मैत्र…. (भाग २)

मैत्र भाग १…

” आज ना मला  माझ्या लेकाबद्दल बोलायचेय रे…. ” ती सांगत होती…

“असली सुरूवात….एकदम मुद्दाच ….. म्हणजे आजचा एपिसोड हा सामाजिक नसून पारिवारीक आहे असे दिसतेय… त्यातही लेकाबद्दल,  त्याशिवाय झाशीची राणी हत्यारं म्यान करून अंगाई गीत गायच्या नाहीत….. अगं मला वाटलं इथे एव्हाना कोणितरी प्रचंड रागावलेले असेल… मी तर त्यादृष्टीने तयारी पण करून आलो होतो… तुझी लाडकी भेळ आणि मोगऱ्याचे गजरे आणलेत बघ ” तो हसतच बोलला….

” अरे वा भेळ आणि गजरे… एक मला आणि एक बायकोला ना!!! 🙂 पण बोलू देत आज मला आधि…..अगदी बरोबर आहे रे तुझे…  हळवी झालेयं मी हे खरयं….. तूला माहितीये ना माझा नवरा कसा आहे??? ” …..ती

“न–व–रा sssssss!!!! अगं बाई माझी त्याचं काय??? त्याने काय केलय आता??? ” तो जवळपास ओरडलाच…..

दोन वर्षापुर्वीची त्यांची भेट आठवली त्याला अचानक… दुसऱ्या दिवशी ती एका वकिलांकडे जाणार होती… तिच्या एका जवळच्या नातेवाईकांनी आपल्या मुलाच्या मानसिक आजाराबाबत माहिती लपवून त्याचे लग्न लावून दिले होते…. लग्नानंतर झाला प्रकार उघडकीस आल्यावर त्या मुलीने घटस्फोटाचा अर्ज दिला होता…. आम्ही मुलीला पुर्ण कल्पना देणार आहोत असे हिलाही त्या नातेवाईकांनी कबूल केलेले होते पण प्रत्यक्षात मात्र त्या निरागस मुलीची फसवणूक झाली होती….. त्यावेळी आपल्या दिर-जावेच्या विरोधात जाऊन हिने त्या मुलीला पुर्ण मदत केली होती….. नंतर पुतण्यालाही त्याची ट्रीटमेंट घेण्यात मदत केली होती… पण आधिच सासरी नावडती असणारी ही मात्र या प्रसंगानंतर अजुनच मनातून उतरली होती…..

आपण तिला भेटून सांगितलेही की उगाच लोकांच्या भानगडीत पडू नकोस…. काहिही झाले तरी खरं वागणे बोलणे सगळ्यांनाच नसते पटत हे त्याचे मत होते!! पण नेहेमीप्रमाणे ही आपला मुद्दा पटवून गेली होती….. पण यावेळेस एकदम नवऱ्यावरच हल्ला आहे म्हटल्यावर तो गोंधळला…..

“चूप!!!  ओरडतोयेस काय??? नवऱ्याबद्दल असे की एरवी तो ढीग चांगला असला तरी त्याची काही मतं जाचक वाटतात आम्हाला…. त्याच्या काही समजूती आम्हाला पटत नाहीत… एरवीचे त्यांच्या घरचे देव देव करणे वगैरे, जाती पातींबद्दल बोलणे मला पटत नसले तरी मी ऐकते बरेचदा पण आता माझ्या मुलाचा प्रश्न आहे तेव्हा मी काहिही ऐकणार नाहीये….. त्याविषयावर आहे आजची आपली चर्चा!!! “……

“बोला आता.. ऐकतोय मी…..” …. तो म्हणाला…

“तरं बघ झालयं असं की माझा लेक प्रेमात पडलाय 🙂 आणि आता ही बातमी त्याच्या बाबाला सांगून बाबाचे या विषयावरचे मतं मला जाणून घ्यायचे आहे…. आधि तूझ्याशी बोलूयात म्हणून तुला बोलावले आहे….. ” ती

” अगं मोजून साडेबावीस वर्षाचा आहे ना तुझा लेक…. नुकताच हापिसात जातोय… त्याला सांग करियर कर ना जरा आधि!! कसली घाई आहे एव्हढी??? …..बरं मुलगी कोण आहे? तू भेटलीयेस का तिला??? डोळे उघडे ठेवलेस की चिरंजीव दाखवताहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी म्हणून जपलेला हळवेपणा उधळलात??? तिचं शिक्षण काय? आई-वडिल कसे आहेत? काय आहेत? अगं खूप मुद्दे असतात गं…..  आणि तुझ्या त्या कार्ट्याला बापाला सांगता येत नाही का डायरेक्ट काही… बाप काही अगदी हिटलरच आहे का त्याचा….” तो बोलतच राहिला ..

