अ ब क ड ई…. किंवा दळण… किंवा काहिेही….

काल आठवलेला दिवाळीतल्या दिवसातला एक प्रसंग, आम्ही एका ओळखीच्यांकडे त्यांच्याच निमंत्रणानूसार गेलो होतो. नेहेमीप्रमाणे स्वागत छान पार पडले आणि गप्पा रंगायला लागल्या….. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकायला लागला तसा एक अस्वस्थपणा पसरत होता तिथे….. आम्हाला दिलेली वेळ आम्ही पाळलेली होती, मग चुकतेय काय ते समजेना….. घरातली लोकं घड्याळ पहात होते आणि मी चिडून नवऱ्याकडे पहात होते कारण सद्य मंडळी त्याच्या ओळखीची होती 🙂 तेव्हढ्यात त्या घरातलं २२-२३ वर्षाचं शेंडेफळ मित्रांकडचा फराळ आटोपून घाईघाईने घरात प्रवेशलं….. त्याने आल्या आल्या आमची दखलही न घेता आधि टिव्ही लावला आणि त्याच्याकडे आनंदाने पहाणाऱ्या त्याच्या आईकडे पाहून विचारले, “सुरू नाही ना झालं अजून?? ” माँसाहेब उत्तरल्या, “नाही जरा आहे वेळ अजून!!!”

अजूनही आम्हाला उलगडा होत नव्हता की असे काय आहे ज्याबद्दल सारे घर टिव्हीकडे ईतके आतूरतेने पहातेय!! टिव्ही पहाण्याला माझा विरोध कधीच नाही, मी स्वत: भरपुर टिव्ही पहाते… अगदी सगळ्या सिरियलांची अपनेको लिंक होती है!!! पण निदान कोणिही आले तर टिव्ही बंद ठेवावा हा नियम मी पाळते, त्यात जर आपणच निमंत्रण केले असेल तर मुलांनाही सांगितलेले असते की टिव्हीसमोर बसायचे नाही!!! लेकिन कुछ साल पहलेके किस्से मे बात अलग थी….. आता मला राग न येता उत्सूकता वाटत होती की ये राज है क्या?? माझे प्रश्न बहुधा चेहेऱ्यावर दिसले असावेत कारण त्या घरातल्या काकांनी कसंनूसं हसत सांगितलं आज किनई अवंतिकाचा शेवटचा भाग आहे, यांना फार नाद हो सिरियलांचा….. आता आज ती अवंतिका काय निर्णय घेते हा प्रश्नच आहे बघा, जाते परत सौरभकडे की नाही राम जाणे!!!  🙂

त्यादिवशी त्या फ्यामिलीचा जरा राग आला होता…. ठीक आहे पहायचाय ना तुम्हाला अवंतिकाचा शेवट मग आम्हाला का बोलावलतं वगैरे !!!! नंतर हा प्रसंग विसरलेही ….. काल मी स्वत:च टिव्ही पहात होते, कुठली एक सिरियल असे नाही सांगू शकत सॉरी….. म्हणजे मी पोळ्या आटोपल्यावर टिव्ही लावला तेव्हा लावला झी टिव्ही , हल्लीचं माझं आवडतं च्यानल….. पुर्वी नुसतं झी नसून ते झी मराठी होतं पण असंभवच्या वेळेसचं चऱ्हाट पाहिलं आणि सध्या मी माझा मराठी बाणा त्यागून भारतीयत्व स्विकारलयं….. आजकल हम बहूत हिंदीच देखते है, वैसे मधे कधीतरी आम्ही सारे खवय्ये देखते है, उसमेकी अट अभी भी वहीच है की प्रशांतबाबू दामलेच पाहिजे सुत्रसंचालन मे….. शेफ निलेश होंगे तो हम शेफली च्यानलवा बदलते है!!! रानी गुनाजीजी अगर कम बोलनेका गुन अपनावे तो हम शायद गुरूवार/शुक्रवार को भी मराठी देखेंगे!!! लेकिन सध्यातरी हिंदीच….

