छोट्या छोट्या गोष्टी……

आज सकाळी नेटाने सगळं काम आवरून ठेवलं होतं!! स्वयंपाक झाल्यावर कामवाली बाई आली त्यामुळे सगळीच भांडी घासली गेली…… घरही आवरुन झालं….. कामवाल्या बाईकडे (तिच्या नकळत 🙂 ) लक्ष ठेवून घर स्वच्छ पुसुनही झालं……. बास!!! पर्फेक्ट पर्फेक्ट काय तो आजचाच दिवस असे वाटत होते……. आता ही बाई गेली की धूणं फिरवायचं तिसऱ्यांदा की मस्तपैकी दिवस हातात…..

खुशीतच दुपारची जेवण झाली…… मग अचानक आठवलं की आपल्या आनंदाच्या नादात धूणं प्रकरण राहिलय तिथेच , ते मशिनात आपली वाट पहातयं….. मग मोर्चा तिथे वळवला……. वॉशिंग मशिनला मनात धन्यवाद म्हणतं पाणी भरायला लावलं…… नेहेमीपेक्षा जरा जास्तच भरू दिलं म्हटलं आज कपड्यांना पण जरा चंगळ, उगाच दाटीवाटी नको…मोकळेपणे आंघोळ करू देत!!!!!!  मशीन ईमाने ईतबारे फिरू लागले……. एक दिड मिनिटात जाणवलं की काहीतरी लोचा आहे ……. पिकलेल्या केळाचा वास येतोय घरात….. मग हा वास (/गंध  जे हवे ते वाचा…. आम्ही घरात ’वास’ असेच म्हणतो त्यामुळे तेच टायपले आहे…असो मुद्दा वेगळा आहे ) मशीन लावण्यापुर्वी येत होता की लावल्यानंतर येतोय असा प्रश्न पडला!!!!! माझा आजचा मस्त मुड पहाता आजकाल डिटर्जंट वाले काय फळांच्याही वासाच्या पावडरी विकायला लागलेत का असाही एक हलकाफुलका विचार मनात आला….. पण मग सलमान कसे चादरीतून ’बरसावो तूम फुल ..’ म्हणतो तसे माझा नवरा चादरीतून सफरचंद, केळी, द्राक्ष अगदीच गेला बाजार कलिंगड उडवतोय असाही विचार आला…… या फळांचा आघात फुलांसारखा नसेल असेही मनात आले आणि माझी मीच स्वत:शी हसले!!!! (आता ही बया बावळट आहे या विचाराने तुम्ही हसत असाल तर आपली वेवलेंथ मॅच होत नाहीये असे समजा….. पण मी दर एक दिड दिवसाने अशी ’येडचाप विचारांची’ ट्रीट देत असते स्वत:ला 🙂  )

विषयांतर करावे माणसाने पण किती???? तर कुठे होते मी….हं!!! पिकलेल्या केळाचा वास ……. घरातली फळांची परडी (मराठीत बास्केट!!!) पाहिली तर सगळीच फळं सुस्थितीत होती…… बाहेरच्या उन्हाने त्यातले एकही अजुन अति पिकले नव्हते….. आता मात्र माझ्यातली लेडी करमचंद (किटीच म्हणणार होते…पण मग सुश्मिता मुखर्जी आठवली 😦 …..तेव्हा करमचंद {त्यातल्या त्यात} बरयं!!!  [ या वटवट्या सत्यवानाच्या पोस्टपायी ना कंसांची सवय झालीये …आता हेच बघा आधि साधा कंस त्यात महिरपी त्यात चौकट…काय आहे हे सत्यवाना!!!!!!] ) तर…. हा केळाचा वास येत होता वॉशिंग मशिनमधुनच!!! मोहीम फत्ते उगमस्थान कळलेय!!!…… मग डोकावले त्या मशीनात…..माझे शोधकार्य संपेपर्यंत मशीन फिरून फिरुन दमुन थांबलेले होते……थोडक्यात त्याने त्याचे काम चोख पार पाडलेले होते!!!!!! सगळ्या कपड्यांमधे मधे मधेच केळाची सालं तरंगत होती…… मधेच थोडा फेससदृश काहितरी होते…… माझ्या मनात वैताग आणि कपाळावर आठ्या जमायला लागल्या होत्या!!!