“अरे जरा दम घे… आणि माझ्या नवऱ्यासारखे बोलणे बंद कर आधि!!! हे बघ मुलगी सुंदर आहे… माझ्या लेकाईतकीच शिकलेली आहे….. ते दोघे एकमेकांना गेली २ वर्ष ओळखताहेत आणि मी तिला गेले सहा महिने ओळखतेय….फक्त…. ” ती सांगत होती,

“सगळं ठरलयं म्हणजे मायलेकाचं मग बापाची गरज काय तुम्हाला??? आणि ’फक्त..’ काय आहे?” तो

“फक्त असं की मुलगी एकुलती एक आहे आणि तीचे आई-वडील तिच्यावर अवंलबून आहे्त….. आणि ’जात-पात’ या आघाडीवर थोडा घोळ आहे… त्यांची जात वेगळी आहे…. आता हे सगळ्ं मला नवऱ्याशी बोलायचं आहे….. म्हणजे बघ तसं ८०% ठरलयं सगळं पण उरलेले २० % संमती मिळाली की झालं!!!” तीने सांगितले….

“८०% —- २०% हे काय? आणि तुझा नवरा जात मानतो…ही माहिती नवी आहे बुवा… ” तो मिश्किलपणे म्हणाला…. त्याला आता आजच्या तिच्या हळवेपणाची गंमतही वाटायला लागली होती…. एरवी कितीही धिटुकली असणारी आपली मैत्रीण मुलाचा मुद्दा आला की टिपीकल आईच असते हे माहित असलेले सत्य तो पुन्हा अनुभवत होता…..

“म्हणजे मी, माझा लेक आणि अबोली हे तयार आहेत तेव्हा ८०% आणि माझा नवरा आणि तिचे आईवडिल हे उरलेले २०%…. म्हणजे मेजॉरिटी विन्स हा न्याय आहे इथे…. तिच्या आई-वडिलांची जरा कुरकुर आहे….. तेव्हा माझ्या नवऱ्याने त्यांना समजवायचे अशी आमची अपेक्षा…. सगळे हवेत ना रे आणि ते ही मनापासून…. नाहितर त्रास होतो रे …..” ती म्हणाली…

” 🙂 मला आवडली ही ८०%-२०% ची थेअरी….. माझा रोल काय आहे आता यात?? ”

“हे बघ मी काही इथे प्रश्नपत्रिका सोडवायला आलेले नाहीये… तू ठरव ना काहीतरी….. ” हळवेपणाचा त्रागा होत होता आता….

“वेडाबाई अग्ं ईतका का कठीण करते आहेस हा पेपर…. मी आधि तुमच्या त्या ’अबोली’ ला भेटतो मग ठरवतो पुढचे काय ते…. आणि तुझ्या नवऱ्याची काळजी करू नकोस ते माझ्याकडे लागलं….. लव्ह मॅरेज असलं तरी ते शक्यतो एका जातीतच असावं हे त्याचं मत मलाही पटतयं कारण त्यामूळे ’आमच्यात असं तुमच्यात तसं’ असले लहानसहान मुद्दे वादाचे कारण कमी होतात…. तरिही आपली मतं मुलांवर सगळीकडेच तो लादणार नाही गं!!! तो कडक वागतो कारण घराची घडी बिघडू नये… तुम्ही तर त्या बिचाऱ्याला अगदीच वाईट ठरवायला निघालात 😦 ……. तूला एक सांगू का आज तू डिट्टो माझ्या बायकोसारखी वागते-बोलतेयेस… वो मेरी ’मैत्रीण’  आज दिखाई नही दे रही है!! तुझा फोन आला तेव्हा मनात धाकधूकच होती माझ्या पण आज तर इथे एकदम घरगुती प्रश्न होता….  ” तो बोलता बोलता हसत होता आता….

