टॅगा टॅगी…………….

गौरी तू कालच टॅगलेस……पण म्हटले येउ देत सगळ्यांचे…….

(खरे कारण हे की एकाच दिवशी दोन पोस्ट लिहिल्या तर माझा ब्लॉग पण चक्कर येउन पडेल गं!!!!! त्याला त्याच्या आळशी मालकीणीची सवय आहे!!!!!!)

****************************************************************

1.Where is your cell phone?

 लेकाला विचारावे लागेल…….

2.Your hair?

तेल लावून चंपी केलीये…..शँपूची वाट पहाताहेत…..

3.Your mother?

विश्वाची चिंता वहातेय….

4.Your father?

रसिक माणुस… (दोन्ही महत्वाचे आहे…रसिकही आणि माणुसही)

5.Your favorite food?

गरम गरम बाजरीची भाकरी आणि खानदेशी भरीत आणि ठेचा……..

6.Your dream last night?

माझी स्वप्न सांगितली तर लोक हा ब्लॉग वाचणं बंद करतील….. (कालच्या स्वप्नात आम्ही एका उंच घरात रहायला गेलो…जिथून खाली उतरायला जिनाच नव्हता त्याऐवजी दोन बोगदे होते….टायरच्या ट्यूबसारखे दिसणारे….बरं मला ’सपने मे एक छोटी सपनी’ पहायची सवय आहे……मी झोपेतच स्वप्न बदलू शकते आणि त्यात काल दिवसा पाहिलेले दोन CID चे भाग लक्षात घेता नक्की कोणाचा तरी खुन केला असेल…….कोण बरे डोक्यात गेलेय गेल्या काही दिवसात???????)

7.Your favorite drink?

 ताक (ताजंच, आणि सायीचंच) हे भारतात, मस्कतला अल-मराईचं……

8.Your dream/goal?

हम बताने में नही करने में यकीन रखते है जानी!!!!!!!

 9.What room are you in?

बेडरूम…..

 10.Your hobby?

सतत बदलत असते पण तरिही बडबड करणे……………..

11.Your fear?

माझा घसा बसलाय आणि मला बोलता येत नाहीये!!!!!!!!!!!!!!!!!

 12.Where do you want to be in 6 years?

 माझ्या नवऱ्याबरोबर आणि मुलांबरोबरच………………..

13.Where were you last night?

अरे माझी कालची पोस्ट वाचली नाहिये का? इथेच होते घरात राखण करत!!!!!

14.Something that you aren’t?

मी मुर्खांबाबत उदार मतवादी नाहिये…..

15.Muffins?

 Not my cup……..

 16.Wish list item?

एक असेल तर सांगू.. (आणि तसाही ते इथे सांगून काय उपयोग…..त्यापेक्षा सरळ नवऱ्याला आणि बाबांना गाठते, कसे!!!!!!!!!!!!!)

 17.Where did you grow up?

मनमाड, नासिक

18.Last thing you did?

मुलांना जेवायला घातले……………

19.What are you wearing?

राखाडी आणि गुलाबी…….(थोडक्यात जे मिळेल ते….अपर्णा ममं!!!!!!)

20.Your TV?

साडे माडे तीन नावाचा प्रकार मुलांना दाखवतोय!!!!!

 21.Your pets?

 नाहीत 😦

 22.Friends?

मोजकेच पण जीवाभावाचे…………….

23.Your life?

जगी सर्वसुखी अशी मी आहे म्हणायला लावणारे……..

 24.Your mood?

 आत्ता मस्त आहे पाच मिनिटानंतरचे माहित नाही……

25.Missing someone?

 हो…..आई-बाबा

26.Vehicle?

 Hyundai Accent

27.Something you’re not wearing?

attitude…….मराठीत माज…..

28.Your favorite store?

१.जिथे रंगांची मुक्त उधळण असेल आणि प्रत्येक वस्तुला हात लावुन पहाण्याची मुभा असेल…….

 २. किंवा मंडई (हसू नका. पण ताज्या भाज्या इतक्या सुंदर लावलेल्या बघणं हे सुद्धा एक सुख असतं. इतका ‘लेटेश्ट’ माल तुम्ही दुसऱ्या कुठल्या दुकानात बघितला आहे कधी? आणि इथे कितीही खरेदी केली, तरी कुणी तुम्हाला विनाकारण खर्चाबद्दल काही म्हणू शकत नाही. आईकडे मी भाज्या घेऊन आल्यावर त्या टेबलभर पसरून नव्या साड्यांकडे बघावं तसं त्यांच्याकडे डोळे भरून बघत बसायचे. :)) (गौरी सेम टू सेम)

29. Your favorite color?

 आकाशी, पांढरा, सगळ्या पेस्टल शेड्स…..

 30.When was the last time you laughed?

आज सकाळी…… (कधी नाही ते अलार्म लावून ७ वाजता उठले आणि नवरा म्हणाला तू उठत नको जावूस मग ऑफिसला जावेसे वाटत नाही…………….)