मशीनमधे केळं जाण्याचा संबंधच काय??????? गुन्हा सिद्ध होत नाही तोवर सगळेच आरोपी या दृष्टीने घरातल्या उर्वरीत तीनही सदस्यांना पाचारण करण्यात आले…… नवरा आणि मुलगा म्हणाले की आम्ही आत्ताच घरी आलोय आमचा काहीही संबंध नाही!!! ते सुटले…उरल्या दोघी मी आणि माझी लेक…… मी का बरं असे काही करू????? संशयाची सुई घरातल्या मोस्ट उचापती मेंबरकडे गेली…… आणि मला आठवले की हिला सकाळी केळं खायला दिले होते खरे…… मग तिला विचारले तर ती म्हणाली, मी तर खाल्लं केळं!! मग आता काय करावे????? पण माझ्या या लेकीचा भाऊ अतिशय हुशार त्याने तिला पुन्हा विचारले की गौरा तू केळ सगळे खाल्लेस ना , मग त्याचे साल कुठे फेकले????? त्यावर लेक बोलती झाली, “ईशान मी केळं सगळे नाही खाल्ले….. ते घाण होते, त्याला काहितरी काळं लागलेलं होतं मी ते धुवायला टाकलेय!!!!! ” 😀

कपाळावर हात मारून घेतला……. हसावे का रडावे कळेना!!!!!!  नवरोजी तर रवाना झाले हापिसात!!!! पण मग मी काय करणार……. सगळा प्रकार निस्तरता निस्तरता दोन तास गेले कारण मशीनने फिरून ते केळ आणि त्याच्या सालाचे अनेक छिन्नविछीन्न तुकडे कपड्यांमधे अडकवून ठेवले होते……. सगळं धुणं पुन्हा एकदा स्वच्छ (!!!) धुवून वाळतं घातले आणि हुश्श केले तेव्हा बराच वेळ गेलेला होता……… आलिया भोगासी असावे सादर!!!! घातलेत उचापती पोरं जन्माला मग निस्तरा… दुसरे काय!!!!! बरं हे सगळे होत असताना उत्सवमुर्ती निवांत घरभर फिरत होत्या…..नवे नवे उद्योग शोधत!!!!

हाच पराक्रम ईतर कोणाकडून झाला असता तर किती वैताग वाटला असता….. ईथे मी ग्लोबल वॉर्मिंगला टांग मारून पाणी नासत दोन दोन वेळा धूणं धुत होते आणि शांत होते……संध्याकाळी नवऱ्याला सगळी गाथा सांगितली तेव्हा आधि तर त्याला हसू आ्ले पण लगेच लक्षात आले की त्याच मशीनात त्याचेही कपडे जातात… मग सावध पवित्रा घेत त्याने त्याच्या नव्या शर्टांविषयी विचारले…….येव्ह्ढा वेळ शांत असणारे वातावरण तापवायला ती ठिणगी पुरेशी होती……. “अच्छा तुझे शर्ट म्हणजे कपडे आणि आमचे तिघांचे काय रे…..म्हणे माझ्या शर्टांचे काय!!! …… आहे ना आपल्या घरात B.E. केलेली धोबीण तिने धुतलेत हो तुमचे शर्ट व्यवस्थीत….. त्यांच्यातल्या पाण्याचे बाष्पिभवन व्हायला लटकवलेत हो ते!!!!”……. एक ना दोन नुसती धुसफूस सुरू होती माझी….. आणि ’अहो’ शांत… मग त्या तटस्थपणावर माझी आणिक चिडचिड……….

जरावेळाने वातावरणातला उष्मा कमी झालायसा अंदाज घेत नवरोजी म्हणाले तूला आठवतयं का ईशानने लहानपणी मोबाईल धूतला होता एकदा……. 🙂 …..

