रात्र वैऱ्याची आहे……………..

रात्रीचे साधारण पावणे अकरा वगैरे………………..नवरा नेहेमीप्रमाणे, ’ मला दिवसभर पीसी ला डॊळे लावून बसावे लागल्यामुळे माझे डोळे शिणले गं!!!!!!!!!!!!!!!!!!!’ चा नारा पुकारून कधीच गुडूप झोपलेला…………….मी मात्र दोन्ही मुलं कधी झोपतील याची वाट पहात त्यांना दटावत पडलेली……………..याच सीनच रोज रिपीट टेलिकास्ट होतय हल्ली आमच्याकडे……………..

मग मुलाला आणि लेकीला ,”हळू बोला रे बाबा उठेल”………….. ही तंबी देत देत त्यांच्या अनेक शंका कुशंकांना (यात लघू आणि दीर्घशंका देखील) मी तोंड देत असते…………….अश्या वेळची माझी हतबलता लक्षात घेता मुलाने चाणाक्षपणे ओळखलेले असते की ही बाई काही रागावत नाही आता………….मग त्याची जिज्ञासूवृती अगदी भरात येते!!!!!!!! आणि सुरु होते अखंड प्रश्नावली……………….

परवाचा सगळ्यात गहन प्रश्न होता, “जगात सगळ्यात पहिल्यांदा Good morning, good night , good afternoon, good evening…असे कोण म्हणाले?” आता हे कोणाला तरी माहितीये का?……मी सांगितले की चांगली लोक असे एकमेकांना म्हणतात. मग उपप्रश्न आला की जसे good morning म्हणजे सुप्रभात,good night म्हणजे शुभरात्री तसेच दुपारला म्हणायचे किंवा संध्याकाळला तर शुभदुपार की सुदुपार वा सुसंध्याकाळ का शुभसंध्याकाळ…..मुळात Good’ हा एकच वर्ड आहे ना मग हा ’सु’ आणि ’शुभ’ चा घोळ कशाला?ते पण फिक्स नाही..कधी म्हणायचे ते!!! काय म्हणुन उत्तर देणार…..उगाच रागावले काहितरी आणि झोपवला दामटून………………..

असाच येतो मग गोष्टीचा तास………बरं या गोष्टींच्या सुरूवातीला श्रावण बाळ अगदी पेटंट…….ही गोष्ट ऐकल्याशिवाय माझा श्रावण बाळ पुढे सरकत नाही…….श्रावणबाळ, दशरथ, शाप, वनवास वगैरे स्पष्टीकरण सुरु असते………….’कावड’ या शब्दाने तर मला ईतके पिडलेय की विचारता सोय नाही…..श्रावणाला उद्योग नव्हता…..आजवर अनेकदा मी त्या कावडीचे चित्र काढलेय…..शेवटी एकदाचा राजा दशरथ श्रावणाला बाण मारतो…तो त्याच्या हार्ट्ला लागतो and then he died……………अशी ती गोष्ट सोप्पी वाटत असताना लेक सांगते, “मम्मा बिचारा श्रावण आपण त्याला vaselline द्यायचे का?”

मग आम्ही हळुहळू लाकुडतोड्या, हिरण्यकश्यपु वगैरे फिरत असताना……मधेच लेक म्हणतो, ” OK आता आजची न्यू स्टोरी सांग…………………..” मग एक न्यु स्टोरी कशीबशी त्याच्या कानात ओतली की तो खुश आणि मीही या विचाराने की हुश्श!!!! सुटले एकदाची!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! पण नाही ना मुळात रात्रच वैऱ्याची आहे नं मग………कुठल्याही बाबतीत आपण दादापेक्षा कमी नाही हे पटवण्याच्या अट्टहासाला पेटलेली माझी लेक दवंडी देते ,” मम्मा आता मला ’डॉगची’ गोष्ट सांग!!!!!!!!!!!!!!!!!!!”

हे सुरू होते मग तन्वीउवाच डॉगपुराण……. बरं हे सगळं होत असताना ’बाबा’ नामक आमच्या खऱ्या गोष्टीतला प्राणी घोरायला लागतो……मग आमची कुजबुजही खालच्या पट्टीत जाते…………….या माणसाला स्वत:च्या घोरण्याच्या आवाजाखेरीज टाचणी जरी पडली तरी झोप disturb होते………………….

पेंगुळल्या डोळ्यांनी आणि कदाचित या गोष्टीनंतर हे दोघं झोपतील या आशेने मी सुरु करते ती कथा!!!!!!!!!!!!!!!! एक किनई डॉग असतो…………………….पण श्रावणापासून ते या डॉगपर्यंतच्या हातघाईत माझे पानिपत झालेले असते आणि मला जाम आठवत नसते की हा डॉग पुढे काय करतो…………..

