देवीयों और सज्जनों……

’देवीयों और सज्जनो…..’  अनेक वर्षांनी हीच हाक पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे आजपासून…. ११ ऑक्टोबर , अमिताभचा वाढ्दिवस … ह्याच  दिवसाचे औचित्य साधून यावेळेस सोनीवर KBC पुन्हा एकदा सुरू होतेय!!! गेला दिड महिना सोनीवर ’कोई भी सवाल छोटा नही होता’ सांगणाऱ्या अमिताभच्या मस्त जाहिराती पहायला मिळाल्या……. नंतरच्या दिवसात अमिताभ स्वत: या कार्यक्रमासाठी तयार असल्याचे सांगत , प्रेक्षकांना तुम्ही तयार आहात का विचारत होता……. आणि आता तर तास- मिनिट- सेकंद असे काऊंटडाऊनच सुरू आहे……

काल चॅनल्स बदलता बदलता सोनीवर अमिताभ कौन बनेगा मधे एका स्पर्धक महिलेशी संवाद साधत होता, “आप सबको डाँट देतीहै….. हमको डाँट दिया…. कंप्यूटरको डाँट दिया……” असे म्हणत मग तो प्रेक्षकांमधे बसलेल्या त्या महिलेच्या नवऱ्याला म्हणाला, “आप अभी बचे हुए है!!! 🙂 ” अत्यंत मिश्किल भाव चेहेऱ्यावर, आवाजाची नेहेमीची राखलेली विनम्र पट्टी, आश्वासक अस्तित्व……नकळत ती जाहिरात पहाणाऱ्या माझ्याही चेह्ऱ्यावर हसू आले….. चॅनल्स फिरताना पुढचे चॅनल आले तिथे देखील एका रिऍलिटी शोची जाहिरात होती….. दस्तूरखुद्द राखीताई सावंत त्यांच्या अदालतीत बोलत होत्या….. त्याही नेमक्या अमिताभच्याच आवाजात बोलल्या पण अगदी व्यक्तीमत्त्वाला साजेसे, अमिताभची नक्कल करत त्या म्हणत होत्या, “मेरा नाम विजय दीनानाथ चौहान है….हाय….. तो फिर बाप का नाम क्या…. चौहान????” असा अतिशय गहन प्रश्न त्यांनी कॅमेऱ्याला विचारला 🙂 …………. पहिल्या ठिकाणी खुद्द अमिताभ असून त्याचा एकेरी उल्लेख करूनही आदर वाटतो तर दुसऱ्या ठिकाणी बाईंना आदरार्थी बहूवचन वापरले तरी कीवही करावी वाटत नाही!!! खोल अथांग डोहाची धीरगंभीरता आणि उथळ पाण्याचा खळखळाट  यातला फरक त्या १० मिनिटात जाणवून गेला!!!

मनात आधिच्या कौन बनेगाच्या आठवणी येत होत्या, “कंप्युटरजी लॉक किया जाए!!!” ,”गुडनाईट, शब्बा खैर, शुभरात्री, अँड डू टेक व्हेरी गूड केअर यूरसेल्फ” वगैरे अमिताभची वाक्य त्याच्या ईतर अनेक डायलॉग्ससारखेच हिट झाले आणि वेळोवेळी वापरले गेले!!! आपण लोकप्रियतेच्या उच्चतम शिखरासमोर बसलो आहे याचं कणभरही दडपण स्पर्धकांना येऊ न देता अत्यंत हलकंफूलकं , विनोदी तर कधी गंभीर बोलत हा कार्यक्रम रंगतो!! पण उच्चारलेला प्रत्येक शब्द ऐकला की अमिताभमधल्या प्रतिभेची, विद्वत्तेची जाणीव होते!! त्याचा सुसंस्कृत वावर कार्यक्रमाची उंची वाक्यागणिक वाढवत असतो!!

