’पास’ आजोबा…….

हॉटेलवाल्यांना करोडपती करून (म्हणजे निदान एका ठराविक रकमेचं दर आठवड्याला खाऊन) काल आम्ही निघालो. वीकएंडचा मूड होता सगळ्य़ांचा……लॉंग ड्राईव्ह हा लेकाचा कायमचा हट्ट असतो….रस्ता जसा जात राहील तसे जात रहायचे. कुठेतरी निर्जन रस्ता असला तरी चंद्राच्या प्रकाशात खुर्च्या टाकून उजाड माळरानात गप्पा टाकत बसलेले ओमानी असतात सोबतीला……..कधी नव्हे ते टेपमधल्या गायकांनाही विश्रांती दिलेली होती. गप्पा ऐन रंगात आलेल्या……………बाबा असा निवांत भेटला की मुलंही खुश असतात.त्यांच्याकडे अश्यावेळी सांगायच्या अनेक गोष्टी असतात……..मग तेरी उपर मेरी करत दोघेही चढाओढीने सांगत होते…………….

फिरून फारून विषय पोहोचला नासिकवर…..आधि आम्ही अगदी अंतराळाच्या गप्पा मारत असलो तरी एक पाय नासिकमधे घट्ट रोवलेला असतो. मग नवरा नेहेमीप्रमाणे लेकाला चिडवायला म्हणाला ,” काय समजतं रे तुझ्या बाबूंना ? तुला उगाच कौतूक त्यांच!!!!!! ”

आता ’बाबू ’( माझे बाबा ) हा विषय लेकाला त्याच्या श्वासाईतकाच प्रिय. माझे बाबा माझेही कायम लाडके पण लेकाचा जीव सतत त्यांच्यातच गुंतलेला असतो. तो विचार करता मी नवऱ्याला म्हणाले, ” अब तो तू गया….. Now to u r gone…..ईशान धोपटतो तुला आता!!!!!!!!!!!! ” आणि मागून चिरंजीवांचा आवाज आला, ” No mumma he is not gone…. बोलू दे त्याला!!!! ” मी चकित झाले अगदी….थोडी रागावलेही कदाचित…….गंमतीतही मला बाबांबद्दल काही बोललेले पटले नव्हते…………नवऱ्याच्या हेतू विषयी अजिबात शंका नाही मनात तरिही लेकाने react व्हावं असं मला वाटत होतं बहूतेक…………..

अगदी गेल्या वर्षीपर्यंत बाबा असं काही बोलला की माझा लेक त्याच्यावर तुटून पडायचा……………..आणि आज हे काहितरी भलतचं!!!!!!आजोबा आणि नातवातला दुरावा हा केवळ भौगोलिक  अंतराचा न उरता माझं पिल्लू मनानेही दुर होतय की काय अशी शंकाही मनात आली!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! चुकतय नक्कीच काहितरी…………….शेवटी त्यालाच विचारलं, “का रे आता तुला चालतं वाटतं तुझ्या बाबूंना कोणी काहि बोललेलं?????? ” तसा तो शांतपणे म्हणाला, “मम्मा त्याला बोलू दे ना काय बोलायचे ते, आपल्याला माहितीये ना आपले बाबू कसे आहेत ते!!!!!!!!!!!!!!!!!!!! झालं तर!!!!!!”

माझं पिल्लू वय वर्ष सात………एका वाक्यात मला खुप काही शिकवून गेलं………..नवऱ्याने फक्त एक नजर टाकली माझ्याकडे……तो एक जिंकलेला बाबा होता तेव्हा. आणि मी आई म्हणून जिंकले असले तरी या विचारापर्यंत लेकाला प्रगल्भ कसा करावा हा विचार करू शकणारी माझ्या बाबांची मुलगी हे स्वत:चच अस्तित्व शोधत होते!!!!!!!

