गाते माहेराचे गाणे…..

“मम्मा मला बाबूंबरोबर रोज रेल्वे स्टेशनला जाता येणार आता….. य्येsssssssss!!!!!!! तपोवन, नंदीग्राम, पंचवटी, गोदावरी मै आ रहा हूँ!!!!!!!!!!!!!!!!!!!” चिरंजीव आपल्याच नादात ओरडत होते…..

“मम्मा यावेळेस मी पण जाणार ना ???? ” …कन्यारत्न

“हो हो … सगळी सगळी मजा करा ठीके!!!” ….मी

एक एक बेत आखताहेत सगळे, काही बोलले सांगितले जाताहेत तर काही कागदावर.. आणि बरेचसे मनात 🙂

मुलांना आजोळी जायची, आजी-आजोबांना भेटायची घाई… तर मला ’माझ्या घरी’ जायची घाई झालीये!!!!

पुन्हा एकवार तो मायेचा उंबरठा ओलांडून आत जाईन मी!!  मुंबईहून नाशकात पोहोचत पोहोचत बाबा आणि मुलं एकमेकांशी गप्पा मारण्यात गुंग होतील…. मी आणि नवरा दोन खिडक्यांमधून बाहेर पहात असू!!!! ठाणे सोडल्यावर मन धावायला लागेल माझे…. बाहेरच्या प्रत्येक झाडा, पाना फूलाला आसुसून पाहीन मी… मोकळ्या आकाशाला साद घालेन….. “आले रे बाबांनो मीsssss”  त्या प्रत्येकाला सांगेन… त्यांचे माझे मुक नाते मी जपेन आणि पानांची सळसळ करून झाडंही मग मला “ये गं!!” म्हणतील……. एकीकडे “बाबा कसारा घाट मस्त झालाय हो आता…………” असे काहितरी बोलून आजोबा आणि नातवंडामधे शिरण्याचा निष्फळ प्रयत्न करेन…… ईगतपुरी, घोटी पार करत गाडी नाशकात शिरेल……

आता माझ्या मनाचा वेग गाडीपेक्षा खूप जास्त असेल…. दारात उभी असलेली आई मला आत्ताच दिसायला लागेल….. वर्षभरात बदललेले नासिक डोळ्यात साठवत घरापुढे गाडी उभी राहील……गेटजवळचा गुलमोहोर रंगीबेरंगी स्वागत करेल…. मागच्या आंब्याच्या कैऱ्या दिसताहेत का मी पटकन नजर टाकून बघेन…..मी भराभरा दाराकडे चालत जाईन आणि मग आदेश येईल, “मम्मा थांब!!!! नानी ते काय पोळी आणि पाणीने ओवाळेल आपल्याला… then u can enter the house!!!!”……….. अस्सा राग येईल मग वाटेल त्याला सांगावे, ” शहाण्या हे माझे घर आहे… माझी आई आहे ती, मला माहितीये ती काय करेल ते!!!!!”

घरात गेल्यावर आईला चहाची ऑर्डर देइन मी… किचनच्या ओट्याजवळ ती गेली की तिला मागून घट्ट मिठी मारेन मी… चहा होत होत आई भरलेवांगे,भरीत भाकरी, ईडली, आई हे आई ते अश्या सुचना देत देत तिच्या कुशीत विसावेन मी……

आता सकाळी दहा वाजताना पुन्हा एकवार किचनमधे शिरेन मी… “बाबा चहाssss”  करून ओरडेन…. “कुलकर्णी बाई तुमच्या मुली भलत्या चहाबाज!!!” बाबा आईला म्हणतील…. गेल्या वर्षभरात आईने घर काहीच बदललेले नसेल… मग मी तिला रागावेन… “ताई अगं तू कर हवे ते बदल…” आई म्हणेल…. किचनमधले ठिय्या आंदोलन आळशीपणे पेपर वाचन संपल्यावर उठेल केव्हातरी 🙂