पण हरायचे नाही या ईरेला मीदेखील पेटते आणि कथा पुढे रेटते, “एक किनई डॉग असतो…………………….तो एका घराच्या बाहेर रहात असतो…..त्या घरात ना एक कॅट रहात असते………………एकदा काय होते मोठ्ठा पाउस येतो मग डॉगला थंडी वाजते तो जातो घराकडे……आणि दार वाजवतो…..टक टक टक….दार उघड बाई दार उघड कॅट कॅट दार उघड………………मग ती कॅट म्हणते थांब मी माझ्या बाळाला आंघोळ घालते…………”……..मग त्या बाळाची आंघोळ, तीटं बीटं, पावडर बिवडर यच्चयावत मेक अप होईपर्यंत चिरंजीव कसाबसा धीर धरतात आणि अचानक बोलतात ,”Mummaa u r cheating her……ही चिमणीची गोष्ट आहे………………”!!!!!!!

पारा चढतो माझा…….हुशार लेकीने ओळखलेले असते आपली माय आता रुद्रावतार धारण करतीये ……ती पण ब्रम्हास्त्र काढते ,” मम्मा टॉयलेटमधे शू करायचीये!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!” लेकाला दटावून आम्ही मोर्चा वळवतो……तिथे पोहोचल्यावर तिला साक्षात्कार होतो की आपल्याला शीपण करायचीये……………..मग माझ्या, “झाली का गं????” या प्रश्नाला तिच्या ,” होतेय!!!!” या उत्तराच्या ७/८ फैऱ्या झडतात……….आणि आमचा ताफा परत युद्धभुमीवर येतो!!!!!!!!!!!!!!!!!

ईकडे लेक किलकिले डोळे करून झोपेचे सोंग उत्तम वठवत असतो…….बाबाची अर्धी झोप झालेली असते……………माझ्या मनात विचार येतो याच्या ’पिछले जन्म के राज’ उलगडत गेले तर पुर्वजन्मांची ती साखळी ’कुंभकर्णा’ वर जाउन थांबेल……………..पण मी हे उघड बोलत नाही …न जाणो कुंभकर्ण उठायचा आणि रूप बदलून शंकर व्ह्यायचा आणि तांडव सुरू!!!!! नाहीतर लेक विचारायचा, “Mumma who is Kumbhakarn???????”

माझं ना एक स्वप्न आहे की दिवसभर उनाडणाऱ्या माझ्या मुलांनी स्वत:हुन अगदी आठ वाजता नाही पण दहा वाजता तरी स्वत:हुन झोपावे किंवा मला तरी मुलं झोपली नाहीत तरीही स्वत:ला झोप लागावी……………………………….

या दोहोंपैकी एक होत नाही तोवर ’रात्र वैऱ्याचीच आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!”

जागते रहो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!निगाह रख्खो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Advertisements

37 thoughts on “रात्र वैऱ्याची आहे……………..

 1. hahaha. खूप मस्त झाली आहे post. लहान मुलांना झोपवण हे खरच एक दिव्य असत. फक्त झोपवणच नाही, त्यांना सांभाळण, त्यांच्याशी खेळण हे एकंदरीत तारेवरची कसरतच. आणि हे सगळ नेहमीच आईला कराव लागत. कुठे बाहेर फिरायला, मॉलमध्ये, reception ला, लग्नाला आणि main म्हणजे पाहुण्यांकडे गेलो कि मग तर विचारू नका.
  बाबा लोक आरामात सुटतात यातून. काही अपवाद असतात यालाहि. माझी दीड वर्षाची भाची दादा समोर असला कि वहिनीकडे पाहत पण नाही.

  “मम्मा बिचारा श्रावण आपण त्याला vaselline द्यायचे का?” हे असलं काही कसं सुचत ह्या चिमुकल्यांना कोण जाणे.

  -अमृता

  • तुझी वहिनी नशिबवान गं!!!!! आमच्याकडे तर मॉलमधे बाबाकडे असतात मुलं पण ते केवळ बाबा हवे ते चॉकलेट्स घेउन देतो म्हणून ….
   आभार..:)

  • आशूताई बऱ्या आटोपल्यात लवकर कमेंटमधे……मी येतेय जुनमधे याचं भान ठेव लिहीताना……
   आणि आठवत का ईगतपुरीला तुम्ही सगळी प्रजा हॉलमधे जागत असायची तेव्हा बापूआजोबा फक्त मला झोपू द्यायचे त्यांच्याजवळ कारण मी लवकर झोपायचे आणि वळवळ नाही करायचे तुमच्यासारखी……………..खणु का ईतिहास!!!!!!:D

 2. तन्वी,
  अतिशय गोssड लेख लिहीलायस !
  मुलांना झोपतांना गोष्टी सांगण्याचा अनुभव मला पण आहे…आणि तुझ्या खुसखुशीत लेखाने वाचतांना मला सुखद गुदगुल्या होत होत्या !…

  कधी कधी लहानमुलांच्या विचारशक्तीची पण कमाल असते….आपणही तेथे पोहोचू शकत नाही.

