खो…..

छळ मांडलाय या खो प्रकरणाने गेले काही दिवस……. म्हणजे ’मला झोप येत नाही माझे चैन गायब झाले ssssss’ अशी अवस्था झाली होती…. (वरील ओळी ’मुझे निंद ना आये मुझे चैन ना आये’ या गाण्याचे भाषांतर आहे….. 🙂

थोडक्यात पुढे वाचायचे की नाही ते इथेच ठरवा… 😉  नंतर डोके दुखायला लागल्यास , चिडचिड झाल्यास, आपला वेळ वाया गेला असली काही भावना आल्यास माझा अजिबात दोष नाही…. ईथवर आला असाल तर स्वत:च्या जबाबदारीवर पुढे वाचा!!!! शक्यतो भिंतीजवळ बसा नंतर डोके आपटावे वाटल्यास सोयीचे होईल …. 🙂

तर सुरूवात झाली ती गाणे निवडण्यावरून…. जाम सुचत नव्हते….. न्युनगंड कशाला म्हणतात ते समजले अक्षरश: ……तरी घाईघाईने श्रीताईच्या आधि उरकतेय हा प्रकार म्हणजे तिने केलेला सुंदर अनुवाद वाचून लोक इथला मानसिक छळ विसरतील 🙂

भाषांतर या शब्दाचा अर्थ निवडलेल्या गाण्यासाठी आपली ’भाषा’ आणि मुळ अर्थापासून जरासे (लक्ष द्या खूप नाही) ’अंतर’ असा सोयिस्कर लावून घेतल्यावर जरा हुश्श केले आणि म्हटलं ,”आने दो!!”   🙂

निवडलेल्या गाण्याची गायिका कू/सौ. (माहित नाही) शनाया ट्वेन आहे…. मला साहेबाच्या भाषेतली बरीच गाणी आवडतात आणि समजतात (असा माझाच समज आहे…. स्वत:बाबतीत मला कुठलाही समज असू शकतो …लोकशाही आहे!!! ) …

गाणी हा प्रकारच तूफान फ्येव्हरेट असणाऱ्या माझ्यासारख्या गद्य व्यक्तीने (मला आमच्या थेअरी सबजेक्टमधे नेहेमी बरे मार्क असायचे 🙂 ) ही असली तोडमोड करू नये खरं तर पण कभी कभी मेरे भी दिल मे खयाल येतो की ’का नाही करायचे?  करून बघू एकदा ….’

मुळ गाणे, (मुद्दाम लिरिक्स वाले गाणे टाकलेय… सगळेच माझ्यासारखे हुशार नसले मग!!! आणि खर्राखुर्रा विडिओ टाकला तर या गाण्यांमधे मधेच केव्हा काय येइल भरवसा नाय बा.. तेव्हा लिरिक्सच बरे!!!! )

आठवणींच्या राज्यातल्या त्या,

ओळखीच्या वळणावर…..

नेहेमीच मग पुन्हा विचार येतो…..

अजुनही तूच आहेस,

ज्याच्यात गुंतलाय श्वास……

सुख् दू:ख रागलोभाच्या पलीकडल्या या ,

नात्याचीच आपल्याला आस…..

आठवतं तूला ,

प्रवाहात मन मारून धारा न होता……..

प्रवाहाविरूद्ध पोहून राधा व्हायचा,

निर्णय मी घेतला जेव्हा…….

निरूद्योगी अनेक सरसावले ,

सोपं नाहिये बरं का!!

येता जाता म्हणु लागले…..

सोपे नसतात बघ सारे रस्ते,

ओळखीच्या रस्त्यांवरही तर असतातच खड्डे……

अनोळखी रस्त्यांची खुमारी नवी,

निदान नव्या ठेचा लागतात पायी……

नियतीचे निर्णय नी प्राक्तनाची मर्जी,

यावर का ठरायचे सारे….

फसव्या कल्पना नी खुळचट भावना,

यापलीकडले आयूष्यच न्यारे!!!

आठवणींच्या राज्यातल्या त्या,

ओळखीच्या वळणावर…..

