Tangents……

“अगं माऊ किती गार झालेत हात तुझे….कशाला गं उभी रहातेस AC समोर….. नंतर नुसत्या शिंका येतात मग!!!!”………..

प्रचंड उकाड्यात किचनमधल्या गॅससमोर उभे रहाण्याने आधिच कंटाळले होते मी …. वळून पाहिलं तर समोरचं पिल्लू मला खाली वाकायला सांगत होतं खूणेने…… वैतागतच मी खाली वाकले…. तशी नाजुक हाताची ती बंद मुठ माझ्या गालावर उघडली!!!! थंडगार नाजुकसा स्पर्श मला सुखावून गेला…… 🙂

पिल्लू म्हणालं, “ तूला गरम होतय ना म्हणून तुझ्यासाठी AC ची हवा हातात भरून आणली होती!!!!!!  🙂 “

माझे डोळे नकळत पाणावले होते. त्या कोवळ्या मुठीतला हा सुखद गारवा मला आय़ुष्यभर पुरणार आहे आता.

आम्ही एका परिचितांच्या घरी जमलो सगळे. मुलं मस्ती करत होती…. त्यांच्या सायकलवर मुलं आलटून पालटून बसत होती…. आया रागावत होत्या, ’अरे पडाल रे’ च्या सुचना करत होत्या. मुलचं ती, कसली ऐकायला!!!!!! माझाही मुलगा गेला तिथे, सायकलवर चढण्यापुर्वी त्याने माझ्याकडे पाहिले, क्षणभरची ती नजरानजर त्याची नी माझी…… आणि हा मुलगा तिथून निघून आला. त्या सायकलवर चढण्याचा मोह झाला असला तरी आपल्या आईला हे पटत नाहीये हे त्याला एका नजरेत समजले :). मी मंद हसले, तो ही !!!! कोणीच काही बोललं नसलं तरी तो अबोल संवाद जास्त आवडला मला.

माझे डोळे कौतूकाने की समाधानाने भरले माहित नाही. पण मी सुखावले नक्कीच…… नजरेचा धाक नकोय मला पण नजरेची भाषा मात्र समजायला हवीये!!!!

लॉंग ड्राईव्ह सगळ्यांचा आवडता प्रकार. भटकताहेत गाडी घेउन सगळे आणि अचानक लेक बोलली, “मम्मा माझे तोंड सारखे उघडतेय आणि तोंडातून हवा येतेय……“  आधि तर कळेना हे काय नवे म्हणून पण मग ही ’जांभई’ ची व्याख्या आहे हे कळल्यावर मात्र हसलो सगळे :).

खेळायला गेलेली लेक मधेच परत आली ती डोक्याची क्लीप हातात घेऊन…… “का गं, का म्हणून परत देतेस ती क्लीप ?????” मी विचारले.

“अगं परत देतेय कारण मला नको आहे ती “ 😉 ती म्हणाली आणि खेळायला पळून गेली. जाताना चेहेऱ्यावर आपल्या आईला ईतके साधेही कळत नाही हे भाव मात्र न विसरता आणून गेली 🙂 …… तिने ती क्लीप परत देण्याचे कारण सांगावे ही माझी अपेक्षा , तर क्लीप नकोय म्हणुन मी ती परत करतेय ही साधी गोष्ट आईला समजावी ही लेकीची अपेक्षा 🙂

लेक शाळेतून परत आलेला….. कसला तरी अपुर्ण अभ्यास, शिक्षकांची काहितरी कुरकूर सोबत घेऊन आला म्हणुन की माझाच काहिसा त्रागा म्हणून पण सगळ्याची परिणिती झाली ती त्याच्या गालावर जोरात मारलेल्या चापटीत….. फटका तर मारला पण अपराधी पणाच्या भावनेने माझेच मन मलाच खात होते. त्याचे काठोकाठ भरून आलेले डोळे, गालावरच्या दुखण्याने किती होते आणि मनावरच्या आघाताने किती कल्पना नाही. चटकन त्याला जवळ ओढले आणि समजावू लागले…. कुठलेही कारण सांगणे किती फोल आहे हे मलाच जाणवत होते पण तरिही मी बोलत राहिले. पाच एक मिनिट गेल्यावर तो पुन्हा समोर उभा राहिला आणि म्हणाला, “मम्मा पुन्हा तसेच मार मला!!! “

“अरे काहितरीच काय बाळा, मला आधिच खूप वाईट वाटतय!!!”…… मी म्हणाले….

