वाचाळ…..

वाचाळ म्हणजे अतिशय बडबडे किंवा वाचनाचा नाद असलेले असे जर दोन्ही अर्थ घेतले तर ते दोन्हिही मला १००% लागू होतात…. वाचायला आवडायला कधीपासून लागलं हे माहित नाही पण नुकतीच अक्षरओळख झाल्यावर शाळेतल्या पुस्तकांबरोबरच दुकानांच्या पाट्या वाचायला सुरुवात केली होती…. काना मात्रा, वेलांट्या, उकार हे ज्ञान जसजसे वाढत गेले तसे वाचनही वाढत गेले, आवडायला लागले किंबहूना समजायला लागले!!

बाबांबरोबर कायम लायब्ररीत जाणे व्हायचे…. लोकांना वाचताना बघणं व्हायचं…. लायब्ररी वरच्या मजल्यावर होती आणि खालच्या मजल्यावर अनेक पेपर्स टेबलवर ठेवलेले असायचे आणि अत्यंत तन्मयतेने ते वाचणारे लोक पाहिले की कुतूहल वाटायचं नेहेमी!!! आई- बाबा, आजी- आजोबा पेपर नूसते वाचायचे नाहीत तर अग्रलेख हा बरेचदा चर्चेचा मुद्दा असायचा जो मला तेव्हा अत्यंत रटाळ वाटायचा पण कानावर पडायचे त्यांचे बोलणे!! असाच मग कधितरी पेपर हातात आला, आधि मटा मग लोकसत्ता तो आजतागायत…..

तिसरी/ चौथी पर्यंत गोष्टीची पुस्तकं आली खजिन्यात…. आमचे आजोबा रेल्वेच्या शाळेत मुख्याध्यापक होते, शाळेच्या लायब्ररीतली पुस्तकांनी खचाखच भरलेली अनेक कपाटं हा सुट्टीचा मुख्य अजेंडा असायचा…. मजा होती एकदम… ही गोष्टींची पुस्तकं म्हणजे गम्माडी गम्मत…. एक राज्य असतं… राजाची राजकन्या अतिशय सुस्वरूप असते… ती सहसा नवसानेच झालेली असते, आणि दिसामाजी तिचे सौंदर्य वाढत गेलेले असते…. ती तिच्या मैत्रीणींबरोबर राजवाड्याच्या गच्चीत खेळत असते मग हवेत उडणारा दुष्ट राक्षस येतो आणि तिला पळवून नेतो….राजा कितीही शुर, पराक्रमी ईत्यादी असला तरी तो आणि त्याचे सैन्य राजकन्येला शोधून आणण्यासाठी दवंडी पिटण्याचा सोपा मार्ग स्विकारतात….त्या राज्यात एक हुशार, धाडसी मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईसोबत गावच्या टोकाला किंवा गावाबाहेर आणि झोपडीतच रहात असतो…..या मुलाला वडील असल्याचा उल्लेख कधीच नसतो….मग दवंडी ऐकल्यावर आई मुलाला शिदोरी बांधून देते…. हा मुलगा निघतो , वाटेत त्याला साधू, परी, ऋषी कोणितरी भेटून त्या राक्षसाचा प्राण अमुकढमूक मधे आहे हे तरी सांगतात किंवा काहितरी जादूची वस्तू तरी देतात 🙂 …. हाच आशय असलेल्या कथा किती वाचल्यात माहित नाही….

दिड किंवा दोन रूपये ईतकीच किंमत असलेली ही पुस्तकं स्वत:च एक जादू होती….. रामायण, महाभारत, असेच ओळखीचे झाले . मग कळलं अश्या कथांना mythological  कथा म्हणतात 🙂  … मग चंपक, चांदोबा, ठकठक , पंचतंत्र, अकबर-बिरबल, ईसापनिती, तेनालीरामन, जातक कथांचे दिवस आले आणि कोल्हा, मगर, सिंह, वाघ, बगळे, ससे वगैरे यच्चयावत प्राणीसृष्टी बोलू लागली…. अरेबियन नाईट्स, सिंदबादच्या सफरी, हिमगौरी, अलीबाबा सगळ्यांशी ओळख होत गेली…. Moral stories /बोधकथा किती सहज आपल्याला एखादे नितीतत्त्व शिकवू शकते हे आता मुलांना गोष्टी सांगताना जाणवते…. चलरे भोपळ्या असो, की लाकूडतोड्या असो, कावळा चिमणी असो की माकड-मगर असो मुलांची झटकन मैत्री होते या सगळ्यांशी!!

