!!पसायदान!!

हे आहे ईशानने म्हटलेले पसायदान….काल दिवसभर त्याच्या मित्राने आणि त्याने प्रचंड मस्ती केली आणि संध्याकाळी पडलेल्या पावसात मनसोक्त भिजले!!!!!! रात्री केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमात खरं तर तो अतिशय दमलेला होता पण त्याने निवडले पसायदान…..

हा त्याचाच व्हिडिओ…..

ज्ञानेश्वरांचे पसायदान :

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

45 thoughts on “!!पसायदान!!

 1. ईशान ,
  पसायदान खरोखरीच छान म्हटले आहेस. तुझे अभिनंदन ! उच्चार अगदि स्पष्ट आहेत. मला खूप आवडले. आता मस्ती करायला हरकत नाही !!

  • काका मुळातच मस्तीखोर आहे तो आता तुमची परवानगी म्हटल्यावर तर विचारायलाच नको!!!
   त्याला वाचायला सांगते तुमचे कमेंट………….

 2. सही आहे इशान…एकदम मस्त ….आरूषला घेऊनच पाहात होते..तोही पाहात होता हा दादा किती गोड गातो ते….आतापासुन शास्त्रीय शिकायला सुरुवात केली तर खूप पुढे जाईल बघ..त्याचे उच्चार पाहुन तर कळणार नाही हा भारताबाहेर राहतो….मस्तच….
  खूप खूप शुभेछा…

  • अगं मराठी अगदी म्हणी बिणी वापरून असते त्याचे….आणि उच्चार बरे करतोय.ते डिपार्ट्मेंट गौरीचे कमाल बोबडं बोलते गं…पण दादा म्हणतो त्यामुळे तिलाही पसायदान पाठ झालय!!!!
   आरुषला सांग ईशानदादाने त्यालाही बोलावलय सगळे मिळून मोठेही होउ दे आणि मस्तीही करू दे!!!!!

   • तन्वी,

    गौरीच्या बोबडे पणा साठी दोन गोष्टी सुचवतो.

    पहिली… ती बोबडी बोलत असली तरी आपण म्हणजे कोणीही तिच्याशी बोबडॆ बोलायचे नाही.

    दुसरी… तिच्या समोर स्पष्ट व थोडॆ लाऊडली रामरक्षा वा तत्सम श्लोक म्हणत राह्यचे. ईशानला शिकव तिच्या समोर.

 3. तन्वी सर्वप्रथम ईशानचे अभिनंदन! पसायदान हे त्यानेच निवडले म्हणून अजून एकवार अभिनंदन! गाणे सुराला व तालाला पक्के राहून अतिशय छान म्हटले आहे. मला आवडले.सुरवातीचे हसू मस्त. तयारीत होता अगदी.त्याच्या वयाच्या मानाने चांगलेच सुरात राहून म्हणतोय गं. काही ठिकाणी जरा शब्दांची गडबड असली तरी प्रत्येक चरण नीट समजून म्हटले आहे हे महत्त्वाचे आहे. जे खळांची ला उंचावलेला सुर मैत्र जीवांचे ला बरोबर खाली आला. सहीच. शिकवणी चालू ठेव गं. सोडू नका. घोटून घोटून घे त्याच्याकडून. निदान काही वर्षे शिकला ना तरीही पुढे तो स्वत:च प्रयत्न करेल. ( स्वानुभव 🙂 ) शेवटचा चरणही छानच.खूप आवडले.आता दादा आला की त्यालाही ऐकवते.पुन्हा एकदा ईशानला शाबासकी. अजून अशीच छान गाणी ऐकायला मिळणार ना?

  • ताई अगं किती दमला होता काल पण हटूनच बसला, त्यात सध्या हवा खूप गार आहे त्यामुळे सर्दीने गळा गडबड…किती ताण पडलाय बघ गाताना!!!!! ऐकायचे नाही ना पण!!!!
   आणि शोमूला सांग आम्ही ’तू ही मेरी शब है” हे शोमूदादाचे गाणे म्हणतो अगदी गौरीही त्यामुळे ते गाणे सुरू असल्यावर जे कोण टि.व्ही.वर असेल तो शोमूदादा असतो :D………..त्याला ऐकव मात्र नक्की…माझं पिल्लू खुश होइल आम्हाला मोठा दादा फार आवडतो!!!!!