त्याच्या हसण्यात ती ही सामिल झाली मग… “मला नक्की कसलं ओझं वाटतं होतं ते कळतं नव्हतं रे….. म्हणजे हे सगळं नवऱ्याला सांगायचं की आता लेकाचे लग्न होणार, तो थोडा दुरावणार…. समजत नाहिये पण चलबिचल होतीये बघ मनात… म्हणजे सतत संमिश्र भावना…. खूप आनंद होतो मग काहितरी हुरहूर…. आता छान वाटतयं …. तुझ्याशी बोलायचं होतं मला आज……” ती मग बोलतच राहिली खूप खूप काही…. मुलाचं बालपण, त्याचं शिक्षण, नवी सुनं, तिच्यासाठीचे दागदागिने….. विषयाला वाट फूटेल तसे ते वहात होते…. मधेच ती अचानक ओरडली, ” ए मी बेटातल्या अरूणा ईराणीसारखी सासू होईन की डोली सजाके रखनातल्या मौशमी सारखी…. मला दोघी आवडतात!!! 🙂 ”

आता हिची गाडी आलीये रूळावर त्याच्या लक्षात आले… “भेळ खाऊया का की बडबडीवरच पोट भरायचेय..” तो तिला थांबवत म्हणाला….. भरपेट गप्पा मारून ते निघाले… निघताना तो म्हणाला, ” तुझं पण वय झालयं आता!!! 😉 ” ती चक्क न चिडता नुसती हसली.

गाडीपाशी पोहोचताना तिने पटकन मोबाईल काढून ’Done 🙂 ‘ असा एक sms पाठवला….. गाडीत त्याने टेप लावलेला होता, किशोर गात होता… “फिर वही रात है!!!” तिचे अत्यंत आवडते गाणे…. ती त्याला नेहेमी म्हणायची कायम माझी लाडकी गाणी लावतोस तूला आवडी निवडी नाहीत का रे…. तो म्हणायचा, “मला तू आवडतेस!!! :)”

घरी पोहोचले ते….. तिचे मस्त आल्याचा चहा केला… त्याच्या हातात कप देऊन ती काही कामाने किचनमधे गेली…तेव्हढ्यात दार उघडून तिचा लाडका लेक आला दारातूनच ओरडला, “माँ मी आलोय….” …. टीपॉयवर वाफाळत्या चहाचा कप पहाताच लेकाने आनंदाने तो उचलला…..

आत्तापर्य़ंत शांत बसलेला तो ओरडला, ” कप खाली ठेव तो चहा माझ्यासाठी आहे!!!”

तीदेखील आतून ओरडली, ” पिल्लू आधि हात-पाय धूवून ये मग चहा देतेय!!”

“This is not fair aai….. बाबासाठी वेगळे नियम आणि आम्हाला वेगळे असे का ??? तो पण ऑफिसमधून आल्यापासून इथेच बसलाय ना!!!”

लेकाला अडवत तो म्हणाला, ” ’अबोल’ पणे कप देतोस की ८५% चे पुन्हा ८०% करू???? 🙂 ”

आपल्या बाबाच्या डोळ्यातले मिश्किल भाव पहाता त्याला मगाशी आईने पाठवलेला sms आठवला….. बाबा आपल्याकडे मायेने पहातोय की चिडवतोय समजत नाहीये पण डोळे भरलेले दिसताहेत त्याचे….. लहानपणी आपण कधी खोटं बोललो, गृहपाठ केला नाही की बाबा चिडायचा पण आई नेहेमीच काहितरी जादू करायची मग बाबा असाच पहायचा आपल्याकडे….. लेक चटकन मिठीत शिरला बाबाच्या… लहानपणी शिरायचा तसा……

एव्हाना ती किचनमधून बाहेर येऊन उभी राहिली होती… तिच्याकडे पहात ते दोघेही म्हणाले, “Love u!!!”

ती हसतच म्हणाली, “Love u ‘two’ !!!”

मोगऱ्याचे दोनही गजरे तिने माळले होते तेव्हा……

47 thoughts on “मैत्र…. (भाग २)

 1. सोचा था क्या और ये क्या हुवा?
  कहानीमे एकदम ट्वीस्त्……एकाताकपूरसारखी गोष्ट एकदम नेक्स्ट जनरेशन वर गेली..
  एकदम संपवल्यासार्खीही वाटले.
  असो…. पण वाचताना मजा येत होती…काही ठिकाणी वाक्यरचना खूप छान केलेली आहे.
  पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर थोडासा अपेक्षाभंगही झाला….

  • >>>> एकाताकपूरसारखी गोष्ट एकदम नेक्स्ट जनरेशन वर गेली..
   एकदम संपवल्यासार्खीही वाटले…..
   नाही रे अजिबात नाही माझं जाम पटत नाही त्या बाईशी त्यामूळे तिच्यासारखे काही शक्यच नाही…मी मागे पोस्टही टाकलीये तिच्यावर 🙂

   >>>> पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर थोडासा अपेक्षाभंगही झाला…
   हे मान्य…:) तरिही अपेक्षाभंग झाला हे तरी कळवलेस… नुसताच वाचून निघून गेला नाहीस, त्याबद्दल स्पेशल आभार 🙂

   कालच्या कमेंट वाचून हेरंबला तेच म्हटले होते की कथा बदलावी की काय… पण नाही बदलली… एक साधासा विचार आला होता मनात त्याला मुर्त रूप देणे हाच प्रयत्न होता….