हेच तर शिकवले होते ना कायम बाबांनी आम्हाला…….तत्वज्ञान कधीही सांगितले नाही त्यांनी ते तसे जगून दाखवले होते……….कधीही सल्ले दिले नाहीत तर कायम उत्तरे स्वत: शोधायला शिकवले होते……..बसलेला हत्ती हा ईतर अनेक प्राण्यांपेक्षा उंच असतो हे ते सहज कोणाला तरी सांगत होते, कोणाला सांगितलं ते आता अजिबात आठवत नसले तरी सहज कानावर पडलेली अशी अनेक वाक्यं कायम मनात आहेत……मी हॉस्टेलला निघाल्यावर बाबा म्हणाले होते, “ताई पाण्यात पडलेल्या तेलाच्या थेंबासारखी रहा……………..पाण्यात विरघळलेला तरिही स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व, गुणधर्म जपणारा……………..”

असेच एकदा आई-बाबांना कोणितरी गैरसमजातून आलेल्या रागाने खुप काही बोलत होते…..बाबा शांत होते. मी मात्र वाक्यागणिक चिडचिड करत होते….शेवटी न रहावून मी बोलायला लागले…….माझ्या आयुष्यातला तो पहिला आणि शेवटचा उद्रेक असावा……..कारण माझा आवाज ऐकल्यावर चमकून बाबांनी माझ्याकडे पाहिले होते……ती नजर कायम लक्षात राहिलीये माझ्या, त्यात राग नव्हता चीड नव्हती…..पण माझी मुलगी अशी ताबा सोडून बोलली हे त्यांना सहन होत नव्हते. उघडपणे ते बोलले येव्हढचं की ताई मोठ्यांना बोलायचं नाही!!!!!!!! समोरची व्यक्ती शांत झाल्यावर त्यांच्याशी व्यवस्थित बोलून एकही अपशब्द न उच्चारता स्वत: त्यांना निरोप द्यायला गेलेले बाबा कायम आठवणीत तसेच आहेत……..एरवी विलक्षण स्वछंदी, मस्तमौला असणारे आमचे बाबा असेच कायम काहीतरी शिकवत राहीले……

पुढे कधीतरी Quotes ओळखीचे झाल्यावर वाचले , ’Speak when you are angry and you will make the best speech you will ever regret!!!!!!’  म्हटलं छटं तेरी तो…..मला हे आधिच माहीतीये……मेरे पास मेरे बाबा है!!!!!!

आणि आजची मी मुर्खासारखी लेकाने चिडावे तेही बाबाने चिडवल्यावर, काहितरी प्रतिक्रीया द्यावी अशी अपेक्षा करत होते!!!!! कोणीतरी आपल्या मनाचा असा ताबा घेउन आपल्याला ईच्छेविरूद्ध, स्वभावाविरूद्ध वागायला भाग पाडतो ती आपली हार असते ही साधी गोष्ट मी विसरले !!!!!! आज मी ’तन्वी देवडे’ हे नाव मिरवताना आधीचे कुलकर्णीपण विसरले की काय……..आडनाव बदलायच्या affidavit वर सही करताना स्वभावही बदलत होते मी!!!!!! गलत है ये!!!!! आज लेकाने मला पुन्हा जागे केले…………….

एकदा मी बाबांना म्हटले होते ,” बाबा मला जेव्हा कोणी काही बोलतं आणि समोरच्याची अपेक्षा असते की मी वाद घालावा तेव्हा मी शांतपणे झालेल्या आरोपांच analysis करते मनात…..खरे आहेत की खोटे ते जोखते !!!!! शक्यतो शांत रहाते!!!! आणि स्वत:चे मुद्दे नंतर शांतनेने मांडते……..”  बाबांनी टाळीसाठी हात पुढे केला, हसत ते म्हणाले ,”चहा ठेवू का? घेणार????? ”   आयूष्याच्या परिक्षेसाठीची आमची तयारी पुर्ण आहे असे वाटले की ते खुश असायचे………’सुख म्हणजे नक्की काय असते’ हे बाबांना पुर्ण माहीत असावे, ते उगाच गद्य स्वरुपात आम्हाला न सांगता ते त्यांनी लहान मोठ्या उदाहरणातून कायम दाखवून दिलेय……………