” हो मग न उचापत्या करायला काय झालेय.. तुझीच मुलं ना ती!!!! “… मी माझा राग न विसरता म्हणाले……

“आहेतच ती माझी मुलं…. पण मला एक सांग जवळजवळ सुरु झालेल्या ट्रेनखालती जाणे, कण्हेरीच्या पानात गंध घालून ते विडा म्हणून खाणे असले पराक्रम कोणाच्या खात्यात जमा आहेत??????”….. हसत नवरा म्हणाला.

आता मात्र मी पण हसायला लागले. हे दिव्य पराक्रम माझ्याच बालपणीचे आहेत…….

मुळात आडात जे तेच पोहोऱ्यात यायचे ना….. सहज गप्पा सुरू झाल्या, चतूर मुलांनी ही संधी ऒळखली आणि ते ही सामिल झाले…. ईशान म्हणाला, ” मम्मा सांग ना तुझ्या लहानपणची ट्रेनची गोष्ट !!!! “….. मग पुन्हा एकदा त्या गोष्टीचे साग्रसंगीत पारायण झाले…… मग माझ्या भावंडाचे, नवऱ्याचे त्याच्या भावंडांचे लहानपणी केलेल्या पराक्रमांचे किस्से ऐकता ऐकता वेळ मस्त गेला……

केव्हातरी मनात एका जाहिरातीतली ओळ आली, ’छोट्या छोट्या गोष्टी आठवाव्या किती……………’

(फोटो जालावरून साभार!!!!)

67 thoughts on “छोट्या छोट्या गोष्टी……

  1. सही.. हुश्शार आहे गौरा बरं.. मजा आली वाचतांना -आता चिडू नका, तुम्हाला स्वच्छ करायला जरी त्रास झाला असेल तरी आम्हाला मजा आली बरं का वाचायला. गौरा ला थॅंक्यु सांगा.. 🙂

    • 🙂 महेंद्रजी तुमचा पराक्रमही वाचला मगाशी…..

      आणि गौरावर रागावते खरं तर पण कार्टीला बरोबर जमते कसे हसवायचे आपल्याला ते….. नेमके आपण अगदी रागावून तिच्याकडे पहावे आणि तिने गोडं हसावे..म्हणजे झालं राग पळतो बरोब्बर!!!

      आणि उचापत्या तर काय विचारू नका…… अविभाज्य घटक झालाय आयूष्याचा 😀

    • पिय़ू तुझे भाच्चे आहेत तुलाच माहित कुठून सुचतात हे उद्योग… तुझ्या ताईला ऒळखतेस ना तू!!! 🙂

  2. हो खरच तुम्हाला जरी कपडे धुण्याचा त्रास झाला असला तरी आम्हाला मजा आली वाचताना.

  3. मलाही मजा आली वाचायला…..आता तुमचेही लहानपणीचे पराक्रम टाका ब्लॉगवर (तसे दोन पराक्रम तर कळले आहेतच)….बाकी नेहमीप्रमाणेच.. एकदम धो डाला…. 🙂

    • तुझी ईच्छा लवकरच पुर्ण होईल असे दिसतेय कारण सध्या मला तसेही ईतर काही विशेष सुचत नाहीये …आणि भारतात जायचे आहे काही दिवसान्नी त्यामुळॆ सारख्या बालपणीच्या आठवणी येताहेत…. 🙂

  4. मला पण जाम हसायला आले वाचताना. पण तुम्हाला काय त्रास झाला असेल याची पण कल्पना आली. आर्यनने एकदा फ्रिजमधले दुधाचे पातेले स्वतःवर सांडून घेतले, तेव्हा माझे फ्रिज, फरशी आणि आर्यन या सगळ्यांना धुताना काय हाल झाले होते ते मलाच माहीत.

    • सोनाली
      लकी आहेस तु. मी लहान असतांना गोडं तेल अंगावर सांडून घेतलं होतं. चांगलं पाच लिटर तरी असेल ते. मग घर आणि मला स्वच्छ करतांना आईचा जो वैताग होता, तो अजूनही आठवतो.