नेहेमीच मग पुन्हा विचार येतो…..

कधितरी पुन्हा घ्यावा हातात हात,

सांगावे तूला मनापासून आज…..

माझ्यातल्या मी ला,

तुझ्यातल्या तू ने जपले…..

तुझ्यातल्या तू साठी,

मी जगाशी भांडले…..

खरयं रे अगदी खरयं,

अजुनही तूच आहेस,

ज्याच्यात गुंतलाय श्वास……

सुख् दू:ख रागलोभाच्या पलीकडल्या या ,

नात्याचीच आपल्याला आस….. 🙂

हुश्श!!! संपले … सुटले एकदाचे…….

(नेहेमी हा ब्लॉग आणि पोस्टा वाचणाऱ्यांनो ..नवे जर कोणी आले तर त्यांचा विचार करा रे!!! तुम्हाला हा अत्याचार सहन करायची सवय आहे… 😉 )

आवरा आवरा हे ’खो आवरा!!!! 🙂

(तळटीप:  अमित (अस्मादिकांचे मंगळसुत्र) बाबा रे ईतर कोणाला समजो न समजो तूला नक्की समजेल रे मला काय म्हणायचेय!!!)

माझा खो शिनूला ….

Advertisements

33 thoughts on “खो…..

  • शेखर तू या प्रकारातला गुरू आहेस बाबा… माझी मात्र दमछाक झाली हे लिहिताना!!!

   आभार रे 🙂

 1. अजुनही तूच आहेस,

  ज्याच्यात गुंतलाय श्वास……

  सुख् दू:ख रागलोभाच्या पलीकडल्या या ,

  नात्याचीच आपल्याला आस…..

  पहिले वाचतांना तरी वाटलं की तू त्या ओरिजिनल गाण्याचे लिटरली शब्दशः भाषांतरच करुन ठेवलंय की काय, पण नंतर तुझी कविता वाचली… अतिशय सुंदर बनवलीय गं… यानिमित्ताने तुझ्यातली कवयित्री तरी समोर आली म्हणायची, यानंतर अशाच सुंदर सुंदर कविता आम्हाला वाचायला मिळतील, अशी आशा व्यक्त करतो.

  बाय द वे, तू भारतात आहेस की मला न भेटताच निघून गेलीस युएई ला?

  आणि मी पिकासावर आत्ताच केलेल्या ट्रेकचे काही फोटोज टाकलेत, ते पाहण्यासाठी तुला आमंत्रित केलंय (मेल चेक कर), कसे वाटले ते नक्की सांग… 🙂

  • विशाल आभार रे!! 🙂

   >>>पहिले वाचतांना तरी वाटलं की तू त्या ओरिजिनल गाण्याचे लिटरली शब्दशः भाषांतरच करुन ठेवलंय की काय…

   नाही रे अजिबात..तसा खरच हेतू नव्हता माझा…केवळ ते एक अत्यंत आवडतं गाणं म्हणून ते रेफरन्स ला घेतले…..

   बाकि कवयित्री वगैरे..नको रे !! अरे ही एक पोस्ट लिहितानाच नाकी नऊ आले माझ्या 🙂

   तुझे फोटो पहायचे आहेत नक्की… म्हैसमाळ अत्यंत आवडती जागा आहे माझी!!
   बाकि मेल लिहितेच तूला!!

 2. ताई,
  अगं काय हे…चक्क शनाया ट्वेन चं गाणं आणि एव्हढा मस्त अनुवाद…
  >>प्रवाहात मन मारून धारा न होता……..