मी पोहोचण्याच्या दिवसाच्या हिशोबाने आईने गहू भिजत घातलेले असतील…. सकाळी ती म्हणेल “चीक करू का खायला????” सगळे एकसुरात “होss” करून ओरडतील….. मी उगाच निरर्थक घरात फिरेन… मागच्या दाराने अंगणात जाऊन पुढच्या दाराने पुन्हा आत शिरेन…. अश्या परिक्रमा करताना अंगणातल्या झाडांना  पहात राहीन…. मागच्या टाकीच्या नळाखाली पाय सोडून धुण्याच्या दगडावर बसून राहीन थोडावेळ… जणू त्या थंडगार पाण्यात गेल्या वर्षभराचा शीण वाहून जाईल मग…. 🙂 … किचनमधे आई-बाबा, माझा नवरा गप्पा मारत बसतील….. बहिणाबाई माझा मागोवा काढत मागच्या दारी येईल…. गप्पा सुरू होतील मग…. केव्हातरी आई हाक मारेल……

पुढच्या दारी पेपरवाल्याने पेपर टाकलेला असेल… मी तो उचलायला जाईन, तर मुलं पेपरवाल्या मामाशी गप्पा मारत असतील….. तोवर दुधवाला येइल…. ” चिक्या कसा आहेस रे?” तो मुलाला विचारेल….. मग माझ्या लक्षात येइल तो आपल्या दारी नाही आला…. मी बाबांकडे पाहीन….. यांचे रेग्युलर दुधवाला लावणे, बंद करणे सुरू आहे समजेल मला…… “अगं हा उशिरा येतो वेळा जमत नाहीत आमच्या” वगैरे परिचित कारणं बाबा सांगतील…… तोपर्यंत तो परत येईल,” कशी आहेस ताई?? दाजी कसे आहेत?? … आहेस ना आता महिनाभर….” तो कुठलाही किंतू मनात न आणता माझ्याशी आणि बाबांशी गप्पा मारत राहील….. समोरच्या बिल्डींगमधल्या गॅलऱ्यांमधे काका-काकू येतील…. मग गप्पा मोठमोठ्याने रंगतील निदान १५-२० मिनीट…… मी कधी गप्पांमधे भाग घेत कधी अलिप्तपणे त्या संवादात रमेन….. मनात कुठेतरी सुखावत राहीन पण!!!!!!!

गुलमोहोर एव्हाना रागाने लालबुंद होईल….. मनात म्हणेल हिच्या एकटेपणात कित्येकदा साथ दिलीये मी पण ही बदललीये आता….. आल्यापासून माझी दखल नाही घेतली हिने….. त्याला एकनजर पाहिले की  मात्र नजरबंद होइल तिथे….. त्याचे हिरवेगार शेंदरी रुप मोहावत राहील…. खुळ्यागत त्याच्या पानाफूलात रमेन मी….. मनात रागावेन मग मी देखील….. यावेळेस जरा जास्तच बहरलाय … कचरा किती होतोय रे दारात!!!!! तो हलकेच एक लकेर घेईल आणि अजुन काही फुला-पानांची बरसात करेल….. :)…. जा रे बाबा मला खूप वेळ नाहीये… आजीकडे जायचेय त्याला सांगेन मी….. तो अजूनच हसेल….थोडा पलीकडे झुकून हलकेच पावले टाकत येणाऱ्या आजीवर सावली धरेल तो!!!!  सुंदर साडी नेसलेली, नीटनेटकी आवरलेली….. बगलेत ’पाकिट’ आणि हातात छत्री  घेतलेली आजी मला दिसेल येताना….. “ये गं आई!!!!” माझी आई स्वयंपाकघरातल्या जाळीअडून म्हणेल…… अच्छा म्हणजे मी माझ्या पाउलखूणांचा ईथे मागोवा घेत बसलेय आणि जाळीअडून मातोश्री आम्हाला पहाताहेत वाटतं….. आजी हसेल….. आई हसेल… मी देखील आणि अंगणात बागडणारी माझी लेकही……………. 🙂