“नाही मम्मा तू तशीच ऍक्शन कर पुन्हा… “…..तो म्हणाला.

शेवटी मी पुन्हा तशीच ऍक्शन केल्यावर तो चटकन खाली वाकला…… माझा हात हवेतच फिरला….. तो म्हणाला, “ मम्मा मगाशी पण माझ्या मनात असेच आले होते की आपण पटकन वाकावे…. पण मग तूला तर मला मारायचे होते ना!!!! म्हणून नाही वाकलो!!!!!! “

तो विसरून जाईल कदाचित हा प्रसंग पण मला बसलेली ’चपराक’ मात्र आयूष्यभर साथ देणार आहे आता!!!

पसायदान म्हणणार होता लेक….. आधि स्वत:चे नाव सांगतो म्हणे, मग शाळा, वय वगैरे!!!! अचानक म्हणे, “मम्मा मी असे सांगू का ….. मी म्हणणार आहे ’पसायदान’ by  ज्ञानेश्वर “ ….. 🙂

तो निरागसपणे बोलून गेला पण मला मात्र पसायदानाबरोबर, ’पसायदान by ज्ञानेश्वर’ कायम लक्षात राहील.

माझ्याच ईवल्या पिल्लांकडुन येणारे हे tangents ….. माझ्या मनाच्या वर्तूळाची त्रिज्या मात्र वाढवत असतात. काय नाही या नव्या परिघात……. निर्भेळ, निखळ, निर्व्याज आनंद. कधी हळूवार कधी खिदळणारं हसणं!!!!! खूप सारी दंगामस्ती. ….. कधी एकमेकांवर रुसणं, मग समजावणं……. एकमेकांच्या सानिध्यात फुलणं, वाढणं !!!! 🙂 एकमेकांच्या नकला करणं…. कधी धडपडणं….. कधी सावरणं!!!!!

बरेचदा वाटतं मनाच्या भिंतींना बाहेरच्यांचे धक्के बसताहेत….. उगाच औदासिन्य येतं!!!! आपल्याच मनातली सकारात्मक, विधायक विचारांच्या खजिन्याची गुरूकिल्ली हरवल्यासारखी होते……. आपल्याच माणसांनी दिलेला हा आनंदाचा साठा कुठेतरी लपल्यासारखा वाटतो….. अश्याच वेळासांठी ही पोस्ट 🙂 ….. मलाच शिकवायला, समजवायला की आनंदी रहाण्याची खूप खूप कारणं आहेत माझ्याकडे.

अश्यावेळी आवर्जून वाटतं where is the time to hate when there is so little time to love!!!! 🙂

49 thoughts on “Tangents……

 1. वाह..तन्वी..अतिशय भावपूर्ण पोस्ट ग..किती सहजपणे लिहून गेलीस तू. तुझी दोन्ही बाळ डोळ्यासमोर आणि तू. अप्रतिम.
  मूठभर एसीची हवा तुला खूप सुखावून गेली असेल ह्यात शंकाच नाही 🙂

  • अगदी बरोबर महेंद्रजी.. आपण समजून घ्यायला हवं…..

   कधी कधी त्यातच कमी पडते मी अस वाटतं मला…. मग पून्हा वाटतं की चूका करत त्यातून शिकतच पार पडावे लागणार आहे. मुलं मात्र भरभरून आनंद देताना अजिबात चुकत नाहीत यातच फार मोठे सुख आहे 🙂

  • निखील स्वागत आणि आभार 🙂

   हो हे tangents लक्षात ठेवायचेच आहेत म्हणूनच त्यांची ही साधी सुधी पोस्ट 🙂

 2. सहज चुकवू शकत असलेली चपराक केवळ आईला आपल्याला फटका द्यायचा आहे म्हणून न वाकणे…. तन्वे, देवापुढे प्रार्थना करू गं… पिल्लू असेच आई-बाबासाठी आयुष्यभर समजुतदार राहिल. गौराचे चिमुकल्या मुठीत आईसाठी गारवा भरून आणणे खूप भावले गं. माझी दोन्ही भाचरे इतकी गुणी आहेत तरी तू त्यांना दामटत असतेस. वाSSSS…. 🙂