कॉमिक्स तर अतिशय आवडते… एकिकडे ढगासारख्या आकारात काहितरी लिहीलेले तर त्याच चौकटीत बोलणाऱ्याचे चित्र…. कुठल्याही खेळण्यांपेक्षा यांचे मोल निश्चितच जास्त होते!!! चाचा चौधरी आणि साबूने तर एक काळ गाजवला होता, कितीही मारा धोपटा, समुद्रात टाका तो राका परत यायचाच….. आम्ही सुट्टीत आजीकडे म्हणून जाण्यासाठी म्हणून रेल्वे स्टेशनला गेलो की मी आमच्या आजोबांना पैसे मागायचे पुस्तक घ्यायला, आणि ते दर सुट्टीत मला रागावायचे की तुला ५० पैसे देतो, तिथेच स्टॉलसमोर उभी राहून वाच, तसेही घेतलेले पुस्तक खूप काळ पुरत नाही तूला , मग बडबड सुरू करतेस पुन्हा 🙂 …. असे म्हणायचे तरीही पैसे द्यायचेच ते आणि मग ते पुस्तक अजूनच आवडायचे…. माझ्या दुसऱ्या आजोबांनी मला चौथीत दिलेले ’श्यामची आई’ माझ्याकडे अजूनही आहे, अगदी मस्कतलाही….. पिवळी पानं झालेलं ते पुस्तक मधेच नजरेस पडतं आणि सुखावतं….

शिवाजीमहाराज, ज्ञानेश्वर आदि संत शाळेच्या ईतिहासाबरोबरच या गोष्टींच्या पुस्तकांतून जास्त ओळखीचे झाले….. बाबासाहेब पुरंदऱ्यांचे शिवचरित्र वाचून महाराज आदरस्थान होत होते !!

पेपरमधल्या रंगीबेरंगी चित्र असलेल्या पुरवण्या पहात आणि त्यातलं लहान मुलांचं सदर वाचता वाचता हळूच कधीतरी ललीतही यादीत आलं, मग ते आपल्याला झेपतयं असंही वाटायला लागलं….. लोकप्रभा, चित्रलेखा, जी वगैरे मासिकं चाळता चाळता वाचलीही जाऊ लागली…. मागे एकदा मी बाबांना विचारलही होतं की तुम्ही पुस्तकं बदलायला आम्हाला पाठवायचे ते सहज की वाचनाची गोडी लागावी म्हणून?? त्यावर ते हसले नुसते नेहेमीप्रमाणे, पण दर आठवड्याला होणाऱ्या या लायब्ररी वारीने मला वाचाळ बनवण्यात मोठा वाटा उचललाय 🙂

बारावी संपल्यावर कादंबरी वाचनाची ऑफीशियल परवानगी मिळाली 😉 त्याआधि पु.लं. की वपू हे चर्चेचे मुख्य कारण असायचे…. नंतर पु.लं.चे खुसखूशीत गुदगूल्या केल्यासारखे हलकेफूलके लिखाण तर व.पुंचे मोजक्या शब्दातले अत्यंत नेटके विचार, यांच्यात आपल्याला तूलना नकोय तर  ते दोन्ही अतिशय आवडते हे ही समजले!! एकदा सुहास शिरवळकर वाचले आणि मग झपाटल्यासारखे शिरवळकरांची पुस्तकं वाचली….. व.पुं ची पार्टनर, तप्तपदी, आपण सारे अर्जून, ठिकरी, ही वाट एकटीची किती नावं घ्यायची , निदान एकदा तरी वाचली गेलीच पाहिजेत ही पुस्तकं!! एकदा वाचली की आपोआपच ती पुन्हा पुन्हा वाचली जातात, दरवेळेस नवे काही गवसते आणि त्यातून…. दासबोध जसे कधिही बदलत नाही तसेच व.पुं.ची वाक्य , अगदी मनाच्या प्रत्येक अवस्थेवर नेमके भाष्य करणारी!!!