“पणजीआजी ssssss” ती धावेल आजीकडे….” छकुले किती मोठी झालीस गं!!!!!” आजी म्हणेल……. धावलेली छकुली एक असली तरी आजीच्या मात्र आम्ही तिघी छकुल्या 🙂 तिच्याकडे पहात असतील….. “तायडे अगं काय हा अवतार???? ” आजी रागावेल मला…. “अगं म्हातारे तुझ्यावर नाही ना गेले मी”, म्हणत तिच्या कुशीत शिरेन मी….. पॉंड्स…. चिरपरिचित सुगंध पण तो माझ्या आजीची ओळख आहे, स्वत:लाच पुन्हा सांगेन मी!!!! हातातलं सोनचाफ्याचे माझ्यासाठी आणलेले फुलं आजी मला देईल मग…. तिचा हात हातात घेऊन मी म्हणेन,” काय हे चिरतरूण बाई तुमच्या हातावर सुरकुत्या???”………….. 🙂

माझं वजन वाढलय, यावेळेस मी योगा क्लास लावणार आहे, झालचं तर कुकरी क्लास पण ई. ई. बडबडेन मी… कोणीही दखलही घेणार नाही… मग थोड्यावेळाने बहिणाई ओरडेल,” ताई सगळ्यांना माहितीये तू घरात बसणार आहेस फक्त 😦 ” मी काय ऐकून घेईन वाटलं का…… “तूला होऊ दे ना दोन मुलं मग बघू किती ऍक्टिव रहातेस तू???? ” मी सुनावेन तिला…. “मला कशाला आईला बघ… आपलीच आई आहे ना ती!!!” वगैरे म्हणत वाद घालेल ती…..

माझा लाडका मामा आणि मामी येतील मग…. मी मामाला त्याच्या स्वत:च्या तब्येतीबाबतच्या हेळसांडीबद्दल व्याख्यान देत राहीन आणि तो आपलं मला चिडवत राहील या ना त्या कारणाने… लहानपणी ’ताई तुझं नाक बघ किती लहान आहे माझं कसं मोठं म्हणून’ चिडवायचा तसा….. केव्हातरी रागावेन मी आणि सरळ मामीकडे जाईन आणि ठणकावून सांगेन की मामा तुझ्यापेक्षा मला माझी मामी जास्त आवडते….. आमचं बालपण, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ गप्पा वाट फूटेल तिथे वहातील मग…. 🙂 …. मामा हलकेच माझ्या डोक्यावर हात ठेवेल मग….. आता वाटेल आपण परतून जाऊच नाही ईतके दुर… इथेच रहावे या सगळ्यांच्या जवळ… 🙂

केव्हातरी मोठ्या मामीचा फोन येईल ,” बारका बाई कशी आहेस??” ती म्हणेल…… मामी अगं सुटलेय गं आता, मी कुरकुर करेन…..

एखाद्या दिवशी पहाटेच जाग येईल …. मग मी दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत जाईन…. पहाटं….. एकटीनेच बसून राहीन तिथे…..वर असणारे आकाश माझे एकटीचे असेल तेव्हा…..बोटायेव्हढे नारळाचे झाडं मात्र आता ईतके वाढलेले असेल की आम्हा माहेरवासिणींना ईतक्या वरही साथ देईल….नुकतेच दव पडलेले असेल त्या पानापानावर हलकाच हात फिरवेन मी…. नारळाशी अबोल संवाद होत राहील आणि तितक्यात तो येईल …. पुन्हा एकदा मारूती चितमपल्लींचा कुकुडकोंबा आठवेल मला… तेजस्वी काळा आणि तपकिरी रंग असलेल्या भारद्वाजाला मला सांगायचे असेल की मी आल्या दिवसापासून तूला शोधतेय रे!!! तो फांदी फांदीवर बागडेल… मी लपून कधी प्रकट होत त्याला पहात राहीन…. सुगरणींचे अनेक खोपे नारळाच्या पानापानाला असतील…. एखादी सुगरण मन लावून आपला खोपा विणत असेल….. मी मग भारद्वाजाला हलकेच खूण करेन “गप्प बैस जरा” तीला मन लावून काम करू दे जरा!!! त्यादिवशीच्या सुर्योदयाचे आम्ही तिघं साक्षीदार होऊ मग……

(आज थांबतेय इथे….पण माहेरपुराणं संपलेले नाही बरं!!)