  ” माझं ना एक स्वप्न आहे की दिवसभर उनाडणाऱ्या माझ्या मुलांनी स्वत:हुन अगदी आठ वाजता नाही पण दहा वाजता तरी स्वत:हुन झोपावे किंवा मला तरी मुलं झोपली नाहीत तरीही स्वत:ला झोप लागावी…………” ह्या तुझ्या स्वप्नाची तामिली इतक्या लवकर होईल ? ….भलत्या आशेवर राहू नकोस.

  आत्ता कळलं बाईसाहेब चाट मधून कुठे गायब होतात किंवा चाटवर फारवेळ का नसतात ते !…..

  • काका खरचं कमाल विचार शक्ती असते या मुलांची…..गौराईला परवा सारख्या जांभाया येत होत्या….मी म्हटलं, “काय ए गं तुझं सारखं जांभाया देणं लावलयेस!!!!” तर म्हणे ,”अरे मम्मा मी काहिच नाही करत…माझं तोंड आपोआपली उघडत आणि आपोआपली बंद होतय!!!!!” जरा विचार केल्यावर कळलं बाईंनी

   आपोआप+automatically=आपोआपली

   हा शब्द बनवलाय…..आणि तिचे म्हणणे ही बरोबरच होते जांभई मुळे तोंड आपोआप उघडत आणि बंद होत होते तिचे ती मुद्दामहून काहीच करत नव्हती!!!!!!!!!

   • तन्वी,
    आत्ताच्या गौराईच्या नव्या शब्द बनवण्यावरून सहजच (तुझ्या ब्लॉगचे हे नाव किती मस्त आहे !) आठवण झाली, माझी धाकटी सुचेता असेल तेव्हा दिड एक वर्षांची,… ताटलीत गरम भात वाढला होता…. बाईसाहेबांनी त्याला हात लावला….. झाले चटका बसल्यावर लागली ओरडायला,.. ” आई भात चावला SS “

 3. तन्वी,
  जी मुल लहानपणी आपल्या आई-बाबाना त्रास देतात त्यांची मुल त्यांना मोठेपणी तसाच त्रास देतात. काय म्हणण आहे आपल ह्यावर?

  अनिकेत वैद्य.

  • या लेखाबाबत म्हणतं असशील तर हे म्हणणे चुकीचे आहे रे बाबा…..मी बरेचदा रात्री न जेवताच झोपून जायचे…अगदी ईंजिनीयरींगच्या पहिल्या वर्षीही मी पावणे दहालाच मच्छरदाणीत गुडूप व्हायचे त्यामुळे मैत्रीणी चिडवायच्या मला…….:)

   बाकी बडबड आणि शंका म्हणशील तर आहे रे बाबा माझी कार्टी थेट माझ्यावरच गेलीत……………….

  • अरे कोणिही माझी स्वप्न खरी होतील असे म्हणत नाहीये……तरिही तुझ्या शुभेच्छांबद्दल आभार….

  • गौरी तुझा टॅग जसाच्या तसा माझ्या नावाने खपवला तरी चालेल…येव्हढी मॅच होताहेत उत्तरे…..

 4. तन्वी एकदम मस्त झाली आहे पोस्ट. अग पोरांना झोपवणं म्हणजे आईच्या सहनशक्तीची कमाल आणि प्रेमाचा अंतच म्हणायला हवा. सगळ्या मुलांचा जशीजशी रात्र चढेल तसतसा गप्पाचा मूड वाढतच कसा जातो कोण जाणे.मग या सगळ्या शंका…शूशू-शीशी…त्यांनाही अगदी उत येतो. बरेचदा तर माझा कारटा गादीवर पडून कंटाळा व आईचे झोप रे सोन्या ऐकण्यापेक्षा शीईईई असे जाहीर करून मस्त अर्धा तास टॊयलेट झिंदाबाद करत राहायचा. असे वाटायचे चांगले धरून धोपटावे. पण मग ते पुढचे दोन तासाचे गळा काढणे ….नको रे बाबा त्यापेक्षा ही रखवाली परवडली. हेहे.. गौराचे आपोआपली एकदम ब्येष्ट्य गं. मस्त शब्द केलाय तिने तयार.
  तन्वी बायो तुझी स्वप्न होतील हां पुरी….जरा कळ काढ. मग पोरं त्यांच्या त्यांच्या तालात आणि तू यारे, तुमचा श्रावण नाहीतर डॊगी वाट पाहतोय ना….म्हणत असशील. अग खरेच सांगतेय….अशी वेळ येणार आहे लवकरच.

