मैत्र…..

त्याची मिटिंगला जायची तयारी जवळपास पुर्ण झाली होती…. सगळ्या फाईल्स वगैरे पुन्हा तपासत असतानाच त्याचा फोन वाजला….. कपाळाला जरा आठ्या पाडतच त्याने फोनवर नंबर पाहिला….. नंबर त्याच्या ओळखीचाच होता….. तरिही त्याला आश्चर्य वाटले, हिचा फोन आत्ता… हे कसे काय बुवा??? जवळपास २ वर्षानी तिने त्याला फोन केला होता…..

गेल्या जवळपास पंचवीस वर्षांची मैत्री होती त्यांची…… लग्नापुर्वीची!!! लग्न, बदललेल्या नौकऱ्या, मुलंबाळं , त्यांची शिक्षण सगळे अडथळे पार करतही तशीच टिकलेली!!! तो मात्र तिला अगदी क्वचित फोन करायचा….. तिचे तसे नव्हते…..अधुनमधून फोन करून ती त्याला भेटायला बोलावून घ्यायची!!!

त्याची बायको मात्र त्याला शक्यतो ऑफिसमधे फोन करत नसे….ती स्वत: जॉब करत असतानाही तिला घरून विनाकारण कोणी फोन केलेला आवडत नसे….. एथिक्स वगैरे मुद्दे ठाम असायचे तिचे… पण  ही मैत्रीण म्हणजे एक वेगळेच रसायन होते…..  मी वाटेल तेव्हा फोन करणार हा मैत्रीचा हक्क तिने राखून ठेवला होता….

विचारातच त्याने फोन उचलला………. “बोला मॅडम आज अचानक पामराची आठवण केलीत….. काही विशेष ??? ” तो म्हणाला…

“हो रे , मला भेटायचयं तूला…. बोलायचयं महत्त्वाचं… ” ती म्हणाली.

“ठीक आहे मला आत्ता एक मिटिंग आहे , ती आटोपतो आणि तूला बागेत गाठतो… चालेल ना!!”…. त्याने विचारले.

तिची परवानगी घेऊन फोन ठेवताना त्याच्या मनात पुन्हा विचार आले, आता या बयेने काय नवा पराक्रम केलाय राम जाणे!!! ’बिन्धास्त’ हे एकमेव विशेषण त्याने आणि त्यांच्या ग्रूपने तिला दिलेले होते…. मनात येईल ते बोलणे…. तूफान चांगले वागणे…. रागावली की तोंडाचा पट्टा सोडणे…. खरेदी तर जीव की प्राण होता तिचा….. उत्स्फुर्त असे तिचे वागणे त्याला कायम आवडायचे….. अश्याच कुठल्यातरी तिच्या बडबडीनंतर त्याने तिला वचन दिले होते की मी आयुष्यभर मित्र राहिन तुझा… तू हाक मारलीस की मी येणारच…. 🙂 …… आपली बायकोही तर अशीच होती नाही लग्नाआधि, प्रपंचातल्या अनेक जबाबदाऱ्या , मुलं , आपल्या घरच्यांच्या वेळोवेळच्या टोमण्यांमधे ती कुठेतरी हरवत गेली असे वाटते कधी कधी….. पुन्हा एकदा दोघिंची तुलना मनात झाली त्याच्या…..  त्या दोघिंचीही  रूपं त्याला अतिशय आवडती होती एकीचे मनमोकळेपणं आणि एकीचे समंजसपणं….. .

एका मागोमाग एक येणारे विचार त्याने मागे सारले आणि मिटिंग गाठली….. मिटिंग आटोपून तो लगेच बाहेर पडला….. ट्रॅफिकच्या भाउगर्दीतून तिच्यापर्यंत बागेत पोहोचताना त्याला उशीरच होणार होता….. ती आपल्याआधि पोहोचली असणार आणि आपल्याला जसजसा उशीर होईल तसतसा पारा चढत असणार तेव्हा बचावासाठी त्याने वाटेत थांबून तिच्यासाठी तिची आवडती भेळ पार्सल करून घेतली….. बागेपाशी पोहोचला तर मोगऱ्याचे गजरे विकणारी बाई दिसली त्याला….. त्याने पटकन दोन गजरे घेतले…. आता तिचा राग आवरणे सोपे काम होते त्याच्यासाठी अगदी!!!

एका डेरेदार झाडाखाली ती बसलेली दुरूनच दिसली त्याला…. समोरच्या झाडाकडे आणि तिथे खेळणाऱ्या मुलांकडे तन्मयतेने पहात असलेली ती!!! अजिबात बदलली नाहिये ही असा मनात विचार करतच तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि तिच्या कानात जोरात तिचे नाव ओरडला…..

दचकून तिने पाहिले आणि ओरडली, ” शोभतेय का रे गधड्या असले उद्योग… अरे गेल्या महिन्यात वयाची पंचेचाळिशी ओलांडलीस ना!!! लहान आहेस का ८-१० वर्षाचा उगा बालिशपणा आपला….”