तश्या मराठीवर लज्जा सारख्या वेगळ्या विषयांवरच्या मालिका आहेत म्हणा, लेकिन हम हिंदीच देखते है ना आजकाल :)…. मधे कुठल्यातरी एका ब्रेकात (हो हे ब्रेक प्रकरण जाम सहीच आहे… च्यानलवाले कितीही पोटतिडकीने ओरडले की कुठेही जाऊ नका आम्ही आलोच बिलोच तरी मी का त्यांच ऐकू??? तेव्हा ब्रेकात रिमोट नक्कीच शिव्या घालत असणार एकूणातच तमाम प्रेक्षकांना, ब्रेकात रिमोटच्या बटनांवर तबला खेळला जातो अक्षरश:  ..) मी ’माझिया प्रियाला..” नावाचा प्रकार पाहिला होता , चकचकीत वातावरण आणि डायलॉग्स, आणि कटकारस्थाने का जाणे पण ओळखीची वाटली जरा मग उलगडा झाला हिंदी-मराठी बहेन बहेन हा नारा पुकारत एकता ताई इथेही दाखल झाल्यात!!!! हिंदी च्यानलांवर मराठी कुटूंब दाखवत त्या मराठीला सरावल्या असाव्या किंवा त्या सिरियलांचा टिआरपी पहाता मराठी लोक जास्त रिकामटेकडे आहेत हा निष्कर्ष त्यांच्या चतूर मनाने काढला असावा…. कारण काहिही असो मला हे प्रकरण पटले नाही तेव्हा नकोच ती सिरियल म्हणून ती बंद झाली!!!

तर >>>> काल मी स्वत:च टिव्ही पहात होते, कुठली एक सिरियल असे नाही सांगू शकत सॉरी.<<<< पासुन पुढे ….. तर वाळवंटात गॅससमोर उभे राहून पोळ्या करण्याचे दिव्य पार पाडले की मी अर्धा तास किचनकडे फिरकतही नाही, मठ्ठासारखी टिव्ही समोर बसते (म्हणजे असे काही कारण हवे असेच नाही , एरवीही मी माझ्या सिंहासनावर बसू शकते… टिव्ही समोरच्या आमच्या खुर्चीला नवरा माझे सिंहासन म्हणतो ;)) अगले जनम, पवित्र रिश्ता, ज्योती, तारक मेहेता, बात हमारी पक्की है, सास बिना ससुराल, बंदिनी , राम मिलाए जोडी, बाबा ऐसो वर….वगैरे वगैरे कोणतेतरी कार्यक्रम जोडीने, तिकडीने वगैरे चाललेले असतात… आपल्याला विषेश काही करायचे नसते  एका ब्रेकात (किंवा अधेमधेही) केव्हाही दुसरे च्यानल बदलायचे आणि सिरियली पहायच्या किंवा ऐकायच्या…. दोन्ही प्रकारात काही फरक पडत नाही कारण तत्सम सिरियलींमधे ऍक्टिंग केलीच पाहिजे अशी अट सहसा नसते त्यामूळे चलता है…. अपवाद तारक मेहेता आणि अगले जनम चा….

हे करत असताना माझ्या अचानक मनात विचार आला अरेच्या त्या दो सहेलियाँ नावाच्या सिरियलीचे काय बुवा झाले शेवटी??? आणि हाच होता तो टर्निंग प्वाईंट आणि पोस्टचा विषय!! 🙂 नमनाला टॅंकरभर तेल ओतलेय ना 🙂 दिवाळी आहे ना सध्या तळातळी चाललीये घरात म्हणून पोस्टेवरही अंमल तेलाचा जास्त हात 🙂

असो, आजका घर बैठे लखपती का सवाल है बेटियाँ, काशी, देवी, अंतरा, दो सहेलियाँ… , कसोटी जिंदगी की, १२/२४ करोल बाग, कुमकूम , वहिनीसाहेब, जुन्या वैतागात बनेगी अपनी बात ….. ह्या माझ्या माहितीतल्या आणि आत्ता आठवलेल्या काही आणि असल्याच अनेक सिरियलांचा शेवट कोणी पाहिलाय का?????? मी तर नाही पाहिलेला… मग जर सिरियलवाले एखादी सिरियल शेवटापर्यंत दाखवू शकत नाहीत, या दळणाचे पीठ पाडतात आणि पोळी करत ना्हीत तर ते दळण पहायचे का?? आहे किनई सच्चा सवाल???आज मला त्या अवंतिकाचा शेवट आमच्याकडे दुर्लक्ष करूनही नेटाने पहाणाऱ्या का्कूंचे कौतूक वाटले एकदम…. म्हटलं वर्षानूवर्षे आपण ज्या पीडेला अर्धा तास देतो आयुष्यातला त्याचा शेवट दाखवणे हे सिरियलवाल्यांचे कर्तव्य आणि आपला अधिकार आहे!!! 🙂

हे मी ईतरांना नाही स्वत:लाच विचारले काल!!! बरं मग राग आला तो स्वत:चाच कारण किती वेळ वाया जातो आपला आणि तरिही शेवट काय ईतपत उत्सूकताही असू नये आपल्याला… की या अनादी अनंत दळणाची सवय लागलीये आपल्याला…. म्हणजे अनेक जे अघोषित अलिखीत नियम असतात तसाच एक की सिरियलांना शेवट बिवट काही असू नये….

