सहजच- पुन्हा एकदा….

गुरुवार शुक्रवारची सुट्टी मुलांबरोबर घालवायची…. आणि फक्त अभ्यास किंवा खेळ येव्हढेच न करता, दर सुट्टीला त्यांना काहितरी नवीन शिकवायचे असा गेल्या काही दिवसात आम्ही केलेला नवा नियम….. त्यानुसार गेल्या शुक्रवारी आम्ही (मी आणि ईशानने) केलेली कलाकारी…..

स्वत:च्याच कलाकारीवर चिरंजीव खुश झाल्याने या गुरूवारी पुन्हा टुमणं लावलं माझ्यामागे, शिकव काहितरी नवे म्हणून….. नवे म्हणजे त्याला अगदीच माहित नसलेले काहितरी असा अर्थ असतो कारण आपण काहितरी सांगायला जावे आणि त्याला जराही कल्पना असली तर लगेच ,”ए हे नको मम्मा… हे मला माहितीये!!’ नावाची नवी भुणभूण सुरू होते……

जरा डोके लावल्यावर लक्षात आले, नवे, त्याला अजिबात माहित नसलेले आणि करायला सोपे असे म्हणजे ’वारली चित्रकला’ …… पेंटींगही होइल आणि महाराष्ट्राच्या या आदिवासी कलेबद्दलची माहिती सांगणेही होईल….. त्यातही वेगळेपण हवे, मग घरी असलेल्या एका जुन्या बॉक्सची चिरफाड केली त्याच्याच लेसला हाताशी धरले आणि काही बुकमार्क्स बनवले…….

हा होता पहिला प्रयत्न…… जरा सोपेच करूया म्हटलं…. उगाच लेकासमोर आपलाच पोपट नको म्हणून आधि स्वत:चा हात कितपत साथ देतोय याचा अंदाज घेण्यासाठीचा हा बुकमार्क….. मग बुकमार्कची गरज काय, हे लेकाला समजावले की  आपण काय वाचत होतो हे लक्षात ठेवायला उगाच पुस्तकाची पानं मुडपायला नकोत, पुस्तकांचा आदर  वगैरे विषय मी बोलायला लागल्यावर मात्र चिरंजीवांनी, “अच्छा म्हणजे एरवी तू मोबाईल किंवा चमचा बिमचा घालून ठेवतेस बुकमधे, त्याऐवजी आता हे बुकमार्क्स घालून ठेवायचे , म्हणजे आपण वाचत असलेले पेज सापडेल……. बाबा ही मम्मा ना मोबाईल ठेवते बुकमधे आणि मग ते बुक जाडं दिसतं जाम 🙂 ” असे मलाच कोंडीत पकडून गप्प बसवले…… मग आम्ही बुक्सबद्दलचा रिस्पेक्ट या मुद्दा तुर्तास बाजूला ठेवून मोर्चा वळवला पुढच्या बुकमार्काकडे!!!

हे झाले दुसरे बुकमार्क……

आणि हे तिसरे आणि शेवटचे (सध्यातरी)…. कारण यातले एक आणि ईशानने बनवलेले एक गेलेत शाळेतल्या टिचर्ससाठी … त्या पण बुकमधे स्केल घालून ठेवतात याचा चिरंजीवांना अचानक साक्षात्कार झाला…. 🙂

थोडक्यात काय आमचा हा गुरूवार -शुक्रवार मस्त गेला!!!

याआधिचे सहजच इथे आहे, म्हणूनच आज आहे सहजच- पुन्हा एकदा!!! 🙂

शेवटी काय ब्लॉगाचे नाव चुकलेय असे नको वाटायला!!!

31 thoughts on “सहजच- पुन्हा एकदा….

 1. फार सुरेख…असच मुलांच्या आवडीनिवडीनुसार गोष्टी करत राहिल्या की मुले नित्यनविन काहितरी छानसे शिकतात… त्यांचा वेळ ही जातो आणि घर बसल्या काहि शिकल्याचा आनंद हि मिळ्तो…आता नेक्स्ट quilling cards शिकव…मुले खुप एन्जोय करतात..हा माझा अनुभव आहे..मी वर्कशोप घेतलेले नं लहान मुलांचे..आता रोज पाठी पडलेत की आता काय नविन शिकवणार आम्हाला..नाहितर पुन्हा एकदा हिच कार्ड्स शिकवा ना म्हणुन…
  छान झाली आहे पोस्ट…

  • माऊ खरयं गं तुझं मुलं खरचं धमाल करतात आणि त्यांच्याबरोबर आपणही 🙂

   Quilling cards नक्की करून बघेन…. अगं आम्ही रोह्याला असताना ९० मुलांचा पंधरा दिवसाचा कॅम्प घेतला होता… मुलं शिकतातही आणि आपल्याला शिकवूनही जातात!!

