कं ची बाधा……….

कालच्या पोस्टला मी  सगळ्या कमेंटला एकच उत्तर दिले… खरं तर प्रत्येकच उत्तरात आभार मानायचे होते. आणि मग तेच ते सगळ्यांना लिहायचे तर त्यापेक्षा एकत्रच एकच उत्तर टाकले……

त्या माझ्या महान चातुर्यावर हेरंब आणि अपर्णाने अजुन दोन कमेंटस टाकल्या…… हेरंबच्या मते मला ’कं’ ची लागण झाली आहे आणि त्याला अपर्णाचा दुजोरा 🙂  होता. थोडा वेळ मला गंमत वाटली या दोघांची…. एकूणातच आता ब्लॉगर्सची जी टीम झाली आहे, त्यात असे संवाद नेहेमीच घडतात. आणि काही वेळ चेहेऱ्यावर हसू फुलवून जातात……….

काही समजत नाहिये ना ही पोस्ट कश्याबद्दल आहे… 🙂 ….. नमनाला बरेचसे तेल ओतले गेलेले आहे तेव्हा आता मुख्य मुद्द्याला सुरूवात…………..

मुळ मुद्दा आहे माझ्या ’कं’ च्या बाधेचा…… काल मी सहज विचार करत होते की आयूष्यात मला आलेला पहिला ऐतिहासिक कंटाळा कोणता???? मग काय ईतिहासच खणला……….. माझा तो अतिमहत्वपुर्ण शोध पोहोचला थेट साडे एकतीस वर्षापुर्वीच्या अस्मादिकांच्या जन्मवेळेशी……. जन्मल्या जन्मल्या मला पहिला जाहीर कंटाळा आला होता आणि तो मी ’न रडून’ साजरा केला होता !!! (प्रस्तुत माहितीचे सौजन्य आमच्या मातोश्री…… 🙂 ) मग मला फटके मारून रडायला भाग पाडले होते असेही आईनेच पुढे सांगितले होते……. आणि आपल्या पहिल्या अपत्याला झाल्या झाल्या मार बसलेला आहे तेव्हा आपण मात्र कधी मारायचे नाही हा तिचा निर्धार कोणा एका ३१ डिसेंबरला आमच्या महान कर्तूत्त्वाने मोडला होता….. (तारिख कायम लक्षात रहाण्याजोगी आहे आणि तो पहिला आणि शेवटचा नॉनशाब्दिक मार असल्यामुळे आणि या मारातले हत्यार कुंचा असल्यामुळे आठवण अगदी पक्की आहे……..या मारानंतरचे अनेक शाब्दिक मार व्हाया कान मनाला लागत, मात्र हाच एकमेव मार व्हाया पाठ मनापर्यंत पोहोचला होता :D… या आठवणीवरचे आईचे मत असे की नेहेमीच बडवायला हवे होते म्हणजे नसते डिटेल्स लक्षात राहिले नसते 🙂 )  असो आज महत्वाचा मुद्दा हा की माझ्या आयुष्यातला पहिला कंटाळा जन्माला आल्यावर रड्ण्याचा होता…. खरं तर माझी वैचारिक बैठक (!!!) पहाता , जन्माला येणे हा सुंदर फिनॉमिनॉ रडून मला साजरा करायचा नसावा……

मात्र हा कंटाळा माझ्याबरोबर वाढतोय…… शाळेत येणारे लहानसहान कंटाळे, माध्यमिक- उच्चमाध्यमिक वर्षात प्रगत होत गेले…….मला तीन तास एका जागी बसून पेपर लिहिण्याचाही भयंकर कंटाळा होता. मग मी पेपर अर्धा लिहीला की स्वत:च स्वत;ला मार्क देउन पहायचे… ते एकदा का ३५ भरले की मी उत्तरपत्रीका देउन मोकळी व्हायचे…… माझ्या या अतिहुशारीची कल्पना माझ्या शाळेतल्या शिक्षकांना फारच लवकर आल्याने मी पेपर दिला की ते तो आधि तपासून पहात आणि जर पुर्ण लिहीलेला नसेल तर मला पुन्हा माझ्या जागेवर दामट्त……. P.T. चा तासही एक असाच महाकर्मकठीण कंटाळ्याचा होता…..मला स्वत: कवायती करण्याचा कंटाळा यायचा मग मी ईतरांकडे पहात उभी रहायचे……. यावर रागावून मला आमच्या मॅडमनी एक संपुर्ण वर्ष टेबलवर उभे राहुन P.T. करायला लावले होते……. सारी शाळा पुर्वेला तोंड करून उभी असेल तर मी एकटी त्यांच्यासमोर पश्चिमेला तोंड करून उभी असायचे , ते देखील टेबलवर :)…… अश्या आळशी विद्यार्थ्याला आमचे शिक्षक लाडकी का म्हणत हा खरचं एक प्रश्न आहे……