Advertisements

37 thoughts on “गाते माहेराचे गाणे…..

 1. Kiti bare hey typical title..’maherache gaane’ asa vichar karat vachayala ghetale.

  Vachoon adhichya vicharabaddal laaj vatali. kiti sundar..ata pudhacheavkar yeu del.
  Coincidence bagha. Kaalach ratri Nashikhoon drive karun Thanyala alo. Kasara ghatat twilight hota.
  Chandr valley chya var..misty sandhiprakash.

  Cant explain..it was haunting but beautiful lonely drive..ektaach hoto..rasta hee nava kora..sundar nirmanushy..

  Just felt like sharing..aj sandhi ali..

  • नचिकेत आभार रे… ’कसारा घाट’ मला कुठल्याही रूपात आवडतो….पावसाळ्यात जितका आवडतो तितकाच तो उन्हाच्या रखरखाटातही…. बालपण ईगतपुरीला गेलेय… घाट पक्का माहेरचा… 🙂 … लहानपणी रेल्वे ईंजिनमधे बसून घाटात जायचो आम्ही… घाटात उतरून टेकड्या चढून घाटनदेवीला यायचो….

   >>>misty sandhiprakash…. आधिच कधी पोहोचते असे झालेय त्यात आता तू केलेले हे वर्णन… I can just imagine what a wonderful feeling it must have been on that road… एकटेपणा सोबत असतो तेव्हा आपल्या आणि आपण एकटे नसतो किंवा असेच काहितरी.. जरा गुढ असे, पण हवेहवेसे!!!!

 2. पिंगबॅक गाते माहेराचे गाणे….. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

  • मैथिली आभार गं!! 🙂

   या गाण्याचे पुढचे कडवे टाकतेय बघ… माहेरपुराण ते थोडक्यात आवरणे बहिणाबाईंना नाही जमले आपली काय बा प्राज्ञा…. 🙂

 3. छान लिहिलंस…तुझ्या नेहमीच्या स्टाइलमध्ये नाहीये पण आतुन वाटायचं तू असंच लिहीशील अगदी तस्संच…मी आत्ताच जाऊन आलेय त्यामुळे काय बोलु?? उगाच हळवं होऊन चालायचं नाही….तू खूप मजा कर…पावसाळ्यात सगळंच कसं छान छान वाटतं नाही?? नाशिकचा पाऊस कसा असतो तेही येऊदेत…(मी आत्ताच उन्हाळा पाहुन आलेय तिथला)

  • अपर्णा आभार गं!!! ’नासिकचा पावसाळा ’अगं एक पोस्ट पुरायची नाही मला त्याचे वर्णन करायला…. 🙂

 4. Good one !!! expected post 🙂 Good one yesss Aaji tashi ch chalat yeil tula bhetay la sahi kele aahes sagale varnan 🙂 I hope this time you will have some time to visit us 🙂

 5. हळवं केलेस बघ तन्वी…फ़ार माहेरचा हळुवार स्पर्श झाला…मी अताच माहेरी जाउन आले आहे नां.घाल घाल पिंगा वा~या माझ्या परसात.माहेरीच्या सुवासाची कर बरसात !!!!!!म्हणुन …अपर्णा म्हणतेय ते खर आहे..हळवं होवुन चालायचे नाही..जाउन ये मस्त…………..आणि खुप मज्जा कर..

  • आनंद आभार रे!!!! 🙂

   अरे तो गुलमोहोर हक्काचा आहे माझा…. दु:खात सुखात तो तटस्थपणे उभा असतो पाठीशी…..आता तर असा बहरला असेल की पहात रहावे त्याला… 🙂

 6. खूप छान लिहिलंयस. अगदी मनाला स्पर्शून गेला प्रत्येक शब्द. ती उत्सुकता, तो आनंद इतका छान वर्णन केलायस ना की बस.
  मी सगळीकडे काहीतरी रेफरन्सेस देत राहातो हा आरोप पत्करून मी सांगू इच्छितो..की जेव्हा केव्हा आम्ही आजोळी जायचो, तेव्हा आई अगदी ह्याच पद्धतीने प्रत्येक गोष्ट अनुभवत राहायची अशीच रिऍक्ट व्हायची. मी नेहमी पाहिलंय ते. आणि तू तर परदेशातून येतेस. तुझ्या भावना मला अश्या कळल्या!