  • हो गं ताई खरचं देवापुढे प्रार्थना आहे ग्ं की पिल्लू असेच रहावे कायम!!! अगं तो प्रसंग आठवला तरी सारखी टोचणी लागते गं मनाला…. त्याचा तो भेदरलेला चेहेरा जसा माझ्या नजरेसमोरून जात नाहीये तसा माझा रागावलेला चेहेरा त्यालाही लक्षात असेल ना गं!!! मग मन पुन्हा पुन्हा अपराधी भावनेने भरून येतं बघ …..

   मुलांना रागवावं लागतं, प्रसंगी दामटावं लागतं पण आपला ताबा न सुटु देता हे भान आता नाही सुटणार माझं!!!!

 3. माझ्याच ईवल्या पिल्लांकडुन येणारे हे tangents ….. माझ्या मनाच्या वर्तूळाची त्रिज्या मात्र वाढवत असतात. काय नाही या नव्या परिघात……. निर्भेळ, निखळ, निर्व्याज आनंद. कधी हळूवार कधी खिदळणारं हसणं!!!!! खूप सारी दंगामस्ती. ….. कधी एकमेकांवर रुसणं, मग समजावणं……. एकमेकांच्या सानिध्यात फुलणं, वाढणं !!!! 🙂 एकमेकांच्या नकला करणं…. कधी धडपडणं….. कधी सावरणं!!!!
  १००% सहमत…..तन्वी ,अग्ग खरच…मुलांबरोबर च प्रत्येक क्षण हा लाख मोलाचा… ओंजळीत जपुन ठेवण्या सारखा….खुपच छान लिहिलेयेस…

  • आभार माऊ 🙂 …. हो गं खरच प्रत्येक क्षण ओंजळीत जपण्यासारखा असतो…. म्हणून तर या अश्या पोस्ट येतात… न जाणो एखादा क्षण सुटला तर!!!

 4. हे tangents खूप स्पेशल आहेत….तो प्रत्येक क्षण लाखा मोलाचा आहे….खूप भावस्पर्शी झाली आहे पोस्ट….

  तन्वी मला तुझा विरोपाचा पत्ता पाठव….invitation सेंडवायच आहे….माझा विरोपाचा पत्ता खाली देतोय त्यावर पाठव.

  yogesh.mundhe@gmail.com

  • शिल्पा आभार्स…. :)…. तूझे अनूभव असेच असायचे जत्रेत बिछडलेल्या भावंडांना सांभाळतोय ना आपण …हेहे

 5. Khupach chan lihita tai tumhi. Tumache sagale post vachale aahet mi. Tumachi lihinyachi padhat far aawadate. Rojachya jiwanatalya goshti pan far fulawun lihita.

  – priti

  • प्रिती स्वागत आणि आभार :)….

   नेहेमी लिहीलेले वाचतेस तश्या मला आता तूझ्या प्रतिक्रीया वाचायला येऊ देत 🙂

  • गजानन स्वागत आणि आभार ….पोस्टसाठी आणि पोस्टच्या नावासाठीही 🙂
   पोस्टच्या नावासाठी आलेली पसंतीची ही पहिली पावती 🙂

 6. किती सुंदर, हळुवार, भावस्पर्शी लिहिलं आहेस नेहमीप्रमाणेच.. !!!!!

  एकेक प्रसंग, त्यातून ओथंबून वाहणारी निरागसता, पिल्लांचे हसरे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले.. God Bless !!

  इतका निष्पाप विचार करायला आणि ते विचार समजून घ्यायला पुन्हा लहान व्हावसं वाटतंय.. किंवा सोपी आयडिया म्हणजे तुझ्या सगळ्या पोस्ट्स वाचतो पुन्हा 🙂

  • >>>> इतका निष्पाप विचार करायला आणि ते विचार समजून घ्यायला पुन्हा लहान व्हावसं वाटतंय.. किंवा सोपी आयडिया म्हणजे तुझ्या सगळ्या पोस्ट्स वाचतो पुन्हा

   अरे हरभऱ्याची शेती सुरु केलीस का??? 🙂

   असो…. पण खरय़्ं रे बालपण अनुभवावं आणि अनूभवत रहाव…. आणि तत्वज्ञान तर शिकावं ते त्यांच्या वागण्यातूनच…. त्यांच्याकडुन घेत रहावं कारण देताना त्यांना ’मोजता’ येत नसत… मोजमाप नंतर मोठे शिकवतात.

