फ्रेंड्स……….

आता म्हणाल पोस्टला नाव ’मित्र- मैत्रीणी’ न देता फ्रेंड्स का दिलेय? (म्हणाला नसाल तरी आणि असाल तरी………….कारण ऐका…) ’फ्रेंड्स’ नाव यासाठी कारण मी ही पोस्ट ज्यांच्या मुळे लिहीतीये त्यांना ’मित्र- मैत्रीणी’ कळत नाही………त्यांना कळते ते म्हणजे फक्त friends……

खरं तर मला या शब्दाची कायम गंमत वाटते…..कारण हा शब्द ’तो’ किंवा ’ती’ यासाठी वेगळा नसतो त्यामुळे  ’अमुक ढमुक फ्रेंड आहे….’ म्हटल्यावर भुवया जरा कमी उंचावल्या जातात. असो, मुद्दा वेगळा आहे, तर माझे हे सगळे नवे कोरे फ्रेंड्स आहेत माझ्या लेकिच्या शाळेतले वय वर्षे ३ च्या आसपासचे मुलं!!!!!!!!!!! त्याचं झालं काय मी लेकीला शाळेत घातलंय नुकतचं, आणि कुठल्याही परिस्थितीच तिथे रमायचे नाही असा विडा तिने उचललाय………….बरं येव्ह्ढ्याश्या लेकराला स्पर्धेत लोटलं, एकटं सोडलं वगैरे अनेक विचारांच्या अपराधीपणाचे ओझे माझ्या मनावर. मग करणार काय …………………..त्यातला सुवर्णमध्य म्हणजे तिच्याबरोबर निदान सुरुवातीचे काही दिवस तरी मी देखील शाळेत जाणे.

आता हा पर्याय आम्हा दोघींनाही पटला……. नव्हे आवडला…….त्यात आता तिच्या शाळेत आहे त्यांचे Annual Exhibition …..मग काय मला तर आयतीच मेजवानी मिळाली. मुख्य म्हणजे आयता मदतनीस मिळाल्यामुळे तिच्या मुख्याध्यापिकेनेही मला येउ दिले. सुरूवात अशी झाली तरी मैत्री व्हायला आम्हा दोघींनाही एक दोन दिवसच लागले आणि आमची स्वारी तिथे रमली…………..

तिथे मला मिळाले हे नवे नवे मित्र मैत्रीणी……………….आपल्याच विश्वात रमलेले, जगातली स्पर्धा, जीवघेणी शर्यत सगळ्या सगळ्या पासून दुर असलेले आणि त्यांच्या विश्वात अलगत फुलपाखरासारखे बागडणारे…………मजा येत होती या सगळ्या बच्चे कंपनीच्या बरोबर……पटकन मैत्री करतात ही मुलं. कसल्याही अटी नसणारे नवे नवे मित्र……….आपण जरासे हसलो तरी ते तोंड भरून हसतात, आपण जरा दोन वाक्य बोललो की यांचा कथाकथनाचा कार्यक्रम सुरू!!!!!!!!!!!! मला तर एक विचार मनात येउन गेला उगाच B.E. करत बसलो आपण मस्तपैकी शिक्षिका झाले असते तर या पिल्लांमधे कायम रमता आले असते!!!!!!

शाळेच्या एका भिंतीवर जंगलाचे चित्र बनवायचे ठरले आमचे, त्यासाठी माझ्या या बच्चू फ्रेंड्सची एक टीम आली माझ्या मदतीला.

या टीमने मी सांगेन ती चित्र पटापट कलर करायची असे डिलिंग झाले……कसला भयंकर उत्साह असतो या मुलांमधे……..माझी चित्र काढून होण्यापुर्वीचे आधि दिलेली चित्र रंगवून ते ’काम मागणाऱ़्या राक्षसासारखे’ माझ्या समोर उभे असायचे………….

त्या सगळ्या चित्रांमधुन दोन तासात आमचे मस्त जंगल साकारले…..पटापट रंगवलेली

हिरवी हिरवी झाडं आणि मधे मधे काही प्राणी…….