      • सोनाली सही आहेत ना आपली मुलं!!!

        महेंद्रजी तुमची कमेंट वाचून मला ईशानचा एक किस्सा आठवला त्याने एकदा असेच खोबरेल तेल अंगाला फासले होते आणि त्यावर टॅल्कम पावडर लावून तो ’तयार’ झाला होता….. माझ्या असेच नाकी नऊ आले होते त्याची तयारी आवरताना…………. 🙂

  5. गौरे बयो तुला अगदी मावशीकडुन गोड पप्पी…विक्रमी पोर हो……तन्वी,काहिही म्हण मुलांच्या ह्या करामती व्ह्यायलाच पाहिजेत नां..त्या शिवाय काय मजा गं….ही तुझी पोर सासरी गेली कि ह्या आठवणींवर जगशील तु…मस्तच बाकी…

  6. गौरा झिंदाबाद!! 🙂 तन्वी, वाSS…… उगाच रागावतेस तिला. तिच्या पराक्रमामुळे इतक्या जणांची सही करमणूक झाली ना. माऊ काय म्हणतेय ते वाचलेस ना…. शोमू बराच गुणी होता पण त्याचे माय व बाप दोघेही उचापती…. हीही…. बाकी पोस्ट एकदम धमाल झाली गं.

    • ताई अगं काय भावात पडते मला ही करमणूक 🙂

      बाकि तू उचापती हे वेगळे सांगणे न लगे!!! :))….
      हो ग ताई जपायच्या आहेत या आठवणी… माझा हाच खरा खजिना आहे!!!

  7. कं(टाळा) न करता भरपूर आणि सगळ्या प्रकारचे कं(स) वापरल्याबद्दल वटवट सत्यवान आपला आभारी आहे 🙂

    केळं धुवायला टाकणे हा प्रकार ऐकूनच मी जाम हसतोय इथे.. गौराबाई, एकदम सहीच भारी आहेस तू. मानलं तुला 🙂 (आणि आमच्या घरातल्या पुढच्या संभाव्य धोक्यांची जाणीवही झाली. 🙂 )
    दादाला बरोब्बर माहित्ये अचूक उत्तर मिळवण्यासाठी कुठले आणि कसे प्रश्न विचारायचं ते 😛

    हो आणि ते ट्रेनचे आणि विड्याचे किस्से आम्हालाही ऐकायला आवडतील. लवकर लवकर टाक पुढची पोस्ट.

    आणि ब्लॉगची रंगरंगोटी आवडली. आठवड्याभराच्या फॉर्मल वेअरला कंटाळून एकदम बीचवेअर मध्ये आल्यासारखा वाटतोय 🙂

    • पुढच्या संभाव्य धोक्यांची जाणीवही झाली ना सत्यवाना…. हेहे… त्याचसाठी लिहीतिये मी!!! 🙂

      अरे ब्लॉगला जरा बीचवर नेऊन आणलेय आजपासून ऑफिस सुरू :)… पुन्हा फॉर्मल वेअर!!!!

  8. अच्छा अश्शी मज्जा झाली तर !…. चला त्यामुळॆ मशीनही स्वच्छ झाले बरेच दिवसांनी?…खरे तर हे वाचत असतांना मी विचारणार होतोच ” आपल्या” काय काय उचापती असायच्या ? पण वाचता वाचताच पुढे कबुली जबाबही मिळालाच आहे !

    आता देवेंद्रजी म्हणतात तसे “तेही सारे ” एकेकदा ऐकवा……वाच्वा ..! म्हणजे उचापतींचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करता येईल !

  9. छोटीच गोष्ट आहे म्हणून सांगतो…….

    हे तुझ्या ब्लॉगचे नवे रूपडे डोळ्याला अतीच त्रास देत आहे !

  10. हे हे हे केळी धुण्याची आयडिया आवडली आपल्याला … नावाचा महिमा बरं हा 🙂
    ब्लॉगचं नवं रूपडं साजरं दिसतंय.