अमिताभ अभिनेता म्हणून मला ’अँग्री यंग मॅन’ पेक्षा शांत, गंभीर भुमिकांमधला जास्त आवडतो नेहेमी!!! जुन्या चित्रपटांपैकी आनंद, अभिमान, मिली, शोले, चुपके-चूपके, आखरी रास्ता, ….. वगैरे कितीही वेळा पाहिले तरी पुन्हा पहायला आणि ते ही अर्ध्यातून वगैरे कसेही पहायला आवडतात!!! तर जंजीर, कालीया, मुकद्दर का सिकंदर, डॉन, खुदा गवाह, नमकहराम,मर्द……  वगैरे नवऱ्याचे आवडते…… शोले बद्दल तर प्रत्येक ब्लॉगरनी एक एक स्वतंत्र पोस्ट लिहीली तरीही अजून लिहीले जाऊ शकते असे वाटावे!!

गेल्यावेळेस कौन बनेगा आले तेव्हा अमिताभ नुकताच सावरत होता, त्याआधिचे त्याचे सुर्यवंशम, आज का अर्जून वगैरे मी पहाण्याच्याही फंदात आजतागायत पडलेले नाहीये….. कितीही असले तरी मावळत्या सुर्याला पाहिले की रुखरुख वाटते तसले काहिसे वाटायचे तेव्हा मला!! पण अस्ताकडे जाणारा सुर्य़ हा सुर्यच असतो हे या माणसाने दाखवून दिले…. तळपणे हाच ज्याचा गुणधर्म तो लख्ख प्रकाशात, झगमगाटात पुन्हा येणार हे सत्यच!!! बडे मियाँ छोटे मियाँ च्या ’मखना’ मधे अमिताभकडे दुर्लक्ष होऊन जेव्हा गोविंदा आणि माधूरीच फ्रेममधे दिसत होते तेव्हा स्वत:चेच काहितरी चुकतेय असे वाटत होते…… पण ही चूक आपल्याला फार काळ करू न देण्याची जबाबदारी होती अमिताभची….. पुनरागमन, सेकंड ईनिंग वगैरे शब्द आपल्यासाठी हा असा वावरला जसा कधी बाजूला झालाच नव्हता…. आणि ते खरेही आहे तो नव्हता तेव्हा त्याचे स्थान रिकामे होते!!!!

आताचे चित्रपट आठवायचे तर मोहोब्बते … हा पाहिला तेव्हा शाहरूखला पहायचा नुकताच कंटाळा यायला लागल्याची जाणीव होती आणि अमिताभला तर पहायचेच होते, आँखे…. अमिताभ-सुश्मिता एकत्र , किती वेळा पाहिलाय तरिही आवडतोच, खाँकी…. अमिताभ-अजय एकत्र , चूकवूच नये असा अनुभव, चिनी कम….. अमिताभ- तब्बू एकत्र, न पटणारे काही असेल तर दुर्लक्ष करूनही अनेकदा पाहिला जाणारा सिनेमा, भुतनाथ…. पारायण चालते याचे, कारण हा मुलांचाही अत्यंत लाडका….. “यार मैं भूत हुँ की नही??? ” असो की “ए चार फूट दो ईंच” असो अमिताभचे डायलॉग्स तोंडपाठ असणारी पुढची पिढी आमच्या घरातच नव्हे तर सगळीकडेच तयार आहे…..

क्यूं हो गया ना, अक्स, कभी खुशी टाईप सिनीमे, निशब्द वगैरे प्रकारांच्या वाटेला मी शक्यतो जात नाही…… हे म्हणजे अमिताभला सिनीमात घेणे आणि वाया घालवणे…..मागे एकदा श्रीकांत बोजेवारांनी असल्या प्रकाराला एक मस्त उपमा दिली होती ,” सोन्याच्या सुरीने बटाटा कापणे” ….. अमिताभसारखी लखलखती सुरी घेऊन त्याला गुळचट डायलॉग्स देणे वगैरे प्रकल्प करण जोहर हातात घेत असतो!!!

कौन बनेगा बाबतच बोलायचे तर त्याच धर्तीवर आलेल्या ईतर अनेक कार्यक्रमांपैकी एक ’छप्पर फाड के’ सोडले तर ईतर कोणाचे नावही आत्ता आठवत नाही….. कौन बनेगाच जेव्हा शाहरुखरावांनी हातात घेतले तेव्हा त्या कल्पनेनीच मी फ्रीझ झाले होते त्यामूळे त्यांनी कंप्युटर कसा फ्रीज केला ते पहायला मात्र कधी गेले नाही, तेच ’पाँचवी पास’ च्या बाबत,  शाहरुख एक आगाऊ आणि  मुलं सात आगाऊ, हा प्रकार पहाणे हे न पटणारे होते!!!