मग मधेच माझ्या एका फ्रेंडला वाटल्ं की I want a fish to colour……..मग जंगलाबरोबरच आले समुद्रातले काही प्राणी…..

आज माझ्या या बालमित्रांची कलाकारी टाकतेय ब्लॉगवर……………

किती निरागस वातावरण होते ते!!!! सगळेच आनंदी होते……ती मुलं निर्व्याज आनंद वाटत होती आणि मी तो ठेवा भरभरून  साठवत होते……..येणाऱ्या पुढच्या अनेक दिवसांचे श्वास मी तिथे भरून घेतलेत हे मात्र नक्की!!!!!!!!!!!!!!!!!!

या सगळ्या थोड्या गंभीर कधी खेळकर विचारात गढले असतानाच लेक आली आणि म्हणाली, “मम्मा मला हॉर्लिक्स नाही आवडत……………..” म्हटले ठीके पिल्लू, तुझ्या दुधाच्या कपात नाही टाकणार मग मी!!!”

तर हसायला लागली आणि म्हणाली, “हॉर्लिक्स कधी दुधात टाकतात का?”…………………….आता माझ्या अल्पमतीनुसार हॉर्लिक्स हे दुधातच टाकतात…………..पण ही बया तर हसतीये मला, तेव्हढ्यातच मुलगा म्हणाला, “मम्मा ती रॉड्रिक्स म्हणतेय……….”

अच्छा मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला…………..लेकीने रॉड्रिक्स नावाच्या मुख्याध्यापिकेचे हॉर्लिक्स असे बारसे केलेले होते…………तिच्या मुख्याध्यापिकेलाही आवडलेय तिचे हे नवे नावं!!!!!!!!!!!!!!!

मुलांचे विश्व नेहेमी भुरळ पाडणारे….रंगीबेरंगी, नटलेले, हवेहवेसे……………..माझी लेक शाळेला सरावलीये खरं तर……पण मी का कबूल करू हे, त्यापेक्षा काहितरी कारणाने या पिल्लांच्या जगात लुडबुडायला जावे म्हणतेय………………….

32 thoughts on “फ्रेंड्स……….

  • खरय़ सुहास तुमचं…म्हणूनच माझी लेक रमलीये आता शाळेत हे मी पटकन स्वत:शीही मान्य करत नाही 🙂
   आता मी तिचा हात धरून शाळेत जाते येव्हढचं!!!!!!!!!!!!!!

 1. खुपच छान !!अग ते आयुष्यच निराळे !!ह्या जगात रमताना खरी मजा येते ..मी स्वत: शिक्षीकेची नोकरी केली आहे त्यामुळे मला ह्या लेखामुळे सर्व आठ्वणी ताज्या झाल्या ..फ़ारच मस्त…u made my day dear…:)

  • माऊ अग त्यातली मनीमाऊ तुझ्यासाठी आहे बर का!!!!!!
   अगं खरं तर मला हे असे हसणारे सिंह वगैरे प्राणीही काढता येतात हा साक्षात्कार तिथेच झाला:)

 2. हो गं. खरंच खूप मजा येते. त्यांचं जग नि आपलं जग निराळंच असतं. त्यांच्याबरोबर खेळता खेळता आपल्याला स्वत:मध्येही कितीतरी शोध लागतात. मी सुद्धा नर्सरी टीचरचा कोर्स करताना ही मजा अनुभवली आहे. आणि एक बाकी खरं, आपण ह्यांचे फ्रेंड्स असतो, त्यामुळे त्यांना ’टीचर’ हे नाव फारसं काही रूचत नाही. दीदी, ताई, अगदीच काही नाही तर आंटी चालतं पण टीचर म्हटलं की ते लांबच पळतात. माझ्या काही गोड आठवणी या इथे आहेत. वेळ मिळाला तर पहा. आणि जमलंच तुझ्या ह्या फ्रेंड्सना नेहमी भेटत रहा.