    • गौरी खरय़ं गं नावाचा महिमा 🙂 ……

      ब्लॉगला पुन्हा जुन्या रूपात आणावं लागलं गं…. ब्लॉगला एक सहमालक पण आहे ना (ईशान) त्याला जुनेच रूप हवे होते परत 😦

  11. तुझ्या लेकीचं खूप कौतुक वाटलं…तिच्या लॉजिक प्रमाणे तिनं काळं असलेलं केळं बरोबर धुवायला टाकलं होतं. आता मोठ्या माणसांना नाही कळत असल्या गोष्टी त्याला ती पोर तरी काय करणार?
    पण सर्व प्रसंगाचं वर्णन आणि शेवट सुंदर झालाय!
    सप्रेम
    अरुंधती

    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    • खरयं गं तिचे लॉजिक अगदी बरोबर होते…. पण आता बिनडागाचे केळे शोधावे लागणार मला 🙂

      तिच्या स्वच्छतेच्या वेडाचे काय बोलावे गं…. जिथे तिथे स्वच्छता मोहिम असते तिची…:)

      आभार गं!!!!

  12. मजा आली वाचायला…..गौराईच्या नावानं चांग भलं….:)

    कापडं धुता धुता ब्लॉगलाही नवी कापडं चढवलीत जनू????

  13. What an IDEA Madamji…कं ची बाधा…त्याग करून मस्त मस्त पोस्ट लिहल्याबद्दल अभिनंदन…सगळा प्रसंग कसा डोळ्यासमोर उभा राहिला एकदम..गौरीचा innocent चेहरा दिसला बघ डोळ्यासमोर 🙂 मस्त मस्त मस्त

    • गौरीचा innocent चेहेरा :)…. अरे बाबा चेहेरा भोळा पण करामती बघ …..

      प्रतिक्रीयेसाठी आभार रे!!!

    • अगं बायो नवे नवे कापडं घातले वो ब्लॉगाला पण आलय पुन्हा घरच्याच कापडात 🙂 म्हनलं जुनं ते सोनं!!!!

    • अरे तुला उत्तर द्यायचे कसे काय राहिले माहित नाही… असो सॉरी रे…

      माझे पराक्रम 🙂 लिहिते रे लवकरच…

    • Banana Flavoured Perfume सहीये गं….. तुझे ’किडे’ हेहे…काय शब्द आहे गं हा…. लिही न ब्लॉगवर….म्हणजे आम्ही वाचू!!!!

  14. वा रे वा !!! अगदी मस्तच. यावरून मला माझी एक गोष्ट आठवली. मी लहान असताना एकदा भाजीच्या पातेल्यातच बसले होते तेदेखील गरम गरम. अर्थात फार लहान होते तेव्हा. आईला किती त्रास झाला होता आणि माझ्या त्रासाचे तर विचारूच नका. बाकी, गौरी खूप logical person आहे म्हणायची.

    • जिवनिका आभार गं!!! आणि तुझे लहानपणीचे आणखी किस्से आता नासिकला आले की प्रत्यक्ष तुझ्या आईकडुनच ऐकेन…. 🙂

  15. Kitti sahi aahe ti… Ekdam perfectly logical thinking…!!!!!
    Mazya eka bhavane POND’S khalli hoti ka tar mhane powder laavun baherun gore hoto na mag khaun kayamacha , aatunach gora zalo asto…( nantar hospital la admt karave lagale)
    Tevha vaitag yeto pan nantar majja yete aathavayala…
    BTW, ” aamhalahi sanga na tumachya lahan panichi train chi gosht” 🙂

  16. विनोदी लिखाण आणि ते सुद्दा लेखिकेचे हे फार दुर्मिळ होते.आज प्रथम आपला ब्लॉग पहिला आणि हे पहिले सदर वाचूनच
    आपल्या विनोदी,आनंदी स्वभावाची कल्पना आली.आपण ब्लॉगवर लिहून आपली कला तर जपली आहेच पण आम्हाला टवटवीत
    केले आहे.आपल्या सनिदयात रहाणारे भाग्यवान आहेत….असेच लिह्त रहा…..शुभेच्छा……Bharati

    • भारती मनापासून आलेल्या प्रतिक्रीयेसाठी आभार आणि स्वागत गं!!!

