खोप्यामधी खोपा……….

सुगरण पक्ष्याचे नुसते नाव घेतले तरी बहिणाबाई आठवल्याशिवाय रहात नाही…….

बहिणाबाई म्हणते……..

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला……
देखा पिल्लांसाठी तिने
जीव झाडाले टांगला……

सध्या मुक्काम पोस्ट नासिक असल्यामुळे आईच्या घरामागच्या नारळाच्या झाडावर सुगरण पक्षी बांधत असलेले घरटे पहायची संधी मिळाली. तसा दरवर्षी मी हे घरटे पहाते. पुर्ण झालेली घरटी, न पटलेली अपुर्ण राहिलेली (सोडलेली) घरटी……त्यासाठीची त्या ईवल्याश्या पक्ष्याची लगबग ….. एक एक काडी, कापुस आणून त्या घरट्याचे सुरू असलेले बांधकाम सगळेच खिळवणारे असते……

यावेळेस त्या घरट्याचे आणि त्या सुगरणीचे फोटो काढायचा विचार आला पण माझा हा विचार सौ. सुगरण बाईंना फारसा पसंत आला नसावा कारण मी कॅमेरा सरसावावा आणि त्यांनी पानाआड लपावे हे सत्र बराच वेळ चालले……पण मी हार मानते कशाला काही फोटु मिळवलेच………:)

लपाछूपीचा खेळ …..

शेवटी या सुगरणीच्या नकळत तिचे फोटो काढण्यात मला यश मिळाले…. 🙂

 

तिची उलुशीच चोच…
तेच हात तेच बोटं…..
तुले दिले रे देवाने…
दोन हात दहा बोटं…..

बहिणाईने माणसाला विचारलेला हा प्रश्न किती योग्य आहे हे या सुगरणीच नीटसपणा समजावत होता.

 एव्हाना माझे अस्तित्व तिला जाणवायला लागले होते…..पण घरट्यात दोन पिल्ले आहेत हे मलाही समजले होते…… मी तिथून कधी हटते याची वाट ती पहात होती, आणि जमल्यास पिल्लांचे फोटो काढता आले तर पहावे याची मी 🙂

 तास दोन तास तो पक्षी आणि मी रमलो एका वेगळ्याच विश्वात …..वेळोवेळी तो ईवलासा अगदी आपल्या हाताच्या तळव्यापेक्षा लहान पक्षी मला जाणीव करून देत राहिला माझ्या खुज़ेपणाची,ती चिकाटी,ते कलाकुसर, ते नेटकेपण आपल्यात नाही ही खंत वाटत राहिली मग मनात …..

24 thoughts on “खोप्यामधी खोपा……….

  • मस्तच रे पंकज …..जाम सही आहेत फोटो 🙂 मी पण सुगरण घरट्यात कधी जाते अशी वाट पहात होते पण तिला माझा गनिमी कावा समजला असावा … ती बहाद्दर बाहेरच बसुन राहिली बराच वेळ…..

 1. बहिणाबाईंच्या अप्रतिम कवितेच्या ओळीचे हे सुंदर फोटोबरोबर आले रसग्रहण खुप भावले.. थोडावेळ वेगळ्याच विश्वात नेलेस.

  जियो तन्वी!

  • आभार दीपक 🙂

   अरे मी स्वत:देखील दरवर्षी या सुगरणींची वाट पहात असते…. एक विलक्षण अनुभव असतो त्यांचे घरटी विणणं पहाणं हा!!!!

 2. ताई इज बॅक.
  ह्यावेळी काव्य आणि छायाचित्र ह्यांचा मेळ. नाशकातला वेळ मस्त सत्कारणी लावतेयस!
  सुगरणीचा खोपा पाहून मला खरंच खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं. आज मी पहिल्यांदाच सुगरण पक्षी पाहिला, तुझ्या फोटोंमध्ये. आत्तापर्यंत शोपीस म्हणून असलेली त्यांची घरटीच पाहिली होती.
  छानच आलेत सगळे फोटो…मेहनतही तेव्हढीच केलीयस तू म्हणा! 😀

  • तुला निमंत्रण धाडले होते,नाशकात आला असतास तर प्रत्यक्ष सुगरण पक्षी पाहू शकला असतास…..Next Year nakki!!!!!..

   आभार म्हणु की नको हा संभ्रम होता, जाऊ दे नाहीच म्हणत 🙂

  • माऊ अगं मला विशेष मेहेनत नव्हती करायची, कॅमेरा घेऊन लपून बसले होते येव्हढेच….बाकी श्रेय सगळे त्या सुगरणीचे 🙂

 3. वा वा. देशातूनही ब्लॉगगिरी चालू आहे तर.. मस्त मस्त…

  >> आपल्या हाताच्या तळव्यापेक्षा लहान पक्षी मला जाणीव करून देत राहिला माझ्या खुज़ेपणाची

  मला वाटतं निसर्गातला प्रत्येक सजीव आणि निर्जीव घटक ही जाणीव आपल्याला सतत करून देत असतो. मात्र ते जाणवून घेणारे विरळाच..

  • >>>>>>वा वा. देशातूनही ब्लॉगगिरी चालू आहे तर.. मस्त मस्त…

   जय ब्लॉगिंग !!!!

   >>>>मात्र ते जाणवून घेणारे विरळाच..

   खरय रे अगदी!!! 🙂

 4. फोटो सुंदर आहे, निसर्गाची व बहिणाबाईच्या कवितेची अठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ;;;;; महेशकाका

 5. WAA MASTACH…..TUMCHYAA MADHYE ASLELYAA ANEK GUNANACHI MAHITI TUMCHYAA VIVDH POSTS MADHUN MILAT ASTE…PARANTU PHOTOGRAPHY SAATHI (ESPECIALLY BIRD WATCHING SAATHI) LAAGNAARE KAUSHALLYA AANI CHIKAATI HA SUDSHA GUN TUMCHYAAT AAHE HE PAAHUN AANAND JHAALAA……

  LAGE RAHO….

 6. तन्वे, अगं खूपच सही पकडलेस गं तिला. फोटो मस्तच आणि त्यांची तू केलेली गुंफण त्याहूनही भावली. 🙂 जियो!

 7. Mast post aahe ……… aani photos sudha…….fakta ek information sugran “male” gharate banavato/bandhato not female. Gharate ardhe/purna bandhun zale ki sugaran female yete gharate tila aawadale ki pudhe jate 🙂 o.w. sugaran male navin gharate tayar karato.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s