  • ताई तशी वेळ यावी असे कितीही म्हटले तरी मनातून मात्र ती येउ नाही कधीच असेही वाटतेय गं!!! खरय तुझं हे चिमणे उडाले की आपण आपले ,”या चिमण्यांनो…” म्हणत रहायचे………………:))

 5. रोज सकाळ दोघींची पणशाळा असायची, मग हळू जा , आवाज करु नकोस..बाबा झोपलाय वगैरे ्सगळे डायलॉग डोळॆ बंद करुन ऐकायचो. एकदम सेम टु सेम… अस्संच व्हायचं..आमच्या घरी पण..

 6. “jaagte raho??” — aahe, aahe, aamhi paN jaagech aahot ikaDe. amachi majal ajun goshti sanganya aikanya paryant nahi geli, tyapeksha khaDatar tapp chalu ahe. lekila 12:30 la zopalyavar 2, 4, 6, 8 vajata jaag yete, aaNi mag aai/baba chya kaDevar basun sagaLa ghar punha ekada nirakhun baghayacha asata.

 7. ag agdi dukhri nas pakadlis g! aamchyakde fakt wakya wakyala gaani badlat astaat. ek ol gaayli n gaayli ki dusrya ganyachi farmaish yete…ha prakar shwati majha aawaj tipela laagla ki thambto. baki baba=zop he same to same. Mi khupda majhya nawryaala kantalun mhante ki pudhchya janmat roles reverse jhale pahijet…:)
  Baki post ekdam khuskhushit!

 8. तन्वी लवकरच आई परत गेली की मी पण तुला सामील होणार आहे..तसंही माझं एक गोष्टपुराण तू वाचलं आहेसच म्हणा…अग पण तुझ्या गोष्टी तू फ़ार शॉर्टकट मध्ये सांगतेस गं..माझी भाची लहान असताना म्हातारीच्या गोष्टीतली म्हातारी जंगल सुरू व्हायच्या आधीच वीसेक मिन्टं लागायची तिला रस्त्यावर आणायला, मग कसंबसं अर्धा पाऊण तासाने तिला लेकीच्या घरी आणि मग निवांतपणे ती भोपळ्यात बसली की हव्वा तेवढा वेळ भोपळ्यात मज्जा करेस्तोवर ही हमखास पेंगायची…तू ’उन्हाळ्याची सुट्टी’ वर मुद्द्यावर यायची पोस्ट वाचलीस ना अगदी ते टेक्निक वापर….निदान रात्र सरेल..पण तुझी दोन्ही लेकरं इतकी गुणाची आहेत की ती त्यांच्या सगळ्या शंका (कु, लघु, दिर्घ इ.इ.) नंतर सक्काळी विचारतील तेव्हा त्यासाठी तयार राहा…..
  आणि हो पोस्ट लय भारी…मला काही दिवसांसाठी आरुषला तन्वीबरोबर खेळायला पाठवायचं…दोन दोन ध्यानं पाहायचीत कशा गमती करतील ते….

  • अगं बाइ माझी कार्टी नाहीत गं येव्हढी सोप्पी……लामण लावली तर ते तर एंजॉय करतात आपला जीव जातो!!!!
   तुला आरुषला नक्की कोणाबरोबर खेळायला पाठवायचे आहे….अर्थात ते ’तन्वी’ नाव चुकुन लिहीले असशील गौराऐवजी तरी दोन ध्यानं हेच विशेषणं योग्य आहे!!!!!!!!:D

 9. अगदी खरे आहे तू लिहिले आहेस ते.. मी त्या phase मधून गेलेली आहे.. आता माझा मुलगा मोठा झाला आणि त्याची सकाळची शाळा असल्यामुळे रात्री तो लगेच झोपतो.. त्यामुळे मुलांना झोपवणे या प्रकारातून मी सुटले असे म्हणायला काही हरकत नाही ..) असो.. लेख खूपच छान झाला आहे.. एकदम मस्त… वाचून जुन्या आठवणीना जरा उजाळा मिळाला आणि खूप छान वाटले..

  -शिल्पा

 10. हा हा हा. एकदम मस्त.. आणि “शंका कुशंकांना (यात लघू आणि दीर्घशंका देखील)” हे तर लई बेश्त..
  सध्या आमच्या पण वैऱ्याच्याच रात्री चालू आहेत म्हणा !! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s