  प्रवाहाविरूद्ध पोहून राधा व्हायचा,

  हे मला कैच्याकै आवडलं… 🙂

  माझ्या ताईनं इतका उत्तम अनुवाद करून, माझ्या बाजूनं राहिलेली कमतरता भरून काढली…

  बाकी…

  >>मला साहेबाच्या भाषेतली बरीच गाणी आवडतात आणि समजतात (असा माझाच समज आहे…. स्वत:बाबतीत मला कुठलाही समज असू शकतो …लोकशाही आहे!!! ) …
  हे वाचून मला माझ्या जीव की प्राण मुपीवरचं – ‘मी एक चतुर स्त्री आहे. (हे फक्त माझेच मत आहे असे नाही.)’ हे आठवलं.. 😛

  • >>>> एव्हढा मस्त अनुवाद… 😉

   ही मी रक्षाबंधनाची आगाऊ भेट समजते… नाहितर त्या ’र’ ला ’ट’ ला मस्त म्हणण्यासाठी हिंमतच हवी बाबा!! 😉

   बाकि मुपीबद्दल, अरे माझा एक भाऊ आहे त्याचे अत्यंत आवडते ठिकाण त्यामूळे वाण नाही पण गुण लागला…. 😦

 3. जबरदस्त तन्वे…

  संपूर्ण अनुवाद आवडलाच पण

  “प्रवाहात मन मारून धारा न होता……..
  प्रवाहाविरूद्ध पोहून राधा व्हायचा,”

  यातलं प्रवाहातली धारा आणि प्रवाहाविरूद्धची राधा हे जाम जाम जाम जाम जाम जाम जाम जाम जाम जाम आवडलं… जिओ !!!

  • हेरंबा आभार रे!!! 🙂

   शिनुबाईंना खो दिलाय आता एक मस्त अनुवाद वाचायला मिळेल…. माझी तर फ्या फ्या उडाली होती मग हिंदी गाण्यांचा नाद सोडला आणि साहेबाला गाठले…म्हटलं हिंदी गाण्यांची कशाला वाट लावा…

   बाकि तुम्ही बाप माणसं …हा प्रकार सहन करून वर कौतूकही करताय..आभार म्हणजे दुप्पट आभार 🙂

 4. मी असा अत्याचार याआधी इथे केला आहे तुला माहित आहेच पण हेरंबाने खो दिल्यावर काय झाल माहित नाही पण अजुन जमवता आल नाहिये…असो पण तुझा हा अत्याचार मात्र सुखावह आहे… 🙂

  • देव अरे लिही पटकन .. तू यापुर्वी केलेला अनुवाद अत्याचार असता तर हेरंबने तूला खो दिलाच नसता… लिही पटकन आम्ही वाट पहातोय…

   आभार रे!!!

 5. खर तर खो हा प्रकार मला आजच समजला. महेंद्रजीच्या आजच्या पोस्टवरून..आणी आता इथे धडकलो..शायना ट्वेन माझी आवडती गायिका. आणी हे गाणे तर इतके आवडते की काही विचारू नका…नेमका त्यालाच तुम्हे खो दिलात.
  अगदी अप्रतिम लिहलय तुम्ही..हे मी जरा अतिशयोक्ती करतोय असे वाटेल तुम्हाला कदाचित पण असे अजिबात नाही…ह्या गाण्याला १००% न्याय दिला आहे तुम्ही…इथे कोणी जावेद अख्तर नाहीये की जादुगारासारखे शब्द वापरावेत.
  एक तर आपल्या पोतडीत खूप कमी शब्द असतात त्यांना घेवून हे असले शिवधनुष्य पेलायचे म्हणजे अवघडच आहे…
  खूप छान 🙂

  • झम्प्या ब्लॉगवर स्वागत आणि आभार… 🙂

   >>>>इथे कोणी जावेद अख्तर नाहीये की जादुगारासारखे शब्द वापरावेत.
   हे खरचं आवडलं आणि पटलंही…

 6. तन्वे, अगं किती सुंदर न्याय दिलास. ( बापरे! या विभीला धरून मी धोपटणार आहेच त्यात आता तुझाही नंबर लागलाय… मला तर धडकीच भरलीये…. या खो ला घाबरून मी चक्क ब्लॉगवरूनच पळ काढलाय… विभी, ऐकतो आहेस ना? )

  जीवनाचे नेमके सत्य व हळुवार तरल शब्द यांचा सुरेख मिलाफ झालाय. आणि तळटीप ब्येसच. 😀

  • तायडे अगं कुठे पळतेयेस…. आम्ही वाट पहातोय तुझ्या पोस्टची….