आज माझ्या लेकाने मला सगळे आठवायला भाग पाडलेय!!!!!! हे खरं तर माझे विचार सगळे , माझ्याच अस्तित्वात त्यांच अस्तित्वं. मीच हरवते माझ्याच विचारात आणि माझे विचार माझ्यात………कधी कधी कुठे जातात ते सगळे राम जाणे……म्हणून आज या विचांराची एक पोस्ट करतेय सरळ!!!!! नाहीतर पुढच्यावेळेस ,” आईना जेव्हा माझी पहेलीसी सुरत मागेल, ” तेव्हा माझ्या ’डॅडींचा’ नातू यायचा पुन्हा अक्कल शिकवायला……………

पिताश्री तुमच्या तालमीत छोटे ’उस्ता्द’ बऱ्यापैकी ’वस्ताद’ होताहेत तर……………..लगे रहो!!!!!!!!!!!!!!

39 thoughts on “’पास’ आजोबा…….

 1. एकदम बरोबर … माझा सुद्धा ताबा सुटायचा बरेचदा. आता मात्र मी बराच शांत झालो आहे. बाकी ही मात्र खरे की …

  ‘हत्तीच्या पावलांत इतर सर्व प्राणीमात्रांच्या पावलांचा समावेश होतोच की.” – इती महाभारत…

  • रोहन, माझा आयुष्यात असा रागाने ताबा सुटलेला तो एकमेव प्रसंग…त्यानंतर राग यायचा थांबला नाही पण तो असा व्यक्त काही होत नाही कधी!!!!
   राग आल्यावर बोलणे सोपे खरं तर याउलट काहीच न बोलता शांत बसणे अवघड होते…बरेचदा वाटतं आपला गैरफायदा घेतला जातो असा…..पण मानसिक शांतता काही सहजी ढळत नाही…..हल्लीच्या आयुष्यात इतके कमावले तरी फार नाही का!!!!!:)

 2. kalat nakalat changale sanskar mulanwar hot astat. jewha te disun yetat tewaha apalyala ashharya watate. masta asech nehami lihit raha. mi dar weli pratikriya lihit nahi pan tujha blog nehmi wachate. all the best and happy & prosperous new year to all of you.
  mugdha,madhav & aaji.

  • कुठे आहात तुम्ही? आम्ही कालच पुन्हा आठवण केली तुम्हा सगळ्यांची? मुलं रागावलीयेत…..म्हणताहेत आजी, आणि काका काकू अजुन कसे आले नाही परत भारतातून????

   नुतन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांनाही आमच्याकडून अनेक अनेक शुभेच्छा…..आमची ’मस्कतमधली आजी’ रमलीये का तिकडेच!!!!!!

 3. नव्या गोष्टी जगताना अशा जुन्याही आठवतात आणि आपण आपल्याला अधिक चांगले कळत जातॊ. मनापासून जगण्याची ही एक वेगळीच गंमत असते. तुमचा क्षणभर हेवाही वाटला .. असे बाबा मिळाल्याबद्दल…

  • खरयं…..“नव्या गोष्टी जगताना अशा जुन्याही आठवतात आणि आपण आपल्याला अधिक चांगले कळत जातॊ. मनापासून जगण्याची ही एक वेगळीच गंमत असते.”
   आभार….

 4. तन्वी, जाम म्हणजे जाम आवडलं हे पोस्ट. बाबांच्या नात्यातली वीण छान उमटलीये लेखात. आज पोरांवर पोस्ट टाकायचा दिवस आहे वाटतं. माझं पण पोस्ट लेकावरच आहे 🙂

  • हेरंब खेकडे आपण…आपलं आयुष्य फिरतं मुलं आणि कुटूंबाभोवती…..हळवेपणा आपला स्वभाव, तोच पोस्टमधे उमटतो!!!
   मनापासून आभार रे!!!!