तो हसला, तिच्याशेजारी बसत म्हणाला, “बोल आता बये काय झालयं , कशाला बोलावलेस असे अचानक…. ठीक आहे ना सगळे… की आपणच वाढवा केलात काही ??? ”

“चूप रे , बोलायचेय महत्त्वाचे जरा…. ”  आणि ती सांगू लागली…..

क्रमश:

(तळटीप: ब्लॉगवर पहिल्यांदाच कथा टाकतेय… मला स्वत:लाच क्रमश: प्रकार आवडत नाही … तेव्हा निषेधाला सुरूवात माझ्यापासूनच… 🙂 …. कंटाळाही आलाय टायपायचा आणि पाल्हाळ न लावेन तर मी कसली… मग वाचकांच्या सहनशक्तीच्या मर्यादा लक्षात घेता आज ईतकेच वाचन पुरे… बाकि उद्या!!! )

29 thoughts on “मैत्र…..

 1. क्रमश: चा निषेध ………
  क्रमश: पण अगदी सस्पेन्स मोड ला केलाय.
  ——————————————-
  कथेची सुरवात तर कैच्याकै भारी झालीये.

  ( वि.सु : पुढील भाग आजच लवकर टाकला तर आम्हीं शांत चित्ताने कामाकडे लक्ष देऊ. )

  • >>>> वि.सु : पुढील भाग आजच लवकर टाकला तर आम्हीं शांत चित्ताने कामाकडे लक्ष देऊ.

   भारी… 🙂

   अरे करतेच रे प्रयत्न…. आभार रे!!!

  • महेंद्रजी अहो खरं तर कथा वगैरे माझा प्रांतच नाहीये… एक कल्पना मनात आली ती उतरवायचा प्रयत्न करतेय खरा .. बघू या कितपत जमतेय….
   उद्या शेवटचा भाग टाकणार आहे….

   बाकि सोपा नाहिये हा प्रकार.. तुम्ही म्हणता तसं हे काम बाबा, हेरंब, कांचन, श्रीताई ,अनिकेत यांनाच बरे आहे!!!

 2. नेमक्या ठिकाणी ब्रेक घेतलात….आता उद्या पुन्हा फिरकावे लागणार…असो पहिल्यंदच लिहिल्यासारखे वाटत नाहीये….जास्त घटना नसूनही वेग चांगला धरलाय तुम्ही….keep it up

  • आभार झम्प्या… उद्या दुसरा भाग टाकतेय…

   सगळ्यांच्या प्रतिक्रीया पाहून खरं तर आता उगाचच टेन्शन वाटतेय…

 3. ताई,
  सहीच एकदम…कथा…
  भारी!!
  आणि एव्हढे एव्हढेसे भाग कसले टाकतेस गं..थोडे मोठे तरी भाग टाकायचेस.. 🙂
  आणि लवकर लवकर टाका आता पुढचा(चे) भाग!

  • अरे माझेही विचारचक्र सुरू होते पुढे काय टाकायचे म्हणुन… 🙂

   >>>> णीsssशेssssध

   स्विकारला…..

 4. एकदम छान वाटतेय कथा.लवकर पुढचे भाग येऊद्या. आणि मैत्र… म्हणजे माझा आवडता विषय त्यामुळे आतुरतेने वाट पहातेय.

  • >>>> तुझा उत्साह कमी पडू देऊ नकोस, कोणी जरी वाचायले आले नाही तरी मी नक्कीच वाचीन तुझी कथा, तीही शेवटपर्यंत… 🙂

   अरे अशीच हिंमत वाढतेय माझी… स्पेशल आभार रे….

   उद्या टाकतेय पुढचा भाग!!

 5. शीर्षकात सुधारणा : ‘मैत्र : भाग अर्धा’

  😉 .. हा हा हा… पण मी निषेधणार नाही मीही हे असलंच करतो.. पुढच्या मोठ्ठ्या भागाची वाट बघतोय..

  • शीर्षकातली सुधारणा सहीच… 🙂

   अरे बाबा पुढचा भाग आधि ठरलेला होता पण आता बदलावा का असा विचार करतेय…

   अरे सस्पेन्स वगैरे काही नाही रे डोक्यात.. साधा सरळ घरगुती विचार होता डोक्यात… 🙂

   लिहीतेच आहे.. उद्या टाकते…

   • बदलायचा विचार?? ते का बरं? जे तुझ्या डोक्यात होतं सुरुवातीला तेच वाचायला आवडेल. असो. काहीही टाक पण लवकर टाक म्हणजे झालं 🙂

   • >>>> जे तुझ्या डोक्यात होतं सुरुवातीला तेच वाचायला आवडेल…..

    शेवटी तेच टाकलयं रे…. ईतक्या पटापट कथा बदलायला सुचायला तर हव्या 😉

 6. तन्वे, अगं फक्त चार ओळी लिहून क्रमश:…. लिही पटापट.
  सुरवात झक्कास झालीये आणि उत्कंठाही वाढालीये… 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s