 31.Last time you cried?

कर्क रास आहे माझी……अगदी सन आणि मुन साईन बिईनही तीच……पाट वाहातात डोळ्यात…कशाला हवेत नसते डिटेल्स….आत्ता रडून दाखवू शकते….वेळ पडली तर तितकेच रडायलाही लावू शकते!!!!

(Be aware of खेकडाज….)

 32.Your best friend?

मी स्वत: आणि माझा नवरा……

33.One place that you go to over and over?

सोनाराचे दुकान….. (नवे डिजाईन्स पहायला)

 34.One person who emails me regularly?

कोणबी नाय बा!!!!!

35.Favorite place to eat?

कामत आणि मुमताज महल……

(भारतात सगळे वडापाववाले…तेलकट बिलकट पण चालतात….)

 ****************************************************************

कोणी उरलय का ज्याला आत्तापर्यंत कोणीच टॅगले नाहीये……मग मी त्याला टॅगते…………………..

44 thoughts on “टॅगा टॅगी…………….

  • ओ बाय असे नगा करा नाहितर आम्हाला ,”अश्विनी ये ना!!!!!!!!!!!!!!!!!” म्हणावे लागेल….अवो आपली उपस्थिती प्रार्थनीय हायं वो!!!!!!!!!!!!
   ए नाटक कंपनी मुकाट कमेंट्स टाकत जा….समजल!!!!

 1. सॉलीड आहे गं. मला आत्ता ट्विटरवर मंदारने सांगितलं. इतके दिवस टॅगींग म्हणजे मला वाटायचं की आपलं स्पेशल वाक्य बिक्य असतं की काय. हे मस्त आहे, आवडलं मला. अगं पण आपल्याला कुणी टॅगलंय, हे आपल्याला कळणार कसं?

  • कांचन अगं मी घाईत पोस्ट टाकली त्यामूळॆ होलसेलमधे राहिलेल्या सगळ्यांना टॅगलय बघ….पटकन लिही बघू आणि वाचू दे आम्हाला….वाट पहातेय!!!!!:)

 2. माझा घसा बसलाय आणि मला बोलता येत नाहीये!!!!!!!!!!!!!!!!!

  haa point bhari aavadalaa.. evadhi bolki aahes kaa tu , tasa asel tar navra tujhaa ekdam shant asnarr painjevar sangato 🙂

  • अजय मला लहानपणीची कहरी शिक्षा व्हायची ती एका कोपऱ्यात १० मि. गप्प बसण्याची….मी साडे तीनाव्या मिनिटाला परत यायचे……रोजचे ४/५ किलो दळणं दळते मी तोंडात साधारण..:)
   नवरा शांत नाहीये माझा…..मी काही खात असेल तर बोलता येते त्यालाही!!!!!:D

 3. कर्क रास 😀 😀 😀
  सपने मे सपना पण LOL
  मनमाड, इगतपुरी अशी खास रेल्वेपुरतंच अस्तित्व असणारी गावं तुझ्या लिहिण्यात बघितली … रेल्वे कॉलनीमध्ये तर राहिलेली नाहीस ना?

  • अगं आम्ही नाही पण आजीचे घर होते रेल्वे कॉलनीत ईगतपुरीला…..आणि मी तिच्याकडे पडिक असायचे!!! बाकि मनमाड जंक्शन होते याचा अभिमान कितीतरी दिवस मिरवला गं मी!!!!!!!!!!!!!
   तू दीपनगरची का? कारण बरोबर रेल्वे कॉलनीत कडे लक्ष गेले तुझे……………

   • दीपनगरची नाही – भुसावळला रेल्वे कॉलनीत रहायचो आम्ही. माझ्या जन्मापूर्वी इगतपुरीला होते आई बाबा बरेच वर्षं … आणि तेंव्हा इगतपुरीमध्ये रेल्वे खेरीज काहीच नव्हतं त्यामुळे माझा हा अंदाज 🙂

 4. मस्त…तुझ्या बाकी पोस्टसारखंच खुसखुशीत झालंय…आणि ब्लॉगला चक्कर यायची कल्पना भन्नाट (च्यामारी या रियलिटी शोजच्या जजेसच्या………..) आहे……..आणि बरीच माहिती मिळाली तुझ्याबद्द्ल..आता मध्ये मध्ये त्याचा स(?)दुपयोग करेन….खेकडे….आम्हाला आवडतात अर्थात खायला…ही ही…

 5. तुझी टॅगा टॅगी होईपर्यंत तरी कुणीच मला टॅगलं नव्हतं. पण शेवटी माझासुद्धा नंबर लागला. अगं तुला एक गम्मत सांगायचीय, तुझ्या कर्क सारखी माझी पण मिथून – सन साईन, मून साईन दोन्ही एकच. सगळं कसं हुकमी!