आमच्या हॉस्टेलवाचनाची मात्र गंमत होती , मुली जेव्हा वेगळ्या कथांमधली , त्यातही काही मोजकीच पानं वाचायला लागल्या तेव्हा मी nancy drew वाचायला घेतले, ईंग्लिश वाचनाचा तो पहिला अनूभव आणि तोच मला जास्त आवडायचा…. मग मोठी पुस्तकं वाचणाऱ्या मैत्रीणी आम्हाला ’बच्चे’ 🙂 असं चिडवायच्या….. पण तिथेही मी बरेचदा मराठी पुस्तकं घेऊनच जायचे, ईंजिनीयरिंगची पुस्तकं जड आणि जाड आहेत यावर आम्हा मैत्रीणींचं एकमत व्हायचं आणि आम्ही कथा/ कादंबऱ्या वाचायचो!! 😉

आज खरं तर यादी करत होते, साधारणपणे आजवर वाचलेल्या पुस्तकांची आणि पुढे कुठली पुस्तकं वाचायची आहेत याची…. रणजीत देसाईंचे श्रीमान योगी,स्वामी, राऊ, राधेय असोत की शिवाजी सावंतांचे मृत्यंजय, छावा असो, विश्वास पाटलांचे संभाजी, पानिपत, झाडाझडती असोत,  गोनीदांचे पडघवली, शितू, दास डोंगरी रहातो, दुर्गभ्रमण असो की सावरकरांचे माझी जन्मठेप असो, ना.सं. ईनामदारांचे शहेनशहा , रविंद्र भटांचे भेदीले शुन्यमंडळा, भगीरथ, असो, श्री.ना. पेंडसेंचे गारंबीचा बापू असो, अनिल अवचटांची पुस्तकं असोत, हेच का कमलाबाई ओगलेंचे रुचिरा असो, हवेच नाही आपल्याकडे!!! त्याचबरोबर नव्या पुस्तकांमधले अभय बंगांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग, अलका मांडकेंचे हृदयस्थ हे ही हवेच…… यादी प्रचंड मोठी आहे ही, आज आठवू म्हटले तरी भराभर आठवलेली ही काही वाचलेली पण संग्रही ठेवायची पुस्तकं!!!

पुढे शिव खेरांच्या You Can Win, पासून सुरू झालेली प्रेरणादायक, यशाचा मंत्र देणारी अनेक पुस्तकं…. यात विठ्ठल कामतांच्या ईडली ऑर्किडचाही समावेश होतो…. रॉबिन शर्माने तर अनेक दिवस पुरणारे वैचारिक खाद्य दिले…. चेतन भगतनेही सोप्या भाषेतली पुस्तकं आणली…. हेरंबने पाठवलेले white tiger ही असेच, आधि रटाळ वाटलेले पण पकड घेणारे पुस्तकं!!!हेरंबनेच अनेक ई-पुस्तकांचा खजिना पाठवलेला आहे, पण वाचन म्हणजे निवांत उशीला टेकून करायचे काम, ते मला लॅपटॉपवर एक दोन पानांच्या वर वाचायला अजूनही आवडलेले नाही, त्यामूळे त्याचा मुहुर्त काही अजून लागलेला नाही!!!

कित्येक पुस्तकांमधल्या अधोरेखीत करून ठेवलेल्या, किंवा डायरीमधे लिहून ठेवलेल्या ओळी कधीतरी उदास असताना सोबत करतात, आणि जगण्याची उर्मी पुन्हा देतात….. कधी हसवतात, कधी चटका लावतात पण मोहवतात हे खरे!! 🙂 यावेळेस मायदेशातून आणलेल्या पुस्तकांवर २ पोस्ट लिहून झाल्यात तरी बरीच पुस्तकं बाकी आहेत अजून…. डॉ. आनंद नाडकर्णी, आणि अल्बर्ट ईलीसची विवेकनिष्ठ मानसोपचार हे विषय सध्या टारगेट आहेत माझे!!

वाचनाला निवांत वेळ मिळणं हे ही खरं तर भाग्याचे लक्षणं आहे, हे भाग्य ज्याच्या नशीबात त्याचा मला नेहेमी हेवा वाटतो!! मधे एकदा मला कधीतरी लायब्ररीयनच व्हावे असा विचार आला होता…. कितीही अधाशासारखे वाचले तरी वाचन उरणारच आहे हे माहिती आणि मान्य असले तरी, कोणाच्या घरी गेले आणि व्यवस्थीत मांडलेली पुस्तकं दिसली की त्या पुस्तकांच्या कपाटाकडेच लक्ष जाते!! शाळेत निबंधाला विषय असायचा ’वाचाल तर वाचाल’ तेव्हा मी कधीही नाही लिहायची या विषयावर निबंध, त्यापेक्षा मी अमुक ढमूक झाले तर, किंवा अमकेतमके बोलू लागले तर हे माझे आवडते विषय होते…… पण मुळातच वाचाळ असल्यामूळे तो निबंध आज लिहून काढतेय असे वाटतेय कारण पुन्हा मायदेशात जायचे आहे आणि पुन्हा नवी पुस्तकं आणायची आहेत….. स्वत:ला वाचनाचे वेड असले तरी हा साठा पुढे मुलांपर्यंतही न्यायचा आहे…. टि.व्ही., लॅपटॉपमधे रमलेल्या मुलाला पुस्तकं वाचायला लावायची आहेत….