  • कांचन छानच आहेत गं फोटो…….खरय तुझं या मुलांबरोबर आपल्याला नवे नवे शोध लागतात…..हो गं मी नक्की भेटत रहाणार आहे या फ्रेंड्स ना………….:)

 3. अच्छा ! तर अश्या पध्दतीने बाईंनी शिरकाव करून घेतलाच तर !मग आता काय जंगलात मुक्त संचार दिसतोय तर !…. खरंच आहे, आपल्या वयाच्यां बरोबर आपण नेहमीच मिसळत असतॊ.. खरी कसोटी व मज्जाही आपल्या वयां बरोबर नसलेल्यांशी मिसळतांना येते !…. अगं प्राणी सुध्दा संवयीनी माणसाळतात… मग ह्यांचे बरोबर प्राणसाळलात तर ….?

  मज्जा आहे एका माणसाची !

  • काका…………..
   खरच मज्जा आहे पण…… 🙂
   चित्र तर बघा ती…..खरी मजा आली या चित्रांमधे कारण कुठलेही बंधन नव्हते….सिंह हसतोय मस्तपैकी….असाच एक ढब्बू मासा पण आहे…टाकते नंतर…..

 4. मस्तच लिहिलंयस. सही आहे तुझ्या फ्रेंड्सची कलाकारी. अँड यस मला पण अर्थातच खेकडाच आवडला 🙂 हा हा..

  आणि ते रॉड्रिक्स हॉर्लिक्स तर झक्कासच..

 5. आपण त्यांचा शिकवतो … त्यापेक्षा
  त्यांची निरीक्षण शक्ती अफलातून असते…
  म्हणूनच तर लोड शेडींग नसले तरी..
  त्यांच्यासमोर कधी कधी आपली बत्ती गुल होते..
  माझा पुतण्याही असाच आहे… अवलिया…
  फक्त कार्टून चालू असले कि त्याची समाधी लागल्यासारखी अवस्था होते..
  नाहीतर हे आणलस का? ते आणलस का? एवढे प्रश्न विचारात बसतो..
  लहान मुल फार गोंडस आणि निरागस असतात
  कसला स्वार्थ नाही, कसला परमार्थ नाही…
  स्वताच्या जगात… मश्गुल असतात…
  म्हणतात ते खर आहे न…
  लहानपण देगा देवा…
  आता तो निसटून गेलेला क्षण आहे…
  येणारा क्षण नेहमीसारखा विलक्षण आहे..
  नियतीच्या आगमनाला वर्तमानाचे औक्षण आहे…
  कळला नेहमीसारखेच द्रुत गतीचे निरीक्षण आहे..

 6. तन्वी, अग मस्तच झालीये की फ्रेंड्सची चित्रकारी. तूही रंगलेली दिसते आहेस,:) मला पण खेकडाच आवडला. चला गौरा आता हळूहळू रूळेल. मस्त झालीये पोस्ट.

  • अगं कशाला हवेत तुला ईंपोर्टेड राक्षस…… 🙂
   घरातलं पिल्लू अजुन थोडं मोठ झालं की बघ कसा कामाला लावतो तुला…… त्यांना सतत नवे नवे ईंटरेस्टिंग ईंटरटेनमेंट (ईशानचा शब्द) पुरवण्यात आपला दिवस संपतो…..आणि काही उरलाच तर ते स्वत: जी कलाकारी करतात ती पहाण्यात आणि धन्य (!) होण्यात संपतो…………..

 7. फारच छान लिहिल आहे.घरात एक लहान मूल असेल तर वेळ कसा नि केव्हा संपतो तच समजत नाही.देवाच शुद्ध रुपच जणू घरात वाव्ररत असत.लहनपण देगा देवा असं उगिच नाहि म्हंटलं.पण हल्ल ” डींक” च फ़्याड आलंय ना ? कोण सांगणार यांना.
  धन्यवाद !

 8. चित्रं बाकी तुम्ही छान काढता हो. मी एवढी चांगली चित्रं काढली असती तर आयुष्यात चित्रकलेच्या तासाला खाल्लेल्या मारातला निदान थोडा मार तरी चुकला असता… 😉

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s