निकाल….

स्टार माझा चे निकाल नुकतेच जाहीर झालेत….

’सहजच’ ला विजेत्यांच्या यादीतले सहावे स्थान मिळालेय!!! खरं तर सकाळी जी-मेलला लॉगईन केले तेव्हा सगळ्यांचे अभिनंदनाचे मेल्स पाहिल्यावर या निकालाची आठवण झाली, आणि प्रत्यक्ष निकाल पाहून मनापासून आनंद झाला!! 🙂

संपुर्ण यादी इथे आहे…

ब्लॉग माझा-३ स्पर्धा : निकाल आणि विजेते ब्लॉग्स

स्टार माझा तर्फे,ब्लॉग लेखकांसाठी,प्रिय ब्लॉग माझा-३ स्पर्धा घेण्यात आली होती. नुकतेच याचे विजेते जाहीर करण्यांत आले असून विजेत्यांची नावे व ब्लॉग्स खालील प्रमाणे.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे.http://myurmee.blogspot.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

दिड दोन वर्षाचा ब्लॉग कारकिर्दीत, मला लॅपटॉपवर काम करताना बघूनही चिडचिड न करणाऱ्या माझ्या नवऱ्याचे आज मला आभार मानायचे आहेत!! मला सातत्याने विषय पुरवणारी माझी मुलं , कायम प्रोत्साहन देणारे माझे आई-बाबा, बहिण,आजी, मामा सगळ्यांचे आभार!! स्टार माझाचे आणि परिक्षकांचेही विशेष आभार!!

या ब्लॉगवर प्रेम करणारे (किंबहूना या खर्डेघाशीला सहन करणारे) वाचक आणि ब्लॉगमूळे मिळालेले अनेक मित्र-मैत्रीणी यांचे मनापासून आभार!! तुम्ही सगळे आहात म्हणून ब्लॉगचा कोंबडा त्याचा तूरा मानाने मिरवतोय!!

तरिही यादीत स्वत:चे नाव शोधताना नकळत श्रीताई, हेरंब, रोहन, विद्याधर कुठे आहेत ते आधि शोधले जात होते…. श्रीताईचे नाव दोन्ही याद्यांमधे नाही हे पाहून सखेद आश्चर्य वाटतेय!!! हेरंब, रोहन , विद्याधर, नचिकेत उत्तेजनार्थ म्हणून पाहून देखील आनंद की आश्चर्य ह्या संमिश्र भावना मनात आहेत!!

परिक्षकांचे मतं आणि आपले वैयक्तिक मत यात अंतर असणारच असे जरी मान्य केले तरी माझ्या यशात काहितरी सुटलेय हा विचार मनात कायम रहाणार आता!!

सगळ्या विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन!!!

69 thoughts on “निकाल….

 1. Hey……Congratulations!!!!!!!!!!!

  Really feeling great & proud to have wife like you!!!!!! After all it was a worldwide contest & you have proved that you have all the capabilities. Not only of being a great wife, a great mother, a great daughter, a great friend but also a great writer with variety of matured views on various topics ranging from social importance to entertainment. This award is the proof of that……..Moreover, the thing to be noticed is you are the only lady in the list, it means TOP in Women Category…WOW……:)

  Alongside, there are really quite a few surprises as well that, Blog from Bhanasa, Rohan, Herambh, Baba, Nachiketji, Mahendraji & lot many others are not there in the list. However, getting an award may be just a formality & after all it is just a competition, wherein somebody wins some time & somebody loses sometimes. This does not mean that, they are lacking in the quality. BEST WISHES for all of them who have their names in the list & EVEN for all of them who got an inspiration to get there next time!!!!!

  Everyone should keep in mind that, “SKY IS NOT THE LIMIT, PEOPLE HAVE STEPPED EVEN ON THE MOON….”

  KEEP IT UP & KEEP BLOGGING ALL OF YOU……… Don’t forget that, the people like me (Silent readers) enjoys reading quality blogs & posts which I believe is nothing but a true award for any writer.

  Amit

  • महेंद्रजी आभार 🙂

   तुमचा फोन येऊन गेल्याचे सांगितले आईने!! आई- बाबा खूप खूश आहेत आज आणि त्यामूळे मला जास्त आनंद होतोय!! 🙂

 2. अभिनंदन.
  काहितरी सुटलेय हा विचार मनातून काढण्याचा प्रयत्न करावा.
  निर्दोष निकाल कधीच असू शकत नाही. कारण प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतोच.
  विजेत्या ब्लॉगरमध्ये महिलाब्लॉगर कमी आहेत, ही बाब मात्र खटकली. त्यासाठी अधिकाधीक स्त्री वर्गाने ब्लॉगींग करावे, या साठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे वाटते.
  या निमित्ताने का होईना तुमच्या ब्लॉगवर येणे झाले, हेही नसे थोडके.
  असो, पुनश्च: अभिनंदन.