कामं फार आहेत नाही…. थांबावे का इथेच…. कित्येक पुस्तकांचे, लेखकांचे नावही आलेले नसावे पोस्टमधे, हरकत नाही, अचानक नाव आठवले नसले तरी मनात कुठेतरी नोंद असेलच…आज ना उद्या आठवतील नावं!!

कितीही लिहीले तरी ’अपुर्ण’ अशी एक पोस्ट टाकतेय याची जाणीव मनात ठेवून आज थांबतेय इथेच……

 

34 thoughts on “वाचाळ…..

 1. Chan ahe lekh. Tumhi ullekh keleli pustake pratekane ekdatari vachalich pahijet. Mala swatala vachanacha prachand nad ahe. Aai chief librarian asalyamule lahanpanapasunach khup chan pustake vachayala milali. Sadhya sudha sakali 8.15 am te ratri 11.00 as hectic shedule asal tari vachanakarata ardha tas rakhun thevalela ahe. Nukach ‘Anant Samant ‘yanch ‘Avirat’ vachun zal .(5th time).Khup chan ahe. Milal tar jarur vacha.

  • अश्विनी आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

   आई chief librarian म्हणजे मजा अक्षरश: ….. वाचनं म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय हे वाचणाऱ्यालाच समजते नाही का 🙂

   तू /तुम्ही सुचवलेले पुस्तक नक्कीच वा्चेन मी!! पुन्हा एकदा आभार!!

 2. ताई,
  अगं मस्त नॉस्टॅल्जिक पोस्ट झालीय! त्या परीकथा, राजकुमार, जादूची अंगठी, जादूचा रूमाल ह्या गोष्टी तर माझा जीव की प्राण होत्या…अजूनही घरी कुठेतरी आवराआवरी करताना दिसतात ही पुस्तकं आणि मी उघडून पुन्हापुन्हा वाचत राहतो…
  इसापनीतीची तर मी लहानपणीच पारायणं केली होती…चाचा चौधरीचा मी फॅन होतोच पण एकदा उत्तर भारतात ट्रेनने गेलो असता, सुपर कमांडो ध्रुव, नागराज वगैरेंचीही ओळख झाली आणि वेड लागलं…दिवस बदलले तशी वेडं बदलली…पण पुस्तकं हा कॉमन फॅक्टर होताच…सगळीच सफर घडवलीस बघ…इथे वजनाच्या प्रॉब्लेममुळे (आणि आई भरमसाठ वस्तू बॅगेत भरत असल्याने) पुस्तके आणणं होत नाही…मग इ-पुस्तकांवर भागवतो..पण
  >>पण वाचन म्हणजे निवांत उशीला टेकून करायचे काम, ते मला लॅपटॉपवर एक दोन पानांच्या वर वाचायला अजूनही आवडलेले नाही, त्यामूळे त्याचा मुहुर्त काही अजून लागलेला नाही!!
  हे अगदी अगदी अगदी खरं आहे…मी कसाबसा वाचतो इ-पुस्तकं.. 😦
  तुला बोलता बोलता मीपण नॉस्टॅक्जिक झालो बघ! 🙂

  • >>>>अजूनही घरी कुठेतरी आवराआवरी करताना दिसतात ही पुस्तकं आणि मी उघडून पुन्हापुन्हा वाचत राहतो… 🙂

   मी पण…. मग आई ओरडते वाचत नको बसूस आता, आवर आधि पटापट…. जुन्या पत्रांबाबतही हेच…. आजोबांची, नातेवाईकांची, मैत्रीणींची , अमितची 😉 अशी आवराआवरीत सापडतात मग भर पसाऱ्यात फतकल मारून तास दोन तास मी ते वाचत बसते!! 🙂 तेव्हढ्यात आई बाकि पसारा आवरून टाकते 🙂

   बाकि काकू यावेळेस याच्या बॅगेत अजून एक किलो समान भरा हो, माझ्यातर्फे!! 🙂

   आणि हे नको असेल तर कुटूंबकबिला हवा हो सोबत, मग आणता येतात पुस्तकं मुलांच्या तिकीटावर… 😉

 3. ताई,

  अगदी मस्त झालीये पोस्ट. चंपक, चांदोबा, ठकठक, अकबर-बिरबल या पुस्तकाची खरच अगदी वेड लावलेलं. आणि शक्यतो ती एक-दोन दिवसात वाचून संपल्याने माझे पण मामा लोक असेच वैतागायचे. (बाकी चंपक मी अजूनही वाचतो :))

  बारावी संपल्यावर कादंबरी वाचनाची ऑफीशियल परवानगी मिळाली . अगदी सेम.
  कॉलेजात असताना सुहास शिरवळकर च्या पुस्तकाबद्दल हि तेच.

