नाहितर तुझ्या अर्धे मुर्धेही कलागुण नाहीत गं बाई आमच्यात!!!

 9. ईद ची सुट्टी मजेत जातीय असे दिसते!!!! बाकी हि फिल्मी चक्कर आवडली पण मी अडाणी आहे ह्या प्रकारात….अपर्णा ची बहिण. काहीही आठवत नाही…काय करणार पण हरकत
  नाही. पोस्ट मुळे मजा आली

 10. तन्वी,

  फ़िल्मी दुनियेतील अडानी मी देखील!!!!!
  पण एक सांगू एखादा दुसरा हिंदी सोडला तर म्हणजे ’मधुमती’, ’ दो ऑंखे..’, ’मुगले आझम’ किंवा तत्सम फ़िल्म्स डायलॉग साठी प्रसिध्द असलेले सिनेमे बघीतलेले असून सुध्दा, मी खराखुराच अडाणी ! डायलॉग तर कध्धी आठवायचे नाहीत. बहुदा मी थियेटर मध्ये झोपा काढतो म्हणून मला सारे टाळायचेच ! तसा तर माझ्या मित्रमंडळीत पण त्याबाबत कुणाला उत्साह नसे. काही गाणी वगैरे म्हणत असू…पण तिथेही चाल फक्त ती पण शब्द आमचे…. मराठीत भाषांतरीत केलेले… असलेच उद्योग चालायचे….एकूण सिनेमांनी मला कधीच हवेत तरंगायला लावले नाही. मराठी आवडायचे पण फालतू लावणीवाले असले तर आम्ही थियेटरच्या बाहेर ! आम्हाला Interval ला दिलेले पासेस जमवायचा छंद्च लागला होता !! बाकी तुझा त्याचा अभ्यास मात्र अफलातून आहे.

  • काका माझे बाबा आहेत रसिक….लहानपणी गाणी ऐकली ती त्यांच्या तोंडून, डायलॉग्सचेही तसेच…..मी तर दहावीच्या शेवटच्या पेपरच्या आधिही सिनेमा पहायला गेले होते :D……..
   आता नवऱ्यालाही आहे आवड मग मुलांनाही!!!!!!!!!!!!!
   आई मात्र तुमच्याचसारखी ती उन्हाळयात उन्हातान्हात, पावसाळ्यात पावसापाण्याचं आणि हिवाळ्यात थंडीवाऱ्याचं कारण सांगून सिनेमाला यायचं टाळते!!!!!!!!!!!!

 11. हा हा हा.. हेरांबो खुश हुआ !!! शोले, अंदाज अपना अपना, हेराफेरी सगळे एकमेकांचे बाप dialogues च्या बाबतीत !!! अजून पण आहेत काही काही.. आवारा पागल दिवाना, मि. इंडिया, अब तक ५६ …. पण झक्कास… जाम मजा आली वाचून !!

 12. “शांत गदाधारी भीम शांत….” हा आमचा ऑफिस मधला पेटंट Dialogue आहे. कोणी पेटलेला दिसला कि झालीच अशी आतिषबाजी. अंदाज अपना अपना, शोले, मैने प्यार किया, मुन्नाभाई MBBS, हम आपके ही कौन(ह्यातलं ते “उ:हू उ:हू” तर जाम फेमस). झालंच तर आत्ताचा kaminney मधला “ऐफे ऐफे कैफे कैफे?” तर सॉलिड चालतो माझ्या घरी आणि टीम मध्ये सुद्धा.

  – अमृता

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s