माझे म्हणजे पहिलीत वर्गात पहिला नंबर, दुसरीत दुसरा, तिसरीत पहिला, चौथीत दुसरा….. असे सम संख्येच्या वर्गांना दुसरा नंबर आणि विषम संख्येंच्या वर्गांना पहिला नंबर यायचा. या हिशोबाने माझ्या दहावीच्या वर्षाचे काय व्हावे असे टेन्शन आमच्या मातोश्रींना आले होते…… मला हे असले टेन्शन घेण्याचाही कायम कंटाळा असल्याने मी निवांत होते. असेच काहिसे विचार माझ्या दोन शिक्षकांना पण आले असावे…… कारण सुरूवातीच्या काही दिवसातल्या माझ्या शाळेतल्या आणि शिकवणीच्या दांड्या पहाता हे दोघे जण मला घरी रोज शिकवायला यायला लागले….. ते ही नि:शुल्क…. आताची शिक्षणपध्दती पहाता या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी मला मात्र तेव्हा हा जगातला सगळ्यात मोठा उपद्रव वाटायचा…… आणि मग मी चार दारे असलेल्या आमच्या घराच्या कुठल्यातरी दाराने पळून जायचे…… मग सर घरी यायच्या आधि मला शोधून दामटून घरी आणणे हे आईचे काम असायचे……. बरं हे सर घरी आले की सगळ्या गणितांची तोंडी उत्तरे देउन मी मोकळी होत असे….. मग ’स्टेप्सला मार्क्स असतात, त्या लिहिण्याचा कंटाळा करायचा नाही!!!! ’ हे माझ्याकडून ५ वेळा लिहून घेतले जाई!!!!!!!……………… एक मात्र खरं आहे की या शिक्षकांनी मला वळण लावण्याच्या विचाराचा ’कंटाळा’ न केल्यामुळे मी दहावीत शाळेत पहिली आणि केंद्रात मुलींमधे पहिली आले……. 🙂 माझ्या या रिझल्टवर खुश होण्याऐवजी जेव्हा माझे सर म्हणाले बघ येव्हढा आळस केलास तरी पहिली आलीस…. खरचं जरा अभ्यास केला असतास तर मेरीट असे ८-१० मार्काने चुकले नसते…. :(………….. यावर आमच्या आईचे मत ’जिद्द’ म्हणजे अशी ती नाहीच, सगळ्याचा मेला कायम कंटाळा आहे या मुलीला…………..तिचे हे मत बदलणार नाही याची मात्र मी कायम ’उत्साहाने’ काळजी घेतलीये……

आठवायचा कंटाळा म्हणजे ’विस्मरण’…… कंटाळ्याच्या या उपप्रकारानेही माझ्या आयुष्यात अनेक चमत्कार घडवलेत आजवर….. आई-बाबांसाठी म्हणून मला दिले गेलेले कुठलेही निरोप मी कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचवले नव्हते…… निरोप सांगणाऱ्या काका- मावश्यांना तोंडभरून ’हो नक्की सांगते!!!’ म्हटल्या म्हटल्या मी तो निरोप विसरून जायचे………. कोणी उद्या घरी येतो वगैरे सांगितलेले असले की ते प्रत्यक्ष आल्यावरच आईला समजायचे की ते येणार होते…… मग मी आपली ’मला आज खूप गृहपाठ आहे!!! ’असले कारण सांगुन तिथून काढता पाय घ्यायचे!!!! पण ते पाहूणे गेल्यावर बाबांचे ठरलेले वाक्य यायचे, ” अगं कुठल्या तंद्रीत असतेच गं!!! कायम स्वत:च्याच नादात…..” …………… विसराळूपणा मी माझ्या मामाकडून घेतलाय. आमच्या मामाच्या विसराळूपणाचे किस्से आम्ही आजही एकत्र आलो की आठवत असतो…… आमच्या मामाने एकदा ट्रेनमधे जाताना लोणच्याचा संपुर्ण डबा वरच्या बर्थ वर ठेवला होता आणि साधारण दिड तासाच्या प्रवासात हे महाशय त्याबाबत ठार विसरले आणि तो न घेताच उतरून गेले होते….. एखाद्या ठिकाणी जाताना गाडीने जाणे आणि येताना मित्र भेटला तर गाडी तिथेच किल्लीसहित विसरण्याचे भीमपराक्रमही मामाच्या खात्यात आहेत…. 🙂 वस्तू हरवणे हे तर आमचे कॉमन आहे!!!