  >>पण वाचन म्हणजे निवांत उशीला टेकून करायचे काम, ते मला लॅपटॉपवर एक दोन पानांच्या वर वाचायला अजूनही आवडलेले नाही, त्यामूळे त्याचा मुहुर्त काही अजून लागलेला नाही!!
  —- हे अगदी खर आहे. पुस्तक अगदी एक-दोन दिवसात वाचून संपतील. पण इ-पुस्तक मी अजून १०-१५ पानाच्या वर वाचून नाही झालेलं.

  • सचिन आभार कमेंटसाठी आणि सेम पिंच 🙂

   (बाकी चंपक मी अजूनही वाचतो 🙂 )…. हे पण मी पण 🙂 .. ईशानला घेऊन देते आणि मग त्याच्याशी भांडत वाचते… मग तो ते लपवून ठेवतो… मी लहानपणी माझी गोष्टीची पुस्तकं ईतर भावंडांनी घेऊ नयेत म्हणून लपवायचे तसे!! 🙂

   ई-बुकांबाबत तर आपल्या सगळ्यांचे एकमत झालेले आहे!!! 🙂

 4. तन्वी, खरंच किती लिहिलं तरी ‘अपूर्ण’ अशी ही पोस्ट आहे. आवडलेल्या सगळ्या पुस्तकांची नावं एकदम आठवण शक्यच नाही.

  ‘मी, अल्बर्ट एलीस’ नुकतंच वाचलं. छान आहे. वाचलंस की लिही त्याच्याविषयी.

  • गौराबाई आभार गं!!

   अगं अल्बर्ट ईलीस एकदा वाचून झालयं माझं!! पुन्हा वाचणार आहे आता… सध्या डॉ. आनंद नाडकर्णींचे ’शहाण्यांचा सायकियाट्रीस्ट’ वाचले….

   आणि अल्बर्ट ईलीस वर माझ्याऐवजी तूच लिही म्हणेन मी… तूझी थोरोची पोस्ट वाचल्यावर तर मी तूला आग्रहच करतेय की लिही त्याबद्दल…

   विवेकनिष्ठ मानसोपचार , जाम आवडलाय मला हा प्रकार!! तसाच आत्ताच्या पुस्तकात एक शब्द आलाय ’सायकोसोशल’ … शब्दाशब्दांमधेही किती ताकद असते नाही!!

 5. माझे फेवरेट होते इर्वींग वॅलेस, ऍलिस्टर मॅकलिन्स आणि हेरॉल्ड रॉबिन्स! मराठी मधे जे काही हाती पडेल ते वाचायचो.
  पोस्ट मस्त आहे . खूप जून्या पुस्तकांची आठवण झाली . गुरुनाथ नाईक, बाबूराव अर्नाळकर वगैरे तर फेवरेट होते कित्येक वर्ष. 🙂

  • महेंद्रजी तूम्ही लिहीलेली पुस्तकं वाचलेली नाहीत मी 😦 … पण ज्याअर्थी तुम्ही फेव्हरेट लिस्टमधे ते नोंदताय त्याअर्थी ते छानच असणार….

   ही पोस्ट लिहीतानाच जाणवतं होतं की किती अल्पवाचन झालयं आपलं आत्ताशी… खूप वाचायला हवयं अजूनही!!
   गुरूनाथ नाईक, बाबूराव अर्नाळकर माझा मामा वाचायचा… त्याच्यातले आणि तुमच्यातले आणि एक साम्यस्थळ 🙂

   आभार 🙂

 6. Hey Tanvi,

  Same pinch…. 🙂 Agadi manatla lihilays…
  >>पण वाचन म्हणजे निवांत उशीला टेकून करायचे काम, ते मला लॅपटॉपवर एक दोन पानांच्या वर वाचायला अजूनही आवडलेले नाही, त्यामूळे त्याचा मुहुर्त काही अजून लागलेला नाही!!
  —- हे अगदी खर आहे. पुस्तक अगदी एक-दोन दिवसात वाचून संपतील. पण इ-पुस्तक मी अजून १०-१५ पानाच्या वर वाचून नाही झालेलं.