  • आभार विध्याधर 🙂

   >>>>>मी सगळीकडे काहीतरी रेफरन्सेस देत राहातो हा आरोप पत्करून मी सांगू इच्छितो..

   अरे आरोप काय त्यात… आपण सगळे व्यवहारापेक्षा भावनेला कांकणभर अधिक महत्त्व देणारी माणसं आहोत, त्यामूळे अनूभव आणि अनूभूती बरेचसे जुळतात…. आणि ते जिथे जुळतात तिथेच आपण मैत्री करतो ना!!! मग असे रेफरंन्स येणारचं…मी पण देते नेहेमी… देत जा बिन्धास्त!!आपलेच ब्लॉग्स आहेत… 🙂

   बाकि अरे लेकी आणि माहेर हे नातं थोड्याफार फरकाने सगळीकडे सारखेच…. 🙂

 7. अतिशय सुंदर लिहिले आहेस…”मी पोहोचण्याच्या दिवसाच्या हिशोबाने आईने गहू भिजत घातलेले असतील…. सकाळी ती म्हणेल “चीक करू का खायला????” सगळे एकसुरात “होss” करून ओरडतील…..” माझी ताई सुद्धा घरी आली का आई तिचे असेच लाड पुरवते तिच्या आवडी निवडच बघते वातावरण खूप आनंदी होत ती घरी आली का. अगदी तसच काहीस चित्र डोळ्या पुढे उभ राहिलं.

  • सागर स्वागत आणि आभार…. 🙂

   >>>>माझी ताई सुद्धा घरी आली का आई तिचे असेच लाड पुरवते तिच्या आवडी निवडच बघते वातावरण खूप आनंदी होत ती घरी आली का.
   सगळ्या आया सारख्याच नाही का!!! 🙂

 8. खूप सुंदर लिहिलंयस ग! माहेरी जाऊन आले तेंव्हा थोड्या-फार फरकाने बऱ्यापैकी हे सगळे क्षण मी मिळवले. आज हा लेख वाचून परत एकदा अनुभवले.

  तुझ्या लिहिण्यातून असं वाटलं की प्रत्येकीचं माहेर वेगवेगळं, मानसं वेगवेगळी, माणसं वेगवेगळी, अनुभव खूप वेगवेगळे पण भावना “relative” असूनही किती सारख्या! “माहेर वाढू दे!” असं म्हणताना प्रत्येक मुलीची भावनाही सारखीच असावी बहुतेक! देवाने त्याबाबतीत सगळ्या मुलींना सारखंच “program” केलं असावं.

 9. खूपच सुंदर……. मला बसल्या बसल्या माझ घर आठवलं..
  २ week झालेत आता घरापासून दूर येऊन, कदाचित त्यामुळे तुझा blog जरा जास्तच भावला..

 10. तन्वे, वाचत होते तर शब्दच गायब झाले… पाणावलेल्या डोळ्यांनी तरिही पाहू लागले तर तू समोरच आलीस आणि चलं गं दोघी मिळून जावू म्हणू लागलीस… अगदी मनातलेच लिहिलेसं गं.जीव हळवा-हुळहुळा झालायं. आपण लेकी कुठेही गेलो तरी कायमच्या आईपाशीच रमलेल्या. आईच्या-आजीच्या कुशीतली माया, सुख, शांतता… बयो, अगदी भरभरून आनंद घे गं. पुन्हा परतलीस की तोच सोबत असणार आहे.