   आभार रे!!!

   • नुसताच वाचून निघून जाऊ शकलो नाही..कारण कधी कधी चित्रपटाची स्टोरी माहित असेल कलाकार नेहमीचेच असतील तरीही दिग्दर्शकाच्या कौशल्यामुळे, लेखकाच्या संवादमुळे साधासा चित्रपटही आवडायला लागतो….तसेच काहीसे माझे झाले..
    कथेचे सादरीकरण व कल्पना मला आवडली.

    आणि इथून पुढेही जर आवडली तर आवडली व नाही आवडली तर ते ही धडधडीतपणे सांगून मोकळा होईल..

    एक वाचक म्हणून प्रामाणिकच मत देईन…के जेणेकरून लेखकाचा फायदाच होईल.
    माझे मत/विचार त्या लेखाला/स्टोरीला/पोस्टला असेल. त्याच्या लेखकाशी त्याचा काहीही संबध नसेल.

 2. माझी प्रतिक्रिया दुसरी!
  खूप खूप छान झाली आहे कथा…
  मला फारच आवडली!
  आमची ताई फायनली कथालेखिका झाली! 🙂

  • सचिन आभार रे!!!

   >>> आमची ताई फायनली कथालेखिका झाली!!!!

   हेहे… अरे बघ हं सावधान… हुरूप बिरूप आला तर अजुन लिहीन एखादी कथा… 😉

  • हेरंब आभार रे… 🙂

   तूलाही तेच सांगतेय जे सचिनला सांगितलेय…
   >>अरे बघ हं सावधान… हुरूप बिरूप आला तर अजुन लिहीन एखादी कथा… 😉 हेहे

   • निखील आभार आणि ब्लॉगवर स्वागत….

    >>>Are bap re ati shudha marathi….. हे तर काहिच नाही डॅशबोर्डवर View all या ईंग्लिश साठी ’सर्वकाही पहा’ असे भाषांतर आहे 😉

 3. […]ती त्याला नेहमी म्हणायची कायम माझी लाडकी गाणी लावतोस तूला आवडी निवडी नाहीत का रे…. तो म्हणायचा, “मला तू आवडतेस!!! 🙂 “

  व्वा, काय मस्त जमवलं आहेस…

  म्हणजे, बागेत भेटलेला “तो” आणि घरी आल्याचा चहा पिणारा “तो” एकच होता तर… असो मी गोष्ट वाचण्यापेक्षा फुल्ल-टू एन्जॉय केली… आणखी अशाच छान-छान गोष्टी (ह्म्म कविता सुद्धा!) येऊ दे… 🙂

  • विशाल आभार रे… 🙂

   >>>> आणखी अशाच छान-छान गोष्टी (ह्म्म कविता सुद्धा!) येऊ दे 🙂

   काही सुचले तर नक्की लिहीन रे….

 4. ” तुझं पण वय झालयं आता!!! 😉 ” ती चक्क न चिडता नुसती हसली.” हे आवडलं आपल्याला
  बाकी कथा एकदम छान झालीये.

 5. कथा आवडली…. खरंच काही काही नाती अशीच गोड असावी आयुष्यात तर आणखी मजा येते….. आणि असे प्रसंग आयुष्यभर लक्षात राहतात गोड आठवणी म्हणून… अशा अजून कथा वाचायला खूप आवडतील, आम्हाला जास्तीत जास्त notifications येऊ देत….. 😉

 6. हे काय संपली सुद्धा ??? अजून मस्त मोठी लिही ना… ते काय ते ‘डेप्थ’ मध्ये … 😀

  शेवट आवडला… त्यावर पुढची स्टोरी होऊ शकेल काय!!!

  >>>>> मोगऱ्याचे दोनही गजरे तिने माळले होते तेव्हा…… 😉

 7. पिंगबॅक मैत्र…. (भाग २) | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 8. हे काय संपली सुद्धा ??? शेवट आवडला… त्यावर पुढची स्टोरी होऊ शकेल काय!!! ( अंदाज आला होताच. दोन्ही गजरे एकाच मनात खुलणार आहेत याचा… 🙂 ) मस्तच गं बायो.

  • आभार गं तायडे…

   अगं पण वर सगळ्यांना सांगितलेय तेच बघ, कठीण वाटतोय मला हा कथा प्रकार….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s