  Apan evdhe computer savvy lok, pan vachan matra he asach hava.. computer waracha wachan tevdha sukhad anubhav nahi det.. Arthat, tuzya sarkhe kahi blogs sodun… 🙂 Laukarach tuze lekh pustak swarupaat baghayla milave hi sadichcha…

  Regards,
  Priti.

  • प्रिती आभार गं!!

   त्या ई-बुकांनी बिचाऱ्यांनी खरं तर जेव्हा आपल्याला वाचायला काहीच नसते तेव्हा आपली साथ केलीये आणि आपण बघ सगळे एकमताने निषेध करतोय त्यांचा…. ते पण मनात रागावत असतील आपल्यावर 🙂

   >>>.Arthat, tuzya sarkhe kahi blogs sodun… 🙂 Laukarach tuze lekh pustak swarupaat baghayla milave hi sadichcha…

   आज वजनकाट्यावर चढावे लागेल बहुधा… मुठभर की किलोभर चढलयं ते बघायला 🙂

   आभार गं पुन्हा एकदा….

 7. >> तन्वी, खरंच किती लिहिलं तरी ‘अपूर्ण’ अशी ही पोस्ट आहे.

  +२३४५३४५३५६४११२१३४२३४

  झक्कास झालीये एकदम पोस्ट.. खूप आठवणी जाग्या झाल्या..

  दहावीच्या सुट्टीत ‘पार्टनर’ मुळे वपुंचा पंखा झालो आणि ते थेट त्यांची तोवर प्रकाशित झालेली सगळी पुस्तकं वाचली आणि मगच थांबलो. ‘व्यक्ती आणि वल्ली’ नंतर असाच पुल वाचत सुटलो. रत्नाकर मतकरी, अनिल अवचट, रणजित देसाई ……. !! किती नावं घ्यावीत !

  रॉबिन शर्माच्या ‘ग्रेटनेस गाईड’ चा मी ऑलटाईम पंखा आहे. तसंच भगतच्या FPS ची पारायणं झालीत. (बाकीची तीन बेक्कार आहेत एकदम) .. जॉन ग्रिशम तर सगळ्यांचा बाप. सस्पेन्स/थ्रिलर काय लिहितो तो !! खालीद हुसेनी पण अप्रतिम लिहितो.

  इ-बुक्स वाचायला मलाही कंटाळा येतो खूप. पण समथिंग इज बेटर द्यान अज्याबात नथिंग !!

  (कसली भरकट प्रतिक्रिया झालीये…!!! असो.. पर भावनाओंको समझो 😉 )

   • 🙂

    वाचाळ आणि खेकडाळ 😉

    (लोक म्हणतील जिथे तिथे यांचे खेकडापुराण सुरू होते… काय करावे रे…. थांबवावे की लिहीत रहावे? )

  • हेरंब्स आभार्स!! 🙂

   अरे हो ना , तू पाठवलेली ई-बुकं वाचायची बाकि आहेत रे अजूनही… जॉन ग्रिशमबद्दल तू ईतके लिहीलेस खरं तर आधि वाचायला घ्यायला हवे, पण भारतातून आणलेली पुस्तकं आणि ई-बुकं यात पुस्तकं जिंकतात नेहेमी!! बाकि दिग्विजयी ’कं’ बद्दल आपण दोघेही किती/ आणि कितीवेळा बोलणार, तो ही असतोच सोबतीला सावलीसारखा…. पण ये नही चलेगा… लवकरात लवकर हम वाचेंगेच जॉन ग्रिशम भी!!

   >>>इ-बुक्स वाचायला मलाही कंटाळा येतो खूप. पण समथिंग इज बेटर द्यान अज्याबात नथिंग !!
   लय खरं !! 🙂

   भरकट प्रतिक्रीया या शब्दावर आक्षेप नोंदवत मी माझी भरकट थांबवते आता 🙂

 8. तन्वी,
  तुझ्या पोस्ट नेहमीच वाचनीय असतात व त्या त्या मला त्या त्या भाव विश्वात हिंडवून आणतात. व मग असा लंबाचवडा निबंध उत्तरादाखल तय्यार होतो. तुला वाचनाची आवड आहे हे ठीक पण तुझ्या पोस्टच्या वाचकांनाही हे काय मधेच उपटलंय म्हणून बहूतेक वाचून काढावा लागत असावा. बिच्चारे!