अपवाद मगा म्हटल्याप्रमाणे अगले जनम आणि तारक मेहेताचा….. अगलेजनम केवळ ताकदीच्या अभिनयासाठी आणि कथेच्या वेगळेपणासाठी , तर तारक मेहेता बद्दल काय बोलावे , अत्यंत हलकेफूलके पण उत्तम विषयांची सुंदर मांडणी यासाठी हे सोडले तर बाकि नुसतेच विषय वेगळे पण मसाला जुना असला प्रकार येतो समोर!!! राजा शिवछत्रपती दुसऱ्यांदा दाखवल्यावरही मी पुन्हा पाहिले आणि निष्कर्ष काढला महाराज आजच्या या रटाळ टिव्हीतल्या हिरोंमधेही राजा आहेत…. एकही दिवस पुन्हा कशाला पहायचे हे असे वाटले नाही ….

दरवर्षा अखेरी मनात आपण आढावा घेतो ना वर्षभर काय तीर मारलेत याचा, मी पण घेते…. मग मला नेमेची येतो मग पुन्हा हिवाळा (कारण वर्षाखेरी हिवाळा असतो 😉 ) या नियमाने आ्पण वर्षाच्या फर्स्ट हाफ मधे जरा सद्वर्तनी झालो होतो, टिव्ही आणि तत्सम गोष्टींवर कमी वेळ घालवायचो हे आठवते, त्याचबरोबर सेकंड हाफात आधिचे नियम विसरत अंगात आळशीपणा वाढवत आपण खूप टिव्ही पा्हिला वगैरे जाणीव होते …. मग मी नित्यनेमाने टिव्ही डाएट आखते….

तरिही जाता जाता मनात येतेच की पुर्वीच्या म्हणजे मला आठवतात तेव्हाच्या सिरियल्स मधल्या (ज्या १३ भागाच्या असायच्या) तलाश, एक आभाळ संपलं, पार्टनर, ईंतजार,हमराही  जरा पुढच्यांमधे हसरतें, साँस, ई.ई. आठवतात मग…. पुन्हा जाणवते ठराविक भागांचे बंधन हवेच…. आणि त्यांना नसेल ते पाळता येत तर निदान आपल्या स्वत:वर तरी बंधन हवेच … कशाला पहायच्या ईतक्या लांबलचक, अनिर्णित, अशेवट असणाऱ्या कहाण्या ??? चूकून कथा लिहीणार होते पण ’कथा’ नसतेच काही या रवंथात…. नको नको नकोच ते!!!!

थोडक्यात या दिवाळीपासून पुन्हा एक जुनाच संकल्प नव्या दमाने, ” हम अब ये सिरियल्स कमच देखेंगे!!! हमको वैताग ज्यादा नको आहे!! मोजक्या सिरियली देखेंगे… नॅट Geo, डिस्कवरी वगैरे देखेंगे…ऍनिमल प्लॅनेट मे जब किडे-माकूडे, साप, माकडं नही होंगे तो वो भी देखेंगे !!!!ब्रेकमे गप्प बसेंगे ई.ई….  ” इथे स्मायली टाकणार होते पण संकल्पाचे गांभीर्य लक्षात घेता स्मायली टाळलेला आहे…. 🙂 आणि तो इथे टाकलेला आहे!!!

आता या असल्या पोस्टला नाव देणे म्हणजे कठीण , पण एकता मातेच्या धसक्याने हल्ली मी ’क’लाच काय तर अ ब क ड ई सगळ्यालाच घाबरते म्हणून ते, किंवा सिरियलांचे (हवे तर मालिका म्हटले तरी चालेल, मी सिरियली म्हणते म्हणून ते लिहीलेय ) दळण किंवा अक्षरश: काहिही आपल्या आवडीनूसार 🙂

शेवटाचे महत्त्व मला वेळीच समजले नसल्यामूळे ज्या काकुंवर मी क्षणिक राग धरला होता त्या उदार मनाने मला माफ करतील अशी आशा ( कारण वर उल्लेखलेल्या अनेक सिरियलींची त्यांना लिंक असते मग त्या माझ्याशी त्याच विषयावर बोलतात :)) मनात धरत आता या पोस्टचा शेवट इथेच…

समाप्त!!

 

22 thoughts on “अ ब क ड ई…. किंवा दळण… किंवा काहिेही….