 3. तन्वे नचिकेत व माझ्यातर्फे मन:पूर्वक अभिनंदन! अतिशय आनंद झाला तुझे यश पाहून. अशीच भरभरून लिहित रहा. आम्ही आहोतच वाट पाहत. 🙂 पुन्हा एकदा तुझे व यश मिळालेल्या सगळ्य़ांचे अभिनंदन!

 4. कुठेही काहीही सुटलेलं वगैरे नाहीये ग.. उगाच काहीतरी विचार करत राहू नकोस.. छान यश मिळालंय ते मस्तपैकी एन्जॉय कर.. मनापासून अभिनंदन.. खूप आनंद झाला खरंच.. !!

 5. तन्वी ताई,
  सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन..
  त्यानंतर अजून खूप खूप अभिनंदन…
  मग अजून खूप खूप अभिनंदन आणि शेवटी..
  अजून खूप खूप खूप अभिनंदन!
  🙂 🙂 🙂 ………………………………………..+१११११११११

  लिहती राहा,वाचायला आम्ही आहोतच…

  • प्रिती आभार गं!! 🙂

   नक्कीच… काल निकाल ऐकला तेव्हा नव्हते जाणवले आता हळूहळू जबाबदारी वाढल्यासारखे वाटतेय!!

  • आभार गं जयश्री 🙂

   येस… तू येतेयेस ना भारतात डिसेंबरात, मी प्रयत्न करतेय नक्की… भेटुया नक्की आपण ..धमाल येईल 🙂

  • आभार आनंदा… 🙂

   एक काम करूया, तू हैद्राबादला दे पार्टी, विभी मुंबईला, मी (सध्या) नासिकला….. आणि तुम्ही मस्कतला कधी येता बोला, मग तर मेगा पार्टी 🙂

  • नरेंद्र आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

   त्याचबरोबर तुमचेही मनापासून अभिनंदन 🙂

   योग्य आहे तुम्ही म्हणताय ते, मला वाटतं मी जे लिहीलेय ते काल निकाल ऐकल्याबरोबर जे जसे मनात आले ते आहे…. आणि ज्या ब्लॉग्सबाबत मी ते लिहीलेय त्या व्यक्तींशी ब्लॉग्समार्फत झालेली ओळख ही आता वैयक्तिक ऋणानूबंधाची आहे , तसेच त्यापैकी सगळ्यांचे लिखाण उत्तम असल्यामूळॆ हे विचार मनात आले माझ्या!!

   आनंद निश्चितच खूप खूप आहे!! 🙂

 6. व्वा ! तन्वी ! कमाल केलीस ! पण मला आश्चर्य मात्र बिलकूल वाटले नाही ! माझ्या सारख्या सामान्यातील सामान्याला सुध्दा जिच्या ब्लॉग ने जिव्हाळा लावला नव्हे मला उत्साहित..उद्यापित केले… ( मला नेमके काय म्हणायचे आहे सुचत नाही )…. त्या ब्लॉगला
  वगळायचे, दुर्लक्षायचे कोणाला शक्य होते ?

  त्रिवार अभिनंदन !

 7. काल मी ब्लॉग्ज वाचायला सुरवात केल्यानंतर पहिली पोस्ट महेंद्रकाकांची वाचली, स्टार माझाच्या ‘ब्लॉग माझा’ च्या स्पर्धेबद्द्लची. ती वाचल्यावर मला वाटलंच की ’सहजच’ ला नंबर मिळाला असणार. माझा द्राविडी प्राणायम बघ, मी त्यानंतर स्टार माझाच्या वेबसाईट्वर गेले, तुझं नांव विजेत्यांच्या यादीत आहे हे confirm केलं, आणि आता तुझं अभिनंदन करतेय.
  मन:पूर्वक अभिनंदन.
  निकाल तसा धक्कादायक आहे. हेरंब, भानस, रोहन, विभाकर वगैरेंची नावं विजेत्यांमधे असायला हवी होती.

  • प्रज्ञा स्पेशल आभार त्या द्राविडी प्राणायमासाठी 🙂

   अगं हे असे तुम्हाला करावेसे वाटते यानेच लिहायचे, किंबहूना व्यक्त व्हायचे बळ्ं मिळते/ वाढते बघ मला!! पुन्हा एकदा आभार गं!!!