  आताच बघ ना, मला लगेच माझा बालपणीचा तो सुखद साठ एक वर्षां पुर्वीचा काळ आठवला. अगदि जेव्हा कधी मी वाचायला लागलोय तेव्हा पासून माझ्या हातात पुस्तक हे असायचेच. तेव्हा जोडाक्षर विरहित गोष्टींची पुस्तके असत तर पुढे जे मिळेल ते! आमचे घरचेच पुस्तकांचे दुकान असल्याने रोज रात्री दुकातून येतांना दादा पुस्तके घेऊन यायचे व दुसऱ्या दिवशी वाचून ती परत करायची की दुसरा ..तिसरा लॉट हजर. आणलेल्या पुस्तकांना कव्हर घालायचेच… पाने दुमडायची नाहीत…पुस्तके खराब झालीत तर पुन्हा मिळणार नाहीत ही तंबी! पण त्यामुळे पुस्तके चांगल्या प्रकारे हाताळायची हे बाळकडूच मिळाले.

  आमची अभिनव वाचनालय ह्या नावाची लायब्ररीच नाशिकरोड ला होती. बरीच वर्षे दादाच चालवायचे. पुढे नाशिकरोड नगरपालिका झाल्यावर नावा व सर्व पु्स्तकांसह ती त्यांनी नगरपालिके कडे सुपूर्त केली. आजहि ती चालू आहे!

  नाशिकला आमच्या वाड्या जवळच सरकारवाडा आहे. तेथे खाली मुख्य पोलीस कचेरी व त्याचा वरचा संपूर्ण मजला हा नाशिकच्या सार्वजनिक वाचनालया कडे असे व मी त्यांचा तहहयात सभासद तिथेच पडिक !

  तू नॊंदवलीस त्यातील जुनी अशी बहुतेक पुस्तके मी ही वाचलेली आहेत. माझे सर्व जीवन त्यावरच पोसले गेले आहे. तेव्हा एक लेखक पकडला त्यांची सर्व पुस्तके वाचून काढायचीच. आचार्य अत्रे, ना सी फडके, त्यांच्या तले वाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, नाशिकचेच, मोरोपंत–वामन पंडीत ह्यांची काव्ये सुध्दा ! आता ती नावे इथे लिहू लागलो तर कित्येक पाने होतील. पुण्यात आल्यावर इथल्या नगर वाचनालय व भा ई सं मंडळाचा तहहयात सभासद व मग इतीहासाची गोडी ! असो

  पण जसे नोकरी धंद्याला लागलो तशी ही संवय कमी होत गेली व आता सेवानिवृत्तीत भरपूर वेळ असूनहि वाचावयाची इच्छाशक्तीच नाहिशी झालीय !

  मग ताकाची तहान तुझ्या ’दुधा’ सारख्या पोस्ट वर भागवतो झालं !

  • काका मी तुम्हाला मागच्याच एका प्रतिक्रीयेत म्हटलंय ना मी तुमच्या निबंध प्रतिक्रीयांची वाट पहात असते!! कारण तुम्हीही मला तुमच्या बालपणाची आणि माझ्या आजोळाची सफर करवता… 🙂

   अभिनव वाचनालय आहे अजून नासिकरोडला, माझ्या बिटकोच्या घराच्या अगदी जवळ!! यावेळेस गेले की तुमची आठवण येईल…

   >>>>तुला वाचनाची आवड आहे हे ठीक पण तुझ्या पोस्टच्या वाचकांनाही हे काय मधेच उपटलंय म्हणून बहूतेक वाचून काढावा लागत असावा. बिच्चारे!

   उलट मी म्हणेन की ६० वर्षापुर्वीची सहल होते आमची…. 🙂

   • >>>>तुला वाचनाची आवड आहे हे ठीक पण तुझ्या पोस्टच्या वाचकांनाही हे काय मधेच उपटलंय म्हणून बहूतेक वाचून काढावा लागत असावा. बिच्चारे!    हे तुला नाही गं! तुझे पोस्ट-वाचक गप्प आहेत त्यावरून समजून जाउया ना !


    आताच्या अभिनव वाचनालयात तेव्हाच्या संस्थापकाचे नाव तरी ठेवले आहे का… मला माहित नाही. बघुन आल्यावर सांग !

   • नक्की सांगते काका, ४ नोव्हे. ला येतेय मी भारतात… 🙂

    आले की बोलेनच तुमच्याशी….