 1. अर्र्र्र्र्र सीरियल्स आणि माझ नेहमीच वाकड..
  तसा मी टीवी फक्त बातम्या आणि डिस्कवरीसाठी बघतो…तुझ्या नव्या संकल्पाला शुभेच्छा…आणि हो तुम्हा सर्वांना ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच देवाकडे प्रार्थना 🙂

  • सुहास बरेच दिवसाने उत्तर देतेय, त्याबद्दल आधि स्वारी 🙂

   तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा फळाला आल्या बघ…. गेल्या १५-२० दिवसात मी अतिशय कमी टिव्ही पाहिलाय 🙂

 2. तन्वी,
  एकदम बरोबर निर्णय घेतला आहेस(सिरीयल्स न बघण्याचा), मी पण नेहेमी ठरवते पण उत्सुकतेपोटी परत पाहिल्या जातात. खरोखर अर्थहीन दीर्घकथा असतात.
  तुम्हा सगळ्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • सोनाली आभार गं!!!

   जम्या जम्या मेरेको टीव्ही कम देखनेको जम्या 🙂 तू पण प्रयत्न कर जरा नेटाने (म्हणजे नेटचा वापर वाढव असे नाही 😉 ) जमेल बघ तूलाही 🙂

 3. सिरियली बघणं खरंच कमी करणार असशील तर माझ्या शुभेच्छा!
  पण तू माझी ताई आहेस, त्यामुळे इथेच ‘सिरियली’ बघणे पुन्हा सुरू केल्याची पोस्ट वाचायला मिळेल असं भाकित करतो 😛

 4. नुकत्याच पाहिलेल्या सीरियल्स पैक्य “राजा शिव छ्त्रपति” चा शेवट पाहताना मात्र खरच डोळ्यात पाणी आले……
  बाकी तुम्ही लिस्ट केलेल्या सीरियल्स म्हणजे खरच दळण त्या न पाहिलेल्याच बर्‍या…..मस्त पोस्ट….

  KEEP BLOGGING

 5. च्यायला महान कटकट असते या सिरीयली म्हणजे. सुदैवाने मी गेल्या > दहा वर्षांपासून सिरियली बघणं पूर्ण सोडून दिलं आहे… म्हणजे अगदी सो कॉल्ड रियालिटी शोही बघत नाही. फक्त एकच सिरीयल न चुकता बघतो ती म्हणजे फ्रेंड्स. आपल्या लोकांनी फ्रेंड्स सारखं काहीतरी काढण्याचा विचार केला पाहिजे. अर्थात होता होईतो त्याची वाट न लावता.. पण कठीण आहे.

  तुझ्या निर्णयाचं स्वागत.. वेलकम टू द क्लब.. 🙂

  • नशिबवान तू हेरंबा…दहा वर्ष सिरियली नाही सहीच 🙂

   अरे प्रतिक्रीयांना उत्तर देण्याआधि संकल्पाची सत्यासत्यता पाहिली, जम्या बरं का 🙂

 6. माझपण सिरीयल्सशी एकंदरीत इडियट बॉक्सशीच वाकड आहे…बाकी ते अ ब क ड ई प्रकरण खर आहे, पहिला लोक ’क’ पाहिला कि दुर व्हायचे मग ही बया पवित्र रिश्ता घेउन आली ( सुरुवातीला बरोबर जेवणाच्या वेळी लागत असल्याने पाहायला लागायची) ,सुरुवातीला कोणाला संशय आला नाही पण नंतर त्यातले ट्वीस्टस पाहिल्यावर डाउट आल्याने लोकांनी कार्यक्रमाची मानावली पाहिल्यावर हा एकतादेवींचाच आविष्कार असल्याचा बोध झाला…बाकी माझिया.. तिची आहे हे माहित नव्हत.मी ही सीरियल पाहत नसलो तरी बराच काळ माझी रिंगटोन राहिल आहे हया मालिकेच शिर्षक गीत…बाकी पोस्ट भारीच विथ लॉट्स ऑफ़ स्मायलीज… 🙂

  • राखी का ईन्साफ नक्की पहा 😉

   मी एक एपिसोड पाहिलाय , मारामाऱ्या होत्या एकदम आणि राखी राखी करून ओरडणारे लोक, अहाहा खालचा दर्जा म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण 🙂

  • संकेत आभार 🙂

   पुढची पोस्ट टाकेनच लवकर, नुकतीच भारतवारी आटोपून आलेय, त्यामूळे सध्या तरी विचार माहेराभोवती फिरताहेत!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s