 5. आणि हो विचारांची पोस्ट टाकणं चांगलं का असतं हे स्वतःच म्हणतेस याचा अर्थ पुन्हा निवृत्तीचे वेध नाही लागणार.. अशी आशा…..

  • नाय वो बाय…गेलय खुळ डोक्यातून आता हाये हितच मुक्काम………..जरा भाव खाल्ला मधे…..जास्त खाईन तर जोडे घालाल मला!!!!!!!!!!!!

 6. मॅडम चांगले धडे शिकवता आहात आम्हाला..
  खरच खुप काही घेण्यासारख आहे हया लेखातुन…
  आणी हो अवघ्या ७ वर्षात इतक प्रगल्भ झालेल्या ’वस्तादाला’ सलाम.

  • देवेंद्र अरे खरचं मीच आश्चर्याने पहात होते ईशानकडे…..कधी मोठी होताहेत मुलं पत्ता लागत नाही बघं!!!!
   तुझ्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार……

 7. नात्यामधली वीण चांगली उकलली आहे..
  हे असं लिहिणं म्हणजे काहीतरीच वाटतं नां? की मला किती साहित्यातलं समजतं वगैरे?? तरी पण वरचं वाक्य लिह्ल्याशिवाय रहावलं नाही.
  नेहेमी प्रमाणेच छान लिहिलं आहे हे पोस्ट!! माझा अन माझ्या वडिलांचा संवाद कधी झालाच नाही आयुष्यात. कायम घाबरुनच होतो त्यांना…उगिच आठवलं म्हणुन लिहितोय..
  मस्त आहे बाकी पोस्ट

  • महेंद्रजी आभार ……

   आईपेक्षाही आम्ही बाबांच्या कायम जास्त जवळ होतो…….ते आमच्यातलेच एक होउन बोलायचे नेहेमी. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर संवादात, “आम्हीही या वयाचे होतो ना!!!” हे त्यांचे वाक्य आले की वाटायचं बाबांना नेमकं कळतय मला काय म्हणायचय ते!!!!!!
   मला लग्नानंतर आईपण समजलं आणि आईशी देखील गप्पा वाढल्या नाहीतर बाबा, बाबा आणि बाबा……

 8. तन्वी आपण लेकी बाबांच्या किती जवळ असतो ना मनाने आणि बाबाही आपल्याजवळ असतात. खूपच मस्त लिहिलेस. बाकी ईशान केवढा समंजस झालाय गं.

  • ताई अगं आपण लेकी असतोच बाबांच्या जवळ आणि माझा लेक तर श्वासच बाबांच्या नावाने घेतो गं!!!
   आणि समंजसपणा म्हणशील तर कधी कधी पहातच रहाते मी त्याच्याकडे पण दुसऱ्याच क्षणी काहितरी तंद्रीतच स्वत:च्याच विश्वात हरवल्यासारखा काहितरी गोंधळ घालून त्याच्या वयाची जाणिव करून देतो…:)

 9. संपून रात्र गेली, उगवून सुर्य आला…
  ठेवील चिरंजीव तो, माझ्या ईशान बाळाला॥

  वाहते नदी जोरात,येउन मिळे तीज नाला….
  माझा ईशान बछडा, कळला ना कधी कुणाला॥

  आकाशात चंद्र हसला,अन वाहू लागला वारा….
  सुखी करेल बाळ माझा, गौरी,मम्मा अन बाबाला॥

  हा ’पास आजोबा’ ईशानच्या ’आसपास पण नाही इतका तो गोड, गुणी आणि हुशार आहे….ईश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे….
  असो,लेख छान झाला…………

 10. Tanvi, lekh khoop sundar jhalay. mala jabardast aawadala. Mi suddha tumachya sarakhich majhya babanchya khoop close hote. Aata te nahit. Pan ajunahi mala sarakha bhas hoto ki te satat aaspas aahet. Tumachi post wachun smrutinna ujala milala. War aaleli comment ishaan chya aajobanchi aahe ka? Mi suddha nashik shi connected ahe. maza janm nashikcha. Aai aani bhawjayiche maher pan nashikch. Maze aawadate shahar ahe nashik. Khoop chhan watale sagale wachun.

