हॅपी बर्थडे………….

आज माझ्या ब्लॉगाचा हॅपी बर्थडे आहे…… ५ मार्च २००९ ला सुरू केलेल्या या माझ्या घराला एक वर्ष पुर्ण होतय आज….. खरं तर माझा आरंभशुर स्वभाव पहाता हा ब्लॉग गेले एक वर्ष टिकाव धरून आहे याचेच मला कधी कधी आश्चर्य़ वाटते. पण एक खरेय की अधून मधून मला येणारे कंटाळ्याचे लहानमोठे झटके वगळता ब्लॉगाची तब्येत ठीकच किंवा उत्तमच आहे म्हणावी लागेल.

मी मागच्या २/३ पोस्ट्स मधे म्हटलेच आहे की या जागेने मला खूप समृद्ध केलेय…….. एकटेपणा कसा असतो हेच आता माहित नाही. अगदीच क्वचित प्रसंगी मन सैरभैर असले की माझ्या ब्लॉगर मित्र मैत्रीणींचे ब्लॉग्स वाचते….. म्हणतात ना कंटाळा जसा संसर्गजन्य असतो तसाच उत्साहही…….. आता तर अनिकेत, दीपकने कष्टाने ’मराठी मंडळी’ ची स्थापना केलेली आहे. मनात असा विचार येतो की हे दोघे जर सगळे व्याप सांभाळून ईतके काही करू शकतात तर आपण का नाही????? मराठीब्लॉगविश्व, नेटभेट , माझ्या ब्लॉगाच्या कोंबड्याला स्वत:च्या ब्लॉगावर मोकळ्या मनाने स्थान देणारे माझे मित्र मैत्रीणी,सगळ्याचा विचार करताना असे वाटते की खरच या मार्गावर निघताना मी एकटी असले तरी आज मात्र काफिला बनलाय आणि या गोष्टीचा खरचं खूप आनंद होतोय!!!!

माझ्या या ब्लॉगला मी जियो हजारो साल वगैरे तर नाही म्हणणार पण आम्हा दोघांची ही मैत्री टिकेल असे चित्र दिसतेय……..

महेंद्रजींनी आणि भाग्यश्रीताईने त्यांच्या ब्लॉगांच्या वाढदिवसाला सुंदर पोस्ट टाकल्या आहेत. संपूर्ण ब्लॉगर्स जगातल्या प्रत्येकाच्याच मनात यादिवशी असणाऱ्या भावनांचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे त्या दोघांच्या पोस्ट्स…. तेव्हा मी खरं तर अजुन काही लिहीत नाही…… आज इथेच थांबते…..

आपण सगळ्यांनी धरलेला हा सुपंथ असाच उत्तरोत्तर प्रगती करो असे मात्र मनापासून वाटतेय…………..

माझ्या या घरात येणाऱ्या आणि या ब्लॉगवर प्रेम करणाऱ्या, आणि हो न विसरता प्रतिक्रीया देणाऱ्या  सगळ्यांचेच मनापासून आभार!!!!!!!

(केकचा फोटो अर्थातच जालावरून 🙂 , आणि मला तो तिथून घ्यावा लागल्याचा सर्वस्वी दोष भाग्यश्रीताईवर, कारण केकाची रेशीपी तिने अजुन दिलेली नाही!!! )

Advertisements

32 thoughts on “हॅपी बर्थडे………….

 1. केकचा फोटो नको. . .एवढा मोठा केक हवा. .. सेलिब्रेशन ला. . .पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

 2. मी गेले वर्षभर आपला ब्लॉग नियमित वाचते. माझ्या आवडत्या ब्लॉगपैकी एक ब्लॉग आहे हा. शैली अतिशय सुन्दर , वाचताक्षणी घटना डोळ्यासमोर आणते. वर्धापनदिनानिमित्त हार्दिक अभिनन्दन !!! आपल्या ब्लॉग चे असेच अनेक वर्धापनदिन येवोत. शुभेच्छा!!!

 3. अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन! तन्वी, खूप खूप शुभेच्छा! असे अनेक वाढदिवस व मोठे मोठे केक- ये पण केक खरा हवा आहे हं का मला….:P साजरे होवोत. तुम लिखती रहो हम पढते रहेंगे…… जियो!!!

 4. पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्छा !!!
  अश्याच लिहित रहा.

  आपला,
  (शुभेछ्छुक) अनिकेत वैद्य.

 5. तन्वी बाई, वा दि हा हा शु तुमच्या ब्लॉगला. आणि कंटाळ्याचे लहान-मोठे झटके हे ब्लॉग च्या आणि (ब्लॉग बाईंच्या) गुटगुटीतपणाचं लक्षण आहे. झटक्यांची फ्रिक्वन्सी नगण्य असली की झालं. अशीच (भरपूर) लिहीत रहा. आम्ही सदैव तयार आहोत वाचायला आणि कमेंटायला 🙂 !!

 6. ब्लॊगच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  Jai blogging 🙂

  शब्दांशी कुस्ती खेळत मोठ्या कष्टाने, आम्ही चार ओळी खरडतो,

  तुम्ही मात्र “सहजच” लिहिता, त्याचा सुंदर ब्लॉग बनतो 🙂

 7. अरे व्वा..तुम्ही पण मार्चच्या…ग्रेट…म्हणूनच तो झटका माझ्यापण ब्लॉगला येतो वाटतं…पण जे लिहितेस ते भारी असतं ना बये….आज काही काम करू नकोस रेशिपी घेऊन..सरळ विकत केक घेऊन ये….आणि मग साजरा कर…तुला आणि ब्लॉगला हार्दिक शुभेच्छा….

 8. अभिनंदन तन्वी… तुझ्या ब्लॉगचा कोंबडा येत्या वर्षात अजून बहरुदे… अधिकाधिक खादाडी पोस्ट येऊ दे.. अशी मनोकामना करतो… (मी निषेध करणे सोडलय हल्ली)

  आता लवकरच भेटून भटकंती आणि खादाडी करायला हवी. सर्वजण एकत्र मिळून धमाल करुया एक दिवस. जूनची वाट बघतोय मी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s