 6. खूप मजा आली ही टॅगा-टॅगीच्या पोस्ट्स लिहिताना आणि वाचताना. अशीच अधून मधून काही तरी टूम निघावी म्हणजे सगळे मराठी ब्लॉगर्स नियमितपणे संपर्कात राहतील. ही पोस्ट पण एकदम मनापासून आल्यासारख वाटली.

  • पंकज काहि जणांच्या कमेंट्सची मी नेहेमी वाट पहात होते यात एक तुझा नंबर आहे….दुसरा होता रोहन!! तेव्हा स्पेशल आभार…
   आणि खरे आहे तुझे सगळे मराठी ब्लॉगर्स नियमितपणे संपर्कात राहिलेच पाहिजेत….काढा टूम आमची साथ आहेच!!!!

  • येत होतास…अरे पण मग तुझ्या फारश्या प्रतिक्रिया मला का बरं नाही मिळतं…असे करू नकोस तर, लिहीत जा नेहेमी!!!!

 7. आजपासून नियमितपणे प्रतिक्रिया लिहीन. कारण आजच अजयच्या ’बेदुंध चार गोष्टी’ मध्ये वाचले “एखाद्या ब्लॉगवर जाऊन जेव्हा तिथले लिखान फुकट वाचता तेव्हा फक्त ‘छान लिहीलयंस’ अशी एक प्रतिक्रिया द्यायला काय हरकत आहे?”

 8. kalach vachayal suruvaat keli, ani aaj sagale mhanje agadi sagale post vachun sampale suddhaa, baghitala majha adhashipanaa, ataa mission “bhungaaa”(hya blog varache post pan vachun kadahto sagale)… ani tumacha blog dekhil vachat rahin nehami…

  Chala gav vale bhetu punhaa.

  tumachy pudhacya post chi vat pahoty.
  ek Rohekar ha ha ha

 9. गेल्या काही दिवसात मला अगदी काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखं झालं होतं. कारण छोट्या अंबानिंचं भुक्कड नेट माझ्या नवरयानं मला “गिफ़्ट” 😦 म्हणून दिल्यानं ते मी दोन वर्षं सहन करतेय. ते कधी कोमात जाईल सांगता येत नाही. तसं ते गेले महिनाभर कोमात आहे. सगळ्या खोल्यातून त्याला फ़िरवलं पण बिचारयाच्या कनेक्टिव्हिटिच्या लाईनी दिसल्या नाहीत आज येरवाळी दोन लाईनी दिसल्यावर पहिल्यांदा ब्लॊग उघडला तर मला टॅगलेलं दिसलं म्हटलं ही काय नवी भानगड? नंतर पाहिलं तर सगळीकडे हा साथिचा रोग दिसला. तर आता प्रश्न हा आहे की हे सगळे प्रश्न आपण कॉपी पेस्ट करून त्याची उत्तरं बित्तरं लिहायची की काय? तन्वी ताई शरण आले तुला….:) काय भानगड आहे त्याचा उजेड पाड बाई.

  महत्वाचं सांगायचं राहिलं. प्रश्नांची उत्तरं झकास आहेत.

  असं म्हणतात की दर सहा माणसांनंतर एकाचा चेहरा दुसरयाशी मेळ खातो आपण या सहात नक्की आहोत. चेहरयाचं माहित नाही पण मेंदूचं स्कॅनिंग केलं तर तो सेम टू सेम वळकट्यांचा दिसेल. 🙂

  • हो तसेच आहे ते…ते सगळे प्रश्न कॉपी कर आणि तुझी उत्तरे दे….एका शब्दात ही अट आहे पण मला काहि झेपले नाहित ते एका शब्दात वगैरे……
   इथे मेलं तोंड उघडल की धबधबा आणि डोके उघडले की विचार बाहेर पडतात…तेव्हा ये एक शब्द हमारा कप नही है…हम एक वाक्य मे ज्यादा से ज्यादा अपनेको आवर सकते है…
   लिही पटकन आणि दे वाचायला….

   मेल टाकलेय बघ तुला…
   मेंदुच्या वळकट्या हीहीही…..:)

 10. हाय. सहज मी खुप दिवसांपासुन तुला लिहीन म्हणतेय.तु खुप मस्त लिहीतेस.भानस आणी तु मी फॅन आहे तुमची.बरेचदा तुमचे लिखाण वाचण्यासाठीच येते मी नेटवर.

  • भाग्यश्री आभार गं!!!! अश्या काही प्रतिक्रीया आल्या की अंगावर मुठभर मास चढते बघ…..माझा वाढता घेर पहाता ब्लॉगिंग कमी कर हे याच कारणाने नवरा म्हणत असावा…:)

  • हं…खरे किती आणि खोटे किती????? प्रश्न खराय गड्या पण त्या टॅगच्या नियमावलीत खरीखुरी उत्तरे द्या अशी काही अट नव्हती त्यामूळे तुर्तास हा मुद्दा गौण आहे……

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s