   कुठलेही कारण चालणार नाही पटकन पोस्ट यायला हवीये….. समजले!!!

   आणि आभार गं!!

   (बाकि विभीला धोपटायचा विचार बदलू नकोस 😉 …. )

 7. अरे वा!
  मलाही

  “आठवतं तूला ,

  प्रवाहात मन मारून धारा न होता……..

  प्रवाहाविरूद्ध पोहून राधा व्हायचा,

  निर्णय मी घेतला जेव्हा.. ”
  हे खूप खूप खूप आवडलं..

  • मीनल आभार गं!!!

   बाकि ते ताकाच्या पट्ट्या वगैरे जे काय हवे ते स्वत: ठरवून घेतलेस ना?? 😉

 8. वा झकासच जमलंय की. सायबापेक्षा मला हेच जास्त आवडलं. (कारण हे कळलं :))
  मला हे प्रकरण काय आहे हे आत्ताच जरा जरा समजतंय. पण मला हे कळत नाही की धाकले अंबानी आमच्यावर रूसले की नेमका हा ट्यागा ट्यागीचा खो खो सुरू होतो. गचके खात चालणार्‍या इंटरनेटला कानाला धरून जरा इथे टेकावं तर ही भानगड समजते. मागच्यावेळेसही असंच आत्ताही असंच. आम्हाला खो मिळालेला आत्ताच समजतोय, सध्या एखादं कन्नड किंवा तामिळ गाणं सापडतंय का याचा शोध जारी आहे :)) {बाय दी वे अजून कोणी आ आन्ते वर तुटून पडलंय की नाही? शी: जरा पांचकट झाला पण असो.} तन्वी बयो खो दिलास त्यातच एखादं गाणं तरी सुचवायचस….:(((माझी पण अवस्था हळ्ळूहळ मुझे नींद ना आये व्हायला लागली गं बाई.

  • तू त्या धाकल्या अंबानीचे नेट फेक बघू आधि… त्याच्यापायी आम्ही चांगल्या पोस्टना मुकतोय….

   कन्नड किवा तामिळ गाणं… सुचवू का एक…’बॉम्बे’ च घे ’कन्नालने….’

   आभार वो बाय!!! 🙂

   बाकि ते आ आन्ते बाबत… अगं म्येन्दुचे लोचे सुरूच आहेत बरं… माझ्याही मनात आधि तोच पांचटपणा आला होता.. 😉

 9. माझ्यातल्या मी ला,

  तुझ्यातल्या तू ने जपले…..

  तुझ्यातल्या तू साठी,

  मी जगाशी भांडले…

  हे खरंय अगदी खरंय गं बयो. मस्त मस्त मस्त. umhhaaa

  • 🙂 …. म्येन्दु गं म्येन्दु आणि त्याच्यावरच्या वळकट्या दुसरं काही नाही… बर्रोब्बर समजलेय तुला मला काय म्हणायचेय ते… 🙂

   तुझ्या खो ची वाट पहातेय…

 10. मला तर वाटलं की कवितेत पण स्वागत टाकतेस की काय आता… मी त्या स्वगतांना मिस्सल 🙂
  मूळ गान बघितलं नाहीये, त्यामुळे मूळ असलेली तुझी कविता आत्तातरी आवडलीये.

  • माझी ’कविता ’ आवडली म्हटलं नं की मला खूप आवडतं 🙂
   कारण त्या कविता (???) ने मला जाम छळलेलं असतं….
   मुळ गाणं आता दिसतेय का बघ !!

 11. <> really very true… I don’t know how I missed to comment on this last time but, today when I was reading this post again , I realized that, this is the fact of my life… who else could understand me much better than you……….. Nobody ever trusted me & showed even little faith that I can do something in my life… but you are the only one who fought against all odds, believed me more than myself & lead to me where I am today… let people laugh at this…… but those who know our history will understand my feelings…. thanks for always being on my Side….. Keep on Winning…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s