अमिताभ, माधूरी, नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर ….. या प्रत्येक नावावर खरं तर एक एक संपुर्ण पोस्ट (निदान) होऊ शकते!!! टीकाकारांना उत्तरं ही टीका न करता शांततेने देता येतात, आपल्यातल्या गुणांची स्वत:लाच पारख असेल तर जग काहिही बोलू देत आपली शांतता ढळू द्यायची नसते, लोकांना काय चांगले काय वाईट हे अचूक समजत असते वगैरे अनेक गोष्टी या सगळ्यांकडून शिकता येतात!!! थोडेफार अपयश आले तरी आपला तोल ढळता कामा नये , always be graceful  हे शिकवणारी ही विद्यापीठं!!! माधूरीचे मृत्युदंड, देवदास (माधूरीसाठी, बाकि आनंद ) असो की ईतर सिनीमे असो तिचे माधुर्य आणि गोडवा कुठेही तसुभर कमी होत नाही…… अनुपमचे सारांश, डॅडी असो की खोसला का घोसला, वेडनेसडे असो, वेगळेपण दिसतेच….. नसिरुद्दीन बद्दल बोलणे म्हणजे स्वत:चा मान वाटतो मला….. ईक्बाल, वेडनेसडे, सरफरोश वगैरे काही फक्त उदाहरणे बाकि मगा म्हटल्याप्रमाणे निदान एक संपुर्ण पोस्ट होईल येव्हढे लिहीले/ बोलले जाऊ शकते!!!

लोकांना हवा तो गोंधळ घालू देत, आपण शांततेने आपल्यातल्या प्रतिभेला जपायचे , समंजसपणे कठीण परिस्थितही धीराने सामोरे जायचे…. आपल्या मनातली आपली प्रतिमा जपली की लोकांच्या मनात त्या प्रतिमेची स्थापना होतेच वगैरे धडे आपल्या वागणूकीतून देणारी ही व्यक्तिमत्त्व!!! दस्तूरखुद्द ’यश’ हा शब्द प्रत्यक्ष जगणारा , आयुष्य म्हणजेच या शब्दाची व्याख्या असणारा तरिही अत्यंत विनम्र, सहज वागणे बोलणे असणारा अमिताभ ’पा’ मधे सुद्धा आवडला होता…. वयाचे बंधन कलेच्या, मेहेनतीच्या आड येऊ न देणे म्हणजे काय याचे हे एक उदाहरण!!!

बरचं लिहीलं नाही….बरचं अजूनही लिहीले जाऊ शकते, कित्येक चित्रपटांचे तर नावही आले नाहीये तरिही थांबतेय आता 🙂 ……. काल अमिताभला पाहिले आणि पाठोपाठ राखीताईंनी गोंधळ घातला मग सुरू झालेले हे विचारचक्र!!! शेवटचे महत्त्वाचे काम , अमिताभला वाढ्दिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!!! 🙂

आणि आता माझे पलायन किचनमधे कारण व्यस्त रहाणाऱ्या अमिताभचे कौतूक करायचे आणि स्वत:चे काम चालढकल या तत्त्वावर करायचे हे मला तत्त्वत: मान्य नाही!!! 😉

तर काय बाय बाय, अपना खयाल रखियेगा, हम बस यूँ गये और यूँ आये!!! 🙂

(पंधरा दिवसानी पुढची पोस्ट घेऊन :))

 

 

Advertisements

30 thoughts on “देवीयों और सज्जनों……

 1. कितने आये और गये….. पण अमिताभची सर कुणाला नाही आली.

  आणि माधुरी ….. दिल धडकन बद्दल काय बोलायचं. निव्वळ माधुरीचा डान्स पाहण्यासाठी साजन,आणि दिल ची पारायणे केलीत.