   कालच एका मैत्रीणीकडे गेले होते रे…तिचा मुलगा खेळणी देताना ईतकी सहज देत होता की बस. काहितरी वस्तू गौराने घेतली म्हणून मी रागावले तर तो म्हणे अगं काकू घेऊ दे प्लॅस्टिकची आहे तुटणार नाही काही :)….सगळं काही ईतकं मनापासून बोलत होता तो की वाह रे वाह!!!

 7. ही पोस्ट मी ८व्यांदा वाचतोय…

  “मम्मा माझे तोंड सारखे उघडतेय आणि तोंडातून हवा येतेय……“

  तशी नाजुक हाताची ती बंद मुठ माझ्या गालावर उघडली!!!! थंडगार नाजुकसा स्पर्श मला सुखावून गेला

  हे दोन्ही प्रसंग खूप भावले….किती निष्पाप, निरागस, आईच्या प्रती काळजी,प्रेम….हे असच आयुष्यभर राहू दे…हीच स्वामी चरणी प्रार्थना.

  • योगेश आभार हा शब्द बरेचदा खूप लहानसा वाटतो….

   काय म्हणू …..तुम्हा सगळ्यांचे प्रेम, शुभेच्छा अश्याच कायम सोबत असू द्या !!! खर,य़ं माझ्याकडे सुखी रहाण्याची खूप खूप कारणं आहेत… तुम्हा सगळ्या मित्रमंडळाचा लोभ हे त्यातलेच एक महत्त्वाचे कारण 🙂

  • नीता आभार आणि ब्लॉगविश्वात स्वागत… एक मात्र आहे ’अधूनमधून’ न येता नेहेमी येत रहा! 🙂

 8. Radawtes.
  Asech anubhav yet raahtat diwasakathi malahi majhya pillache. shabdat mandu shakat nahi pan sagale kashan hridayashi ghatt dharun thewawese wattat. majhe aani fakt majhech asttat te. kharach g. khup khup udas watat tevha, konich aapal nasat tevha, he kaljache tukade, aapalach extension, aaplach bhag, eka sparshane suddha ubh kartaat parat.

  • खरयं गं सोनल अगदी…. हृदयाशी घट्ट धरून ठेवायचे आहेत हे अनुभव…पण वय वाढतय ना आपलं 🙂 त्यामुळे विसरायला होतात बघ कधी कधी…त्यासाठी ही पोस्ट!!!

 9. खुपच बढिया ब्लॉग !!!!!! मला खुपच आवडला !! आज पहिल्यांदाच तुमचे ब्लॉग वाचनात आले आणि मी तुमच्या लिखाणाची फॅनच झाले.

 10. Apratim mee jevha kevha tumchya aani tmchya bachche company vishayi vachto na tevha angavar shahre yetat …….

  lekach aani tumcha prasang khup bhavla …….

 11. मुल समजूतदार असतातच पण
  सध्याची तर खूपच सर्जनशील आहेत .. क्रेअतीवे असतात..
  मला काही अपत्य वगैरे नाहीये..
  पण पुतण्याचे अनुभव मला येतात छान…
  खूप शार्प असतात लहान मुल…
  आपणआच कुठेतरी हरवून, गुंतून राहतोय अस वाटत…
  ते किती निर्मल असतात.. आपल्यात मनातच जलमात साचत जातात,
  वेळच्या वेळी साफ नाही केली कि.. आपण खूप आतल्या आत साठवून ठेवतो..
  आपण वेळच्या वेळी व्यक्त होत नाही.. हे एक चांगल मध्यम आहे व्यक्त होण्याचा
  तर आपण त्याचा उपयोग केला पाहिजे…
  बाकी पोस्त… १ नंबर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s