आम्हाला कंटाळा नाहिये तो फक्त बोलण्याचा ….. डोक्याच्या मातीत विचारांची शेती आणि तोंडाच्या गिरणीत शब्दांचे दळण सतत सुरू असते……. मला आईने सांगितलेली कामं करण्याचाही एक असाच असह्य कंटाळा होता…… मग मी ’हो हो करते!!’ असे सांगायचे, थोड्या वेळाने पुन्हा आईने विचारले की , ’अगं आई ५ मिनिटाचे तर काम आहे, मी नाही म्हटले का, करते थांब!!!” हे उत्तर ठरलेले असायचे…………….. मग आई काय समजायचे ते समजून ते काम करून टाकायची. एकदा आईने मला धुतलेल्या तांदूळाचे पाणी झाडाला टाकायला सांगितले होते…मी संपुर्ण पातेले झाडात ओतून, भुमीतून आलेले तांदूळ पुन्हा भुमीत अर्पण करून आले होते. 🙂  मी आणि माझे दोन मामा (एक ज्याचा आधि उल्लेख केलेला आहे आणि एक आमच्याच कॅटेगरीतला आईचा मामेभाउ.. ) गप्पा मारायला बसलो की इतरांच्या मते ’वल्गनांना’ उत यायचे, कारण या कंटाळाग्रस्त आत्म्यांकडून प्रत्यक्षात काही घडायचे नाहिये या मतावर सगळे ठाम होते….. आमच्या या मामाला आमची मामी आजी ,” रात को बका दिन को नका!!’ असे म्हणायची………. 😀

पुढे कॉलेजमधे फाईल्स पुर्ण करायचा, लेक्चर्स अटेंड करायचा या प्रकारातले अनेक कंटाळे आले नी गेले……हा ’दिग्विजयी कंटाळा’ ( शब्दाचे सौजन्य हेरंब) माझ्या आयूष्यात नसता तर माझ्याकडून काहितरी भव्यदिव्य झाले असते या विचारावर आमची आई अजुनही ठाम आहे!!!!! अहो नुसतीच प्रखर बुद्धीमत्ता काय कामाची, काहितरी रिझल्टही तर दिसायला हवा ना, हे तिचे पेटंटेड वाक्य ती न कंटाळता नेहेमी बाबांना सांगत असते…… आणि गेली साधारण २५-२६ वर्षे (जेव्हा आईला असा बोध झाला की आपली लेक हुशार {!} आहे तेव्हापासुन पुढची वर्ष…) ते न कंटाळता मान डोलवत असतात!!!!!!!!!!!!!!! तिच्या तगमगीत काहितरी तथ्य असावे असे मला मात्र आजकाल कधीमधी वाटते जेव्हा असलाच काहिसा विचार स्वत:च्या लेकाबाबत मनात डोकावतो!!!!! 🙂

असो, तर सारांश काय आम्ही कंटाळापंथीय लोक…….. वपूंचे एक वाक्य आहे ’कंटाळ्याच्या दिवशी काय होते…… आधि कंटाळा येतो आणि मग …. आणखी कंटाळा येतो …’ तसलेच आहे आम्हा कंटाळाप्रेमींचे. कुठलीच नवी गोष्ट खूप दिवस मन रमवू शकत नाही, काही दिवसातच तिचा कंटाळा येतो आणि मन नवे काहितरी उद्योग शोधू लागते!!!!

काहिही असले तरी मला ’कंटाळ्या’ चा राग नाहीये कधीच…. कारण जसे आम्हाला स्वत:च्या आयुष्यात भव्यदिव्य कर्तूत्व करायचा कंटाळा आहे तसेच ईतर कोणाला असे काही करण्यापासून परावृत्त करायचाही कंटाळा आहेच की!!! आम्हाला गॉसिपींग, हेवेदावे, राग, मत्सर हे नसते उद्योग करण्याचाही कंटाळा आहेच की…….