  शाहरुख एक आगाऊ आणि मुलं सात आगाऊ, हा प्रकार पहाणे हे न पटणारे होते!!! +१२३४५६७८९

 2. तायडे एकदम फ़क्कड पोस्ट…खर सांगतो, केबीसी च्या आधी मी त्याला चक्क हेटलिस्ट मध्ये टाकला होता,तेव्हा तो जवळ जवळ संपलाच अस सगळ्यांना वाटत होत एबीसीएलच पण दीवाळ निघाल होत…पण पुढे त्याने अशी भरारी घेतली कि मला परत एकदा त्याचा पंखा व्हाव लागल.बाकी शोले वर मी पोस्ट लिहलेली आहेच…पंधरा दिवसानंतर, ये ना चालबे…!

  अमिताभला वाढ्दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…!!!

  *अपना खयाल रखियेगा वाचुन माझ्यासमोर अमिताभचा सोडुन जेनेलियाचाच ’अपना खयाल रखना’ वाला चेहरा आला…. 🙂

  • आभार देवा!!! 🙂

   खरयं तुझं मी देखील कोणे एके काळी अमिताभला हेटलिस्ट मधे टाकले होते… त्या ईर बिर फत्ते चा तर जाम राग यायचा मला!! उगाच अमिताभला केविलवाणा पहाणे शक्यच नव्हते!!!

   पण फिनिक्स पक्षी तो, कसला आला बघ भरारी घेऊन .. नुसता आलाच नाही तर एक आदर्श बनला पुन्हा एकदा!!!

   >>>>*अपना खयाल रखियेगा वाचुन माझ्यासमोर अमिताभचा सोडुन जेनेलियाचाच ’अपना खयाल रखना’ वाला चेहरा आला…. 🙂

   😉

 3. ताई,
  अमिताभ बच्चन लहानपणी खूप खूप आवडायचा. अभिनेता म्हणून आजही त्याला मी खूप मानतो.
  त्याच्या करिष्म्याचं उदाहरण म्हणजे, माझे वडिल, ज्यांनी चक्क दिलीपकुमारला प्रत्यक्ष समोर भेटल्यावर ‘आपको कहीं देखा है!’ असं म्हटलं होतं, तेसुद्धा कौन बनेगा करोडपतीचे फॅन झाले होते.
  माझ्याही शुभेच्छा अमिताभला (एकेरीच बरं वाटतं)!

  • बाबा आता मात्र तुझ्या बाबांना (काकांना) भेटावेच लागणार आहे… ग्रेटच आहेत काका 🙂 … चक्क दिलीप कुमारला ‘आपको कहीं देखा है!’ म्हणणं … सहीच!!

   आणि तुझ्या कमेंटा पहा,…. दर दोन कमेंटांआड लिहितोस , “खूप सिनीमे पहातो आपण नै 😉 ” … अरेरे!!! 🙂

   माझी ही पोस्ट आता काकांसाठी!!

   • बरं झालं तू सांगितलेस, काकांच्या प्रश्नावरचे दिलीप कुमारचे उत्तर त्यांच्या तोंडूनच ऐकावे असा विचार मनात आला होता माझ्या…. भन्नाट आहे, नक्की विचारणार मी आता हा प्रश्न काकांना!!! मी तर दिलीप कुमारच्या चेहेऱ्यावर नक्की कसे भाव असतील या कल्पनेने हसतेय!!! 🙂

 4. निषेध..

  या पोस्टमध्ये “त्यांचा”……म्हणजे प्रत्यक्ष अमितजींचा उल्लेख नाव घेऊन अमिताभ असा केला?

  “ते स्वत:”, किंवा प्रत्यक्ष “ते” असा उल्लेख करूनही सर्वांना समजलं असतंच.

  गुस्ताखी..बेअदबी..

  ….

  जस्ट किडिंग…Excellent…भा पो…

  • 🙂

   खरयं तुझं….. हम मुआफी चाहते है!!

   अरे ’अमितजी’ असं म्हटलं तर गैरसमज होऊन नवऱ्याला चक्कर यायची माझ्या की काय झालं या बाईला, अमित नावाला ’जी’ कसा जोडला 🙂

   >>>“ते स्वत:”, किंवा प्रत्यक्ष “ते” असा उल्लेख करूनही सर्वांना समजलं असतंच. … मान्य!! अरे पण पोस्टेत राखीताईंना मान दिलाय तो!!! 😉

   आभार रे!!