 2. ताई,
  मला ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की मी असा कलाशून्य! अन माझ्या सगळ्या ताया कलाकार आणि नुसत्या तायाच काय भाचेमंडळी पण! सगळे एकापेक्षा एक!
  कसले मस्त बुकमार्क्स बनवलेत.. जाम आवडले मला! टाईमपासमध्ये कला झाली आणि धडेही मिळाले(तुला न ईशान दोघांना :D) !! बेस्टच एकदम!!!!
  बाकी सुहास म्हणतो तशागत आमचीही शाळा घे! पण माझ्याबाबतीत काही उपयोग नाही…लहानपणी काय दिवे लावलेत मी ते अजून लख्ख आठवताहेत मला! 🙂
  आय स्टिल रिमेन – आड म्यान औट!

  • कुठला रे ऑड म्हणे… अरे कलाकारी म्हणजेच कागदावर रेषा काढणे येव्हढीच असते का?

   तुम तो ठहरे हमसे भी अच्छे कलाकार भय्या!!!तुझ्यासारखे लिहायला व्यक्त व्हायला सगळ्यांनाच जमते का???

   बाकि तुझी शाळा नक्की घेईन मी!!! 🙂

 3. सही तन्वीताई, मस्त बनले आहेत हे बुकमार्कस… मी सहसा बुकमार्क वापरत नाही पण असे आकर्षक बुकमार्क आवडतील वापरायला… आम्हालाही शिकव ना…..

  • आभार आनंदा….

   या भारतभेटीत (माझ्या आणि बाबाच्या) भेटूच या आपण सगळे एकदा पुन्हा… मग करूया धमाल जरा!!!

 4. तन्वी, बुकमार्क छानच झालेत आणि मोराच्या पिसार्‍यासाठी व फुलासाठी वापरलेली आयडीया भन्नाट. खूप दिवसांनी वारली चित्रकला पहायला मिळाली. अगं वाळलेली फुलं, पानं चिकटवून पण मस्त होतात बुकमार्क. पण त्यांना वरून फिनिशींग कव्हर द्यावं लागतं. माझ्याकडे खोके आहेत बरेच, आयताकृती आकाराचे. एखादी चांगली कलाकृती सुचव ना!

  • कांचन आभार गं!!!

   वारली चित्रकला आवडते गं मला फार… सोपी आणि मस्त!!

   अगं मी तुला कलाकृती सुचवायची 🙂 … अगं तुझा creative ब्लॉग पाहिलाय मी… मस्त कलाकार आहेस तू!!! तरिही माझ्या परीने काही सुचले तर नक्की सांगेनच!!!

 5. मस्तच बनलेत ग बूकमार्क्स…दोघांना नेहमी असच काहीतरी नवीन छान छान शिकवत राहा…आणि इशानने बनवलेला बूकमार्क त्याच्या पानावर टाक ना…बाकी पोस्ट एकदम सहजच…रच्याक, तुमचे हे उदयोगधंदे चालु असतांना गौराबाई काय करत होत्या….. 🙂

  • आभार देवा 🙂

   >>>>रच्याक, तुमचे हे उदयोगधंदे चालु असतांना गौराबाई काय करत होत्या….. 🙂

   हा खरा प्रश्न 🙂 … अरे ती पण एक कागद रंगवत बसली आणि तोंड बंद होते तिचे ही आश्चर्याची बाब!!!

 6. >>अरे ती पण एक कागद रंगवत बसली आणि तोंड बंद होते तिचे ही आश्चर्याची बाब!!!

  आमची गौरा शांतच आहे…तुमच आपल उगीच काही तरी 😉
  गुणी बाळ आहे ते.

  बाकी आता आमच्यासाठी “सहजच क्लासेस” काढायला काही हरकत नाही.

  बुकमार्क मस्तच आहेत.

  • यवगेशा आभार रे 🙂

   आणि गौरीला शांत म्हणाल्याबद्दल माझ्याकडून निषेध आणि तिच्याकडून आभार 🙂

   “सहजच क्लासेस” हेहे!! हे भारीये!!!

 7. ज्या विषयातली/कलेतली आपल्याला काहीही गती नाही व किंचितही अक्कल नाही त्या वस्तूच्या कलाकुसारीकडे पाहून मंत्रमुग्ध होताना व कलाकाराविषयी वाटणारे अपार कौतुक व्यक्त करताना आश्चर्याने बोटे तोंडात घालावीत व “अप्रतिम, सर्वोत्कृष्ट” असे उद्गार काढावेत : इति आद्य कलापुराण

  म्हणून “अप्रतिम, सर्वोत्कृष्ट” … बस्स. अजून काही नाही !!

  • भाऊ तू पण हरभऱ्याची झाडं लावू लागलास जनू…..अवो तुमचे गणपतीचे मखर पाहिल्येव ना वो समद्या जगानं…. गती नाय, अक्कल नाय ह्ये कसं आणि??

   आद्य कलापुराण 🙂

   मनापासून आभार रे!!!

  • सोनाली आभार गं!!!

   खरयं तुझं आर्यन जसजसा मोठा होत जाईल हे उद्योग तूमच्याही मागे लागतील….

 8. सहजच का होईना वाचनखूण (BOOKMARK) एकदम मस्त बनली आहे. मला पण खूप दिवसांपासून बनवायची होती , ती बनवायला मला पण उत्साह आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s