 9. त्या जादू, राजकन्या, राक्षस वगैरे गोष्टीच्या पुस्तकांनी वाचायची आवड लावली.
  मी तर लहानपणी रॉबिनहूड , सिंदबादच्या सफरी , अरेबियन नाईटस्‌ , फास्टर फेणे वगैरेंची पारायणं केलीत… 😉
  खरंच, तुझी पोस्ट वाचून नॉस्टॅल्जिक झाले. आतापर्यंत वाचलेली सगळी पुस्तकं मनात पिंगा घालू लागली.
  >> टि.व्ही., लॅपटॉपमधे रमलेल्या मुलाला पुस्तकं वाचायला लावायची आहेत….
  एकदम पटेश. मी ही श्रृतीला वाचनाची आवड लावायचा प्रयत्न करतेय्‌.
  बाकी लॅपटॉपवर वाचायला मलाही आवडत नाही. मस्तपैकी गादीवर उताणं पडून हाताला हनुवटीचा आधार देत वाचणं म्हणजे परमानंद!!!

  • प्रज्ञा आभार गं!! 🙂

   >>> मस्तपैकी गादीवर उताणं पडून हाताला हनुवटीचा आधार देत वाचणं म्हणजे परमानंद!!!

   +१००

   फक्त अभ्यासाच्यावेळेस त्याच पुस्तकावर डोके ठेवून मस्त डुलकी लागते 😉

  • सविता माझ्याहीकडे टि.व्ही. लग्नानंतर आणि ईशान लहान असतानाही बरेच दिवस नव्हता….

   खरयं तुझं वाचनात नक्कीच अडचण होते या माध्यमांची… मुलांबाबत तर वाचन हे तसे स्लो मिडीयम होते कारण टि.व्ही. ,लॅपटॉप मधे चमच्याने भरवले जाते सगळे पण वाचन म्हटले तर स्वत:ला वेळ द्यावा लागतो….

   जाणिवपुर्वक प्रयत्न करणे हाच एक उपाय दिसतोय मला सध्या!! 🙂

 10. Tanvi, tumhee koNee Kishor vachala nahiye ka? may be it was no longer in circulation for you people. and that’s sad, karaN ek atyanta darjedar asa maseek mhaNun mazya kayam lakshat raheel Kishor.
  tasach Kumar cha divaLee anka aksharasha: udya padayachya Nee bhandaNa vayachee kuNee adhee vachayaycha mhaNun!
  . maratheetale sagaLe namavanta ya maseekanmadhun mulansathee khaas lekhan karayache. Bha Ra Bhagvat, Vin Da karandeekar,
  Ramesh Mantreencha Disneyland America ya vishayavar cha lekha mee vachala aNee tya veLeech tharavun takala kee I must land in this palce. very stimulating, entertaining and educative literature..

  • स्मिता मला वाटतेय मी किशोर वाचायचे… A4 आकारात मोठे पुस्तक असायचे का ते? तसाच ’छोटा दोस्त’ नावाचे मासिकही होते….

   प्रतिक्रीयेसाठी आभार गं!!! या पोस्टमधे बरेच पुस्तकं उल्लेखलेली नाहियेत, पोस्ट लिहीताना जे जे आठवत गेले ते नोंदवत गेले मी!! 🙂

   >>very stimulating, entertaining and educative literature..
   अगदी खरं!!!

 11. तन्वीताई खुप सुंदर पोस्ट, लहानपणीच्या प्रत्येक गोष्टींबद्दल अगदी असंच घडलंय… पण अश्यात तुमच्या मानानं माझं वाचन खुपच कमी झालंय… मध्यंतरी हेरंबच्या कृपेने काही पुस्तकं पुण्यातून घेतली आणि वाचायला सुरुवात केली आहे.. पण आधीसारखं अधाश्यासारखं पुस्तकांवर तुटून पडणं होत नाही 😦

  • आनंदा आभार रे 🙂

   होय रे खरं तर माझंही वाचन आता मुलांच्या ईच्छेनूसार होते ….तरिही जेव्हा जमेल तसे पुस्तक हातात घेतेच….. मी वाचत नसताना तीच पुस्तकं गौरा जोरजोरात वाचते, ती जे काय वाचते ना, धमाल नुसती… त्यावरही पोस्ट होऊ शकते बघ एक 🙂

 12. Khup chan vatale ha lekh vachun…..
  Aaj pahilyanda ha blog vachala……Ani khup avadala……..
  Tu ji kahi books chi nave sangitlis na var tyatli alomot 95% vachun zalit…………
  Konitari aaplyasarkhech vede pan aahe he vachun khup anand zala……………..Vatale khup kahi bolata yeil aaplyala…………attasathi evdhech.nantar boluch niwant…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s