तेव्हा सौ बातों की एक बात अशी की कंटाळ्याला ’टाळा’ असे काही मी म्हणणार नाही…………….. 🙂

कंटाळ्यावरचा सलील कुलकर्णींचा लोकसत्तामधला एक सुंदर लेख इथे आहे.

(यॉ डॉ खरं तर ’कंटाळा’ पुराणातला तू महर्षी व्यास पण तरिही तुझ्या टेरीटरीत केलेल्या घुसखोरीचा राग करायचा तुला कंटाळा येवो ही ईच्छा!!!!!!!!!!!!!! 🙂 )

55 thoughts on “कं ची बाधा……….

 1. एवढ तर लिहलस कंटाळा ह्या विषयावर, कंटाळा नाही आला का लिहताना? 🙂
  सगळे प्रसंग कसे डोळ्यासमोर उभे राहतात. कं ची बाधा………झालेल्या जगात तुझ स्वागत. कोणीच अपवाद नाही ग़ ह्याला. जास्त लिहीत नाही दिग्विजयी कंटाळा आलाय..हे हे हे
  मस्त लिहलेस..

  • सुहास आभार… अरे असतात असे अपवादात्मक दिवस जेव्हा कंटाळा थोडा विसावा घेतो आणि उत्साह संचारतो…. मग मी काहितरी पोष्टते इथे 🙂

 2. तन्वी, कंट्याळ्याची राणीसाहेबा नशीब पोस्ट टायपताना कंटाळा केला नाहीस. 🙂 ब~याच अंदरकी बात कळल्या ना गो त्यामुळे…. ” आम्हाला गॉसिपींग, हेवेदावे, राग, मत्सर हे नसते उद्योग करण्याचाही कंटाळा आहेच की…… ” यस्स्स्स्स……..या कंटाळ्य़ाचा विजय असो. सहीच गं.

  • ताई तुमास्नी एक्झ्याक्टली बरोबर समजतेय बगा मला काय म्हनायचे असते ते……. 🙂

   अगं अनेक पराक्रम आहेत गं या कंटाळ्याचे, पण लिहिण्याचा कंटाळा दुसरे काय!!!

   माझे जे दोन शिक्षक घरी यायचे ना त्यापैकी एका सरांचा आमच्या घरी येताना अपघात झाला होता गं!!! एका मित्राशी बोलत उभे असताना अचानक लक्ष घड्याळाकडे गेले तर ७ वाजून गेलेले म्हणून ते पटकन निघाले आणि अपघात झाला बाईकचा, सरांना फ्रॅक्चर झाल्यावर आमच्या कंटाळ्याला लाज वाटली आणि अगदी जानेवारीत अभ्यासाला लागले होते गं मी दहावीत….. आता आठवले तरी अपराधी वाटते……
   मी ट्युशन्स ला जायचे नाही तर माझी एक मैत्रीण सगळा अभ्यास दोन वेळा लिहायची आणि एक कॉपी मला पाठवायची…. आता ती कुठे आहे ते ही माहित नाही, पण नात्यांच्या बाबत मी नशीबवान आहे हे अश्या आठवणींनी पुन्हा पुन्हा जाणवते…… 🙂

 3. जबरदस्त…पोष्ट वाचुन तु ही एक आमच्यातलीच..हे बघुन ,वाचुन खरोखरी आनंद झाला..जय हो..सही लिहिलेस..प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर आला…

  • माऊ अगं मी आहेच आळशी म्हणून तर तुला म्हणते की तू नव्या नव्या कलाकृती जरा दमाने करत जा म्हणजे आम्ही पण करू त्या………. 🙂

 4. केवढा हा कंटाळा ??? आणि किती लिहतेस….. कंटाळा नाही येत का ???
  मला तर वाचून प्रतिक्रिया द्यायचा कंटाळा आलाय 🙂

  कंटाळा ह्या विषयावर एवढी छान पोस्ट…कंटाळा पण उत्साहित होईल 🙂

 5. आयला मी आत्ता बघतोय ही पोस्ट. दिग्विजयी कंटाळ्याने भलतंच सीमोल्लंघन केलंय तर. हा हा हा.. सॉलिड झालाय लेख.. जब्बरदस्त. बाकी हा लेख तंतोतंत माझ्या नावावरही खपू शकतो (ते बोर्डात बिर्डात, शाळेत पहिला नंबर आणि हुशार वगैरे असले तपशील सोडून अर्थात) .. आणि लेख वाचताना आणि प्रतिक्रिया देताना आपला हा ‘कं’ मित्र अजिबात आड आला नाही बरं का.(कंटाळ्यावरचा लेख कंटाळवाणा न होता अतिशय खुसखुशीत झालाय तुझ्या इतर सगळ्याच लेखांसारखा असं म्हणायचं होतं 🙂 )