 4. attach ishuche pasaydan eaikale.khup khup anand zala.sarkhe tech lavtoy.evadhyasha vayat kevadhi ganyachi samaj awaj kiti god.agadi sakharch.tyache gane suru theva.agadi ajobanvar gela ahe.(annanvar).tyachya chehryavarche satvik bhav te pasaydan eka vishishth unchivar gheun jatat.i m proud of being his grand pa.keep it up.

  • बाबा ईशू जे काही आहे ते तुमचे श्रेय आहे…..त्याच्यासाठी जगात तुमच्यापेक्षा जास्त काहीच नाहिये आणि मला माहितीये तुमच्यासाठीही!!!!! तो घडलाच आहे तुमच्या कुशीत आणि आईच्या मायेत …..उलट मीच म्हणेन की आम्हा सगळ्यांना या गोष्टीचा खुप आनंद आणि अभिमान आहे की आई आणि तुम्ही आमच्या सोबत आहात कायम!!!!

  • ताई आभार गं!!!! बाबांचा मोठेपणा आहे गं की ते श्रेय ईतरांना देतात…..खरं तर ईशानसाठी त्यांच्याईतका जीव कदाचित मी आणि अमितही टाकत नाही!!!!

  • हे बरय हं दोघांच…नातवाचं गाणं आहे तर दोघेही कमेंट लिहीताहेत…आता नाही अडचण येत तुम्हाला…माझ्या पोस्टवर मात्र कंजुसी काय!!!!!

   • तन्वी,

    अगं….दुधावरची साय असते ती … नात – नातू म्हणजे… इथे कंजुसी करून कसे चालेल !!

 5. Ishaan Sobat, tumchehi abhinandan…khar tar aaj jithe Marathi lokaana (Visheshat: pardeshaat raah naaryaa Maraathi Lokaanna) Marathi bolnyaachi laaj vaatate, tithe tumhi tyaachyaa var Shivaji Maharaj, Dynaneshwar Maharaj shik vun sanskaar karat aahaat, he paahun kharach khup khp aanand vaatlaa…………

  Punashch abhinandan tumhaa doghaanche…………….

 6. Nandu khup khup mast mhantale aahe, agadi talasurat.
  Khup khup anand vatala.
  Nandu khup khup motha ho.
  Aaj itaka anand vatato tyala itaka motha zalela pahun. Khup khup aashirvad, dibrya.
  Tula aathvate chalata chalta to DugDugayacha tevha Baba aani Aamhi tyala gane mhanayacho
  ITUK IVALI BHINGAR BHAVALI SARSAR SAWALI, BHARBHAR DHAVALI DHPKAN PADALI….
  kiti motha zala nandya tu.
  Zakas mhantale aahe. Motha Ho beta.

 7. सुर-ताल पकडुन, आवाजतला चढ उतार राखुन मस्त म्हटल आहे. याने मुळ पसायदानाचा चांगला अभ्यास केलेला दिसतोय.

  कीप इट उप… !

  -अजय

 8. आवाज आणि उच्चार स्पष्ट आहेत. खुप छान म्हंटलंय. अतिशय अर्थपुर्ण आहे हे. यावरचं शेवाळकरांनी केलेलं अर्थाचं विवेचन फारच सुंदर आहे. जर मिळालं कुठे तर जरुर ऐका आणि इशानला ऐकवा..
  आणि इशान चं खरंच कौतुक वाटतं, इतक्या स्पष्ट लिहिल्याबद्दल. गेले दोन तिन दिवस ट्रेनिंग मधेकामात बिझी होतो, त्यामुळे हे पोस्ट राहुन गेलं पहायचं.

 9. गार्गी किती मोठी झालीस गं!!! तुझे कमेंट्स पाहिले की ती लहानशी गारीच आठवत रहाते सारखी…..

 10. इशानने खूप छान म्हटलंय पसायदान. सुरू करण्याआधीचं हसूदेखील कसं गोड आहे. तो गाणं शिकतो का? त्याने आवाजातील चढ उतार व्यवस्थित सांभाळलेत. अभिनंदन!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s