  • येस रोहणा…. तू आहेस ना भारतात… मी आले तर नक्की भेटूयात आपण 🙂

   आभार म्हणू की नको हा प्रश्न किती वेळा पडतोय बघ आता, तरिही आभार रे!! 🙂

 8. तन्वीताई !
  तुमचे हार्दिक अभिनंदन !
  थोडं उशीरा अभिनंदन करतोय ,पण चांगल्या गोष्टीला उशीर कधी झालेला नसतो हे लक्षात आहे. 🙂 चार महिन्यांपुर्वी जेंव्हा मी ब्लॉगींग सुरु केलं तेव्हा ज्या काही ब्लॉगचा मी अभ्यास केला त्यात तुमचा ब्लॉग एक होता , खरोखरं पहिल्यांदा मला आश्चर्य वाटले होतं ब्लॉग वरील लेखनाचा दर्जा इतका चांगला असू शकतो,विषयांमध्ये इतके वैविध्य असू शकतं , असं अजिबात वाटलं नव्हते. माझ्या डोक्यात काही वेगळयाच कल्पना होत्या {कारण त्या अगोदर केवळ सेलिब्रिटींच्या ब्लॉग बद्दल ऐकले, वाचलं होतं.} तुमचं लिखाण खरोखर अगदी सहजसुंदर आहे म्हणून ते वाचायला नेहमीच आवडतं, सहजच हे नाव या ब्लॉगला अगदी चपखल आहे. मी फारसं अभिप्राय दिलेले नाहीत हे खरं पण नियमीत वाचक नक्कीच आहे आणि असेन . निकालात तुमचे नाव वाचून मीच येस्स्स्स केलं , काही गोष्टी आपल्याशा होऊन जातात आणि आपली टीम जिंकल्याचा आनंद असतोच 🙂 . पुन्हा एकदा अभिनंदन ! शुभेच्छा , सदीच्छा तर सदैव आहेतच.
  लोभ असावा
  समीर पु.नाईक

  • समीर मनापासून आभार 🙂

   माझ्या लिखाणाला मिळालेल्या आणि मनात राहिलेल्या या पावत्यांमधे तूझी/ तूमची मागची पावती अगदी महत्त्वाचे स्थान मिळवून आहे… तशीच आता ही पण!!! 🙂

   अभिनंदन असो शुभेच्छा असो वा सदिच्छा असो लवकर/ उशीर ही मर्यादा येतच नाही, बरोबर आहे तुमचे!! व्यक्त करायला होतो तो उशीर पण मनात असतातच त्या…

   पुन्हा एकवार आभार!! 🙂

 9. पिंगबॅक ’स्टार माझ्या’च्या ब्लॉग माझा स्पर्धेतलं यश. | माझी मराठी

  • आभार गौराई 🙂

   होय गं खर्डेघाशी चल रही है… तूला अल्बर्ट एलीस वर लिही असे सुचवले होते, लिही गं…. एलीस तू पेलशील ताकदीने असा विश्वास वाटतोय मला….

   • तन्वी, अगं एकापाठोपाठ एक खूप पदार्थ खाल्ले, म्हणजे नंतर एकेका पदार्थाची चवच नीट आठवत नाही तसं झालंय. अल्बर्ट एलीसनंतर इतकी पुस्तकं वाचलीत, की त्यावर लिहायचं असेल तर पुन्हा एकदा डोळ्याखालून घालायला हवंय थोडंतरी. 🙂

 10. Sharyu tai chhan Likhan,shalinta,sabhyata,Gharatale sanskar tumcha Likhnat Janawate. Khupach awadlya tumchya athwani aagdi sahajach wachtana Man khup Halve zale. Tumche tar dole Bharun yet aastil lihitana. Kadhi ashrunche themb lihitana blog paper war padle astil aasa janwale. Chan ashech lihit Raha tumchya tarfe aamchya sarkhe lok sudha kahitari sahaj lihun jatil tumhala prerana sthan samjun.

  Dhanyawad

  (Kishor Samfrancisco)

  Goa.

  • किशोर आभार आणि स्वागत ब्लॉगवर 🙂

   पण एक छोटीशी गंमत झालीये….. माझे बारसे आयूष्यात दोन वेळा आधिच झालेले आहे (एक नाव आईने ठेवलेले, एक नवऱ्याने आमच्या लग्नात ) …. तूम्ही माझे ’शरयू’ असे नामकरण का केलेत पुन्हा 🙂

   बाकि कमेंट अतिशय मनापासून लिहीलीत त्याबद्दल आभार 🙂

 11. मस्त. तूझे मनापासून अभिनंदन.
  ओरिजिनल निकालातील चुकीमुळे तूझ्या ही ब्लॉगवर माझ्या उर्मी ब्लॉग ची लिंक चुकली आहे.
  ती दुरूस्ती करावी. http://myurmee.blogspot.com/

 12. सर्वप्रथम मनापासून अभिनंदन…
  आपण दुसर्या विजेत्यांचे ब्लोग वाचता का ?
  आणी वाचत आसाल तर रोखठोक प्रतिक्रिया देता का ?

  • सुखदेव आभार 🙂

   दुसऱ्या विजेत्यांचे ब्लॉग्स असे न ठरवता मी माझ्या सहज प्रवृत्तीला झेपतील असे ब्लॉग्स नियमीत वाचते आणि न विसरता प्रतिक्रीयाही मांडते!!!

  • आभार रे… 🙂

   खरं तर लवकर किंवा वेळाने असा फरक पडत नाही तरीही, उशीराचे कारण नाही उमगले मला, मेल कर!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s