  अखेर काय तर

  उपाय सारे सरून जाती नेहमीच जिंकतो कंटाळा
  विषय बापुडे मरून जाती सदैव विजयी कंटाळा
  हुरूप हरतो, हर्ष थरथरतो दिग्विजयी योद्धा कंटाळा
  उर्जा पतते, जिव्हा ढळते रामबाण, ब्रह्मास्त्र कंटाळा

 6. कंटाळ्यावर लिहतांना कंटाळा केला नाहीत म्हणून वाचतांनाही कंटाळा आला नाही…मस्त खुसखुशीत झाल आहे कंटाळापुराण…पण आता प्रतिक्रिया देताना कं ची बाधा झालीच…म्हणून थांबतो इथेच…काय भारी रोग आहे हा पढनेसेभी फ़ैलता है… 🙂

  • काय भारी रोग आहे हा पढनेसेभी फ़ैलता है… 🙂
   सही……..
   पण खरयं रे हा जांभई ग्रूपचा आजार आहे, संसर्गजन्य!!!!

 7. आणि अजून एक म्हणजे इतके दिवस आम्ही एका स्कॉलर, हुश्शार मुलीचा ब्लॉग वाचत होतो तर. तरी एवढ्या मस्त पोस्ट्स बघून मला वाटायचंच म्हणा 🙂

  • बाबा रे काय स्कॉलर काय, हुश्शार काय……. पण ’मुलीचा’ म्हणालास हे आवडले बघ!!! 🙂

   बाकि कंटाळा जिंदाबाद!!!!!!!! गौरीचे कमेंट वाच…. कंटाळ्याचा वकील आहे ती!!!

 8. mala vatate cancer jatit ch kantala aahe tu mandar/satyajit tumhala tighna baghun mazi aata khatri patali aahe ……hushar+kantakhor+aalshi+premal+emotional agdi ajab rasayan aahat tumhi lok …………Mama ekda Nasik la utaray che sodun direct bhuawal la gela hota aani mag parat Igatpuri ghari aalach nahi heheheh …………..karan First Class madhe zopala TC ne mast rajai dili aani zop lagali 🙂

  • अगं बाई तुझ्या कमेंटला तीन वेळा वाचले आणि जाणवले किती अक्षरे टायपायचा कंटाळा केलायेस तू!!!! 🙂
   kantakhor लिहून कंटाळ्यातला ’ळ’ खाल्लास की!!!
   असो पण आम्ही हुशार, प्रेमळ वगैरे जे लिहलयेस त्याबद्दल ठँकू!!!!
   आणि बालूमामा आणि शेखरमामा आणि त्यांच्या मैत्री आणि अभ्यासाचे किस्से यावरही एक भन्नाट पोस्ट होऊ शकते……बालू मामाला बाकि कितीही आळस असला तरी आपल्या सगळ्या भाच्यांवर प्रेम करण्याचा कधीच कंटाळा नाही गं… आपण नशीबवान आहोत सगळ्या!!!!

 9. हे हे हे … कंटाळामहर्षींचे मोठे उपकार आहेत आपल्यावर … लोकांना कंटाळा आलाच नसता, तर माणसाचे कष्ट कमी करणारे एवढे शोध लागले असते का? कुणाला तरी धान्य गोळा करत लांबलांब हिंडायचा कंटाळा आला म्हणून शेती सुरू झाली, ओझी घेऊन चालायचा कंटाळा आला म्हणून चाकाचा शोध लागला असं माझं प्रामाणिक मत आहे.

  • “कंटाळामहर्षींचे मोठे उपकार आहेत आपल्यावर …” १०० % सहमत…… तुझ्या या प्रामाणिक मताला माझा प्रामाणिक दुजोरा…………

  • अनिकेत तुझ्या कंटाळ्याला सध्या कोणी बोल लावणार नाहिये… 🙂
   तुझा कॅमेरा तुझी वाट पहातो हे माहितीये सगळ्यांना………….