  • माधूरी पहिली गोष्ट मला ’तुम्ही’ नको गं म्हणुस…’तू’च ठीक आहे………..

   हो ग ती कमेंट माझ्या बाबांचीच आहे….शब्दा शब्दात नातवाबद्दलचे प्रेम असते त्यांच्या…….नासिक माझेही आवडते शहर त्यामूळे सेम पिंच…..

 11. मी सांगली कडचा . आमच्याकडे अजूनही लहानांशी बोलताना आदराने बोलण्याची संवय आहे.लहानग्यांना पण योग्य मान द्यावा ही आप्ली पुर्वंपार चालत आलेली रीत.त्यामुळे मी सगळ्यांशीच अहो-जाहो असेच बोलतॊ.

 12. Tanvi,mokalepanane sangatey..ha lekh aadhi pan vachala hotaa..pan comment dili navati..karan tula mahitch aahe…man khup udas hote..ajj punhaa lekh vachala…ani thod lihavese watale..mi sudha babanshi khup close hoti..tyanche nehami mhanane hech asayche ki manushyane garje purate bolave…swatachya bolnyavar ani ragaavar taaba thevava…me te agadi niyamit palale…tya goshticha tyanna nehami abhiman samaj kimva anand… asayacha ki mau shant ahe swabhavane….kadhi kadhi khup shant asne pan kiti trasadayak aste bagh..manatalya manat goshti rahun jatat..kahi goshti ulagadanya agodarach band hotat…agadi nehami saathi…

  ragavar taaba asane kharach jaruri aahe…raag aani tyatun nighalele shabd dusaryaache ayushya udvast pan karu shakate…khup chhan lihiles bagh….ajj majhyaa babanchi athwan punha ekda karun dilis…ashich lihit raha….

 13. baba लवकर झोपी गेले..
  जागवलं… डोळे उघडले ते आईने..
  कष्ट करून, नोकरी करून… आणि मौन व्रत घेवून..
  केलेल्या कुठल्या गोष्टीचे सांगणे नाही, जाहिरात नाही.. तसा मी शीघ्रकोपी..
  पण मनातली भडास निघाली कि शांत… दृष्ट लागण्याजोगा …
  लेख अतिशय उत्तम.. प्रतिक्रिया कशी देवू ? काळात नाही? इतका प्रगल्भ हि मी नाही..
  अजून खूप शिकायचे आहे..
  जे सुचले ते लिहितो..

  अंतरीच्या वादळांना मी साद घालत नाही..
  विझलेल्या दिव्यांना उगाच मालवत नाही…

  वाहिले वारे जोराने… तरी काहीच ढवळत नाही..
  स्पंदनानि वेढलेला गाभारा आढळत नाही..

  माऊलीच्या मंदिरात एक ओढ शिल्लक राहिलेली…
  आई मूर्तिमंत देवता म्हणून जीवनात पाहिलेली…

  • अखिल आज तुझी कमेंट पुन्हा वाचली…. कितीतरी वेळा वाचले की वाटत रहाते की शब्दांपेक्षाही आणि खूप काही व्यक्त होते त्यातून……

   असो…. आभार म्हणून उगाच काहितरी फॉरमॅलिटी नाही करत…पण प्रतिक्रीया आवडली इतकेच म्हणॆन…

 14. सुंदरच आहे पोस्ट! इतिहासाची पुनरावृत्ती होतच राहते बहुतेक! आजोबांचे शब्द नातवाच्या तोंडी….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s