 11. कस्संल्लं लिहिलं आहेस ग तन्वी.. झक्कास.. आपण मनाने केव्हाच घरी पोचलेलो असतो असं जे नेहमी म्हणतो ना त्याचं अगदी जिवंत चालतं बोलतं वर्णन.. इतकं की परत आल्यावर तू सगळी वाक्य त्यांचा भविष्यकाळ बदलून भूतकाळात लिहिलीस की झाला तुझा भारत दौ-याचा वृत्तांत.. इतकं चपखल वर्णन वाटतंय ते.. आणि त्या सगळ्या गप्पाटप्पा, खोटे खोटे रुसवेफुगवे, खेचाखेची, चिडवाचिडवी सगळं सगळं इतकं सही वाटतंय वाचायला की पुढचं विमान पकडून मला घरी जावंसं वाटतंय.. !!

  • हेरंबा आभार रे…..

   अरे वर्णन करायला खूप कष्ट नाही लागले…
   आठवणींच्या गावाला मनाला नेले की सगळे प्रसंग नजरेसमोर येतात बघ!!सगळे असेच होते घरी…..
   त्या आठवणींची पोस्ट केली फक्त यावेळेस… 🙂

 12. आजच सकाळी भ्यां करुन रडले कि मला घरी जायचं आहे नागपूरला..आणि अशातच तुझी ही पोस्ट..:( आता नक्की जावं लागणार आहे maaheri

  • जाऊन ये गं!!! निदान सध्या तरी तुला तुझ्या ईच्छेने पळता येईल.. 🙂 … मग मुलांच्या शाळा, परिक्षा मागे लागल्या की चक्र त्यांच्या वेळापत्रकानूसार फिरतात….

 13. तन्वीताई,
  किती सुंदर लिहिले आहेस.
  मी ठाण्यात आई पण ठाण्यात आणि ऑफिसला जाताना आर्यनला सोडायला रोज जाणं होतं, तरीही सुट्टीत दोन तिन दिवस आई भेटली नाही तर जीव कासावीस होतो. वर्ष वर्ष भेट नाही म्हणजे कठीणच.
  खूप खूप मजा करा सगळे मिळून.

 14. तुझं माहेरचं गाणं आळवणं फारच लयबध्द, तालबध्द ( तालस्वरात म्हणंत नाहीय्ये !) आहे गं ! अन्‌ ते एकदम स्वरात चाललेलं ऐकून जणू पुन:प्रत्ययाचा अनुभव घेउन आलं ….डोळ्यांच्या कडा ओल्या करवित … तूं येत्येस त्याच्या काही दिवस आधीच आमच्या चिमण्या त्यांच्या त्यांच्या घरट्यांकडॆ रवाना होत असतील ! गेले महिनाभर चाललेला चिवचिवाट तेव्हा बंद झालेला असेल… तो पुढील वर्षा पर्यंत !…..
  पण चला तेव्हा बंद झालेला चिवचिवाट तुझ्या रूपाने पुन: अधून मधून ऐकायला येऊ लागलेला असेल ! …कसे असतात हे अनुभव नाही ?…. जेव्हा आम्ही शिक्षणासाठी परगावात रहायला आलेले असू तेव्हाही सुटीत घरी परततांना असेच अनुभव येत !…अगदि गव्हाच्या चिका सकट !… आता मुली माहेरपणाला येतात तेव्हाही असाच काहीसा अनुभव… आधी येण्यातील आनंद/ गंम्मत तर नंतर जातांनाची हूर हूर ! … प्रत्येक वर्षीची !

 15. प्रतिक्रिया द्यायला
  स्वर, व्यंजन आणि बाराखडी शिवाय कुठली अक्षर आहेत का शोधात होतो..
  पण कुठे सापडलीतच नाहीत…
  निव्वळ सहजसुंदर…
  आवडलं…

 16. मनाचा अगदी ठाव ठिकाण माहिती आहे, सवयीचा परिणाम असेल,आहे, आपण केलेले वर्णन म्हणजे आपले अनुभव व आपल्याववर झालेले संस्कार आहे , वर्णन अपतिम व छ्यान आहे,अगदी आपल्या घरी आल्या सारखे वाटते ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s