  • 🙂

   अगदी खरयं तुझं, नाहीचे काहीच तुलना त्या दोघात ….. मी तसा काही प्रयत्न केलाय का पोस्टमधे ??

   एका चॅनलवर अमिताभचे सुसंस्कृत , अतिशय विनयशील वागणे आणि नेमके लगेचच पुढच्या चॅनलवर झालेले राखीचे अमिताभचीच नक्कल करत केलेले मुर्खपणाकडे झुकणारे वक्तव्य पाहिले आणि आलेले विचार मांडलेत मी ईतकेच…. अन्यथा, अमिताभबरोबर काही मोजकी नावं सोडली तर मी जिथे ईतर कोणा मानलेल्या, कसलेल्या अभिनेत्यांची नावं घेतली नाहीत तिथे राखीशी तुलना करणे शक्यच नाही 🙂

   बाकि राखी ज्या प्रकारे स्वत:चा ईतिहास सांगून लोकांची सहानूभूती मिळवण्याचा प्रयत्न करत फिरते ते पहाता शुन्यातून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करणारा अमिताभ अजूनच मोठा वाटतो आणि आदरास पात्रही!!

   राखी साधी अजिबात वाटत नाही निदान मलातरी, तिने केलेल्या पती, पत्नी और वो चे काही भाग ओझरते का होईना पाहिलेत मी… असो मतं वेगळी आहेत आपली येव्हढेच!!

   • quite possible that I am wrong about her tanvi…

    mala somehow asa vaTala kee zopadpatteet motha hoNa he kitee katheen asel, tithale challenges apalyala muLeech familiar naheet. aNee jar kuNee tya paristiteetun var yeun kahee karat asel, tar te kuthe taree -manaat ka hoina puN acknowledge kela pahije ka? arthaat ha struggle karatana sahanubhootee teehee ashee ‘loud’ paddhateena… not sure that that’s necessary…

    Amitabh’s rise-fall and rise again -haa great vaTato, of course mee total fan ahe.

    he had the rich legacy of Harivanshray bacchan , a very rspectable renowned revered family . so basically no common ground for comparison is all I wanted to say.

   • >>> quite possible that I am wrong about her tanvi…

    छे गं, पण मतं वेगळी आहेत आपली जराशी येव्हढेच आणि एकाच मुद्द्याला दोन वेगवेगळी आणि सत्य मतं असू शकतात नाही का 🙂

    घरातल्या वातावरणाचा तू मांडलेला मुद्दा चपखल आहे एकदम, तो ग्राह्य धरला तरी राखीचा उथळपणा खटकतोच गं… प्रसिद्धी आणि सवंगपणा यातला फरक ती जाणूनबूजून दुर्लक्षित करते हे जरा न पटणारे आहे मला…. बाकि तुझी कारणमिमांसा आवडली आणि मुख्य म्हणजे तू पुन्हा कमेंट टाकून हे लिहिलेस हे जास्त आवडले!!

   • you are right.

    about commenting again: I think I enjoy “chatting” with you this way. alikade rare asaNara asa ek satweek feel ya blog la ahe, aNe to mala faar soothing vatato,

 5. वा! मस्त झाली आहे पोस्ट. वाचत रहावी अशी. मला पण पुर्वी अमिताभ आवडत नसे, पण आता आवडतो.
  KBC चा कालचा एपिसोड मिस झाला, आता आजचा पाहीन म्हणत्ये.

  • सोनाली आभार गं!!!

   अगं मला अमिताभ एक अभिनेता म्हणून जितका आवडतो तितकाच किंबहूना जरा जास्त एक व्यक्ती म्हणून आवडतो!!!

   आजचा भाग चुकवू नकोस!! 🙂

 6. >> अमिताभ, माधूरी, नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर ….. या प्रत्येक नावावर खरं तर एक एक संपुर्ण पोस्ट (निदान) होऊ शकते!!!

  पोस्ट ?? अग एकेक (एकेक कसले दहा दहा) ब्लॉग्ज होऊ शकतात या सगळ्यांवर. (अपवाद अनुपम. मी काही त्याचा विशेष पंखा नाय)

  >> तो नव्हता तेव्हा त्याचे स्थान रिकामे होते!!!