      आनंदी स्वभावाचे म्हणशील तर खरं सांगू का आयूष्यात अडचणी येतातच गं पण मग जर मात करायचीच आहे तर हसत करावी नाही का!!! 🙂

  17. मस्तच लिहील आहे…अन त्याही पेक्षा लेकीने छान काम केल आहे…आवडली पोस्ट..आता ब्लॉग वाचतो…खूप आईक्ल आहे ..

    • सागर तुझ्या सगळ्या कमेंट्स साठी एकच प्रतिक्रीया देतेय रे…(वाच माझी या आधिची पोस्ट.. :)माझा कंटाळा….. )

      मनापासून आभार सगळी खर्डेघाशी आवर्जून वाचल्याबद्दल आणि न कंटाळता प्रतिक्रीया दिल्याबद्दल….

      बाकि मला ’ताई’ म्हण किंवा नको म्हणूस ….मी माझे वय न लाजता सगळीकडे सांगत असते (नॉट बिईंग अ टिपीकल वुमन यू नो 🙂 )… तेव्हा तुच ठरव…हेहे…. अरे मनापासून हाक मारलेली समजण्याईतपत तर प्रगल्भ झालोय नाही का आपण!!!

  18. Sahi ga…gauri BANANA FLAVOUR.mastch…Tanvi kiti innocent aastat ga lahan mula.thyana sadha gandh hi nasto ki pudhe kaai hoil te.Te thyanche logica laaun mokale houne jatat.hech thyanche niragaspan japle pahije aapan. baki lekh khupch….chhan zhala ga.

    • रेखा ठँकु ग!!!

      अगं बाई नको झालाय गं हा ईनोसंस आता 🙂

      अगं माझी लेक सतत उचापत करत असते गं…निस्तरताना नाकी नऊ!!!

    • आल्या बाई आपण… गौराईच्या धन्य मावशी राणी अफाट कल्पना आहे हो तुमची…. 🙂

      अगं मला नारळ कपड्यात अडकलेय आणि तो पसारा मी आवरतेय या कल्पनेनेच धडकी भरली गं….

    • सोनल अगं तूझ्या कमेंटला उत्तर द्यायचे राहूनच जातेय बघ…. असो, आहे खरी गं ती ’कुल’ आणि कुल राहूनच ती शांतपणे उपद्वाप बघ किती करतेय 🙂

  19. हाहाहा… झ्याक. इनोदी गोष्टी लई झ्याक लिवता बगा तुमी. आवडलं आमास्नी. आणि हो, ‘केळं धुणे’ यासारखी कल्पक गोष्ट माझ्या लहानपणी मी का केली नाही याची मला अजूनही हळहळ वाटतेय. 😀

    • संकेत आज ब्लॉगावर आले तर २० प्रतिक्रीया एकदम पाहिल्या 🙂

      आभार आभार आणि पुन्हा आभार 🙂 ईतक्या प्रतिक्रीया एकदम येण्याची ही ब्लॉगाची पहिलीच वेळ. जाम खुश आहे मी आज 🙂

      गेल्या कित्येक दिवसात एकही पोस्ट टाकलेली नसताना ब्लॉग हलता पाहून खूप आनंद झालाय मला. आणि याचे क्रेडिट तूला. पोस्ट वाचल्या आणि त्याची पावतीही न कंटाळता दिलीस, मान गये!! 🙂

      • २० प्रतिक्रियांना मिळून एक उत्तर?? हीहीही… मला वाटत होतं की मी ‘कं’ साम्राज्यातला एक महत्त्वाचा शिलेदार आहे. पण, तुम्ही तर अष्टप्रधान मंडळात आहात… 😉

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s