   झालं आळशी महाराणी लिहायला कंटाळल्या……….. 🙂

  • तू डुलकी घेतली असणार हे नक्की, कसली मस्त कानटोपी वगैरे घातलेय 🙂
   प्रतिक्रीयेबद्दल आ…..भा……….र……….
   बाकि ’मायक्रो डुलकी” सहीच….

 10. तन्वी ताई,
  तुमचे लेख खूपच छान असतात. मी एक गोष्ट वाचली होती. राजाला जगातला सगळ्यात आळशी मनुष्य शोधायचा असतो. तो परिक्षेसाठी जमलेल्या सगळ्यांना एका कक्षात रहायला सांगतो. आणि रात्री त्या कक्षाला आग लावतो. सगळे भराभर पळत सुटतात. एकजण अगदिच आग जवळ आल्यावर पळतो पण एक महाभाग असतो जो तिथुन हलतच नाहि. शेवटि राजाचे सेवक त्याला वाचवतात. आणि तो ठरतो ’आळशांचा राजा’. खरेच, माणसे एवढि आळशी असतात का?
  पण तुमचा लेख मात्र नक्किच खुमासदार झालाय.

  • शैलजा आभार आणि स्वागत.. 🙂

   माणसे किती आळशी असतात किंवा खरं तर किती आळस अफॉर्ड करू शकतात हे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थिती सापेक्ष असावे असे मला वाटते गं!!!

 11. मला पण “कं” ची बाधा झालेली आहे बहुतेक.. लेख खुपच मस्त जमलाय .. एकदम पहिल्या ्धारेचा. एकदम डोक्यातच चढला. 🙂 नुसता हासतोय..

  • 🙂 :)…..

   महेंद्रजी आभार…. आणि हा लेख उलट सोपा होता कारण फक्त टायपायचे होते, बाकि विचार काहीच करावा लागला नाही. बालपणात एक फेरफटका मारला आणि पोस्ट झालही!!! कौतूक वाटते ते आई-बाबांचे कसे शांत रहात होते दोघे देव जाणॆ!!! 🙂

 12. khupach chaan..
  mi hi agdi tumchya ya kantal category madhlich ahe.. agdi goshti lakshat thewaychya kantala pasun..

  ha blog ata mi amchya navrobana wachayla denar ahe,. karan tyana watat hota ki mi ektich ha antique piece ahe
  🙂

  • दिप्ती ब्लॉगवर स्वागत आणि आभार…..

   आणि असले antique piece अनेक आहेत, ज्यांनी कमेंट्स टाकलेत ते तर आहेतच पण बाकिचे पहा कमेंट टाकण्याचाही कंटाळा…. तेव्हा काय तर अपनी मेजॉरीटी है!!!! 🙂

  • रेखा आभार आणि स्वागत..

   कंटाळा पसरतोय….. ’कंटाळा’ तितूका मेळवावा, ’कंटाळाधर्म’ वाढवावा!!!!

   कमेंटला उत्तर द्यायला उशीर होतोय कारण गुरुवार/शुक्रवार आमच्याकडे लॅपटॉप कोणी घ्यायचा य मुद्द्यावर तुंबळ युद्ध असते गं, ते इथे सुट्टीचे दिवस आहेत ना!!! 🙂

 13. सही झालीय…बाकी मला आई अजुनही सांगते ज्या गोष्टीचा कंटाळा करशील तिच मागे पडेल जास्त…सगळ्यात जास्त कंटाळा तर अभ्यासाचा त्यामुळे पाठ सोडत नाही एकंदरित…या नव्या राज्यात लायसन्स ट्रान्सफ़रची परिक्षा द्यावी लागते (आणि मेले एकाच देशाचे भाग आहेत तरी) त्याचा गेले तीन महिने कंटाळा करतेय कारण आता अभ्यास कोण करणार??
  असो…बाकी गॉसिपींग, हेवेदावे, राग, मत्सर हे नसते उद्योग करण्याचाही कंटाळा याबद्दल तुपलं आपलं शेम टु शेम….
  (आणि आता इतक्या छान पोस्ट लिहायला आमच्या कं कॉमेन्टची वाट नका पाहू म्हटलं….)

  • काय बाय सोबतं नाय वो तुमास्नी ह्ये असे वागने… अवो ४६ वी कमेंट तुमची … म्हनजे आता काय करावे आमी पामरानी… कुटेसा दडला व्हतासा वो माय…..घरचं कुकु, कुकुलं समदी ठीक ना वो???