  हे तर एकदम परफेक्ट.. !!! कुठे अमिताभच्या सिनेमांवर जगलेली आपली पिढी आणि कुठे श श श शाहरुखच्या त त प प वर जीव टाकणारी आजची पिढी !! असो.. (उगाच म्हातारं झाल्यासारखं वाटतंय हे वाक्य वाचून :P)

  बाकी तू अक्स बघितला नसशील तर बघच.. एकदम सही (पण वेगळा) चित्रपट आहे तो. अमिताभ, नंदिता दास जबरा आहेतच पण मनोज बाजपई आणि राकेश ओमप्रकाश मेहराचा पंखा झालो मी तेव्हापासून. (आता बाजपई बोंबललाय ती गोष्ट येगळी 😉 )

  अमिताभ (आणि माधुरी, सचिन, लताबाई वगैरे) ग्रेट आहे हे जसं वेगळं सांगावं लागत नाही आणि सांगितलंच तर असं सांगणार्‍याकडेच लोक “त्यात काय नवीन शोध लावल्यासारखं सांगतोय हा/ही” अशा नजरेने ज्याप्रमाणे बघतात त्याप्रमाणे लोकांनी माझ्याकडे बघू नये म्हणून तुझी ही पोस्ट कशी झाली आहे याबद्दल मी काहीही बोलणार नाही 😉

  • अरे त्या सगळ्या नावांमधे परेश रावलचे नाव राहिले लिहायचे, अनूपमचे सारांश आणि डॅडी माझे कायम आवडते आहेत आणि पुन्हा एकदा तो/ किरण खेर ह्या व्यक्ती मला जास्त भावतात!!

   >>>>कुठे अमिताभच्या सिनेमांवर जगलेली आपली पिढी आणि कुठे श श श शाहरुखच्या त त प प वर जीव टाकणारी आजची पिढी !! 🙂

   हेरंबा अरे ३२/ ३३ वय आपले, असे नको रे म्हणूस 😦 शाहरुख मला फौजी आणि सर्कस मधे जाम आवडला होता… तेव्हा या अश्या आवडाआवडीला नुकतीच सुरूवात झाली होती माझी 😉 मग काही सिनीमेही आवडले पण लवकरच तो पुन्हा आवडेनासा झाला, अपवाद ’चक दे ’ चा … जे अमिताभबाबत होत नाही …..

   अक्स तु म्हणतोयेस म्हणून पाहीन… पोस्टमधे अमिताभच्या विरुद्ध चा उल्लेख राहिला रे…. जाम आवडलाय तो पण!!

   बाकि तू लिहिलेल्या शेवटच्या ओळींना दोन प्रतिक्रीया….
   १) … 🙂
   २) आधि प्रतिक्रीया कधी टाकलीयेस त्याची वेळ पाहिली… म्हटलं रात्री झोपेत काहितरी टाईपलयं का ते तपासावे आधि 🙂 आता मी ’ह’ हरभऱ्याचा असे म्हणॆन 🙂

   फिर भी आभार रे!!

 7. Hey Tanvi…
  Saglyancha “Shahenshah” asnarya Amitabh baddal lihilas he far mahatvacha…
  Evdha motha asun pan Amitabh aplya sarvanach agdi jawalcha watato he kharay…

  Sarkaar ani Bagbaan ya suddha changlya movies ahet… Baki, You have written as usual very nice..

  Hope to see you new posts soon…

  Regards,
  Priti.

  • प्रिती आभार गं!!!

   बघ बागबान राहिलाच लिहायचा माझा, बरेच राहिलेत तसे, हम सुद्धा विसरले मी!! असो, तुम्ही आहात ना सगळे आठवण करून द्यायला 🙂

   नवीन पोस्ट लिहीतेय गं… टाकेनच लवकर… Thanks 🙂

  • सोनाली नेटभेटमधे माझ्या आत्तापर्यंत काही पोस्ट आलेल्या आहेत….. आणि सलील-प्रणवला माझ्या ब्लॉगमधून कोणतीही पोस्ट घेण्याची कायम परवानगी आहेच… 🙂

   माझे नाव आणि ई-मेल आयडी सलीलकडे आहेच……

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s