   आन काय त्या परिक्सेचे ठेन्शन घेता वो… जायच अनं गोऱ्या सायबास्नी गाडी चालवून दाकवाची….जावा आता बिगी बिगी आनि उरका पयले त्ये काम!!! फुडच बगु फुडं!!!!

   • कुटं दडायला…कुकुलं कुचकुचत व्हतं बग..पर तुमची ही पोस्त दिसली तशी लागलीच आले म्हना तरी बी आमचा नंबर जाउ दे..आन बाये ती गाडी परिक्षा न्हाय अक्षी लेखी बघा..सम्दे असले नसले ते नियम अन चित्र वलखूल पैकी च्या पैकी मार्क घेऊन्शान यायची…

 14. ya, its “Kantala”……तू मामाच्या कंटाळ्याची बरीच publicity केलीये आणि ती तुझी बहिण आशू तिलाही आठवतेय बरेच…good…. पण असे अजुनही अनेक किस्से आहेत…..आम्ही दोघेही (तुझे दोन्ही मामा 🙂 अभ्यास करायला उद्धवच्या रुमवर जायचो आणि झोप काढायचो……आता म्हणशील झोप काढली तर काय!!!! पण आम्ही संध्याकाळी झोपायचो ते दुसरा दिवस रात्र आणि उठायचो ते थेट तिसऱ्या दिवशी सकाळी :D………..अश्या अनेक आठवणी सांगता येतील…..आहोत की नाही नशीबवान……..कंटाळा करून जगायलाही नशीब लागतं 🙂 आहे की नाही मी कंटाळा सम्राट………….आता पुरे कंटाळा आला…….

  • मामाजी तुझी कमेंट….. क्या बात है!!!!

   अरे आहेसच तू सम्राट …… आणि मी लिहितानाच काय लिहीलय बघ की तुम्हा दोघांचे किस्से लिहीले ना तर एक संपुर्ण भन्नाट पोस्ट होऊ शकते…. आणि हो त्यावर विद्यामामी आणि अनितामामीचे कमेंट घ्यायला हवे :)……

   माझी ही पोस्ट आणि त्यावरचे तुझे कमॆंट यावरचे आजीचे मत ऐकायला हवे… 🙂 ओरडेल ती आपल्याला जाम…हेहे….म्हणेल आळशी दोघेही एकमेकांना सपोर्ट करताहेत…..

 15. तन्वी … बऱ्याच गोष्टी कळल्या ह्या पोस्टमधून … एक तर ‘साडे एकतीस’ वर्षापासून तू अतरंगी आहेस आणि तशीच राहणार आहेस!!! दुसरे म्हणजे तू स्वतःचा पेपर स्वतःच तपासायचीस. हेहे…!!!

  आणि काय गं ‘काही दिवसातच तिचा कंटाळा येतो आणि मन नवे काहितरी उद्योग शोधू लागते!!!!’ ब्लॉगचे सुद्धा असेच होणार नाही ना?

  पण मला कसलाच कंटाळा येत नाही. दुर्दैवी आहे मी…!!!

  • ‘”साडे एकतीस’ वर्षापासून तू अतरंगी आहेस आणि तशीच राहणार आहेस!!! दुसरे म्हणजे तू स्वतःचा पेपर स्वतःच तपासायचीस. हेहे…!!!”…. अरे बाबा आई वाचते माझी माझे खरडणे…. मोठी हिम्मत केली हे लिहिताना……. 🙂
   लेडी हिटलर आता नाशकात रागावणार आहे मला पुन्हा 🙂

   ब्लॉगचे नाही रे असे होणार….. करमत नाही इथे आल्याशिवाय…..

 16. आम्हीही कंटाळापंथीयच आहोत. आणि माझ्याही बाबतीत ‘थोडा कंटाळा (याला वास्तविक आळशीपणा म्हणतात लोक… म्हणू देत! माझं काय जातं?) कमी केला असता तर कुठेच्या कुठे गेला असता हा मुलगा!’ हेच मत आहे सगळ्यांचं. आता एवढा कंटाळा करूनही मी कुठेच्या कुठेच (म्हणजे अमेरिकेत खर्डेघाशी करतोय… सरड्याची धाव कुंपणापर्यंतच!) आहे, त्यामुळे हे विधान फोल आहे हे मात्र जाणवलं आहे. 😉

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s